क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी, गावसकर विषयी लिहायचं राहीलं. भारतीय क्रिकेट मधे खेळाडू म्हणून अत्यंत मानाचं स्थान मिळवलेली आणी नंतरच्या काळात ऊंटावरून शेळ्या हाकणे, दुसर्याच्या काठीने साप मारणे, स्वार्थ साधला गेल्यावर / किंवा तो साधला जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर तत्वज्ञानाची गंगा, full throttle ने सोडणे अशी सर्व कामं करण्यात अग्रगण्य माननीय मुकादम (वरच्यांचा मुका, खालच्यांना दम) म्हणून ह्या महाशयांचं नाव घ्यावं लागेल. म्हणून, त्यांच्या मताला फारशी किंमत न देण्याचं संस्थानाने योजिलेलं आहे. Happy

खरं तर रवी शास्त्री ह्या उद्योगी उपद्रवाचं नाव पण वरच्या यादीत घेणार होतो, पण, पहिली अट, 'भारतीय क्रिकेट मधे खेळाडू म्हणून अत्यंत मानाचं स्थान मिळवणं' ही असल्यामुळे तो बाद झाला. अन्यथा बाकीची credentials त्याच्याकडे सुद्धा भरभरून आहेत.

ऋन्मेऽऽष that was rhetoric statement buddy.

भाउ माझा प्रश्न नवीन खेळाडूंच्या कामगिरीबद्दल नसून जुने कसोटीला मह्त्व देणारे खेळाडू कसोटी मधे relatively मानाचे स्थान मिळवून देत असतानाही IPL ला मह्त्व का आले हा होता. ह्याच्या उत्तरातच खरी मेख दडली आहे Happy मला प्रामाणिकपणे आत्तांच्या संघातले पुजारा, धवन, कोहली इ फलंदाजांच्या प्रतिभेविषयी शंका नही किंवा त्यांची कसोटीमधे स्वतःला सिद्ध करण्याची इच्छाशक्ती कमी आहे असे वाटत नाही. कमी पडतोय तो अशा ठिकाणी खेळण्याचा अनुभव नि त्यानुसार आपला खेळ बदलण्याची क्षमता (जी परत अनुभवांती येउ शकते). they need good exposure to these conditions and they will come good, at least Pujara and Kohli. धवन चे काय ते नक्की कळत नाही.

बीसीसीआय चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर जसा-जसा प्रभाव वाढलाय, तसं तसं, क्रिकेट चा धंदा वाढण्याव्यतिरिक्त एक खेळ म्हणून क्रिकेट चं फारसं भलं झालेलं नाही >> एकदम १००% बरोबर. गावस्करबद्द्लच्या पोस्टला पण संपूर्ण अनुमोदन.

केदार मागे तू भुवीच्या पेसबद्दल म्हणाला होतास त्याच्याशी संबंधित काही मस्त मुद्दे. जरुर वाच.
http://www.rediff.com/cricket/slide-show/slide-show-1-bcci-needs-to-hand...

<< प्रश्न.....कसोटीला मह्त्व देणारे खेळाडू कसोटी मधे relatively मानाचे स्थान मिळवून देत असतानाही IPL ला मह्त्व का आले हा होता. >> कमी वेळात धडाकेबाज मनोरंजन हें आयपीएलच्या लोकप्रियतेचं व महत्व येण्याचं कारण आहे. लोकप्रियता आहे म्हणून त्यांत पैसा आहे व म्हणून बीसीसीआय व खेळाडू त्यांत रस घेताहेत; पण आयपीएल लोकप्रिय होण्यासाठीचे घटक कांहीं बीसीसीआयने बनवलेले नाहीत तर ते आयपीएलमधे अंगीभूतच आहेत. खरा प्रश्न असा आहे कीं आयपीएल हें कसोटी क्रिकेटला मारक ठरण्याऐवजीं पोषक कसं ठरेल व ह्यासाठीं प्रथम खेळाडूंना कसोटी क्रिकेटबद्दल तशी आस्था वाटायला हवी व त्यांच्या खेळातून ती लोकांपर्यंत पोहोचायला हवी. बीसीसीआयला मग कसोटी क्रिकेटच्याही प्रेमाचं भरतं येईलच. असामीजी, बघा हें पटतं का .

गावस्कर बद्दल तू बोलतो आहेस त्या बद्दल मी वाद घालत नाही. तो फक्त एक प्रश्न विचारला होता. ते तिथेच संपले होते माझ्यासाठी.

मला टि २० मेन्टॅलिटीमुळे टेस्ट मध्ये प्रॉब्लेम होतोय हे स्टेटमेंट पचायला अवघड जाते आहे. दॅटस. नॉट अ गुड आर्ग्युमेंट. यावर मी तरी लिहिणार नाही.

तुम्हाला टेस्ट खेळायची नाही, नका खेळू. २०११ मध्ये द्रविडने पहिली टी २० इंटरनॅशनल खेळतानाच त्यातून निवृत्ती घेतली होती.

भूवीबद्दल.

असामी, तो लेख आजच्या टाईम्सला पण आहे.
नीट वापरा ना? वर्क हॉर्स करू नका. आज भूवी वर्क हॉर्स आहे !! असे बघ, जो माणूस १३२- १३५ नी टाकतो त्याने का टाकू नये? त्याने पाचही मॅच खेळायलाच हव्यात हा अट्टहास का? खेळूदेत त्याला तीनच ! वरूणला नेऊन त्याला पाच खेळवल्या का? बिन्नीला बॉलर म्हणून घेऊन तीन मॅच मध्ये ३२ ओव्हर्सच दिल्या, तेंव्हा प्रॉपर फास्ट बॉलर पांडे अंडी उबवत बसला होता. एकट्या भूवीनेच सगळे करायला हवे असा अट्टहास का? बेंचचे काय करता मग? उमेश यादवला वनडे मध्ये बोलवायचे अन टेस्टचे मध्ये का नको? त्याकडे पेस पण आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इंग्लंड मध्ये बॉल स्विंग होतो हे आज कळाले आहे का? म्हणून म्हणतो कोणाला कसे वापरावे ह्याची प्लानिंग नीट नाही.

तिथे बिन्नी काय करू शकतो? मग ऑलराऊंडर म्हणून तो आला हे उत्तर असेल. मग जडेजा काय आहे? मान्य की प्रॉब्लेम बॅटसमनच होता आणि आहे. मग जेंव्हा वरचे सर्व बॅटसमन फेल जातात तेंव्हा बिन्नी काही करेल की आशाच चूकीची आहे. म्हणून ते डिसिजन चूकीचे होते.

मी २००९ पासून लिहितो आहे की धोणी चांगला टेस्ट कप्तान नाही, तेंव्हा सेहवाग ते गंभीर हे सर्व पर्याय होते. आज एकही पर्याय नाही. त्यामुळे धोणीशिवाय आज तरी पर्याय नाही हे खरे असले तरी तसेच असायला हवे असे नाही. दुसरा कोणीही कॅप्टन होऊ शकतो.

रिबिल्डींग मध्ये धोणीला काढण्याचा कठोर निर्णय घेतला तर बरे होईल. ही लॉस्ट हिज चार्म अ‍ॅज टेस्ट किपर टू. संजू सॅमसन किंवा दिनेश कार्तिकने किपर बॅटसमन म्हणून रिप्लेस करायला हवे.

प्रश्न आहे कप्तान कोण? मी विराटला संधी देईन. असेही बाहेर हारत आहोतच. मग दुसरा कॅप्टन झाल्यावर हारलो तरी चालेल.

मी रिझल्टस काय हे विचारले कारण तुझ्या मते काय व्हावे हे अभिप्रेत आहे. त्याचा (आपल्या मताचा) इंडियन क्रिकेटवर काही परिणाम नाही हे माहित असूनही आपण चर्चा करतोच ना रोज?

म्हणजे निदान मी तरी कारण मिमांसा देऊन धोणीला बसवावे, भूवीने फास्ट टाकावी असे व्हेंट होत आहे असं म्हण हवं तर .

आता त्या पेन्नीला आणि जोला काढले? कमॉन त्यांना बळीचा बकरा बनवला. त्यांना काढण्यासारखे काय होते? अहो तुम्ही एकट्या भूवीलाच ओव्हर टाकायला देता अन त्यानेच विकेट घ्याव्यात हेच लॉजिक ठेवता. अतर्क्य आहे माझ्यासाठी तरी हे. आणि हे लोकं कॅच सोडून देतात. ती रिस्पॉन्सिबिलीटी प्लेअरची आहे, कोचची एकट्याची नाही.

BCCI वरवरचा उपाय करत आहे.

काल माईक ब्रिअर्ली [भूतपूर्व इंग्लीश कप्तान] यानी देखील त्यांच्या 'लंडन टाईम्स'च्या स्तंभात धोनीच्या कसोटीतील कॅप्टन्सी व यष्टीरक्षणावर प्रश्नचिन्ह उभं केलंय पण त्याच्या चिकाटीचं व जिद्दीचं, विशेषतः फलंदाजीतल्या, मात्र कौतुकही केलंय. [" But his wiketkeeping is not up to Test standard. Nor, I think, his captaincy " ]. बिन्नीवर गोलंदाज म्हणून दाखवला गेलेला अविश्वास व अश्विनऐवजी जडेजावर ठेवलेला भंरवसा याबद्दलही त्यानी नाराजी व्यक्त केलीय.
आपल्या संघाबद्दल जर इंग्लिश जाणकारांच्याही हें लक्षात येत असेल, तर ........

............ समजा आपण चुकुन माकुन देवाच्या रजनीकांतच्या मोदीच्या सगळ्या भारतीयांच्या कृपेने एकदिवशीय मालिका आणि टी२० जर आपण दणक्यात जिंकले .......

तर ...... Wink

केदार, "मी २००९ पासून लिहितो आहे की धोणी चांगला टेस्ट कप्तान नाही, तेंव्हा सेहवाग ते गंभीर हे सर्व पर्याय होते. आज एकही पर्याय नाही. त्यामुळे धोणीशिवाय आज तरी पर्याय नाही हे खरे असले तरी तसेच असायला हवे असे नाही. दुसरा कोणीही कॅप्टन होऊ शकतो."

एकदम सहमत! आणी फोर द रेकॉर्ड्स, हे माझही मत तेव्हापासून आहे, जेव्हापासून, धोनी ने स्वतःची मांड बसवण्यासाठी, सिनीअर्स चे पंख कापायला सुरुवात केली होती. एक फार लवकर विस्मरणात गेलेलं उदाहरण म्हणजे लक्ष्मण ची तडकाफडकी निवृत्ती. लक्ष्मण ने बर्यापैकी एक्स्प्लिसीटली धोनी ला दोष दिला होता. असच थोडसं सेहवाग, गंभीर आणी २००७ मधे कप्तानपद सोडल्यावर द्रविड च्या (वन-डे) बाबतीतही घडलं.

हातात सुत्र आल्यावर, आपल्याशी वेव्ह-लेंग्थ जुळणार्यांची टीम बनवणं, हे क्रिकेट मधेच घडतं असं नाही. सगळीकडे हे पहायला मिळतं. पण जर छतच जर बुटकं असेल, तर खाली वावरणार्यांची ऊंची कधीच वाढत नाही. एक तर त्यांना शक्य होईल, तोवर ते वाकून रहातात आणी नंतर बाहेर पडतात नाहीतर तिथे खुजेच भरले जातात. टेस्ट टीम च्या बाबतीत तेच झालय. एलिमिनेशन पद्धतीने, धोनी ने स्वतःला असलेले सगळे पर्याय हळू हळू बाजूला केले आहेत.

आऊट ऑफ ब्ल्यू, एकदम नवीन कप्तान निवडणं, हे भारतीय क्रिकेट साठी नवीन नाहीये. ह्या आधी देखील अझहरुद्दीन, गांगुली (पतौडी?) ह्यांच्या बाबतीत हे घडलय. कप्तान म्हणून टीम तयार करणं, ज्यात प्रत्येकाच्या काही भुमिका ठरलेल्या आहेत, हे खूप मोठं काम असतं. जे आधी अझहरुद्दीन च्या आणी नंतर गांगुली च्या काळात झालं. स्वतः अझहर किंवा गांगुली काही खूप मोठे टॅलेंटेड खेळाडू नव्हते. पण त्यांनी टीम डेव्हलप केली. (उदा. अझहर चा स्पिन ट्रायो, श्रीनाथ - प्रसाद ची जोडी किंवा, गांगुली च्या काळात तयार झालेली सेहवाग ची धडाकेबाज ओपनिंग, भक्कम मधली फळी ई.)

एक वादाचा होऊ शकेलसा मुद्दा म्हणजे, ह्या कप्तानांच्या काळाची लेगसी. पण ह्या कप्तानांच्या हातातून पुढे टीम जाताना, काही स्पेशल गोष्टी तयार झाल्या होत्या. (ह्या सर्व खेळाडूंचं मोठेपण मान्य करून) उदा. कुंबळे मॅच-विनिंग बॉलर म्हणून तयार झाला होता, किंवा द्रविड - लक्ष्मण स्लीप फिल्डर्स म्हणून स्पेशलाईझ्ड झाले होते. तसं धोनी च्या कप्तानी ची लेगसी काय सांगणार (एक सर्वसामान्य कुवतीचा जडेजा, टेस्ट मधे ऑल-राऊंडर चा टॅग मिरवत होता). हा एकट्या धोनी पुरता प्रश्न नाहीये आणी त्याच्या मागची मॅनेजमेंट सुद्धा जवाबदार आहे. पण, म्हणून धोनी ला क्लीन-चीट मिळत नाही.

खरा प्रश्न असा आहे कीं आयपीएल हें कसोटी क्रिकेटला मारक ठरण्याऐवजीं पोषक कसं ठरेल व ह्यासाठीं प्रथम खेळाडूंना कसोटी क्रिकेटबद्दल तशी आस्था वाटायला हवी व त्यांच्या खेळातून ती लोकांपर्यंत पोहोचायला हवी. बीसीसीआयला मग कसोटी क्रिकेटच्याही प्रेमाचं भरतं येईलच. असामीजी, बघा हें पटतं का . >> भाऊ हेतू पटतो पण मार्ग नाही. तुम्ही जे म्हणताय कि खेळाडूंपासून सुरूवात व्हायला हवी ते idealistic झाले. एका बाजूला BCCI ची मर्यादित क्रिकेटला पोषक धोरणांचा जोर नि दुसरीकडे खेळाडूंनी एक stance घेणे ह्यात कोणाचे पारडे जड होईल हे साहजिक आहे. BCCI does not care for anyone except for themselves हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या धोअरणांवरून उघड आहे. असे असताना कुठला खेळाडू त्यांच्याविरुद्ध जाऊन स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारुन घेईल. ज्यांच्या जीवावर BCCI एव्हढे उडते त्या प्लेयर्सचा players overload चा प्रश्न निघाल्यावर जे organization 'ज्यांना झेपत नाही त्यांनी आराम करावा, We are not forcing anyone' हा पवित्रा घेउ शकते त्यांच्याशी टक्कार घेणे अशक्य आहे. ५ वर्षांपूर्वी BCCI ने आपले कारभार पारदर्शी करावी म्हणून हि जनहित याचिका दाखल झाली होती ती अजूनही तशीच पडलेली आहे (जेंव्हा न्यायाधीशांनी त्याला verbally होकार दिलाय तरी). प्रवाह बदलण्याची सुरूवात BCCI पासून होणे जरुरी आहे. होण्याची शक्यता फार कमी आहे.

BCCI वरवरचा उपाय करत आहे. >> परवापासून मी अजून काय वेगळे सांगतोय भाऊ Happy

धोनीने अजूनतरी सोडण्याबद्दल काहीही सूतोवाच केलेले नाही. तो सोडत नाही किंवा कोहलीला जोवर कमीत कमी ODI मधे तरी दमदार सूर गवसत नाही तोवर इथून तिथे हस्तांतर होणे अशक्य वाटते. फ्लेचरला हात लावायची तयारी नसलेल्यांनी धोनीला हात घालावा हि अपेक्षा ? Wink

पराभवाची मायबोली नाही तर सगळीकडेच एवढी चिरफाड होतेय म्हणजे सिनिअर खेळाडूनंतर परिस्थिती खरेच बिकट झालीय ..

ती एक चांगली करमणूक (प्रेक्षकांची) आणी कमाईची संधी (खेळाडूंची) आहे हे मान्य. पण त्यातून क्रिकेटिंग स्किल्स कितपत डेव्हलप होतात हा चर्चेचा मुद्दा आहे.
अनुमोदन.

. मागच्या वर्षी हैद्राबाद कडून खेळताना डेल्स स्टेन .......... कळायला हवं.
हा, हा! Happy Happy

आई हाक मारतेय जेवायला..... आलोच मी
च्च, च्च. अहो आईच आहे ना. ती काही रागावणार नाही. बायको असेल तर मात्र वाक्य अर्धे सोडून पळा!!!!
Light 1 Happy

मी काल आणखी एका गोष्टी बद्दल लिहिले नाही.

टेक प्लानिंग : सगळ्या गोष्टी लॅपटॉपवर व्यवस्थित दिसतात म्हणून प्लानिंग करून तशीच बॉलिंग टाकली जाते हे ठिक. पण मोईन अली किंवा ब्रॉड आला (किंवा त्या टाईपचा कोणीही) की लगेच वरूणला आणून त्याला शॉर्ट टाकायला लावत होते.

च्यायला इथे टिव्ही बघतानाही कळत होते की किती प्रिडिक्टेबल झाले आहेत आपले लोकं बॉलिंग मध्ये. त्या ब्रॉडने धुतला १० च्या रनरेटने. कोण करतं अशी प्लानिंग? दे शुड सॅक देम !

च्च, च्च. अहो आईच आहे ना. ती काही रागावणार नाही. बायको असेल तर मात्र वाक्य अर्धे सोडून पळा!!!
>>.....
आपल उलटय बाबा, आईला त्रास नाही द्यायचा. बायकोला ठेऊ बरोबर ताब्यात.

असामी,
तरीही माझ्यासाठी ती संघनिवडच चुकलेली होती. नुसती संघनिवडच नाही तर संघबांधणीच चुकलेली आहे. सिनिअर प्लेअर एकेक करून रिटायर्ड होणार हे काळ्या दगडावरची रेघ असून आणि त्याचा मोठा फटका कसोटीलाच बसणार आणि त्यातही परदेशातील हे माहीत असूनही आपण जडेजासारख्यांना कसोटी प्लेअर बनवायला धडपडतोय, वा अचानक एखाद्या बिन्नीला घेऊन ईंग्लडला जातोय, रोहित शर्मा असो शिखर धवन या सदोष तंत्राच्या खेळाडूंना बेंचवर पर्याय नसणे हि वेळ आपणच आणली आहे. यामागे हलगर्जीपणाच नाही तर राजकारणही आहे. असो, हे वैयक्तिक मत आहे. कोण्या धोनीच्या चाहत्याला हे पटणारही नाही, कारण राजकारणाचा आरोप केला की त्यात आरोपी म्हणून धोनी आलाच.

<< इथल्या तज्ञांची मते वाचून कंटाळा आला आता....>> मग आपल्या फलंदाजांसारखं आपणही हंळूच बाहेरच्या चेंडूला बॅट लावायची आणि अंपायरकडे न पहातां मस्तपैकीं पॅव्हीलीयनमधे जावून आराम करायचा ! Wink

चला Middlesex ( काय नाव आहे हे Uhoh ) बरोबर खेळताना कोहलीला सुर सापडला ... अनुष्काला घरी पाठवण्यात आले आणि कोहलीचे लक्ष इतर गोष्टींवरुन स्वेअर कट लेगग्लांस पुल शॉट वर आले... रायडु आणि कोहलीने प्रत्येकी ७० मारलेत... आणि करण शर्मा ने ३ विकेट्स घेउन Middlesex चा डाव १३५ वर संपुष्टात आणला......

तसे आपण देखील अवघ्या ४४ ओवर मधे २३०च करु शकलो.. रायडु नंतरचे सगळे जाडेजा , अश्विन , सॅमसन, बिन्नी रैना एक दोन आकडीच धावसंख्या गाठु शकले

बघु आता उद्या च्या मॅच मधे रंग बदलतात की................रंग दाखवतात Wink

कसोटीतील पराभवांच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीयमध्ये तेच फेवरेट असले तरी दाणादाण उडू नये अशी अपेक्षा. या फॉर्मेटमध्ये आपली हिच टीम सक्षम वाटायला लागते. कारण मुळात हि टीम टेस्टची नसून याच फॉर्मेटला बेस्ट होती. तसेच एखादा अँडरसन तापला तरी त्याच्या १० च ओवर असल्याने लपायला जागा असते. अर्थात त्या १० देखील सांभाळणे कठीण गेले तर मग हे राम. सध्या दोन्हीकडून नवीन चेंडू वापरला जातो हा नियम मात्र आपले लावणार आहे... चल बास झाले, उगाच मोठी पोस्ट नको.. काय ते बघूया उद्या

<< चला Middlesex ( काय नाव आहे हे ) बरोबर खेळताना कोहलीला सुर सापडला ... >> मीं वर उल्लेखिलेल्या माईक ब्रिअर्ली यांच्या त्याच स्तंभात त्यानी भारतीय फलंदाजांवर ताशेरे न ओढतां उलट सहानुभूति व्यक्त केली आहे; ' माझ्या पहाण्यातल्या सर्वांत हिरव्यागार खेळपट्ट्या या दौर्‍यातल्या कसोटींसाठी खास तयार करण्यात आल्या होत्या', हें त्याचं कारण होतं. मला वाटतं एक दिवसीय सामन्यांसाठी मात्र अशा खास खेळपट्ट्या बनवल्या नसाव्यात व हेंच आपल्या फलंदाजाना आतां सूर गवसण्याचं कारण असूं /होवूं शकतं.

चला.. म्हणजे इथे आले की मातीचा आखाडाच तयार करा ... बघु किती दम आहे फिरकीवर खेळण्याची ...

तु असा तर मी तसा.............

<< बघु किती दम आहे फिरकीवर खेळण्याची ... >> उदयनजी, आपल्यालाही त्याच खेळपट्ट्यांवर खेळायला लागणार व आतां तर फिरकी खेळण्यावरची आपली मक्तेदारीही संपुष्टात आल्यासारखीच आहे !

फिरकीचा आखाडा,
गेल्यावेळी ईंग्लंड दोन चांगले स्पिनर घेऊन आली आणि आपल्यालाच भांगडा करवून गेली.
तेच ऑस्ट्रेलियाकडे चांगला फिरकी गोलंदाज नसल्याने ते लायन वगैरेला खेळवून हरले.
तरी आता वेस्टईंडिज येतेय तेव्हा थोडाफार अंदाज येईलच या आखाड्याचा.

<< भारतीय संघ पहिला एकदिवसीय सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी >> यापेक्षां, ' भारताने आज एकही विकेट नाही गमावली ', म्हणणं अधिक आश्वासक नाही होणार ? Wink

आजचा टाईम्स :

बिसीसिआय : रवी बॉस आहे, क्रिकेट टीम इज हिज बेबी.

रवी : धोणी इज द बॉस, ही इज कॅप्टन.

धोणी : फ्लेचर इज बॉस!

हं ! लॉट ऑफ कन्फुझन किंवा मग धोणी इज द रियल बॉस !

Pages