झी-जिंदगी

Submitted by कविता१९७८ on 10 September, 2014 - 00:37

पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्‍या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्‍याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्‍या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.

असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.

ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्‍हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेहरीन जब्बार हे नाव पुरेसं आहे! She never disappoints! मी पाहिलेली तिची हर एक सिरीयल उत्कृष्ट आहे! त्यातल्या काही जरूर पाहाव्या अशा टेलिफिल्म्स/long plays (अजून जशा जशा पाहीन तशा ह्यात अपडेट करेन!)
1. कहानियाँ - ह्या मध्ये ४०-४५ मिनिटांच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अगदी वेगवेगळया विषयांवरच्या! All may not interest you. पण एकदा जरूर बघाव्या अशा! Dabbu, Abba Ammi aur ali, Spenta Mary Zubeida, Shanakht, Rehmat
२. पुतली घर - चकव्यासारखी गोष्ट सांगितली आहे की त्यात आपण हरवून जातो. You will feel dizzy after it ends! Excellent excellent acting by Nadia Jamil and Sajid Hasan! सगळ्यांचीच कामे फार छान!
३. फरार - तीन मैत्रिणींची छान पहावी अशी गोष्ट! ९० च्या दशकातल्या हरवून गेलेल्या गोष्टींची आठवण करून देणारी! सानिया सईद, मरीना खान आणि हुमा नवाब तिघी इतक्या फिट बसल्या आहेत रोल मध्ये! सानिया सईद एक कमालीची अभिनेत्री आहे. इतक्या विविध प्रकारचे रोल्स इतक्या सहजपणे करते ती! आणि एक काम बघताना दुसऱ्या कामाची आठवण होत नाही! Hats off to her!
४. घुंघट - धमाल गोष्ट आहे! खुदुखुदू हसायला लावणारी!
५. अब तुम जा सकते हो - खालिदा रियासत ह्या अभिनेत्रीची (बहुतेक) शेवटचं काम असलेली टेलिफिल्म. काय कमाल काम केलंय! चेहरा इतका बोलतो! सुपर्ब!

जिज्ञासा, थँक्स गं अपडेट्स आणि नविन काही मालिका सुचवल्याबद्दल. सध्या 'ये शादी नही हो सकती' बघते आहे पण ती संपल्यावर काय बघायचे हा प्रश्न होता. आता तुझ्या लिस्टमधल्या सगळ्या बघेन.

कोणी गौहर नाही बघत का? १-२ भाग पाहिले बरी वाटली.. मराठी मालिकांपेक्षा बर्‍याच सुसह्य मालिका आहेत पण ह्या चॅनेलवर..

डॉली की आयेगी बारात पाहून संपवली! Total time pass comedy drama with punjabi masala! Bushra Ansari is the best Lol जि.गु. है मधे फवाद च्या वडिलांची भूमिका करणारे जावेद शेख यांना कॉमेडी करताना पाहून सुखद धक्का बसतो..he plays absolutely lovable guy!
Apparently this is second in series of dramas Kis ki aayegi baraat..पहिली अझर की. आ. बा. मग डॉली की. आ. बा. आणि मग ताके की. आ. बा. सगळे characters तेच आणि तीन तीन लग्नाच्या स्टोऱ्या! मरीना खानने सहदिग्दर्शित केली आहे.
डॉली की. आ. बा. पहिल्यांदा पाहिल्याने विशेष फरक पडत नाही. पण आता मी अझर की. आ. बा. पाहणार आहे.

जिज्ञासा, मी चारही स्टोरीज बघितल्या आहेत. अझर, डॉली आणि अ‍ॅनी कि आ.बा. चांगल्या आहेत. ताके की आ.बा. थोडीशी स्लो आहे.

पेरू, येस! मला आत्ताच कळलं की अॅनी की आ. बा. पण आली होती (Thanks to youtube suggestions!) म्हणजे अझर, डॉली, ताके आणि अॅनी असा क्रम आहे ना?

जिज्ञासा.. जावेद शेख बद्द्ल नि मालिका +१
आता बाकीच्या ३ बघते! मला माहितच नव्हतं

जी सायमा चौधरी आहे तिचं नाव काय? बिल्कीस कौर नि ह्या मालिकेत इतकी वेगळी भुमिका आहे की मला पटलचं नाही ती आहे Happy

कोणी फिराक बघितलीये का? सनम सईद आए त्यात. पहिले ३ एपि बघितलए. छान वाटतेय. अमेरिके मधे रहाणार्या कुटुम्बाची कथा आहे. वरकरणी पहाता प्रेमाचा त्रिकोण होइल असे वाटतेय पण नेहमीप्रमणे सादरीकरणामधे नाविन्य आहे सो बघावीशी वाटतेय .
सनम सईद छान करतेय काम.

झंपी | 31 December, 2014 - 13:34 नवीन

<< डॉली की आयेगी बारत मूवी पण येतोय ना..? >>

डॉली की डोली असा चित्रपट येतोय. त्यात सोनम कपुर लग्न करण्याच्या नावाखाली नवर्‍या मुलांची फसवणूक करते असे कथासूत्र आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Dolly_Ki_Doli

हमसफरची नायिका महिरा खान ही bollywood मध्ये शाहरुखखान बरोबर 'रईस' ह्या चित्रपटात येतेय. कालच्या मटाला आहे ही बातमी.

गौहरमधे मजा येतेय सध्या. ती मुलगी काय गोड आहे.
मी कैसी ये कयामत पण बघतेय. अजून ५-६ एपिसोडस उरलेत. काय सगळे एकसे एक परफॉर्म करतायत

साम्यस्थळे (इकडची आणि तिकडची)

  1. बेजुबान मधला मुकनायक (जो जिंदगी गुलजार है मध्ये सहनायक होता) कोई मिल गया मधील हृतिक रोशनची आठवण करून देतोय. त्याची आई साकारणारी अभिनेत्री झरीना वहाब सारखी भासतेय.
  2. कैसी यह कयामत मधील म्हातार्‍या ताऊचा आवाज कादर खान सारखा आहे.
  3. जिंदगी गुलजार है मध्ये नायकाचे वडील असलेले जावेद खान आपल्या शिखर व इतर अनेक चित्रपटांत आपली छाप सोडून गेले आहेत. तसेच नायक फवाद खान सोनम कपूर सोबत खुबसुरत मध्ये भाव खाऊन गेलाय. शिवाय तो बराचसा आपल्या उपग्रह वाहिनीवरील गीत हुई सबसे पराई या मालिकेत चमकलेल्या गुरमीत चौधरी सारखा दिसतो. http://en.wikipedia.org/wiki/Gurmeet_Choudhary

मानुषी, 'मात' दोनदा दाखवुन झाली..>>>>>>. अग्गोबाई ...हो का? असो..धन्यवाद जिज्ञासा.
टीव्ही फार कमी पहाते त्यामुळे कधी तरी काही तरी पाहिलं जातं, परत बघेपर्यंत ते संपलेलं!!
असो......गौहर अधून मधून पहाते. ती मुलगी गोड आहे. नीधप +१००
महिरा खान ही bollywood मध्ये शाहरुखखान बरोबर 'रईस' ह्या चित्रपटात येतेय.>>>>>> हो अन्जू मी पण वाचलं हे.

फवाद खान गुरमीत चौधरीसारखा दिसतो??????????????????????????????????????????????
आवराच..

डोळे तपासा
कुठे इंद्राचा ऐरावत कुठे शामभट्टाची तट्टाणी!!!

गौहरमधे मजा येतेय सध्या. ती मुलगी काय गोड आहे. > +१११ छान चालू आहे सध्या. सर्वांनी छान काम केले आहे. फाकरा, समीर, गौहर, नानी, दादी, मामी सर्वच पात्रे मस्त काम करत आहेत. निगेटीव पात्रांमधे पण फार आक्रस्ताळेपणा नसतो, एकदम सटल अभिनय असतो.
ती मुलगी काल / परवा कितनी गिर्‍हे बाकी है मधे एका एपिसोड मधे होती.

<<<फवाद खान गुरमीत चौधरीसारखा दिसतो????>>>

होना , दोन्ही वेगवेगळे दिसतात, फवाद खान एकदम गोड, तर गुरुमीत चौधरी "गीत... हुई सबसे पराई" मधे एकदम डॅशिंग बिझिनेसमॅन.

लंपन सहमत.
सध्या, गौहर बघतेय.त्यातला, समीरचा भाऊ, सारा , नंतर बाकिच्या मालिकेतील फवाद वगैरे मंडळी, अमेरिकन अ‍ॅक्सेंटने उर्दू बोलतात ते ऐकताना कंटाळा येतो.
मी ज्या काही टेलिफिल्म्,मालिका पाहिल्या ,त्यात मुलीचे ध्येय फक्त लग्न करणे, नवर्‍याची मर्जी/ घर सांभाळणे एवढेच दिसतेय.जिंदगी गुलझार है'मधली कशफ , हायली एड्युकेटेड असूनही लग्नानंतर घरघर खेळताना दिसतेय.अर्थात ह्या मालिका आहेत कबूल तरीही मला हे वाटतंयच.असं असूनही मी गौहर बघतेय हा भाग निराळा.
बहुधा नीधप यांनी म्हटल्याप्रमाणे , त्या लोकांचे कास्टिंगच इतके मस्त असते.अभिनयातही आक्रस्ताळेपणा नाही.

Pages