पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.
असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.
ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.
सध्या नो टिव्ही मोड ऑन आहे
सध्या नो टिव्ही मोड ऑन आहे आमचा. पण तुझं लिखाण वाचून ही वाहिनी बरी असावी असं वाटतय.
त्या किरण खेर वाल्या मालिके बद्दल तुच का इथे अपडेटस देत नाहीस?
ह्म्म्म्म, मालिका बघायला वेळच
ह्म्म्म्म, मालिका बघायला वेळच नाहीये सध्या कोणतीही.
कविता म्हनाली तसं नो टिव्ही मोड
टिव्ही असला की झी मराठी शिवाय इतर काही चालत नाही.
लेख आवडला
जिंदगी गुलझार है! माझी ऑल
जिंदगी गुलझार है! माझी ऑल टाइम फेव्हरीट झाली आहे. नक्की बघावी अशी मालिका.
ऑन झारा आणि जिंदगी गुलझार है
ऑन झारा आणि जिंदगी गुलझार है या दोन्ही मालिका बेहद्द आवडल्या. पाकिस्तानी संगीताचं वेड आधीपासून होतंच या वाहिनीमुळे मालिकाम्चं पण वेड लावल. कलाकारांचा अतिशय साधासहज अभिनय हे खरंच वैशिष्ट्य आहे, आपल्याकडे त्या ताकदीचा अभिनय करणारे अनेक कलाकार आहेत. पण प्रेक्षकांनाच ते सहन होत नसाव्ण
मलाही कितनी गिरहे बाकी है खूप
मलाही कितनी गिरहे बाकी है खूप आवडते. मी शक्य असेल तेव्हा पाहण्याचा नक्की प्रयत्न करते.
जिंदगी गुलझार है मध्ये रोज वेगळी कथा असते का किगिबाहै सारखी? की एकच कथा आहे?
अतिशय श्रीमंत घर असले तरीही
अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका...+१
लग्न सोहळेही थोडक्यात उरकतात. आप्लया सिरीयल सारखे आठवडा आठवडा तोच रतीब घालत नाहीत बसत. वर ते प्रेक्षकांना सामील करून घेणे या सोहळ्यात हे ही असतं आपल्याकडे.
मला औन-झारा', 'मात',आणि 'जिंदगी गुल्जारहै' आवड्ल्या.
दक्षिणा,
जिंदगी गुल्जारहै' मधे एकच कथा आहे.
जिंदगी गुलझार है! माझी ऑल
जिंदगी गुलझार है! माझी ऑल टाइम फेव्हरीट झाली आहे. नक्की बघावी अशी मालिका.>>> +१
मात नावाचि मालिका सुद्धा
मात नावाचि मालिका सुद्धा सुंदर होति.
झारुन कसला मस्ताय त्याची
झारुन कसला मस्ताय
त्याची हमसफर येतेय आता.
अजुन एक माहिती औन झारा रिपिट टेलिकास्ट सुरु आहे. त्यांच्या हिरविणी लौकिकार्थाने एकदम सुंदर आहेत.
कविता ताई आणि त्यांच्या
कविता ताई आणि त्यांच्या सारख्यांनी ह्या पाकीस्तानी सीरियल बघितल्या मुळे, त्या सिरियल काढणार्यांना, आणि त्यात काम करणार्यांना जास्तीचे पैसे मिळणार. त्यातले १०-२० टक्के तरी ती लोक पाकीस्तनातील मदरश्यांना दान करणार आणि त्यात शिकणारी मुले भारताच्या सैनिकांना मारणार. आणि इथे कविता ताई पाकीस्तानी सिरियल बघुन टाळ्या वाजवणार.
जगातल्या कुठल्याही देशात हे घडणार नाही.
टोचा फारच अस्थानी पोस्ट आहे.
टोचा फारच अस्थानी पोस्ट आहे.
टोचाभौ या सगळ्या जरतरच्या
टोचाभौ या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत हो. आणि कुणी काय बघायच हा ज्याचा त्याचा वैयक्तित प्रश्न आहे की. नका इतका त्रास करुन घेऊ.
कलेला सीमा नसते. जे चांगल आहे त्याला चांगलच म्हणणार ना? की फक्त पाकिस्तानी कलाकार आहेत त्यांच्या सिरियल्स आहेत म्हणुन वाईट म्हणायच?
असो.
सिरियल्स आहेत म्हणुन वाईट
सिरियल्स आहेत म्हणुन वाईट म्हणायच?>>>>> सीरीयल वाईट आहेत का नाहीत हा प्रश्न च नाही.
तुम्ही कशाला खतपाणी घालत आहात ते तुम्हाला कळते आहे का?
जर माझ्या शेजार्याचा, माझ्या मुला/मुली चा खून करणाचा इरादा असेल आणि तो खूप चांगला चित्रकार असेल तर मी त्याची चित्र विकत घेउन घरात लावू का?
Tocha, expected comment
Tocha, expected comment
Mabowar hi comment kona na konakadun yenarch yachi khatri hoti
अहो टोचाभाउ इथे
अहो टोचाभाउ इथे मनोरंजनाबद्द्ल चर्चा चाललीये. पाकीस्तानला कुणीही समर्थन करत नाहीये.
कलेला सीमा नसते. जे चांगल आहे
कलेला सीमा नसते. जे चांगल आहे त्याला चांगलच म्हणणार ना? की फक्त पाकिस्तानी कलाकार आहेत त्यांच्या सिरियल्स आहेत म्हणुन वाईट म्हणायच?
<<
<<
किती बरे झाले असते हेच विचार त्या सीमेपलिकडील सरकार, सैन्य आणि जनतेचे असते. निदान हिंदुस्थानच्या सीमेवर सैनिंकाना दररोज रक्त तरी सांडावे लागले नसते.
@टोचा
+१
इग्नोरास्त्र ऑन करा!!!!
इग्नोरास्त्र ऑन करा!!!!
माझाही ईग्नोर मोड ऑन
माझाही ईग्नोर मोड ऑन
अहो टोचाभाउ इथे
अहो टोचाभाउ इथे मनोरंजनाबद्द्ल चर्चा चाललीये. पाकीस्तानला कुणीही समर्थन करत नाहीये.>>>>>>>
अहो जाणूनबुजुन नाही करत आहात पाकीस्तानचे समर्थन पण त्या सिरीयल बघुन तुम्ही तुमचे पैसे पाकीस्तानात पोहचवत आहात.
ते लोक तुमच्या सैनिकांवर गोळ्या चालवत आहेत रोज. तुमचा कोणी जवळचा माणुस सैन्यात असल्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टींची गंभिरता कळणार नाही का?
नंदिनीला अनुमोदन. अशा पोस्ट्स
नंदिनीला अनुमोदन. अशा पोस्ट्स ना इग्नोर करा आणि सिरियल बद्दल चर्चा ऑन ठेवा.
किती बोलतील बोलून बोलून? कंटाळतीलच ना उत्तर नाही मिळालं तर.
टोचा : आपण प्रसाद भाउ १९७१
टोचा :
आपण प्रसाद भाउ १९७१ मिपाकर का हो? सेम प्रतिसाद आपण तिथे सुद्धा दिलेत.
जिंदगी गुलझार है! माझी ऑल
जिंदगी गुलझार है! माझी ऑल टाइम फेव्हरीट झाली आहे. नक्की बघावी अशी मालिका.>>> +१०००००
फवाद खान आणि सनम सईद दोघेही उत्तम अभिनेते आहेत. झारून तर मस्तचं रंगवलाय फवादने..
फवादच्या मी जामच प्रेमात पडल्ये. 'जिंदगी गुलझार है', 'हमसफर', 'बेहद' अशा पाकिस्तानी मालिकांमधून उत्कृष्ट अभिनय करून सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत ( चित्रपट - खुबसूरत) पावले रोवण्याच्या मार्गावर असलेला अभिनेता 'फवाद अफझल खान' ... सध्या जाम प्रेमात पडल्ये मी त्याच्या (आणि त्याच्या अभिनयाच्याही) त्याचं बोलणं, त्याचे डोळे, समोरचा बोलत असताना तो जेव्हा लक्षपूर्वक ऐकत असतो तेव्हा त्याच्या चेह-यावरचे भाव, त्याचे लुक्स, त्याची भाषा... सगळचं सुंदर वाटतं. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो एका कॉमेडी शोमध्ये आला होता परवा, पण एकदम डाऊन टू अर्थ. पाकिस्तान आणि आता जगभरात एवढं फॅन फॉलॉईंग मिळूनही तो अजूनही नम्र वाटतो, ..
आणि किती आदबशीर असतात ना ते
आणि किती आदबशीर असतात ना ते लोक? बेहद्द तमीज
'झी' नेट्वर्कचे चॅनल
'झी' नेट्वर्कचे चॅनल बघीतल्याने पैसा पाकिस्तानात कसा जातो?
'झी' नेट्वर्कचे चॅनल
'झी' नेट्वर्कचे चॅनल बघीतल्याने पैसा पाकिस्तानात कसा जातो? >> कृपया श्रीयुत टोचा यांच्याशी संपर्क साधावा
मलाही जिंदगी गुलझार खुपच
मलाही जिंदगी गुलझार खुपच आवड्ली.. त्यातले सगळे कलाकार शेवटच्या मुलाखतीत होते.. अगदी सुंदर बोलत होते.. डायरेक्टरला पण 'आपा' म्हणून संबोधलं..
औन झारा पण चांगली आहे.. फवादची बेहद्द नावाची टेलिफिल्म पण..
सध्या वेळ असेल तेव्हा शोधुन हे हम टिव्ही चे प्रोग्राम बघतेय
आगाऊ... आगाऊ प्रश्न विचारु नयेत
'झी' नेट्वर्कचे चॅनल
'झी' नेट्वर्कचे चॅनल बघीतल्याने पैसा पाकिस्तानात कसा जातो? >>>>>>>
झी नेटवर्क ला ह्या पाकीस्तानी सीरीयल विकत घ्यायला लागतात पैसे देवुन. हे तर अगदी बेसिक झाले.
तुम्ही लोक जर त्या आवडीने बघत राहीलात तर त्यांचा टीआरपी वाढेल. टीआरपी वाढल्यामुळे पाकीस्तानी कलाकार, निर्माते त्यांचे रेट वाढवतील आणि अजुन पैसा पाकीस्तानात जाइल.
माझी झी- जिंदगी वर "ज़िंदगी
माझी झी- जिंदगी वर "ज़िंदगी गुलज़ार है" ही आवडती मालिका होती
आणी हो!आपल्या इथे झी टीव्ही वर दाखवण्यात येणारी "कबूल है" मालिका पाकीस्तानामधे गाजतेय. (Geo TV या वाहिनी वर )
माझी ही पाकिस्तानी टीवी
माझी ही पाकिस्तानी टीवी सिरिअल्स मह्हा फेव आहेत..
गेल्या वीसेक वर्षांपासून..
आता भारतात ही दाखवण्यात येत आहेत हे पाहून छान वाटलं , मनापासून आनंद झाला .. भारतीय दर्शकांना दर्जेदार अभिनय पाहण्याची संधी मिळाली म्हणून..
काश.. एकता कपूर ही काही धडे घेईल यांपासून..उगीच्च वाढवलेले रटाळवाणे एपिसोड.. अवास्तविक , अप्रासंगिक दागिने ,मेकप लावण्याची कलाकारांवर सक्ती इ.इ.
कोणाला पाकिस्तानी दर्जेदार मालिका पाहण्यात इंटरेस्ट असेल.. मला संपर्क करा.. पूर्ण जंत्रीच देईन ना..
सर्व यू ट्यूब वर अवेलेबल आहेत..
ए आर वाय टी वी ड्रामा सिरिअल्स, हम टी वी ड्रामा सिरिअल्स खूप छान आहेत..
फवाद खानच्या सध्या जाम
फवाद खानच्या सध्या जाम प्रेमात पडल्ये मी (आणि त्याच्या अभिनयाच्याही) त्याचं बोलणं, त्याचे डोळे, समोरचा बोलत असताना तो जेव्हा लक्षपूर्वक ऐकत असतो तेव्हा त्याच्या चेह-यावरचे भाव, त्याचे लुक्स, त्याची भाषा... सगळचं सुंदर वाटतं...+१
'हमसफर' लवकरच दाखवतील झी-जिन्दगी वर..
Pages