क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< लॉट ऑफ कन्फुझन किंवा मग धोणी इज द रियल बॉस ! > > जेंव्हां वातावरणात " कोण याला जबाबदार ?" हा प्रश्न घुमत असतो, तेंव्हां असं कन्फ्युजन निर्माण करणं सर्वच संबंधितांच्या हिताचं असतं ! Then the buck stops nowhere ! Wink

धोनीला रागपट्टी मिळाली या विधानावरून.
कोण बॉस आहे हे ठरवणारा तू कोण म्हणून?
बहुतेक शास्त्रीची नेमणुक धोनीला रुचली नसावी असा प्राथमिक अंदाज.
साहजिकच आहे कोणीतरी डोक्यावर मिर्‍या वाटायला बसवले तर असे होणारच. फ्लेचरला गुंडाळणे धोनीला सोयीचे पडत असावे.

Cook, Bell, Ballance - are not one-day players who are going to win you a World Cup.

"Alex Hales is going to win you a World Cup; James Vince, Jason Roy, Jos Buttler, Eoin Morgan. They're players I wouldn't want to bowl at, who can build a total of 360-370.

We've made the same mistake now as we did in my time, five-six years ago and in the 1990s. We're picking one-day squads on Test form. English cricket has always had Test cricket at the pinnacle, but the games are so different

हा हा हा. आणि आपण वनडे वरून टेस्टची टीम ! भारत आणि इंग्लंड - नॉर्थ अ‍ॅन्ड साऊथ पोलस

सुरुवात बघून असे वाटत होते की आपली कसोटीसारखीच गत आहे.
कोहलीचे पुन्हा बदक झाले.
पण रहाणे आणि शर्माने डाव सावरला आणि आता रैना तर धमाल करवतोय ..
सोबत धोनीही सुरू झाला तर ३०० पार होतील ..

रैनाचे तूफान शतक.. ७४ चेंडूत
त्याच्या आयपीएलमधील अविस्मरणीय खेळीलाच पुढे कंटिन्यू केल्यासारखे खेळला आज ..
काही फटके डोळ्यांचे पारणे फिटवणारे ..

अँडरसनने फक्त १०च ओव्हर्स टाकल्या त्याचा एव्हढा मोठा परिणाम की जी टीम टेस्ट मध्ये ३०० पण करु शकत नव्हती तिनेच डायरेक्ट ३०४ धावा केल्या ते पण ६ च विकेट देऊन..

<< अनुष्का सिंड्रोमने पुन्हा माती खाल्ली .. >> क्रिकेटशीं निगडीतही कारणं असूं शकतात पण तीं समजून घेण्याची तळमळ असणं व दूर करण्याची जिद्द बाळगणं आवश्यक. एक प्रतिभाशाली फलंदाज केवळ स्वतःच्या फाजील आत्मविश्वासामुळे तर स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेत नाही आहे ना, अशी अभद्र शंका येते. असो.

३०० तर पार केलेत !

<< तुम्ही आम्हाला टेस्ट जिंकू द्या आम्ही तुम्हाला वन डे जिंकू देतो.....>> 'तुम्ही दोन्ही मालिकेतला फक्त पहिला सामना आम्हाला जिंकू द्या, बाकी तुमचंच राज्य ", असं तर नाही ना ! Wink

दक्षिण आफ्रिका ज्यांनी परवाच ऑस्ट्रेलियाच्या ३२५ च्या आसपास धावा ४६-४७ षटकात सहज चेस केल्या ते आज झिम्बाब्वेच्या स्पिनर विरुद्ध २४ ओवर १४२-० वरून १९५-९.
उत्सेयाची हॅट्ट्रिक.
चोकर्स वर्ल्डकपसाठी सज्ज.

बाप्पाने आपल्या खेळाडूंचे कान पिरगळलेले दिसताहेत; लागोपाठ दुसरी एकदिवसीय जिंकायच्या वाटेवर ! कोहलीसुद्धां नीट खेळतोय !! इंग्लंड २२७, भारत १२०-२.

खेळपट्टीचा नूर पाहता ईंग्लंडने आज स्वताची कबर खोदलीये असे वाटते. भारतीय स्पिनर डोईजड झाले. कोहलीला सूर गवसला (?). रहाणेने मात्र काही अप्रतिम फटके मारले. रायडूच्या जोडीने रैना सेट झालाय आणि त्याचा व पाठी येणार्‍या धोनीचा फॉर्म बघता इथून सव्वाचारच्या रनरेटने शिल्लक ८० धावा फटकावणे जड जाऊ नये. म्हणजेच तीन सामन्यांअखेर २-० ची आघाडी, इथून आपण मालिका गमावत नाही Happy

कोहलीला शेवटी सूर गवसला. त्याच्या नाबाद खेळीमुळे विजय साकार झाला. चेस करताना कोहली हवाच! Proud Light 1

दोन्ही फॉरमॅट वेगळे आहेत. वन डे मध्ये इथे कोणीही आपल्या टीम बद्दल अजून तरी ( गेल्या चार वर्षात ) जास्त शंका उपस्थित केल्या नाहीत. त्या शंका सर्व टेस्ट मॅचेस बद्दल आहेत. दोन्हीची तुलना करता येत नाही.

रहाणे आणि धवण दोघेही अप्रतिम खेळले.

<< आणि सेट झालेला धवण बघायला मजा आली.> > आणि बर्‍याच काळानंतर सेट झालेला धवण बघायला मजा आली !! Wink
कालचं भारताचं क्षेत्ररक्षण दृष्ट लागावं असंच होतं.
एकदिवसीय मालिकेमुळे माझ्यासारख्याना यापुढेही भारताचं क्रिकेट पहायला बरी सबब मिळाली ! Wink

Pages