पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.
असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.
ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.
वर्षू नील, द्या ना जंत्री
वर्षू नील, द्या ना जंत्री इथेच..!! वर उल्लेख केलेल्या सिरियल्स शिवाय अजुन कुठल्या चांगल्या आहेत?
वर्षुनील द्या की लिंका इथंच
वर्षुनील
द्या की लिंका इथंच
.
.
.
.
खूप जुन्या सिरिअल्स मधे अवश्य
खूप जुन्या सिरिअल्स मधे अवश्य पाहण्या सारख्या सिरिअल्स
१) अनकही
२) धूप किनारे
३) कशकोल
४) निजात
५) तनहाईयाँ ( तनहाईयाँ -नये सिलसिले..नाही.. नॉट वर्थ वॉचिंग)
नवीन सिरिअल्स
१) डॉली की आयेगी बारात
२) बिल्कीस कौर
३) शिकवा
४) दुर्रे शेहवार
५) एक तमन्ना लाहासिल सी
६) काश मै तेरी बेटी ना होती
७) संझा
८) मलाल
९) मात
१०) मेरे दर्द को जो जुबाँ मिले
११) मेरे कातिल मेरे दिलदार
१२) मुहोब्बत जाये भाड मे
१३) नदामत
१४) नूरपूर रानी
१५) निखर गये सारे गुलाब
१६) उडान
१७) देहलीझ ( नॉट,' दिल दिया दहलीझ..)
हे सर्व मी पाहिलेले आहेत.. म्हणून वाऊच करत आहे ..
एक आगाऊ टिप
बुलबुले आणी तत्सम विनोदी सिरिअल्स .. नॉट अॅट ऑल वर्थ वॉचिंग..
थँक्स वर्षुतै ..
थँक्स वर्षुतै ..
नुरपुर की रानी आणी मात खुपच
नुरपुर की रानी आणी मात खुपच आवडल्या , ह्या आठवड्यात केव्हातरी पुर्ण दिवसभर मात ही सीरीयल दाखवणार आहेत. बाकी - कही अनकही , काश मै तेरी बेटी ना होती सुरू आहेत. मेरे कातिल मेरे दिलदार आताच सुरू होउन संपली.
ओ वॉव.. चनस आणी कविता.. लगे
ओ वॉव.. चनस आणी कविता.. लगे रहो..
या सिरिअल्स शिवाय यू ट्यूब वर पाकी टेली फिल्म्स पण आहेत छान छान!! , दोनेक तासाच्या..
दास्तान पण चांगली आहे.
दास्तान पण चांगली आहे. फाळणीवर आहे.
वर्षू नील, खूप धन्यवाद
वर्षू नील, खूप धन्यवाद यादीसाठी! आता एकेक निवांत बघेन!
हमसफर अतिशय सुरेख सिरीयल आहे!
हमसफर अतिशय सुरेख सिरीयल आहे! थोडी slow आणि sad आहे पण त्याच्या theme song च्या ओळी इतक्या अर्थपूर्ण आहेत..Watching it makes your heart heavy!
वर्षू नील, कंकर पण अॅड कर कि
वर्षू नील, कंकर पण अॅड कर कि त्याच्यात. आवडली मला.
जिंदगी गुलझार है! माझी ऑल
जिंदगी गुलझार है! माझी ऑल टाइम फेव्हरीट झाली आहे. नक्की बघावी अशी मालिका.>>> +१०००००
फवाद खान आणि सनम सईद दोघेही उत्तम अभिनेते आहेत. झारून तर मस्तचं रंगवलाय फवादने..
फवादच्या मी जामच प्रेमात पडल्ये. >>>>>>>>>>>>>>> +११११११११११११११
मी आत्तापर्यंत मात, दस्तक, हमसफर, मेरे कातिल... ह्या सिरीयल्स व बेहद ही फिल्म पाहिली. आवडल्या. पण जिंदगी गुलझार है जास्त आवडली.
हल्ली झी जिंदगी बघायला लागल्यापासून मी बाकीच्या मालिका / वाहिंन्यांना डिवोर्सच दिला आहे.
"कीतनी गिर्हें बाकी है खरच
"कीतनी गिर्हें बाकी है खरच मस्त आहे मालिका. लेखाशी पूर्ण सहमत . पाकिस्त्याण्यान्बाबत कितीही राग असला तरी झी जिंदगी बघावसं वाटतं .
झी TV (भारतीय) वर शनिवार
झी TV (भारतीय) वर शनिवार रविवारी रात्री ८ वाजता नीली छात्रीवले हि मालिका लागते . छान आहे
माझे बाबा / दादा / काका / भाऊ
माझे बाबा / दादा / काका / भाऊ / मामा पण ( हो उगाच कोणी मी पा कर त्याबद्दल विचारातील ) कोणीही सैन्यात नाहीत. त्या मुळे मी का फिकीर करू ?
सीमेवर कोणी मेले तर ते माझे कोणी हि नसणार . मी झी झिन्दागी बघणार .
सीमेवर कोणी मेले तर ते माझे
सीमेवर कोणी मेले तर ते माझे कोणी हि नसणार. मी झी झिन्दागी बघणार .
>>>
आपल्याच देशात रोज किती लोक दहशतवादाने मरतात . सरकारी लोकांच्या चुकीने किती लोकांना नुकसान सोसाव लागतं. महाराष्ट्राचा मंत्री केंद्रात कृषी मंत्री असून सुधा महाराष्ट्रातच सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या करतात . पण मी मात्र काहीच करणार नाही. कारण ह्यांच्यापेकी कोणीही माझे नसतात . मी फक्त तिकडे दुर्लक्ष करत राहणार .
सीमेवर कोणी मेले तर ते माझे
सीमेवर कोणी मेले तर ते माझे कोणी हि नसणार . मी झी झिन्दागी बघणार . >> हे विधान फारच बेजबाबदार आहे. सीमेवर मरणारे आपले कुणी नसतील तरिही त्यांच्या मरणाबद्दल दाखवलेली असंवेदनशीलता टोकाची आहे.
कितनी गिरहें बाकी है चे सर्व
कितनी गिरहें बाकी है चे सर्व भाग सुरेख आहेत. पण प्रत्येक गोष्टीचा शेवट डिप्रेसिंग केलाय.
सुरुवातीची कविता गुलजार यांनी लिहिलीये, त्यांना क्रेडिट मधे स्थान दिलंय..
http://www.mensxp.com/enterta
http://www.mensxp.com/entertainment/gossip/23846-10-things-indian-televi...
हा लेख ह्या संदर्भात वाचनीय आहे
रच्याकने मला हमसफर मालिका फार आवडली
मला हमसफर मालिका फार आवडली >>
मला हमसफर मालिका फार आवडली >> +१११ थोडीशी स्लो आहे पण असं वाटलं मला...!
ही वरची लिंक मस्त आहे.. आपल्या मालिकावाल्यांनी बरच काही शिकण्यासारखं आहे खरच यांच्याकडून ...
vrushali, लिंक साठी धन्यवाद!
vrushali, लिंक साठी धन्यवाद! त्या खालच्या कॉमेंटस् वाचताना कळलं की अरुंधती रॉय यांच्या God of small things वर Talkhiyan (उच्चार आणि अर्थ नक्की माहिती नाही) नावाची एक पाकिस्तानी मालिका आहे. मी बघून कशी वाटली ते लिहेनच! जि.गु.है मधली सनम सईद आहे त्यात
जिज्ञासा .. मी बघायला सुरुवात
जिज्ञासा .. मी बघायला सुरुवात केली पण
माबोवरच पुस्तक परीक्षण वाचलं होत..
हमसफर सुरु झाली? किती वाजता
हमसफर सुरु झाली? किती वाजता आहे?
शर्मिलातै.. मी यु ट्युब वर
शर्मिलातै.. मी यु ट्युब वर बघितली..
'हमसफर' १४ ऑक्टोबर पासून
'हमसफर' १४ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता.
जिज्ञासा.. ,' Talkhiyan ' =
जिज्ञासा.. ,' Talkhiyan ' = तल्खियाँ = बिटर रायवलरी
वर्षू-नील, धन्यवाद
वर्षू-नील, धन्यवाद
हमसफरचं टायटल साँग तर जबरदस्त
हमसफरचं टायटल साँग तर जबरदस्त वेड लावणारं आहे.
वो हमसफर था.. मगर उससे हम नवाँ.... ना थे...
के धुप - छाव का आलम था ... हम नवाँ.... ना थे...
हम नवाँ.... ना थे... हे मला नीटसं ऐकायला येत नाही कधीच नवाँ म्हणत की दुसरं काही.
कविता .. ,' मगर उससे हमनवाई
कविता .. ,' मगर उससे हमनवाई न थी
हमसफर असला तरी त्याच्या शी जवळीक/ लाईक माइंडेडनेस नव्हती
के धूप छाँव का आलम रहा
जुदाई न थी
Pages