Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या धाग्याचा शुभारंभ खालील
ह्या धाग्याचा शुभारंभ खालील बातमीने करूया..
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10682015.cms
पराग. एकदम फरफेक्ट न्यूज
पराग. एकदम फरफेक्ट न्यूज धाग्याच्या सुरुवातीला....
द. आफ्रिका वि ऑसीजचा पहिला
द. आफ्रिका वि ऑसीजचा पहिला कसोटी सामना प्रचंड खळबळजनक झालेला आहे. पहिल्या २ दिवसांतच ३१ बळी गेलेत. पहिल्या डावात २८४ धावा केलेल्या ऑसीजने आफ्रिकेला केवळ ९६ डावात गुंडाळून वर्चस्व मिळविले. पण दुसर्या डावात कांगारूंना सर्वबाद ४७ अशी नामुष्की पत्करावी लागली. एकवेळ त्यांची धावसंख्या ९ बाद २१ अशी होती. शेवटच्या जोडीने २६ धावांची भागीदारी करून थोडीफार नामुष्की टाळली. दुसर्या दिवशी दोन्ही संघांनी मिळून २९४ धावा केल्या पण २३ विकेट्स पडल्या. त्यातल्या १३ विकेट्स उपाहार ते चहापान या २ तासातच गेल्या. दुसर्या दिवसअखेर आफ्रिका १ बाद ८१ आहे व विजयासाठी ३ दिवसांत अजून १५५ धावा करायच्या आहेत. डोकं शांत ठेवून ते खेळले तर अडीच दिवसातच आफ्रिकन्सना सामना जिंकता येईल.
पराग, तेच लिहीत होतो तेवढ्यात
पराग,
तेच लिहीत होतो तेवढ्यात तुमची पोस्ट आली सुद्धा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रे देवा.. हिम्स +१.
रे देवा..
हिम्स +१.
आजच्या ऑसीज वि आफ्रिका
आजच्या ऑसीज वि आफ्रिका सामन्यात प्रथमच एक नवीन विक्रम झाला. कसोटी सामन्यातले चारही डाव (पूर्ण किंवा अपूर्ण) एकाच दिवशी खेळले जाण्याचा विक्रम आज झाला.
ऑसीज वि आफ्रिका total
ऑसीज वि आफ्रिका total dogfight होती सकाळी. मजा आली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिथेहि सरपट्टी चेंडू टकले की
तिथेहि सरपट्टी चेंडू टकले की काय कुणि?
<< तिथेहि सरपट्टी चेंडू टकले
<< तिथेहि सरपट्टी चेंडू टकले की काय कुणि? >> तिथं नेमकं उलटं असतं ! नको तितकी उसळी घेतात चेंडू !!!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आणि, आपल्यासारखे बेताने, शहाणपणाने नाही, तर ते खुळ्यासारखे भन्नाट वेगाने टाकतात चेंडू !
काल ऑस्ट्रेलियाचा २१ ऑल आउट
काल ऑस्ट्रेलियाचा २१ ऑल आउट बघण्यात काय धमाल मजा आली असती .
अहाहा.
मास्तुरे क्रिकेट -२ असे नाव
मास्तुरे क्रिकेट -२ असे नाव द्या.नवीन धागा फारच जनेरिक होतंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
द. आफ्रिका जिंकली............
द. आफ्रिका जिंकली............ हमला आणि स्मिथ दोघांनी शतके झळकावलीत............ ८ विकेट्स नी दणदणीत विजय...............
हे हे हे. काल आमलाचा शेवटच्या
हे हे हे. काल आमलाचा शेवटच्या बॉलवर हातातला कॅच गलीत सोडला होता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
द. आफ्रिकेचं अभिनंदन. ह्या
द. आफ्रिकेचं अभिनंदन. ह्या सामन्याबद्दलच्या लिखाणावरून तरी आधीच्या दोन दिवसात इतकी पडझड होण्यासारखी खेळपट्टी फार विक्षिप्त होती असल्याचं दिसत नाही .
>>> मास्तुरे क्रिकेट -२ असे
>>> मास्तुरे क्रिकेट -२ असे नाव द्या.नवीन धागा फारच जनेरिक होतंय.
बदल केला.
मुरलीधरन निवृत्त झाल्यापासून
मुरलीधरन निवृत्त झाल्यापासून श्रीलंकेच्या संघाचे एका सामान्य संघात रूपांतर झालंय. पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिका हरल्यावर आजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका दारूण पराभवाच्या मार्गावर आहे (सर्वबाद १३१).
सचिन, द्रविड व लक्ष्मण निवृत्त झाल्यावर आपलं असंच होणार का?
मास्तर, श्रीलंका ऐवजी
मास्तर, श्रीलंका ऐवजी ऑस्ट्रेलिया (किंवा जुनं विंडीज) जास्त बरोबर दिसेल. श्रीलंका कधीच बलाढ्य संघ नव्हता, मुरलीधरन होता तेव्हाही! पण ऑस्ट्रेलिया विंडीज वगैरे महाकाय संघ होते एके काळी! भारी बॅट्समन आणि भारी बोलर्स एकाच वेळी संघात असण्यासाठी नशीबाची प्रचंड साथ हवी.
>> सचिन, द्रविड व लक्ष्मण निवृत्त झाल्यावर आपलं असंच होणार का?
आपलं तसं होणार नाही कारण आपल्याकडे बॅट्समनची कमी कधीच नव्हती. बोलर्सची मात्र दर पीढित भासते.
कदाचित् गोलंदाजीतले विक्रम
कदाचित् गोलंदाजीतले विक्रम कुणाच्या लक्षात रहात नसतील, किंवा फलंदाजांना जास्त पैसे मिळत असतील. त्यामुळे गोलंदाज होण्यापेक्षा फलंदाज होण्यावर्च लोक लक्ष देत असतील.
मी बरेच वर्षांपासून सांगतो आहे, क्षेत्ररक्षणाचेहि स्टॅटिस्टिक्स ठेवा. बेसबॉलमधे जसे एरर धरतात तसे.
किती कठीण झेल घेतले, किती अचूक चेंडू फेकला यष्टीरक्षकाकडे अथवा दुसर्या बाजूला, वगैरे. आणि मग त्या क्षेत्ररक्षकाला काही मान सन्मान द्या.
१९९६ ची श्रीलंके विरूद्धची
१९९६ ची श्रीलंके विरूद्धची सेमी फायनल फिक्स्ड होती असा आरोप कांबळीने केला आहे.
आपण कारण नसताना टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती. आणि तेंडल्या (तेंव्हा तो साहेब नव्हता) आउट झाल्यावर अचानक कोलॅप्स झाला होता. या दोन्ही गोष्टींबद्दल तेंव्हा खूप उलट सुलट चर्चा झाली होती.
तेंव्हा कांबळी रडल्याचे कारण कळाले. त्या टीम मधे अजय जडेजा आणि अझर होते हा निव्वळ योगायोग नाही.
२००७ व २०११ च्या विश्वचषक
२००७ व २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतल्या उपविजेत्या श्रीलंकेचे ग्रह फिरलेले दिसताहेत. पाकड्यांविरूद्ध कसोटी मालिका ०-१ अशी हरल्यावर आता ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ते १-३ असे मागे पडलेत. आजच्या सामन्यात पाकड्यांना फक्त २०० धावांत रोखल्यावर श्रीलंका एक वेळ ३७.४ षटकांत ३ बाद १५५ अशा भक्कम अवस्थेत होती. विजयासाठी ७४ चेंडूत फक्त ४६ धावा हव्या होत्या व अजून ७ गडी बाद व्हायचे होते. संगकारा व जयवर्धने हे दोघेही ५० च्या पुढे पोचले होते.
अचानक संगकारा बाद झाला आणि काही कळायच्या आतच पत्त्याच्या बंगल्यासारखा त्यांचा डाव कोसळला व ४५.२ षटकांत सर्वबाद १७४ अशी दारूण अवस्था होऊन पाकडे जिंकले. आफ्रिदीने धमाल केली (६५ चेंडूत ७५ धावा व ३५ धावांत ५ बळी).
तिकडे आफ्रिका व ऑसीज सामनाही रंगतदार अवस्थेत पोचला आहे. उद्या ५ व्या दिवशी ऑसीजना विजयासाठी अजून १६८ धावा हव्या आहेत व ७ गडी बाद व्हायचे आहेत.
कांगारुंनी सामना जिंकला...
कांगारुंनी सामना जिंकला... मस्त अटीतटीची लढाई झाली.
१-१ ने बरोबरीत आहेत.
मस्त झाला आजचा सामना. ऑसीजनी
मस्त झाला आजचा सामना. ऑसीजनी जबरदस्त झुंज देऊन जिंकला. पाँटिंग बर्याच दिवसांनी बरा खेळला (६२ धावा). मिशेल जॉन्सनने दोन्ही डावात १-१ चे बळी घेतले, पण दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली (३८ व ४० धावा).
३ महिन्यांपूर्वी कसोटी
३ महिन्यांपूर्वी कसोटी क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर पोहोचलेला भारत, विंडीजविरूद्ध २ कसोटी सामने जिंकल्याने आता २ र्या क्रमांकावर आलेला आहे. प्रथम क्रमांकावर इंग्लंड (१२५ गुण), नंतर भारत (११७), नंतर द. आफ्रिका (११६), ऑस्ट्रेलिया ४ थे (१०५), श्रीलंका (९९) व ६ व्या क्रमांकावर पाकडे (९८ गुण) आहेत.
aus beat sa...that why we
aus beat sa...that why we come on 2nd number...SA loose 1 point...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारतासाठी नेहमी त्रासदायक
भारतासाठी नेहमी त्रासदायक ठरणारा पाँटिंग नेमका भारताच्या मालिकेच्या आधी फॉर्मात आलाय. त्याने लागोपाठ दुसर्या डावात अर्धशतक केलंय (किवीजविरूद्ध आज नाबाद ६७). मिशेल जॉन्सन दुखण्यामुळे मालिकेबाहेर गेलाय, पण पॉंटिंग आपल्याविरूद्ध नक्की खेळणार.
खेळू दे, खेळू दे!! घाबरायचे
खेळू दे, खेळू दे!! घाबरायचे कारण नाही. आनि एकट्या त्याचे काय घेऊन बसला आहात?
आज दहाव्या विकेटसाठी जवळपास शंभर धावांची भागिदारी केली आपल्याविरुद्ध, आपल्याच देशात.
तसे आपल्यासमोर रवि रामपॉल सुद्धा ८६ धावा काढू शकतो.
आपल्याहि कडे आहेत आश्विन वगैरे, त्यांना जरा शिकवले पाहिजे.
सौरभ गांगुली आज संपलेल्या
सौरभ गांगुली आज संपलेल्या हरयानाविरूद्धच्या रणजी सामन्यात - पहिल्या डावात १७८ चेंडूत १३५ धावा व दुसर्या डावात २२ चेंडूत २१. निवडसमितीला त्याचा पुन्हा विचार करायला हरकत नाही.
nako.....vizataana divaa
nako.....vizataana divaa joraat petato...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बिग बॉसमध्ये सायमंड्स -
बिग बॉसमध्ये सायमंड्स -
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=198...
हरभजन, श्रीशांत व हेडनला पण बिग बॉसमध्ये एंट्री दिली पाहिजे. त्यांच्याशिवाय मजा येणार नाही.
ऑस्ट्रेलिया-किवीज यांचा दुसरा
ऑस्ट्रेलिया-किवीज यांचा दुसरा कसोटी सामना एकदम मस्त चाललाय. किवीजला ऑसीजनी पहिल्या डावात १५० मध्ये गुंडाळल्यावर त्यांना फक्त १३६ च करता आल्या. सामन्याच्या एकूण ३० तासांपैकी केवळ ९ तासांतच २० गडी बाद झालेत. होबार्टची खेळपट्टी इतकी जबरी असेल वाटलं नव्हतं.
किवीजना १४ धावांची आघाडी मिळाली आहे आणि दुसर्या दिवसाखेर त्यांच्या ३ बाद १३९ धावा झाल्या आहेत (एकूण आघाडी १५३ धावांची). जर किवीजनी बर्यापैकी फलंदाजी करून ३०० धावांचे लक्ष्य ठेवले तर त्यांना कसोटी जिंकायची चांगली संधी आहे.
Pages