Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन्ही लेख मस्त आहेत.. 'लाइक
दोन्ही लेख मस्त आहेत.. 'लाइक अ पाकिस्तानी' तर अफलातून
ऑस्ट्रेलियाने पहिल्या
ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगला लीड घेतला.. आता पाचवा दिवस पुर्ण खेळणे सोपे नाहीये आपल्यासाठी.. रफ पॅचेस तयार झालेत..
ऑस्ट्रेलियाने पहिल्या
ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगला लीड घेतला.. आता पाचवा दिवस पुर्ण खेळणे सोपे नाहीये आपल्यासाठी.. रफ पॅचेस तयार झालेत..
रोहित शर्माला त्यामुळेच तर
रोहित शर्माला त्यामुळेच तर घेतलाय. तो आता त्याचे वनडेचे २०० टाकणार.
ऑस्ट्रेलियासाठी उद्यां डाव
ऑस्ट्रेलियासाठी उद्यां डाव केंव्हां घोषित करायचा हा निर्णय घेणं महाकठीण आहे. लायान ह्या एकट्यावर विसंबून डाव लवकर घोषित करणं त्याना महागही पडूं शकतं; त्यामुळे, उद्यां हा सामना एकदिवसीय होण्याची शक्यताच अधिक. कोहलीचा एकंदरीत मूड पहातां, लक्ष्य तसं अगदींच अशक्य नसेल तर तो उद्यां जिंकण्यासाठीच बाजी लावेल असं वाटतं.
बघूं कसा खेळ होतो तें .
भाऊ , मला तर आजच डाव का
भाऊ ,
मला तर आजच डाव का घोषित केला नाही याच आश्चर्य वाटल .
३३० + शेवट्च्या डावात ऑलमोस्ट अशक्य आहे .
अन Dangling the Carrot ही करता आल असत .
सकाळी वातावरण बघुन मग निर्णय
सकाळी वातावरण बघुन मग निर्णय घेतील. कारण सकाळी जर खेळपट्टी फलंदाजीला अनुकुल असेल तर धवन आणि मुरली विजय दोघे धाडसी फलंदाजी करतील आणि किमान लंच पर्यंत १००-१५० पर्यंत मजल मारुन देतील. त्यानंतर पुजारा रहाणे कोहली शर्मा यांना शेवटच्या २ सत्रात २००च्या आसपास रन्स करावे लागतील.
हा धोका ऑसीस घेणार नाहीत खेळपट्टी अजुन ही गोलंदाजीसाठी अनुकुल नाही आहे
सहमत, आजही किमान चार-पाच षटके
सहमत, आजही किमान चार-पाच षटके द्यायला हरकत नव्हती.
उद्या सकाळी जर केला नाही घोषित तर ऑस्ट्रेलियाच गंडलीय असा अर्थ होईल.
बादवे, क्लार्क नाही का टाकत हल्ली बॉलिंग?
क्लार्कच्या पाठीची दुखापत
क्लार्कच्या पाठीची दुखापत त्याला कारणीभूत आहे.
त्याला फलंदाजी करायला त्रास.
त्याला फलंदाजी करायला त्रास. तुम्ही त्याला काय गोलंदाजी करायला लावत आहेत ?>
<< ३३० + शेवट्च्या डावात
<< ३३० + शेवट्च्या डावात ऑलमोस्ट अशक्य आहे .>> केदारजी, एकदिवसीय सामन्यांच्या विश्वविजेत्या संघासाठी, व तेंही सध्यां त्या संघाचे फलंदाज फॉर्मात असताना, शेवटचा डाव असूनही, ३३०+ सहजशक्य नसले तरीही अशक्य, किंवा ऑलमोस्ट अशक्यही, नाही म्हणतां येणार. शिवाय, खेळपट्टी अगदींच खराब झालेली नसताना, पहिल्याच कसोटीत ऑसीजना असा निर्णय घेणे अधिकच कठीण ! [ कसोटी सामना असूनही, ह्याच खेळपट्टीवर ५००+ चा पाठलाग भारताने ३.८०च्या सरासरीने व चौथ्या दिवशी ऑसीजनी २९० धांवा ४.२० च्या सरासरीने केल्या आहेत, हेंही लक्षांत घ्यायला हवं ].
भाऊ , बरोबर आहे . पण चेंडू
भाऊ ,
बरोबर आहे . पण चेंडू हात हात भर वळत असताना अन ४थ्या डावाची त्या मैदानाची सरासरी पाहता कठीणच आहे .
केदारजी, शेवटच्या डावांत ३३०
केदारजी, शेवटच्या डावांत ३३० करणं कठीण, हें तर निर्विवाद आहे. डाव घोषित करण्याचा निर्णय मात्र ऑसीजसाठीं कठीण कां आहे, याची संभाव्य कारणं फक्त मीं अजमावत होतों .
भाऊ , जी नका हो म्हणू आणि ते
भाऊ , जी नका हो म्हणू
आणि ते ऑसीज आहेत म्हणूनच मला जास्त आश्चर्य वाटतय .
मे बी आत्मविश्वासाचा अभाव .
५ वर्षापूर्वीच्या टीमने अस कधीच केल नसता .
भाऊ, ती कसोटी आहे, विकेट नाही
भाऊ,
ती कसोटी आहे, विकेट नाही मिळत हे लक्षात आल्यावर लगेच डावपेच बदलून समोरच्याला ३ ची धावगती राखायलाही रिस्क घ्यावी लागेल हे सहज शक्य आहे.
बाकी आपल्या संघाचे कौतुक नको, वेस्टईंडिजला सामना सोडून दिलेला आठवतेय ना..
मला आपण जिंकायचा प्रयत्न
मला आपण जिंकायचा प्रयत्न करण्याचे चान्सेस फारच कमी वाटतात.
मला वाटते आपण करु. विराट
मला वाटते आपण करु. विराट किमान जि़ंकण्याच्या दृष्टीने खेळेल असे मला तरी वाटते . त्याच्या नेतृत्वाखाली पहिली कसोटी आहे
दिदे, पहिली कसोटी कोणाला
दिदे,
पहिली कसोटी कोणाला हरायचीही नसते
म्हणुनच आशा आहे. अन्यथा धोनी
म्हणुनच आशा आहे. अन्यथा धोनी असता तर इतके केले त्यातच आनंद मानला असता
<< मे बी आत्मविश्वासाचा अभाव
<< मे बी आत्मविश्वासाचा अभाव .>> मे बी, या भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल वाजवी विश्वास !
<< बाकी आपल्या संघाचे कौतुक नको, वेस्टईंडिजला सामना सोडून दिलेला आठवतेय ना.. >> नेमक्या कोणत्या सामन्याबद्दल म्हणताय तें नाही आठवत; पण, शेवटच्या डावात ३५०+ करून सामना जिंकण्याचा पराक्रम आतांपर्यंत फक्त भारतानेच दोनदां केल्याचं कुठं तरी वाचल्याचं मात्र आठवतंय. कुणी नक्की सांगू शकेल ?
शेवटच्या डावात ३५०+ करून
शेवटच्या डावात ३५०+ करून सामना जिंकण्याचा पराक्रम आतांपर्यंत भारताने दोनदां केल्याचं कुठं तरी वाचल्याचं मात्र आठवतंय. कुणी नक्की सांगू शकेल ? >> हो एक वेस्ट इंडीजमधे नि एक भारतात इंग्लंडविरुद्ध. पण अपवादानेच नियम सिद्ध होतो
<< पण अपवादानेच नियम सिद्ध
<< पण अपवादानेच नियम सिद्ध होतो >> खरंय ! पण, <<बाकी आपल्या संघाचे कौतुक नको,>> याला आपला संघ दोनदा अपवाद होता, याचं कौतुक तर आहेच ना !!
थोडक्यात, उद्यां सकाळी आपण
थोडक्यात, उद्यां सकाळी आपण फलंदाजी न करतां ऑसीजनी भारताला फलंदाजीला निमंत्रित केलं, तर ऑसीजच्या जिगरीला सलाम; थोडा वेळ बॅटींग करून मग भारताला फलंदाजी दिली, तर भारताच्या फलंदाजीचा ऑसीजनाही धाक वाटतो हेंच सिद्ध होईल ! मान्य ?
धाक असा नाही भाऊ, पण आपल्या
धाक असा नाही भाऊ, पण आपल्या फलंदाजीचा काय भरवसा? कधी शंभरीत आटोपतील कधी चारशेही मारतील. असा विचार केला क्लार्कने तर तो ही चुकीचा नाही. व्हॉट से?
<< असा विचार केला क्लार्कने
<< असा विचार केला क्लार्कने तर तो ही चुकीचा नाही. व्हॉट से?>> आय से, यालाच तर धाक म्हणतात ना ! <<कधी चारशेही मारतील>> 'कधी' नाही, आत्तांच पहिल्या डावातही मारल्यात ४४४, ३.८१च्या सरासरीने !!
पहिल्या डावात मारणे आणि उद्या
पहिल्या डावात मारणे आणि उद्या मारणे यात फरक आहे.. नुसता खेळपट्टीचा नाही तर डावपेच आणि परेस्थितीचाही..
वेस्टईंडिजचा सामना नंतर शोधून देतो..
मला वाटते आपण करु. विराट
मला वाटते आपण करु. विराट किमान जि़ंकण्याच्या दृष्टीने खेळेल असे मला तरी वाटते . त्याच्या नेतृत्वाखाली पहिली कसोटी आहे >> दिदे, त्याने तसे करावे असे मलाही वाटते. बोर्डाचा व इतर लोकांचा दबाव ("आधी कन्फर्म करा की कसोटी 'वाचेल' आणि मग 'टी' नंतर जमले तर प्रयत्न करा" - हा अनेक वर्षे अयशस्वी झालेला पॅटर्न पुन्हा केला जाईल हीच भीती आहे) किती येतो व तो तो झुगारून देतो का बघू.
आणि ऑस्ट्रेलिया ३४० वर डिक्लेअर करत नसेल तर ते आणि इतर यांत काय फरक राहिला? ऑसीज ची इमेज थोडीफार उतरेल माझ्या डोक्यातून
सुप्रभात. प्रथम ऑसीजचं
सुप्रभात.
प्रथम ऑसीजचं अभिनंदन, 'स्पोर्टींग डिक्लेरेशन' साठीं !
भारत लंचपर्यंत ३२ षटकांत १०३-२; दुसरं सत्र दोन्ही संघांसाठी, अगणित प्रेक्षकांसाठीं आत्यंतिक महत्वाचं. कोहली जिंकण्यासाठीच खेळतोय हेंही नक्की. तो व मुरली विजय आणखी कांहीं वेळ टीकून रन-रेट ३.५ - ४ आणूं शकले, तर सामना धमाल होईल ! अर्थात, चेंडू इतका वळतोय व जॉनसन छोट्या 'स्पेल्स'मधे खतरनाक गोलंदाजी करतोय त्यामुळे शेवटपर्यंत सस्पेन्स हा रहाणारच. हॅपी व्ह्यूइंग !!
१६५-२ [५० षटकं]; सो फार, सो
१६५-२ [५० षटकं]; सो फार, सो गुड !
203-2 [ ५९.१ षटकं] वळणारे व
203-2 [ ५९.१ षटकं]
वळणारे व खालीं-वर रहाणारे चेंडू, जॉनसनची भेदक गोलंदाजी, रिव्हर्स स्विंग या सर्वांचा सामना करत अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत केलेल्या धांवा ! मानलं विजय व कोहलीला !!
<< हो एक वेस्ट इंडीजमधे नि एक भारतात इंग्लंडविरुद्ध. पण अपवादानेच नियम सिद्ध होतो >> अजून ३५ षटकं बाकी व ८ विकेटस हातांत. कुणी सांगावं भारत पुन्हा एकदां ... इजा ,बिजा ..तिजा !!!! All the best, Bharat !!
Pages