नमस्कार,
फोटो सर्कल सोसायटी, ठाणे गेले दोन वर्ष फोटोग्राफीला वाहीलेला मराठी दिवाळी अंक 'फ फोटोचा' प्रकाशित करत आहे. २०१४ हे या दिवाळी अंकाचे तिसरे वर्ष. दरवर्षी या अंकाचे प्रकाशन ठाणे महापौर चषक स्पर्धेच्या बक्षिस समारंभाच्या दिवशी ठाणे महापौरांच्या हस्ते होते. ( यावर्षी निवडणुकांच्या कारणास्तव बक्षिस समारंभ उशिरा झाला आणि त्यामुळे या अंकाचे प्रकाशनही आम्ही दिवाळीत करु शकलो नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत)
काल १४ डिसें रोजी ठाण्याच्या महापौरांच्या हस्ते 'फ फोटोचा' हा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. या वर्षी एक वेगळा प्रयोग म्हणुन आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा अंक पोचावा म्हणुन हा अंक मराठी बरोबरच इंग्रजीमधेही प्रकाशित करण्यात आला.
इंग्रजीत अंक प्रकाशित करणे हे एक वेगळे आव्हान होते कारण ललित प्रकारच्या लेखांचे इंग्रजी अनुवाद कसे होतील याबद्दल थोडी शंका होती. इंग्रजी अंकाचे हे पहीलेच वर्ष असल्याने अंकात चुका राहुन गेल्या असतीलच, किंवा काही ठिकाणी अनुवाद योग्य वाटत नसेल. पण एक पहिला प्रयत्न म्हणुन वाचक नक्कीच दोन्ही अंक वाचुन त्यांच्या प्रतिक्रीया आमच्यापर्यंत पोहोचवतील याची खात्री आहे.
यावर्षी जेष्ठ इंडस्ट्रियल फोटोग्राफर हरी महिधर , प्रख्यात फॅशन फोटोग्राफर विक्रम बावा यांच्या मुलाखती, आयडीयाज्@वर्कचे प्रशांत गोडबोले, सिनेमॅटोग्राफर संदीप यादव यांची मनोगते, अतुल धामणकर, युवराज गुर्जर, बैजू पाटील, गिरिश वझे, डॉ. सुधीर गायकवाड अशा प्रख्यात वन्यजीव प्रकाशचित्रकारांचे लेख आणि स्लाईड शोज, किशोर साळी, ज्योती राणे यांचे वेगळ्या प्रकारच्या प्रकाशचित्रण आणि कला यासंबधीचे लेख, वारी या विषयाचे स्वप्नील पवार आणि रेखा भिवंडीकर यांचे रेखलेले शब्दचित्र, सुभाष जिरंगे, अंकिता वनगे, मेघना शहा यांचे लेख, तन्मय शेंडे यांची अमेरिकेतील लँडस्केप्स, योगेश जगताप यांची लाहौलस्पिती येथील लँडस्केप्स, नंदिनी बोरकर यांची ऑस्ट्रेलीयावारी, स्वप्नाली मठकर यांचे फुजी पर्वताचे शब्दचित्र, संघमित्रा बेंडखळे यांनी साकारलेला मणिपुर येथील इमा बाजार, जॉयदिप मुखर्जी आणि सायली घोटीकर यांची स्ट्रीट फोटोग्राफी, इंद्रनील मुखर्जी यांचा फोटोजर्नालिझम मधील नितीमत्ता असा वेगळ्या विषयावरील लेख या अंकात वाचायला मिळतील.
यावर्षी फोटोग्राफी जगतातील तीन महत्वपूर्ण तारे निखळले. श्री. गोपाळ बोधे, श्री. अधिक शिरोडकर आणि श्री के. जी. महेश्वरी या तिन्ही दिग्गजांना श्रद्धांजली वाहणारे आणि त्यांच्या आठवणी सांगणारे बिभास आमोणकर, प्रविण देशपांडे आणि मिलिंद देशमुख यांचे लेखही या अंकात वाचता येतील.
मराठी दिवाळी अंक - फ फोटोचा
इंग्रजी अंक - द फोटो सागा - इन्स्पायरींग स्टोरीज ऑफ मास्टर फोटोग्राफर्स
सर्व लेखकांचे, अंकाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हातभार लावणार्या प्रत्येकाचे आणि आमच्या वाचकांचेही मनःपूर्वक आभार.
वाचकांच्या पोचपावतीशिवाय अंक अपूर्ण आहे त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया इथे किंवा खालील लिंक वर नक्की द्या.
http://fotocirclesociety.com/fa-diwalianka.php
धन्यवाद,
स्वप्नाली मठकर
मस्तच!
मस्तच!
अरे वा! आला का अंक! मी वाट
अरे वा! आला का अंक! मी वाट पाहतच होते.
फोटो पहायची उत्सुकता आहे खूप.
मस्त! नक्की पहाणार!
मस्त! नक्की पहाणार!
अभिनंदन.. !
अभिनंदन.. !
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
ग्रेट, भारी अंक आहे, वरवर
ग्रेट, भारी अंक आहे, वरवर चाळले, फुरसत मध्ये वाचेन.. अभिनंदन !!!
मस्तच. सावली, अभिनंदन.
मस्तच. सावली, अभिनंदन.
स्वप्नाली, अंक चाळला. मस्त
स्वप्नाली, अंक चाळला. मस्त झालाय. मायबोलीकर दिसले त्यात
नुसत्या हाताळणीत सुद्धा अंक
नुसत्या हाताळणीत सुद्धा अंक फारच सुरेख वाटला . स्ट्रीट फोटोग्राफी आणि पाळिव प्राण्यांचे फोटो आवर्जून पाहिले.
अंकाची ठेवण आणि मांडणी सुबक आहे.
लिंक बद्दल धन्यवाद. लिंक
लिंक बद्दल धन्यवाद. लिंक उघडली पण पुढे जायला वेळ घेत आहे. नक्कीच वेगळ काहीतरी दिसत आहे आहे ह्या अंकात. तुम्हा सर्वांचे अभिनंदन.
अरे वा! सावली अभिनंदन!
अरे वा! सावली अभिनंदन!
अरे वा! 'फ' टीमचे अभिनंदन.
अरे वा! 'फ' टीमचे अभिनंदन. वर दिलेली यादी वाचून अंकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. नक्की वाचणार.
स्तुत्य आणि कौतुकास्पद डिजिटल
स्तुत्य आणि कौतुकास्पद डिजिटल उपक्रम.
अंकाची अनुक्रमणिका चाळली एक लेखही वाचला. केवळ अप्रतिम. प्रत्यक्ष फोटो प्रदर्शनास धावती भेट देण्यापेक्षाही दहापट आनंददायी डिजिटल अंक आहे.
अंकाची माहिती आणि लिंक्स दिल्याबद्दल तुम्हाला अनेकानेक धन्यवाद.
अभिनंदन , काही फोटो पाहीले ,
अभिनंदन , काही फोटो पाहीले , खुप आवडले.
मस्त दिसतोय अंक. सुरु केलंय
मस्त दिसतोय अंक. सुरु केलंय बघायला/ वाचायला. नेव्हिगेशन आवडलं.
व्वा छान आहे अंक.
व्वा छान आहे अंक.
भारी. या अंकात लेख आलेल्या
भारी. या अंकात लेख आलेल्या माबोकरांचे हार्दीक अभिनंदन.
अप्रतिम झाला आहे अंक. वाईल्ड
अप्रतिम झाला आहे अंक. वाईल्ड लाईफचे सगळेच लेख मस्त. बैजु पाटील यांचा स्लाईडशो अनेकदा बघीतलेल्याच फोटोंचा असल्याना भावला नाही पण दुसरा नाविन्यपूर्ण. मायक्रो फोटोग्राफी, पोर्ट्रेट्र्स व लँडस्केप अप्रतिमच. फक्त मधे मधे थोडे स्पिडब्रेकर आल्यासारखे वाटले. बोलक्य रेषा अमेझींग. शब्दच नाहीत.
सावली, योगेश, तन्मय तुमचे लेख मस्तच. अभिनंदन.
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार
केपी, अंक इतक्या लगेच पाहुन अभिप्राय दिल्याबद्दल खास आभार .
छान आहे अंक. वेळात वेळ काढून
छान आहे अंक. वेळात वेळ काढून वाचणार.
अभिनंदन.
अभिनंदन.
सुंदरच आहे अंक! एकेक उघडून
सुंदरच आहे अंक! एकेक उघडून बघतेय, वाचतेय.
दर्जेदार मांडणी आणि मेजवानी पण!
अंक एकदम अप्रतिम दर्जेदार
अंक एकदम अप्रतिम
दर्जेदार मांडणी आणि मेजवानी पण! <<<
ललिता +१ वाचून सांगते पण
ललिता +१
वाचून सांगते पण चांगला असेल यात काही शंकाच नाही
फारच वंडरफुल
फारच वंडरफुल आहे.
आमच्यासारख्या फोटोग्रा फीत गती नसणार्यांना सुद्धा छायाचित्रकारांच्या कॉमेंटरीमुळे प्रत्येक प्रकाशचित्राची मजा घेता येत आहे.
मस्तच.अभिनंदन!
मस्तच.अभिनंदन!
अंकातले बरेच लेख वाचून झाले..
अंकातले बरेच लेख वाचून झाले.. खूप मस्त झालाय ह्यावर्षीचा अंक..
सावली, तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन आणि आभार !
युवराज गूर्जर यांच्या फोटोतली
युवराज गूर्जर यांच्या फोटोतली लिझ्झर्ड मला बराच प्रयत्न करूनही दिसली नाही.