"
कायदे हे नेहमीच नैतिकतेला अनुसरून बनतात, असे माझे मत आहे, नव्हे असा माझा विश्वास आहे!..
"
आता धागा सुरू करूया,
१) त्या दिवशी सचिन फॅन क्लब या धाग्यावर सचिनच्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी फिरतेय अशी बातमी पाहून मी म्हणालो, "पायरसी हे नक्कीच बेकायदेशीर कृत्य आहे, पण तरीही सचिनच्या काही गरीब चाहत्यांकडे (ज्यात तुटपुंजे पॉकेटमनी असलेले कॉलेजस्टुडंट सुद्धा आले), ज्यांना हे पुस्तक विकत घेणे परवडणार नाही, अश्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचले तर मला मनापासून आनंदच होईल." ..अर्थात, अगदी मनापासून केलेले हे विधान होते.
मी स्वत: त्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो ज्या पिढीला क्रिकेटची जाण येणे आणि सचिन नावाचा तारा भारतीय क्रिकेट क्षितिजावर उगवणे हे एकाच वेळी घडले. तेव्हापासून द्रविड-सेहवाग-दादा यांचा उदय होण्याआधी, झाल्यानंतरही, किंबहुना अगदी हल्लीचे कोहली-धोनी-शर्मा यांच्या झंजावातातही, भारतीय क्रिकेटमधील आमचा ईंटरेस्ट सचिन या नावापासूनच सुरू व्हायचा आणि त्याच्या बाद होण्याला संपायचा. अगदी त्याच्या शेवटच्या सामन्यापर्यंत, "सचिनने किती केले?" हा प्रश्न स्कोअर विचारण्याचाच एक भाग होता. असा हा खेळाडू आपल्या स्वत:च्या कर्तुत्वावर मोठा झाला हे न नाकारताही त्याच्या यशातील त्याच्या निस्सीम चाहत्यांचा वाटा देखील कबूल केलाच पाहिजे. आणि अश्यांसाठीच ते केलेले विधान होते. भले मग पुस्तक छापणे आणि विकणे हा व्यवसाय मानला तरी पैसाच कमवायचा म्हटले तर सचिनने स्वाक्षरी केलेल्या बॅट दहापट किंमतीत विकायला काढल्या तरी तो तेवढे पैसे सहज कमावू शकतो. म्हणूनच ज्यांनी सचिनला बघण्यात वीस वर्षे खर्ची घातली त्या प्रत्येकाला सचिन वाचायलाही मिळाला पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.
असो, तर त्या दिवशी ‘सचिन फॅन क्लब’ या धाग्यावर, माझ्या या विधानावर तिथे थोडासा गदारोळ उडाला. मी शब्दाला शब्द टाकत बसलो असतो तर वाढलाही असता. पण मी सुद्धा सचिन फॅन क्लबचा सदस्य असल्याने तिथे त्या धाग्याला वेगळे वळण लावायचे टाळलेच. आणि इथे आज हा धागा उघडला.
कोणाला यावर इथे चर्चा करायची असल्यास वेलकम पण,
हा धागाही इथेच संपत नाही..
२) त्यानंतर एका धाग्यावर लेटेस्ट भोंदू बाबा रामपालवर चर्चा चालू होती. चर्चेच्या दरम्यान त्या बाबाची काही लैंगिक शोषणाची स्कॅंडल्स सामोरी आली. त्या संतापजनक बातम्या पाहता कोणीतरी त्या बाबाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, लोकांच्या हवाली करत दगडाने ठेचून मारले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. अर्थातच हि इच्छा देखील मनापासून आणि प्रामाणिकच होती. काही जणांनी त्याला अनुमोदन देखील दिले. (मनोमन मी सुद्धा दिले).
पण ईथेही पुन्हा, हि इच्छा कायद्याच्या चौकटीत बसवू पाहता कोणत्याही गुन्हेगाराला शिक्षा करायला कायदा आपल्या हातात घेणे हा देखील एक गुन्हाच झाला. मग त्या आरोपीचा गुन्हा कितीही भयंकर का असेना आणि त्याच्या गुन्ह्याची शिकार खुद्द आपण का असेना, तरीही त्याला आपण स्वत: शिक्षा करणे हे बेकायदेशीर कृत्यातच मोडते. मग जसे वरच्या क्रमांक १ मधील भावनेचे समर्थन होऊ शकत नसेल तर या भावनेचेही नाही झाले पाहिजे.
पहिल्या उदाहरणात कायद्याचे उल्लंघन करायचा विचार एखाद्या गरजूला मदत व्हावी भावनेतून आलेला आहे तर दुसर्यामध्ये कोणालातरी धडा शिकवण्याच्या भावनेतून आला आहे.
३) आता तिसरे आणि जरा वेगळे उदाहरण बघूया. ज्यात कायद्याच्या चौकटीत एखादी गोष्ट बसत असूनही कित्येकांना ती मंजूर नसते. यासाठी विषय गेले दोनेक महिने फॉर्मात असलेल्या राजकारणाचा घेऊया.
यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला बहुमत मिळाले नाही हे आपण सारे जाणतोच. अश्यावेळी ते कायद्यानुसार किंवा संविधानानुसार ईतर पक्षांची मदत घेऊन सरकार बनवू शकतात. पण तेच त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा (तो देखील न मागता) घेतल्यावर अचानक एकच गदारोळ उठला. जणू काही त्यांना बरोबर न घेणे हे त्यांच्यासाठी बंधनकारकच होते. खुद्द भाजपाला मत दिलेल्या लोकांनी हा आमचा विश्वासघात आहे, आम्ही फसवलो गेलो असा ओरडा सुरू केला. परिणामी भाजपाला ठामपणे राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारताही येत नव्हता. पण जर संविधानानुसार ते गैर नसेल तर तुम्ही आम्ही मतदार याबाबत कोणत्या अधिकाराने त्यांनी तसे करू नये हा हट्ट धरू शकतो??
म्हणजे इथे आपण फिरून पुन्हा नैतिकतेकडे आलो तर!..
यातून मॉरल ऑफ द स्टोरी काय काढायची हे आपल्यावरच सोडतो.
आपलाच,
ऋ
नाही हो, काही लोक व्यावसायिक
नाही हो, काही लोक व्यावसायिक आणि निवृत्त झालेले नोकरदारही आहेत. अगदी स्वतःच्या पैशाने इथे येत असतात बरं!
मग तेही नैतिक आहे काय हेही
मग तेही नैतिक आहे काय हेही सांगा - हापिसातले प्रतिसादक
व्यवसायिकांच्या बाबतीत
व्यवसायिकांच्या बाबतीत गिर्हाइकांच्या किंवा कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष/तडजोड करुन इथे येणे हा पण मुद्दा आहेच की.
आत्ममग्न मला इतकेच म्हणायचे
आत्ममग्न मला इतकेच म्हणायचे आहे की धागा प्रसवणारा नि प्रतिसाद देणारा दोन्ही ऑफिस इंटरनेट वापरत असतील, आणि जर ते नैतिक नसेल तर दोघानाही या हा निकष लागू होतो.. तुम्हाला तोडायसाठी प्रतिसाद नव्हता दिला... तर अनुमोदनच होते
ड्रीमगर्ल, वेश्याव्यवसायाबाबत
ड्रीमगर्ल,
वेश्याव्यवसायाबाबत जगभरातले कायदे भिन्न आहेत. आणि जर आपण कायदे नैतिकतेच्या निकषातून तोलत असू तर केवळ सर्वच लक्षात घ्यायला हवे.
असो, पण याउपरही भारतात वेश्याव्यवसाय चालत नाही किंवा लपूनछपून चालतो असे आहे का? उलट काही विभाग तर खास वेश्यावस्ती म्हणून ओळखले जातात.
आता बघा, वरच्या सेक्स रॅकेटमध्ये पकडल्या जाणार्या मुलींपैकी ज्या स्वत:च्या मर्जीने या व्यवसायात उतरल्या होत्या त्यांना कायद्याने शिक्षा होणार. पण याच उलट वर मी उल्लेखलेल्या वेश्यावस्तींमध्ये कित्येक मुली आपल्या मर्जीविरुद्ध डांबून ठेवल्या असतील, तो झाला खरा बलात्कार, तो तसाच चालू आहेच. उद्या धाड पडली तरी त्या मुली फसतील पण तिथे जाणारे गिर्हाईकांना बलात्काराची शिक्षा होईल का? कायदा फारच गंडतोय इथे. अजून एक बेसिक प्रश्न, स्वताच्या मर्जीने देहविक्रय करणे गुन्हा ठरवला जावा का?
<<<१) त्या दिवशी सचिन फॅन
<<<१) त्या दिवशी सचिन फॅन क्लब या धाग्यावर सचिनच्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी फिरतेय अशी बातमी पाहून मी म्हणालो, "पायरसी हे नक्कीच बेकायदेशीर कृत्य आहे, पण तरीही सचिनच्या काही गरीब चाहत्यांकडे (ज्यात तुटपुंजे पॉकेटमनी असलेले कॉलेजस्टुडंट सुद्धा आले), ज्यांना हे पुस्तक विकत घेणे परवडणार नाही, अश्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचले तर मला मनापासून आनंदच होईल." ..अर्थात, अगदी मनापासून केलेले हे विधान होते.>>>या मधे सचिन प्रेम आणी फक्त सचिन प्रेम च दिसत आहे.
माझ्या सारखिला कुनी हे पुस्तक फुकट दिल तरी मी ते वाचनार नाही कारन मला क्रिकेट आवडत नाही.
कृती मागचा उद्देश काय हे खुप महत्वाचे आहे.<<यातून मॉरल ऑफ द स्टोरी काय काढायची हे आपल्यावरच सोडतो>>
.मॉरल ऑफ द स्टोरी
१) चाहत्यांचे प्रेम आहे.
२) भोंदू बाबा बाबत टोकाची व्देष भावना आहे.
३) मतदारांच्या मनात फसवले गेल्याची भावना आहे.
कायद्याच्या चौकटीत विचारांना भावनेला काही किंमत नाही.
नैतिकते च्या दृष्टीने कृती मागचा उद्देश काय हे खुप महत्वाचे आहे.
डीविनीता, धन्यवाद!
डीविनीता,
धन्यवाद!
<< ऑफिसातील इंटरनेट कनेक्शन
<< ऑफिसातील इंटरनेट कनेक्शन वापरून वाट्टेल तितके धागे प्रसवणे हे 'नैतिक' आहे काय? >> कांहींच्या बाबतींत याला नैतिक अधिष्ठानही असूं शकतं ! -
भाऊ टीप:हा प्रतिसाद हापिसात
भाऊ
टीप:हा प्रतिसाद हापिसात बसून दिला आहे.
<< टीप:हा प्रतिसाद हापिसात
<< टीप:हा प्रतिसाद हापिसात बसून दिला आहे. >>
भाउ तुम्हीपण ना! बिचारा,
भाउ तुम्हीपण ना! बिचारा, निरागस.धागाकर्ता .जरा स्पाईक्स वगैरे स्टायलिश तरी दाखवायला हवे होते .का असेच दिसतात ऋन्मेऽऽष .
भाऊसाहेब आ.न., -गा.पै.
भाऊसाहेब
आ.न.,
-गा.पै.
ड्रीमगर्ल, वेश्याव्यवसायाबाबत
ड्रीमगर्ल,
वेश्याव्यवसायाबाबत जगभरातले कायदे भिन्न आहेत. आणि जर आपण कायदे नैतिकतेच्या निकषातून तोलत असू तर केवळ सर्वच लक्षात घ्यायला हवे. >> मान्य
असो, पण याउपरही भारतात वेश्याव्यवसाय चालत नाही किंवा लपूनछपून चालतो असे आहे का? उलट काही विभाग तर खास वेश्यावस्ती म्हणून ओळखले जातात. >> हे फक्त तिथून चारापाणी चौकी वर पोहोचते म्हणून!
तसंही आपल्या देशात कायदा हा पळवाटांसह केला जातो किंवा केलेल्या कायद्याला पळवाटा शोधल्या जातात!
स्वताच्या मर्जीने देहविक्रय करणे गुन्हा ठरवला जावा का? >> जर तो गुन्हा असेल तर ग्राहकांनाही शिक्षा असावी. डान्सबार्स वर पण बंदी आहे ना? मग या व्यवसायाला का नसावी? त्यांचे पुनर्वसन शक्य नाहीय का?
भाऊ भारीच नेहमीप्रमाणे... <<
भाऊ भारीच नेहमीप्रमाणे...
<< टीप:हा प्रतिसाद हापिसात बसून दिला आहे. >> मीपण!! ऑफीसमधून इतर साईट्स अॅक्सेस करण्याच्या नैतिकतेबद्दल : बर्याच ऑफीसात रेस्ट टाईम असतो. इथे रिलॅक्सेशन साठी दिसामाजी काही तरी वाचायला हरकत नाही! सोशल मिडीयावर काम करत असल्याने इथली चर्चा, कायदे, बातम्या, आर्टीकल्स उपयोगी पडतात!
दुसरी गोष्ट : अर्जंट आलेली कामे घरूनही करून द्यावी लागतात! तिथे कंपनीचे (नी स्वतःचे ही) हित लक्षात घेतले जातेच की!!
यात मुळात काय कामे वेळेत (डेडलाईनपूर्वी) पूर्ण करून देणे आणि अपेक्षेप्रमाणे रिझल्ट देणे! (कंपनी ते मेजर करत असतेच दरवर्षी, प्रत्येक प्रोजेक्टनुसार!!) ते पूर्ण होत असेल तर काय हरकत आहे!
हे खरे तर समर्थनच झाले. कारण
हे खरे तर समर्थनच झाले.
कारण मुळात यासाठी एक ठराविक टाईम ऑफिसने ठरवून दिला नसतो, आपण केव्हाही आपल्या हिशोबाने करतो, त्यातही इथे धमाल चालू असेल तर नाही म्हटले तरी जास्त वेळ रमतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे येथील चर्चेचे विषय येथून बाहेर पडल्यावरही आपल्या डोक्यात घोळत राहिले तर त्याचा कामावर परीणाम सुद्धा होऊ शकतो.
Parkinson's Law: Work expands
Parkinson's Law:
Work expands so as to fill the time available for its completion.
माझ्या मते सर्व गोष्टी
माझ्या मते सर्व गोष्टी (पुस्तके, चित्रपट, सॉफ्ट्वेयर, इत्यादि) ओपन सोर्स झाल्या तर पायरसी थांबवता येइल. उदहरणार्थ सचिन चे पुस्तक जर ऑनलाइन उपलब्ध करून दिले तर त्याला जगभरामध्ये वाचकवर्ग मिळेल. गुगल ज्याप्रमाणे जाहीरातींमधून रेव्हेन्यू मिळविते त्याप्रमाणे काहीतरी करता येउ शकेल. किंवा ऑनलाइन पुस्तके, चित्रपट, सॉफ्ट्वेयर ह्यांचा साठा करता आला आणि अशा वेबसाइट चे सदस्यत्व अल्प किमतीमध्ये उपलब्ध करून देता आले तर पायरसी ला आळा बसेल.
<< बिचारा, निरागस.धागाकर्ता
<< बिचारा, निरागस.धागाकर्ता .जरा स्पाईक्स वगैरे स्टायलिश तरी दाखवायला हवे होते .का असेच दिसतात ऋन्मेऽऽष >> इथले धागे पहाणार्या कुणाही माबोकराला ते ऋन्मेऽऽष आहेत असं वाटूंच कसं शकतं ! ऋन्मेऽऽष यांच्या संगणकाला व्यचिंत दाखवलंय तसं दिवसांतून एक मिनीटही बंद रहाणं शक्य तरी आहे का ?
सुमुक्ता, चांगली कल्पना आहे.
सुमुक्ता, चांगली कल्पना आहे. कधीतरी असे होईल वा करावे लागेल.
भाऊ,
नाही हं, ऑफिसमध्ये मी पहिला हातातले काम वेगात आटपतो आणि मग त्यानुसार जी वेळेची बचत होते ती इथे खर्च करतो. तसेच मोठ्या पोस्ट वेळेअभावी शक्य नसल्यास शक्यतो घरूनच टंकतो. अर्थात हे देखील समर्थनीय नाहीच हे ही कबूल करतो.
अवांतर - तुम्हाला तुमचे वय माहीत आहे, तुम्हाला माझे वय माहीत आहे, मग उगाच अहो जाहो का करून का मला अवेकवर्ड फील करवत आहात?
सुमुक्ता यांचा प्रतीसाद मलाही
सुमुक्ता यांचा प्रतीसाद मलाही पटला. जसं तुनळीवर पाहता येतात चित्रपट. पण तोपर्यंत पायरसी करणे चुकीचेच ठरते.
>>>तसेच जो कायदा बलात्काराला
>>>तसेच जो कायदा बलात्काराला गुन्हा ठरवतो तिथेच वेश्याव्यवसाय मात्र चालून जातो तो कसा?<<<
बलात्कार आणि वेश्याव्यवसाय ह्यांची तुलना करणे संपूर्णपणे चुकीचे आहे.
बलात्कार हा गुन्हा आहे. उपजीविकेसाठी शरीरविक्री हा गुन्हा नाही. भारतीय कायद्यानुसार त्याला मान्यता आहे. बेकायदेशीर भाग आहे तो हा की 'दुसर्याला जबरदस्तीने किंवा फसवून शरीरविक्री करायला लावणे'! त्याला मान्यता नाही.
पेपरमध्ये ज्या 'सेक्स रॅकेटचा पर्दाफाश' स्वरुपाच्या बातम्या येतात त्या सर्व बातम्यांमध्ये शोषित तरुणींना अश्या जाळ्यात ओढणारे व त्यावर पैसा कमावणारे कोणी दलाल असतात. त्यामुळे ते सगळेच (दलाल, तरुणी व गिर्हाईके) पकडले जातात. मात्र, उद्या एखाद्या स्त्रीने स्वतः देहविक्रीचा निर्णय घेतला आणि तो निव्वळ उपजीविकेसाठी घेतलेला असला तर तिला अटक होऊ शकत नाही.
<< मग उगाच अहो जाहो का करून
<< मग उगाच अहो जाहो का करून का मला अवेकवर्ड फील करवत आहात?>> माझं बालीश लिखाण बघून तुम्हीच मला अरे तुरे करूं नये म्हणून !
विनोद सोडा पण कुणाशीं प्रत्यक्ष चांगलाच परिचय नसेल तर 'अरे तुरे' म्हणणं खरंच मला ऑकवर्ड होतं त्याला काय करायचं !
असो. मुख्य विषयाबद्दल. काल सहज वाटलं कीं 'कायदा गाढव असतो' या रुळलेल्या वाक्यात कदाचित तुम्ही उपस्थित केलेल्या सगळ्याच प्रश्नांचीं उत्तरं दडलीं असावीत !
काही जण म्हणत आहेत की
काही जण म्हणत आहेत की वेश्याव्यवसायाला कायद्याने मान्यता आहे तर काही नाही म्हणत आहेत.. नक्की काय खरे आहे?
असो, कायद्याने मान्यता असल्यास स्त्रियांनी देहविक्रय करणे वा पुरुषांनी वेश्यागमन करणे हे कायद्याच्या मते नैतिकतेमध्ये मोडत असावे.. कि कायद्याचा आणि नैतिकतेचा काही संबंध नसतो हेच खरे.
पण हाच कायदा स्वखुशीच्या समलिंगी संबंधाना मान्यता देताना दहावेळा विचार करतो.. ते अनैतिक म्हणून की अनैसर्गिक म्हणून?
भाऊ, होय, कायदा गाढव असतो .. म्हणी अश्याच नाही बनत, त्यांच्यामागेही वारंवार घडणारा ईतिहास भूगोल असतो..
<< कि कायद्याचा आणि नैतिकतेचा
<< कि कायद्याचा आणि नैतिकतेचा काही संबंध नसतो हेच खरे.>> मला वाटतं दोन महत्वाच्या मूलभूत गोष्टी लक्षांत घेणं आवश्यक असावं - १] कायदा असणं हीच निव्वळ अपरिहार्यता आहे व २] कायदा हा मानवनिर्मितच असून तत्कालीन समाजमानसाच्या सर्वसाधारण नितिमत्तेच्या कल्पना हेंच त्याचं अधिष्ठान असावं. कायदा तयार करताना समाजातील प्रत्येक व्यक्ती/गट यांच्या वेगळ्या वेगळ्या विशिष्ठ नितिमत्तेच्या कल्पना [ मग त्या खूप पुरोगामी असोत वा कालबाह्य ] किंवा प्रत्येक अपवादात्मक परिस्थिती लक्षांत घेवून त्याकरतां त्यांत तरतूद करणं अशक्यच असावं. त्यामुळे, कोणताही कायदा नितिमत्तेला धरून नाही किंवा वास्तवाशी सुसंगत नाहीं असं नेहमींच कांहीं व्यक्तीना/गटाना वाटणं अपरिहार्य असावं. असं वाटण्यातच ' कायदा गाढव आहे' याचं मूळ असावं.
[हेन्री सेसील हा कायद्याच्या पार्श्वभूमिवर बेतलेलीं कथानकं लिहीणारा प्रसिद्ध लेखक. आयुष्यभराचा कायद्याचा व कोर्टातला अनुभव, अफाट कल्पनाशक्ती व तरल विनोदबुद्धीची झालर असलेली खुसखुषीत लेखनशैली हीं त्याचीं वैशिष्ठ्यें. त्याचं 'Not Such An Ass' ('इतका कांहीं गाढव नाहीं ', अर्थात 'कायदा' ! ), हें पुस्तक सकृतदर्शनीं विचित्र वाटणार्या कायद्याच्या कांही तरतूदींमागची कारणमीमांसा व सर्वमान्य अशा कायद्याच्या कलमांचा कांहींजण करत असलेला दुरुपयोग या दोन्ही बाजू अगदीं साध्या, काल्पनिक उदाहरणांतून अतिशय रंजकपणे मांडतं. या धाग्याच्या संदर्भातच नव्हे तर शक्य असेल तर जरूर वाचावं, असं पुस्तक.]
जरी कायदे बनविताना नैतिकतेचा
जरी कायदे बनविताना नैतिकतेचा आधार घेतला जात असला तरी प्रत्येक अनैतिक गोष्ट बेकायदेशीर असेलच असे नाही. उदा. विवाह-बाह्य संबंध ठेवून लग्नाच्या जोडीदाराला फसवणे हे अनैतिक असले तरी बेकायदेशीर नाही.
विवाह-बाह्य संबंध ठेवून
विवाह-बाह्य संबंध ठेवून लग्नाच्या जोडीदाराला फसवणे हे अनैतिक असले तरी बेकायदेशीर नाही.<<<
माझ्या माहितीनुसार ते बेकायदेशीर आहे. लग्नाच्या जोडीदारांचा (दोघांच्याही) कन्सेन्ट असला तरच ते कायदेशीर ठरते.
नाही.
नाही. नवरा-बायकोसाठी/स्त्रीपुरुषासाठी वेगवेगळे कायदे आहेत.
विवाहित स्त्रीशी तिच्या पतीच्या संमतीशिवाय शरीरसंबंध ठेवणे बेकायदा आहे. पण विवाहित पुरुषावर (विवाहबाह्य संबंध ठेवताना स्वतःच्या पत्नीची संमती आवश्यक) अशी कोणतेही बंधने कायद्याने नाहीत. त्याची पत्नी या कारणावरून घटस्फोट मागू शकेल, पण तो दंडनीय अपराध नाही.
ओके.
ओके.
मयेकर, पत्नी घटस्फोट मागू
मयेकर,
पत्नी घटस्फोट मागू शकते, पण कायदेशीर गुन्हा नाही हे माहीत होते. अर्थात अश्या गुन्ह्यात कोणाला शिक्षा झाल्याचे ऐकीवात नाही या आधारावर माहीत होते. पण पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तो कायदेशीर गुन्हा हे माहीत नव्हते.
पण हे जर खरे असेल तर हा दुजाभाव झाला. नक्की कोणत्या बेसिसवर हे समजायला मार्ग नाही.
विवाहित स्त्रीशी तिच्या
विवाहित स्त्रीशी तिच्या पतीच्या संमतीशिवाय शरीरसंबंध ठेवणे बेकायदा आहे. पण विवाहित पुरुषावर (विवाहबाह्य संबंध ठेवताना स्वतःच्या पत्नीची संमती आवश्यक) अशी कोणतेही बंधने कायद्याने नाहीत. त्याची पत्नी या कारणावरून घटस्फोट मागू शकेल, पण तो दंडनीय अपराध नाही.>> हा असा खरच कायदा आहे?मला खरच माहीत नाही.शोधले पाहीजे . हे असले कायदेही खरच सारखे करायची गरज आहे.
www.legalservicesindia.com वर कळेल . पण सोप्या भाषेत माहीत असेल तर कुणीतरी सांगा.
Pages