Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<< म्हणजे ५०० ६०० हे पहिले ५
<< म्हणजे ५०० ६०० हे पहिले ५ जणांचीच जवाबदारी आहे का ? >> गोलंदाजांच्या गोलंदाजीतल्या मर्यादा समजूं शकतों पण फलंदाजीबद्दलची त्यांची अमर्याद अनास्था मात्र अक्षम्य आहे !
धन्यवाद, भास्कराचार्य!
धन्यवाद, भास्कराचार्य!
अखेरच्या षटकात..... अनुष्का
अखेरच्या षटकात.....
अनुष्का वैनी टाळ्या वाजवत होत्या.. ईंग्लंडला बिचारीवर बरेच खापर फुटले होते.
कोहली ने शेवटची ओव्हर शांतपणे
कोहली ने शेवटची ओव्हर शांतपणे खेळायला हवी होती
कोहली अखेरच्या ओव्हरमध्ये आऊट
कोहली अखेरच्या ओव्हरमध्ये आऊट झालेला पाहून एकच विचार आला डोक्यात -
शेवटची ओव्हर शमीने नाईटवॉचमनप्रमाणे खेळावं असा प्लान करता आला नसता का?
अर्थात १६९ रन्स काढल्यावर कोहली प्रचंड कॉन्फीडंट असणार हेही तितकंच खरं!
"शेवट्च्या दिवशी कितिहि
"शेवट्च्या दिवशी कितिहि टार्गेट असले तरि गाठायचा प्रयत्न करणार"---कोहली
एवढ्याच अटिट्युड सठि आवड्तो कोहली.......
ज्याच्या जिभेवर लगाम नाही अशा
ज्याच्या जिभेवर लगाम नाही अशा व्यक्तीचा मी आदर करू शकत नाही,-- विराट कोहली
जॉन्सन ला लय भारी उत्तर दिले.
आपला पण हाच फंडा आहे.
हिवाळ्यातल्या आर्क्टिक
हिवाळ्यातल्या आर्क्टिक सर्कलमधे असल्यासारखे वाटते. रात्र संपेल, संपेल असे अंधुक अंधुक वाटू लागते, पण तेव्हढ्यात, राहुल, धोणी नि आश्विन परत आपल्याला वास्तवात खेचतात.
आता बहुतेक धोणीला काढणार संघातून.
जर हॅरिस नि जॉन्सन मिळून १०० करू शकतात तर शामि, यादव, नि शर्मा मिळून तरी १०० केले पाहिजेत. गोलंदाजीत नाहीतर निदान फलंदाजीत तरी बरोबरी करावी.
भाऊ, क्या बात है! इकडे कोहली, रहाणेची शतके तर तिकडे तुमचे २ हजार! ११००० करूनच दा़खवा.
इकडे मायबोलीवरील काही मुलांना बहकावल्याबद्दल त्यांच्या बायका माझ्यावर नाराज आहेतच, त्यात आता वहिनींची भर घालू नका!! माझे नाव नका सांगू.
असामी, तुम्ही सियाटलला गेलात वाटते? बाSस्टन ला होतात ना? मग पेट्रियट्स च काय? की यंदा ब्रॉन्को मागच्या सुपरबॉलचा वचपा काढणार?
नाहीता मागचे लाईनलावू आहेत..
असेS बोलूSS नयेSSS!!
आपले खेळाडू मायबोली वाचतात नि मग प्रार्थना म्हणतात. त्यांचा आत्मविश्वास जातो.
या कसोटी मालिकेतला आत्यंतिक
या कसोटी मालिकेतला आत्यंतिक महत्वाच्या सामन्यात रोहितऐवजीं राहुलला घेणं निश्चितच शहाणपणाचं नव्हतं. << रोहितऐवजीं राहुल हा दोघांवरही अन्याय ठरण्याची शक्यता अधिक.>> ही माझी भिती सार्थ ठरली !
झक्कीजी, अधून मधून असा फालतूपणा करतों म्हणून तर मीं इतकीं तपं भारतीय क्रिकेट पाहूनही अजून 'डिप्रेशन'मधे नाहीं गेलोय !!
ज्याच्या जिभेवर लगाम नाही अशा
ज्याच्या जिभेवर लगाम नाही अशा व्यक्तीचा मी आदर करू शकत नाही,-- विराट कोहली
जॉन्सन ला लय भारी उत्तर दिले.
>>>>>>>
हो दिदे, पण अश्यामुळे कोहली सुद्धा त्याच लाईनमध्ये येऊन उभा राहतो. यामुळे तो स्वताही कधी आदर मिळवू शकणार नाहीच. आणि त्यालाही हाच युक्तीवाद करत सुनावणारा भेटतच राहणार.
बाकी आज जॉन्सनने त्याला जवळपास बादच केलेला, दोन झेल टिपता नाही आले आणि कित्येकदा चकवले सुद्धा होते त्या छोट्याश्या पिरीअडमध्ये. त्यामुळे या अॅग्रेशन अॅण्ड माईंड गेममध्ये जॉन्सनच सरस ठरलेला. कारण त्याने चिडून कसाही स्वैर आणि शॉर्ट मारा केला नव्हता. जर कोहली तिथेच बाद झाला असता तर आपली स्थिती आणखी बिकट असती. एण्ड ऑफ द डे कोणी सरस शिवी घातली वा कोणी बेक्कार खुन्नस दिली हे नाही तर सामना कोण जिंकला हे मॅटर करते.
उद्याची परिस्थिती एका अर्थी
उद्याची परिस्थिती एका अर्थी आपल्या फेवर मध्ये आहे, कारण दोन दिवस शिल्लक असताना आधी ऑस्ट्रेलिया खेळणार आहे.
जर उद्या ऑस्ट्रेलियाच्या लवकर विकेट काढल्या तर ते दबावाखाली येऊ शकतील. आणि जर गुंडाळायला यशस्वी ठरलो तर कोणास ठाऊक.. अॅडलेडचा ऐतिहासिक विजय आपण असाच मिळवला होता.
याउलट त्यांनी चांगली फलंदाजी केली तरी त्यांना डाव घोषित बिनधास्तपणे नाही करता येणार, आणि गरजेपेक्षा जास्तच खेळावे लागणार, त्या परीस्थितीत सामना अनिर्णीत राहायची संधी वाढेल.
थोडक्यात उद्या आपण आक्रमक गोलंदाजी करून जिंकायचा प्रयत्न करू शकतो, मात्र ऑस्ट्रेलिया सामना सेफ केल्याशिवाय आक्रमक फलंदाजी करायचा धोका पत्करू शकत नाही.
त्यामुळे उद्या वेळकाढूपणा न करता आल्या आल्या बॅट फिरवा..
थोडक्यात उद्या आपण आक्रमक
थोडक्यात उद्या आपण आक्रमक गोलंदाजी करून जिंकायचा प्रयत्न करू शकतो >> म्हणजे more short balls ?
Kohli and Rahane complement each other perfectly.
तुम्ही सियाटलला गेलात वाटते? बाSस्टन ला होतात ना? मग पेट्रियट्स च काय? की यंदा ब्रॉन्को मागच्या सुपरबॉलचा वचपा काढणार? >> झक्की चांगली टीम फॉलो करायला तिथे कशाला जायला हवे. हे तिसरे वर्ष आहे हॉक्स फॉलो करायला लागल्याचे. प्लेऑफ हि निव्वळ लॉटरी आहे.
<< जर उद्या ऑस्ट्रेलियाच्या
<< जर उद्या ऑस्ट्रेलियाच्या लवकर विकेट काढल्या तर ते दबावाखाली येऊ शकतील. >> पण विकेटस काढणार कोण ? मला तर बुवा सध्यां बिलकुल वेळ नाहीय दोन दिवसांकरतांही ऑस्ट्रेलियात जायला !!!
खेळपट्टीमधून स्टंम्प बाहेर
खेळपट्टीमधून स्टंम्प बाहेर नाही काढायचेत
फलंदाज बाद करायचे आहेत भाऊ
असामी, आता आक्रमक म्हणजे काय
असामी, आता आक्रमक म्हणजे काय डावपेच ते धोनीच ठरवेल पण निदान बॉडी लॅंगवेज तरी अशी हवी सतत की ऑस्ट्रेलियाला वाटेल भारत जिंकण्यासाठी खेळतोय.
आणि हे ऑस्ट्रेलियाकडूनच शिकावे, ३०० च्या पार्टनरशिपनंतरही जर त्यांना विकेट मिळाली तरी ते असा माहौल करतात की बस्स याच विकेटची वाट बघत होतो आता उरलेल्यांना १०० मध्ये गुंडाळतो. आणि म्हणूनच बरेचदा तसे ते करतातही. अन्यथा आपण नुसता सुस्कारा टाकतो, हुस्श गेला बाबा एकदाचा..
उद्या त्यांची चांगली सुरुवात झाली तरी रन रोखायला नकारात्मक गोलंदाजी करण्यात काहीच पॉईंट नाही, त्याने फार फार तर शेवटच्या दिवशी खेळावी लागणारी १०-१२ षटके कमी करू शकतो. ४ सामन्यांच्या मालिकेत आपली स्थिती २-० ने पिछाडीवर असणे हिच गोष्ट उद्या आपल्याला सकारात्मक खेळायला मजबूर किंवा उद्युक्त करू शकते.
<< खेळपट्टीमधून स्टंम्प बाहेर
<< खेळपट्टीमधून स्टंम्प बाहेर नाही काढायचेत
फलंदाज बाद करायचे आहेत भाऊ >> तेंच तर सुचवलंय ना जरा वेगळ्या तर्हेने आपल्या गोलंदाजीबाबत !
पाच डावातले आपले बॉलिंगचे
पाच डावातले आपले बॉलिंगचे डावपेच बघूनसुद्धा आक्रमक गोलंदाजी वगैरे म्हणतोयस
भाऊ, राहुलला खेळवण्यामधे baptism by fire हा उद्देश असेल.
चला शेपुट फक्त पर्यटनाला.
चला शेपुट फक्त पर्यटनाला. बाकि काहि उपयोग नाहि..
<< राहुलला खेळवण्यामधे
<< राहुलला खेळवण्यामधे baptism by fire हा उद्देश असेल.>> मग चटका बसणारच ना !
पण सिरीयसली, मीं राहुलला दोष देत नाहीय. उलट, टीकेने तो खच्चून जावूं नये अशीच प्रार्थन करतोय. पण इतका तरूण संघ घेवून खेळताना आजच्या 'क्रुशल' सामन्यात नेमकं रोहितला वगळून राहुल द्रविडला घेणं समजण्यासारखं होतं पण राहुलला ... नाही पटत.
कोहली ऑसीजबद्दल म्हणतो,'They
कोहली ऑसीजबद्दल म्हणतो,'They were calling me a spoilt brat'. ऑसीज म्हणतील, इंडियन्स मनांत म्हणतात, आम्ही जरा मोठ्याने बोललों, इतकंच !!!
राहुल द्रविडला घेणं > राहुल
राहुल द्रविडला घेणं >
राहुल द्रविड इतका 'टीम मॅन' आहे, की आत्ता त्याला विनंती केली, तर तो खरेच खेळायला येईल असेच वाटते.
<< तर तो खरेच खेळायला येईल
<< तर तो खरेच खेळायला येईल असेच वाटते. >> नुसता येईलच असं नाही, अप्रतिम खेळीही करून दाखवेल !
चला, खेळ परत सुरू झाला आहे व आपले गोलंदाज छान गोलंदाजी करताहेत, यजमान ऑसीजना आपल्यापासून कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेत !!
सकाळचे अवघे २च ओव्हर खेळलो
सकाळचे अवघे २च ओव्हर खेळलो आपण ?????
काय हलकटपणा आहे हा माने ?????? त्यापेक्षा ६ विकेट गेल्यानंतर एकुन धावसंख्येत ५०-६० धावा जोडुन सरळ डाव घोषित करण्याची सवलत भारतीय संघाला देण्यात यावी अशी मागणी मी आज करतो.
आणि उरलेले ४ विकेट्स समोरच्या गोलंदाजांच्या खात्यात जोडण्यात यावे.
अप्रतिम कॅच रहानेचा. अझर -
अप्रतिम कॅच रहानेचा. अझर - रैनाची आठवण आली
इटस हाय टाईम. धोणीला टेस्ट
इटस हाय टाईम. धोणीला टेस्ट मधून रिटायर करा आता बळजबरी !
कालचे एकेक शॉटस अगदी दोन / तीनचे सुद्धा अप्रतिम होते.
विजय, कोहली आणि रहाणे तिघे मिळूनच धावा काढत आहेत. बाकीच्यांच्या बॅटी कधी तळपणार कोण जाणे? अरे हो - देशात आल्यावरच
<< बाकीच्यांच्या बॅटी कधी
<< बाकीच्यांच्या बॅटी कधी तळपणार कोण जाणे? >> अगदीं अकराही जणांच्या बॅटी तळपल्या तरीही जोपर्यंत आपल्या गोलंदाजीला धारच येत नाहीं, तोपर्यंत कसोटी सामन्यांत फार मोठी अपेक्षा ठेवणं चूकीचंच !
बरोबर आहे..... चार
बरोबर आहे..... चार फ्र.न्टलाईन बॉलर्स खेळवून परदेशात जि.न्कायचे चान्सेस कमीच!
तो भुवी कधी फिट होणारेय.... टूर स.न्पल्यावर का?
मला असे म्हणायचेय भाऊ की
मला असे म्हणायचेय भाऊ की त्यांनी केलेल्या ५०० + धांवापर्यंत आपणही जातोच.ती लोकंच फक्त आपल्याला मारतात असे नाही तर आपणही त्यांना मारतोच. म्हणजे पीच बॅटसमनला साथ देत आहे तर त्या जोरावर तरी जास्त धावा काढल्या तर आपण जिंकू शकू.
आपल्या बॉलिंगची बोंब पहिल्यापासूनच आहे. आणि आता भूवी पण नाही.
अवा.न्तर धावन्चा रतीब घालतायत
अवा.न्तर धावन्चा रतीब घालतायत लेकाचे..... श्या!
५ आउट झालेत म्हणजे आत्ता कुठे
५ आउट झालेत म्हणजे आत्ता कुठे खरी बॅटिंग चालू झाली त्यांची.
Pages