Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी अगदी. ईतक काय एखाद्याल
अगदी अगदी. ईतक काय एखाद्याल गुळ्मुळीत दाखवायच.
थुत्तरफोड, हे लई भारी दक्षे.
थुत्तरफोड, हे लई भारी दक्षे. मी पहिल्यांदाच ऐकला हा शब्द.
ती आदिती पण पिचकवणीच
ती आदिती पण पिचकवणीच निघाली.
>> ती डे वन पासुन पिचकवणीच आहे. आमच्या साबांना फाSSSSर आवडते
आदिती खळखळुन हसली मी भयानक
आदिती खळखळुन हसली मी भयानक दिसते. हे मा वै म.
हो मलाही असच वाटतं की उगाच
हो मलाही असच वाटतं की उगाच गोड गोड लुक दाखवण्यासाठी तीला जबरदस्ती हसायला लावत आहेत. ते फार कृत्रीम
वाटतं किंवा ओवर अॅक्ट.
मी तर तिला सांगितलं असतं जयच
मी तर तिला सांगितलं असतं जयच होता म्हणून

आम्ही काल मूव्हीला गेलेलो.
तू कशी विचारतेस त्याला येतोस का म्हणून? तसं काल त्याने मला विचारलं
रीया खरच मजा आली असती
रीया खरच मजा आली असती
रीया+१
रीया+१
रिया खरंच मस्त उत्तर. काल
रिया खरंच मस्त उत्तर.
काल ती रजनी अशी झोंबत होती त्या जयला... किस खुशी मे सहन करत असेल तो तीला?
आणि तिला सुद्धा असं मागं मागं करताना कसं काहीच वाटत नसेल? रियल लाईफ मध्ये असं घडतं का कधी?
आणि तिला सुद्धा असं मागं मागं
आणि तिला सुद्धा असं मागं मागं करताना कसं काहीच वाटत नसेल? रियल लाईफ मध्ये असं घडतं का कधी?
>>
घडतं की !
पण मुलांच्या दोन रिअॅक्शन असतात.
ती झोंबणारी मुलगी आवडत असेल तर तेपण फ्लर्ट करतात
नसेल आवडत तर ते तोंडावर अपमान करतात.
जय सारखे मंद नसतात.
.
च! झी मराठीवरचा नायक कधीतरी
च! झी मराठीवरचा नायक कधीतरी कुणाला हर्ट करेल का? आठवा बरं, श्री, आदित्त्त्य, राया, ओम.. सगळे कसे गुलाबजाम!
तुपट आणी पाकात थबथबलेले
तुपट आणी पाकात थबथबलेले गुलाबजाम!.
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र परत गुलाबजाम खाताना हेच आठवणार
हो ना आशू. चांगल्या घरातली
हो ना आशू. चांगल्या घरातली सुसंस्कारी मुलं कुणाला दुखवत नाहीत हो कधी

मग स्वतःवर कितीही संकटं आली तरी चालतील रजनी सारखी... झेलून घेतील अंगावर
रजनी संकट नाहीये हातोडा
रजनी संकट नाहीये
हातोडा आहे
स्वतःच्या पायावर मारलेला
संकट तर ती जुई आहे
अगदी!!
अगदी!!
काय री रजनी तिला काय बोलायची
काय री रजनी तिला काय बोलायची रितभातच नाही.
जय ला म्हणाली शर्ट किती जुना दिसतोय. मी तुला नविन घेऊन येईन.
त्या जयच्या जागी मी असते तर तेच पैसे वापरून तु आधी तुझ्या डोक्याचा इलाज करून घे असं म्हणले असते. लागले तर भरी मी घालेन हवं तर कर्ज काढून
तरी बरं ना, पूर्वीच्या नायिका
तरी बरं ना, पूर्वीच्या नायिका धुवून नाहीतर शिवून द्यायच्या शर्ट. प्रेमाची वीण, फेस.
काळानु रूप गोष्टी बदलतात नै
काळानु रूप गोष्टी बदलतात नै आशू

पण किती अगाऊपणा तो त्या रजनीचा
असं कुणी तोंडावर म्हणतं का की शर्ट जुना दिसतोय म्हणून
रजनी नागोबा आहे आणी जुई धामण
रजनी नागोबा आहे आणी जुई धामण आहे.
रजनी मन्गळ आहे आणी जुई शनी आहे.
रजनी एक घाव दोन तुकडे आहे आणी जुई पाणी आहे जे हळू हळू खडकावर आपटुन झीज करु पहात आहे.
रजनी वीज आहे आणी जुई शॉर्ट सर्किट आहे.
रजनी धबाधबा आहे आणी जुई ओढा आहे.
भर घाला.:खोखो::दिवा:
रजनीला जय आणि अदितीबद्दल खरं
रजनीला जय आणि अदितीबद्दल खरं काय ते माहिती आहे. जुईचा प्रेमभंग होऊ नये आणि ऑफिसमध्ये त्यांचं पितळ उघडं पडू नये म्हणून ती जयला लटकते आहे.
अरे देवा! मन्जूडीने सिक्सर
अरे देवा! मन्जूडीने सिक्सर मारलाय.:स्मित: हे माहीत नव्हते, पण आता मग मजा येईल. पण अदितीचा अती चान्गुलपणा, तिच्या दिराचा आणी सासर्यान्चा अती भिडस्तपणा डोक्यात जायला लागलाय.:राग:
जुईचा प्रेमभंग होऊ नये आणि
जुईचा प्रेमभंग होऊ नये आणि ऑफिसमध्ये त्यांचं पितळ उघडं पडू नये म्हणून ती जयला लटकते आहे.
>>
हा अंदाज आहे की खरचं असं आहे?
कशावरून कळालं हे
अरेरे मी मिसला हा भाग
रश्मी,
अरे देवा मंजूडे असं आहे होय?
अरे देवा मंजूडे असं आहे होय?
रजनीला जय आणि अदितीबद्दल खरं
रजनीला जय आणि अदितीबद्दल खरं काय ते माहिती आहे. जुईचा प्रेमभंग होऊ नये आणि ऑफिसमध्ये त्यांचं पितळ उघडं पडू नये म्हणून ती जयला लटकते आहे. >> >> हे कधी घडल?
मंजे.. कसला उगाच बाण
मंजे.. कसला उगाच बाण मारलाहेस... सगळ्यांच्या विचाराची चक्र फिरवून टा़कलीस...
एक अत्यंतिक वाइल्ड गेस.. बॉसला ह्यांचं खरं प्रकरण काय आहे ते माहिती आहे.. पण कोणाच्या तरी सांगण्यावरून त्याने त्याचा रुल गुंडाळून ठेवला आहे..
हिम्या, तूमाखमि!!
हिम्या, तूमाखमि!!
एक अत्यंतिक वाइल्ड गेस..
एक अत्यंतिक वाइल्ड गेस.. बॉसला ह्यांचं खरं प्रकरण काय आहे ते माहिती आहे.. पण कोणाच्या तरी सांगण्यावरून त्याने त्याचा रुल गुंडाळून ठेवला आहे..

>>
नाही हे असं नाहीये. अजुन बॉसला आदितीच्या प्रेमात पडायचंय
आधीच काय आमटीतलं पाणी आटवता ओ भाव?
नायक नायिका अॉफिस सुटल्यावर
नायक नायिका अॉफिस सुटल्यावर पटकन वेगवेगळ्या बस पकडून घर गाठायच्या ऐवजी पारावर गप्पा का मारत बसतात? घरी स्वयंपाकपाणी, आवराआवर, उद्याची तयारी नसते का? कधीतरी जाऊन त्या मालकीणबाईंना मदत करावी. एकाच अॉफिसात काम करून पुन्हा त्याच विषयांवर गप्पा मारणे म्हणजे कहर. आहे बोअर असण्याचा. त्या दहा लोकांपासून आपले लग्न लपवणे याव्यतिरिक्त कितीतरी गोष्टी असतात आयुष्यात.
अगं त्यांना ऑफिसात एकमेकांशे
अगं त्यांना ऑफिसात एकमेकांशे गप्पा मारता येत नाहीत गंंंंं
पण हाऊ रोमँटीक असं गप्पा मारत बसणं संध्याकाळच्या वेळेला
Pages