झी-जिंदगी

Submitted by कविता१९७८ on 10 September, 2014 - 00:37

पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्‍या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्‍याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्‍या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.

असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.

ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्‍हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे काय सांगता? अगदी धागा सुरू करण्याइतपत आवडलं का सगळ्यांना! मला वाटलं मला आपलं उगीचच ते चॅनल आवडतंय. आणि जिंदगी गुलजार है फार्फारच ! ते दोघे फारच क्युट आहेत. आणि दिग्दर्शन, सेटिंग्ज, पात्रांचे कपडे, अभिनय सगळं कसं अगदी डीसेन्ट, संयत आणि वास्तव! दोघांचीही घरं इतकी रिअ‍ॅलिस्टिक दाखवली आहेत.
साधारणपणे सीरियल्स न बघणारी मी, आवर्जून तर कधीच नाही................पण हे पहाते जमेल तेव्हा.
आता हमसफर बघणार.

मानुषी

धागा सुरु करताना मला वाटलं होतं की मी एकटीच आहे जी झी जिंदगीच्या मालिका पाहते पण धागा सुरु केल्यावर कळलं ही वाहीनी इतकी प्रसिद्ध आहे . Lol

बर्‍याच जणांनी ज्यांना समोरुन सांगता आले नाही त्यांनी मला वि.पु. सुद्धा केली.

अरे मी इथे अजून लिहिलं नाही(मला वाटते दुसरीकडे लिहिलेय).
इथे लिहिते,

मेरी जात जर्र निशां - हि एक सिरियल होती, ती सर्वात पहिली पाकी सिरियल मी पाहिली तेव्हा वाटले हम्म, वेगळ्या आहेत खर्‍या.

जिंदगी गुलजार है- सर्वात मस्त हाताळलेली मुलींचे प्रश्ण.

हमसफर- जराशी दु:खी वाटली. आपल्या बायकोला ओळखता न आल्याने नात्यात कसे प्रश्ण होतात.. मस्त हाताळणी पण मलाच नायिकेचे दु:ख बघताना जरा वाईट वाटले. ती रात्रीची बाहेर पडते तेव्हा खूप वाईट वाटते.मुर्ख नवरा (पात्रं ) वाटला. गाणं मस्तय. माहिरा खान आणि फवाद एकदम क्युट वाटली जोडी.

बेहदः टेलीफिलम आहे. मस्त हाताळणी मूल असताना पुर्नविवाह आणि त्यातील प्रश्ण.

दास्तानः इतकी नाही आवडली. भारताची जरा ज्यास्तच निगेटीव प्रतिमा दाखवलीय. पण एकुणात बरीय.

कंकरः अर्ध्यातच सोडली. बोर झाले. ऑर्थोडोक्स नवरा आणि त्याचे प्रश्ण.

काश मै तेरि.... : केकता कपूरची सिरियल म्हणायला हरकत नाही. अतिशय महाबोर.... सुरुवात बरी होती. पण ते सारखं.... काळोखी वातावरण... नकोसे नकोसे.

कितनी गिर्ह बाकी: हलकी फुलके भाग असतात. मला कुठलीतरी भारतीय जुनी सिरियल आठवली.. श्याम बेनेगलांची होती वाटतं.

बाकी, तश्या बर्‍याचश्या आहेत बोर सिरियल्स.(ऑन झारा.... वगैरे).

मला ते हमसफरचे गाणं खूपच आवडते,
मला जसे एकायला आले व समजले ते,(कोणाला सुधारणा करायच्या असतील तर लिहा)
-------------------------------------------------------------------
तर्क-इ-तालुकात पे रोया ना तु ना मै,
लेकिन ये क्या के चैन से सोया न तु ना मै,

वोह हमसफर था मगर............

उससे हमनवाई न थी
के धूप छांव का आलम रहा, जुदाई न थी

अदावतें थी, तग्गफूल था, रंजिशे थी मगर......
बिछडने वाले में सब कुछ था, बेवफाई न थी

बिछडते वक्त उन आंखो में थी हमारी गझल
गझल भी वोह जो किसी को कभी, सुनाई न थी..

किसे पुकार रहा था वोह डूबता हुवा दिन
सदा तो आयी थी लेकिन, कोइ दुहाई न थी

वोह हमसफर था मगर.......................

--------------------------------------
बस..... इतकेच एकायला मिळाले तुनळीवर...

बेहदः टेलीफिलम आहे. मस्त हाताळणी मूल असताना पुर्नविवाह आणि त्यातील प्रश्ण.>>>
सुरेख आहे ही टेलिफिल्म. सगळ्यांचाच अभिनय सुरेख. विशेषतः फवाद खान.
तो प्रपोझ करतानाच्या सीनमधला त्याच्या अभिनय अत्त्युच्च !! संवाद नसतानाही केवळ डोळे आणि चेहरा यांच्या जोरावर तो मनातली घालमेल,टेन्शन मस्त दाखवून देतो. Happy

प्राची,धन्यवाद! लगे हाथ बेहद पाहून टाकली! Another outstanding piece of art from Pakistani TV!
आम्ही भारतीयांनी काय कुणाचं घोडं मारलंय की आमच्या माथी रटाळ डेली सोप लिहिले आहेत Uhoh
चनस, तल्खीया चा एकच भाग बघितला. संथ वाटला. God of small things देखिल खूप संथ कादंबरी आहे. It's a challenge to make a serial out of the book!

चनस,तल्खीया चा एकच भाग बघितला. संथ वाटला >> हो तरीही मी नेटाने बघतेय.. मला मालिकेची मांडणी आवडली.. मधेच वर्तमानातले त्या मुलीचे विचार नि रिलेटेड भुतकाळ.. खुपच रटाळ होत नाही नि फॉरवर्डचा ऑप्शन आहेच Happy

सध्या हिंदी/मराठी बघण्यासारखं काहीच नाहीयं

झी जिंदगी वर कितनी गिरहे सोडली तर अजून कोणती मालिका आहे जी अधुन मधुन पाहिली तरि कळेल? पण प्रसारण रात्री असावं. १०.३० च्या पुढे.

मेरी जात..., दास्तान आणि कंकर कधी दाखवल्या जिंदगीवर? किती वाजता? परत दाखवणारेत का?

बाकी या उडान, तल्खिया पण झाल्या का दाखवून?

डॉली आयेगी बारात, बिल्कीस कौर?

अरे मी कुठल्या जगात वावरतेय? कधी असतात या सिरीयली?

मी सध्या मेरा नसीब आणि ये शादी नही हो सकती बघतीये. ग्रेट नाहीयेत पण बघाव्याश्या वाटतात.

मी जेव्हापासुन पाहायला सुरुवात केली तेव्हापासुन नुरपुर की रानी , मात , कीतनी गिर्‍हें बाकी है , मेरे कातिल मेरे दिलदार, काश मै तेरी बेटी ना होती , बेहद , ऑन झारा, मेरा नसीब , ये शादी नही हो सकती आणि एक त्या ड्रायव्हरची मुलगी डॉ बनते आणी मालकाच्या मुलाशी प्रेम होतं त्या सीरीयलचं नाव नाही आठवत इतक्याच सीरीयल्स लागल्या आहेत.

बेहदः टेलीफिलम आहे. मस्त हाताळणी मूल असताना पुर्नविवाह आणि त्यातील प्रश्ण.>>>
सुरेख आहे ही टेलिफिल्म. सगळ्यांचाच अभिनय सुरेख. विशेषतः फवाद खान.
तो प्रपोझ करतानाच्या सीनमधला त्याच्या अभिनय अत्त्युच्च !! संवाद नसतानाही केवळ डोळे आणि चेहरा यांच्या जोरावर तो मनातली घालमेल,टेन्शन मस्त दाखवून देतो. >>> +१०००० Happy
सध्या जिंगी चॅनेल लागतच नाहीये आमच्याकडे...

पाकिस्तानात आत्तेबहिणीशी लग्न करण्याची पद्धत आहेसं वाटतं.
मेरे कातिल मेरे दिलदार मध्येही भावाकडे कायमची परत आलेली "फुफू"(आत्या) आणि तिची लेक आहेत.
आता हमसफरमधेही फुफू आणि तिची लेक आहेत. याही दोघी फुफूच्या भावाकडेच रहातात.
आणि पहिले २/३ एपिसोड इतके काही छान नाही वाटले ....जितकी त्याची हवा झालीये!

पाकिस्तानात असं नाही. मला वाटतं मुस्लीम धर्मात पद्धत आहे. चुलत भावंडात पण लग्न करतात. एक जुना हिंदी चित्रपट होता फाळणीवरचा. त्यात बलराज सहानी आणि फारुख शेख, गीता सिद्धार्थ इ. होते.
त्यात तिचे लग्न आधी चुलत भावाशी ठरलेले असते पण ते पाकिस्तानात जातात मग आतेभावाशी ठरते तर ते लोक पण फाळणीनंतर पाकिस्तानात जातात. हिचे वडील काही भारत सोडून जात नाहीत. अशी स्टोरी होती. खूप लहानपणी बघितलाय तो चित्रपट पण आठवतोय मला वाटतं त्याचे नाव 'गरम हवा'.

धर्माचा उल्लेख केल्याबद्दल sorry.

हमसफर मध्ये सारा का झारा आहे तीपण बहुतेक मावसबहीण दाखवली आहेना. खालाची मुलगी मग त्याचे लग्न त्यांची आई आपल्या बहिणीच्या मुलीशी ठरवत असते का?

हो नंदिनी, आतेभावाशी करायची पद्धत इथेही आहे. आते-मामे भावंडांच्यात लग्न करायची पद्धत हिंदु धर्मातही आहे.

कोणी 'हमसफर' पाहतय का? कशी आहे सिरीयल? रिपीट सुद्धा पाहणं जमत नाहिये पण खुप उत्सुक्ता आहे. खुप कौतुक ऐकलंय या सिरीयलच.

<<<<<कोणी 'हमसफर' पाहतय का? कशी आहे सिरीयल? रिपीट सुद्धा पाहणं जमत नाहिये पण खुप उत्सुक्ता आहे. खुप कौतुक ऐकलंय या सिरीयलच.>>>>

मलाही जमत नाही पण मी थोडी थोडी तु नळीवर पाहतीये, स्लो आहे पण मला नायक नायिका दोघे आवडतात आणि टायटल साँग जिवघेणे आहे.

मुस्लिम जमातीत फक्त सक्ख भावंड सोडून चुलत, मावस , आत्ये , मामे भावंड चालु शकतं .

काही मराठी जातीत , मामे नाहितर आत्ये भावंड चालतं असे पाहिलेय. तामिळी ब्राम्हण मुली मामाशी पण लग्न ़करतात.

माझ्या एका लिंगायत मराठी मैत्रीणीने तिच्या मावस भावाशी लग्न केले चक्क प्रेम झाले म्हणून(?)

पारसीत पण सेम मुस्लिमांसारखे असते असे पाहिलेय.

विचित्र वाटते (मला ).

बापरे इथे तर ११ व्या एपिसोड पासुनच टडोपा येतय. तरी बरं तु - नळीवर एक एपिसोड पहायला सुद्धा २-३ दिवस जातायत ..

Pages