Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोपं वाटलं का केश्वि तुला ते?
सोपं वाटलं का केश्वि तुला ते? केवढी जड आहे ती!
जी काही ४-५ वेळा येता जाता ही
जी काही ४-५ वेळा येता जाता ही मालिका बघितली त्यात जय आणि अदिती ऑफिसमध्ये पापण्यांनी बोलतात एकमेकांशी.
हो, हो! मुळात डोळ्यांनी तेही
हो, हो! मुळात डोळ्यांनी तेही मिटलेल्या अभिनय करायचा असेल तर कमाल एक्स्प्रेशन्स लागतात. इथे अविनाश सर, रजनी, नवरे, जुई, तांगडे आणि शोभाचा फोन सर्वांना समान न्याय. "असू दे" च्यापुढे "मै हूँ ना" पर्यंतही गाडी जात नाही मिटल्या डोळ्यांनी. अभिनयाची सोन्यासारखी संधी घालवतायत. आपल्या "बाय बाय बाय बाय बाय" सारखी सिग्नेचर व्हायला हवी होती ही डोळ्यांची गंमत एव्हाना. च, च रजनीला जमलं असतं भारी.
"असू दे" च्यापुढे "मै हूँ ना"
"असू दे" च्यापुढे "मै हूँ ना" पर्यंतही गाडी जात नाही मिटल्या डोळ्यांनी.>>>> अगदी! काहीतरी व्हरायटी हवी किनै?
एकाच ऑफिसमध्ये आहेत म्हणून मुद्दाम कमी बोलल्यासारखे कशाला करायचे? त्यामुळे अजूनच कोंडमारा होतोय त्यांचा. मित्र मैत्रिण म्हणून पण मोकळेपणाने वागू शकतात ना? नवरा बायको घरी.
शिवाय थोडंसं काही बोलायचं
शिवाय थोडंसं काही बोलायचं असेल, तर लगेच उठून एकमेकांच्या डेस्कपाशी कशाला जातात? आणि मग बाकीचं कुणी बघत नाहीये ना? याची चिंता...हळू आवाजात बोलायचं.... एस.एम.एस, व्हॉटसअॅप वगैरे नसतं का?
एसएमएस, व्हॉट्सअॅप, फेसबुक,
एसएमएस, व्हॉट्सअॅप, फेसबुक, गूगल इत्यादी वापरण्यावर अविनाश सरांनी बंदी घातली आहे. लग्नं न करण्याबरोबर नोकरीवर ठेवतानाच्या अटींपैकी हीपण एक अट होती.
च्यायला इतक्या डोक्यावर पडलेल्या ट्रॅव्हल एजन्सीतून कोण महाभाग बुकींग करेल? यांना सुटेबल गिर्हाईक फक्तं श्री आणि जान्हवीच असू शकतात नाहीतर मेघना आणि आदित्य विथ चित्रा कॉम्प्लीमेंटरी.
:हाहा: ही सुटेबल गिर्हाईक
ही सुटेबल गिर्हाईक या लाईन साठी .
चित्रा कॉम्प्लीमेंटरी >>>
चित्रा कॉम्प्लीमेंटरी >>>
स्पार्टा..
स्पार्टा..
सूटेबल गिर्हाईकं अदितीला
सूटेबल गिर्हाईकं
अदितीला नवे ड्रेस दिले बर्का!
काल शोभाच्या आईने अदितीला न येण्यासाठी जे कारण दिलं ते अगदीच फालतू. ती रोज येत असेल (आणि ती येईलही बावळट) आणि तिला आयता स्वयंपाक करून घालत असेल तर ती का तिला नाही म्हणेल? आण्णांना तिच्या चवीची सवय झाली तर होऊदेत की, प्रॉब्लेम काय आहे? हळूहळू गाडी रुळावरून सरकायला लागली आहे!
त्याच वेळी ईटीव्हीवर कमला बघावी काय? कोणी पाहिली का?
एस.एम.एस, व्हॉटसअॅप वगैरे
एस.एम.एस, व्हॉटसअॅप वगैरे नसतं का? >>>> ललिता मेसेंजर पण असतात की ग ऑफीसमधुन... गप्पा, बोलण झाल की पर्सनल चॅट हिस्टरी डिलीट करायची.. बर यांच ऑफीस काही इतक हाय फंडु नाहीये की तिथे आयटी इन्फ्रा टीम वगैरे असेल चॅट्स मॉनिटर करायला..
एवढ्या चोर्या करायच्याच
एवढ्या चोर्या करायच्याच कशाला? एकीकडे खोटे बोललेले आवडत नाही याचे पालुपद नि पदोपदी खोटे बोलायचे!!
जो सासरा चहा करू शकतो तो स्वत:चे जेवण नाही का बनवु शकत? कशाला उपाशी राहिला होता मोठी सून बाहेर गेली तेव्हा?
रोज तांगडे बसस्टॉपवर भेटतो तर जय पुढच्या बसस्टॉपवर का नाही चढत, किंवा पुढे निघून जात? कशाला तांगडे नि आदितीची वाट वघतो?
चांगुलपणाचा उदो करण्याच्या नादात सगळे तार्किकतेच्या पलिकडचे दाखवणे चालू आहे.
मालिकेच्या लेखकांनी आयुष्यात
मालिकेच्या लेखकांनी आयुष्यात कध्धीह्ही खोटेपणा, थापेबाजी केली नसेल...त्यामुळे कथानकात त्यांना तो दाखवता येत नाहीये नीट
मुग्धे आधी त्या हापिसात बघेल
मुग्धे आधी त्या हापिसात बघेल तो पीसी लॉक्ड असतो. चॅट किंवा मेसेंजर असे प्रकार अस्तित्वात आहेत हे तरी माहित असेल का या हापिसला?
शिवाय जी येते ती त्या जय ला बैला सारखं ओढून नेते, कधी जेवायला कधी शॉपिंगला. ह्या नंदी बैलाला नाही हा शब्द माहित नाहि का? अगदिच मतं नैत बै मुलाला.
लले
लले
शिवाय जी येते ती त्या जयला
शिवाय जी येते ती त्या जयला बैलासारखं ओढून नेते >>> खरंच! अति होतंय ते...
काल शोभाच्या आईने अदितीला न
काल शोभाच्या आईने अदितीला न येण्यासाठी जे कारण दिलं ते अगदीच फालतू.
>> काय कारण दिलं गं?
हो ग दक्षे... एकदा तरी विंडोज
हो ग दक्षे... एकदा तरी विंडोज बुट होत असलेली स्क्रीन दाखवली होती चालु कॉम्प्युटर दाखवायचा म्हणुन..
ह्या नंदी बैलाला नाही हा शब्द माहित नाहि का? अगदिच मतं नैत बै मुलाला. >>>> नैतर काय... लग्न झालेल लपवायच आहे.. मला तुझ्यात काडीचाही इंटरेस्ट नाही अस सांगायला काही मनाई नाही केलेली.. मी तर म्हणते आदितीने पण फ्लर्ट कराव जयबरोबर रजनीसारख.. नवर्याबरोबर रहात असल्याचा फील तरी येईल.. आणि नवराच असल्याने ऑकवर्डनेस पण येणार नाही..
आणि सगळ्या पोरी एकजात या
आणि सगळ्या पोरी एकजात या एकट्यासाठी खुळ्या झाल्यात?
वाट्टेल तेच दाखवलय
मी तर म्हणते आदितीने पण
मी तर म्हणते आदितीने पण फ्लर्ट कराव जयबरोबर रजनीसारख.. नवर्याबरोबर रहात असल्याचा फील तरी येईल.. आणि नवराच असल्याने ऑकवर्डनेस पण येणार नाही..>>>>>> मुग्धटले.:हाहा: ये हुई न बात, सही शॉट मारा.:फिदी:
नैतर काय रश्मी उगाच नवरा
नैतर काय रश्मी उगाच नवरा आपल्या हातातुन सुटेल याच टेन्शन घेत बसलीय... त्या जयलाही जरा बर वाटेल बाय्को रोमँटीक झालेली बघुन... नैतर सदानकदा आपली दु:खी, कष्टी चेहरा करुन बसलेली असते..
आणि सगळ्या पोरी एकजात या
आणि सगळ्या पोरी एकजात या एकट्यासाठी खुळ्या झाल्यात? >> तो दुसरा अमित नावाचा यडपट बघ एकदा... त्यातल्या त्यात जय बरा म्हणुन सगळ्याजणी त्याच्या मागे पडल्यात.. सु.भा.ने फारसे ऑप्शन्स ठेवले नाहीत पोरींना
काय एक एक प्रतिसाद मालिका
काय एक एक प्रतिसाद
मालिका बघावी का परत ?
मी तर म्हणते आदितीने पण
मी तर म्हणते आदितीने पण फ्लर्ट कराव जयबरोबर >>> हे बेस्ट !! आवडलं..
मी तर म्हणते आदितीने पण
मी तर म्हणते आदितीने पण फ्लर्ट कराव जयबरोबर >>>> सही शॉट मारा +१
सु.भा.ने फारसे ऑप्शन्स ठेवले नाहीत पोरींना >> पण सुबोध भावे एवढा मोठा ऑप्शन असताना या पोरींनी दुसरयांकडे का पहा ,बॉस असला म्हणुन काय झालं तोही आदितीला जरा जास्तच भाव देतोय ना .त्या जय पेक्षा तरी जास्त भारी आहे सु. भा.
लली, पूनम, आपण मालिकेचं लेखन
लली, पूनम, आपण मालिकेचं लेखन करूया का? फार सुंदर लॉजिकल मालिका घडेल आपल्या हातून.
अग सिनी सु.भा बॉस आहे
अग सिनी सु.भा बॉस आहे त्यामुळे तो जास्त पटकन हाडहुड करु शकतो.. सगळ्यात मोठा धोका म्हणजे नोकरी जाण्याचा..
काल कधी नव्हे ते माझ आणि
काल कधी नव्हे ते माझ आणि नवर्याच "आदितीने पण फ्लर्ट कराव जयबरोबर" या बद्दल एकमत झाल..
करेक्ट. अदिती-जयने फ्लर्ट
करेक्ट. अदिती-जयने फ्लर्ट करावं हे आम्ही कधीचंच म्हणत होतो.
मंजूडी, लॉजिकल मालिकांची परवानगीच नाही आपल्याकडे
लॉजिकल मालिकांची परवानगीच
लॉजिकल मालिकांची परवानगीच नाही आपल्याकडे >>> मग काय! (अगदी ताजं उदाहरण - एव्हरेस्ट)
Pages