झी-जिंदगी

Submitted by कविता१९७८ on 10 September, 2014 - 00:37

पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्‍या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्‍याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्‍या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.

असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.

ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्‍हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला मातचे सुरुवातीचे एपी आवड्ले. अशा बहीणी असू शकतात असं वाटलं. उलट शेवट्च जरा नाही पटला.
मुलगा शेवट्पर्यंत तिचा राहिला पण नवरा कस्ला डेंजर...! पहिल्या बायकोने इतका त्रास देउन पण परत तिला घरी कसा घेऊन येऊ शकला...तेही इत्क्या वर्षांनी..?? म्हणजे ह्या दुसर्‍या बाय्कोची काहीच किंमत ठेवली नाही त्याने.

ह्या दुसर्‍या बायकोची काहीच किंमत ठेवली नाही त्याने.>> तोच तर जबरी सीन आहे तेव्हा ती मोठी बहीण रागाने म्हणते की नवरा आणि लहान बहीण दोघही एकदम एकसारखे आहात.

-- "तुम दोनो झुटे ,खुदगर्ज हो.तुम दोनो को एकसाथ ही होना चाहीये था.डिझर्व करते हो तुमदोनो एक दुसरेको". २७ वर्ष स्वतःचे अस्तित्व विसरुन ज्याच्या साठी तीने हे सर्व केले त्यानेच अशी किंमत केली ,त्यानंतर एमन जे केले ते मला योग्यच वाटले.म्हणुन शेवट आवडला. Happy

मला सध्या 'आईना दुल्हन का' आवडतीये. मातचीच हिरॉईन आहे त्यात. मात' पेक्षा वेगळा आणि मस्त रोल केलाय तिने.

यू ट्यूब प्रेमियों..
पाकिस्तानी टेली फिल्म्स ट्राय करो... दोन दोन तासाच्या सुप्पर्ब फिल्म्स आहेत जिओ, हम , आरी डिजिटल इ.इ. चॅनेल्स वरच्या

अगं इतक्या>>> आहेत.. बरं मला आवडलेल्या टाकते लिस्ट मधे..
जेमतेम दीड दोन तासांच्या फिल्म्स खूप मस्त आहेत.. Happy

हम टीवी वरची

बेहद, जब हम मिले, एक मामूली सी लडकी, जरा सी औरत, सौतन मेरी सहेली,

जिओ वरच्या

परवरिश, बाकी आठवतील तशी अ‍ॅड करते नावं

वर्षू नील, तुम्ही याआधी दिलेल्या लिस्ट मधील धुप किनारे कशी आहे?
त्यावरुनच आपल्याकडे 'कुछ तो लोग कहेन्गे' ही मालिका आली होती सोनी वर. असं वर जिज्ञासाने दिलेल्या लिंकमधे उल्लेख आहे.

चैत्राली, इथे उत्तर द्यायचं म्हणून लिहायला लागले आणि खूप मोठं उत्तर झालं म्हणून धागाच काढला एक! त्याचा दुवा: http://www.maayboli.com/node/51645
आणि एका शब्दात उत्तर द्यायचं तर: must watch!

चैत्राली धूप किनारे अतिशय उत्कृष्ट मालिका होती.. एवरीथिंग वाईज,

कुछ तो लोग वॉज शुद्ध डिझास्टर.. टेरिबल.. अजून (कु)विशेषणे आठवत नाहीयेत.. कोणत्याच बाबतीत तुलना होणार नाही दोघांत..

'और जिंदगी बदलती है' पाहायला सुरुवात केली आहे! आवडते आहे! अगेन उत्तम स्टोरी, अभिनय वै.वै. पण एका स्त्री दिग्दर्शकाने २००० साली पाकिस्तान आणि स्पेन मध्ये शूट केलेली मालिका हा या मालिकेचा USP म्हणता येईल! २००० साली भारतीय मालिकांमध्ये काय चालू होतं (FYI, क्यूंकी सांस..२००० साली सुरू झाली!)?
Indians as immigrants in foreign countries वै. विषय आजही हाताळले जात नाहीयेत!
सहज उत्सुकता म्हणून गुगलून पाहिलं तर कळलं की पाकिस्तान आणि स्पेन यांचे संबंध कायम फार मधुर राहिले आहेत! आपल्या ह्या शेजारी देशाविषयी फारच कमी माहिती आणि जास्ती गैरसमज आहेत आपले बहूतेक!

ओह मस्त गं जिज्ञासा, ही सीरिअल पाहायला सुरुवात केली होती खूप पूर्वी.. पण नंतर फॉलो नव्हती करता आली.. धन्यवाद्,आठवण करून दिल्याबद्दल Happy

वर्षू नील, anytime! मी नादिया जमील (बेहदची नायिका) बद्दल माहिती शोधत होते तेव्हा ही मालिका सापडली ह्या निमित्ताने मेहरीन जब्बार ह्या गुणी दिग्दर्शिकेची ओळख झाली. तिची वेबसाईट खूप छान आहे (http://www.mehreenjabbar.com/). आता वेळ मिळेल तशा तिच्या सगळ्या मालिका बघणार आहे.

और जिंदगी बदलती है नक्की बघा! १३ भागांची आहे. युट्युबवर इथे (https://www.youtube.com/playlist?list=PLCAECE894D7A81F18) सगळे भाग आहेत.

After watching these serials it feels impossible to go back to crappy hindi, marathi daily soaps. संसाधनं, पैसा, वेळ आणि गुणवत्ता (?) यांचा होणारा अपव्यय पाहून भयंकर चिडचिड होते माझी. पाकिस्तानबद्दल इतकी अढी बसली होती/आहे इतकी वर्ष मनात की त्यांच्याकडच्या चांगल्या मालिका पाहताना कौतुक वाटतं पण मनातून इर्षा आणि खेद वाटत राहतो.
Why in spite of all conducive conditions we are constantly failing to produce good TV dramas for last 10-15 years and why and how Pakistan in spite of all the odds has continued its legacy of excellence in the field? The answers are beyond me!

यस्स्स टोटली अग्री विथ यू , जिज्ञासा.. Happy

पाकीज इतके काही वाईट नसतात गं, इनफॅक्ट तिकडली पब्लिक अगदी भारताच्या प्रेमात असते.. बघ ना तिकडले कित्येक कलाकार बॉलीवुड मधे छानपैकी एस्टाब्लिश झालेलेत

इंडोनेशियात असताना एका इंटरनॅशनल शाळेत शिकवत असताना बरेचसे पाकी विद्यार्थी होते. आमचं मस्त गूळपीठ जमलं होतं. ११ वीतील एक पोरगी तर माझ्याशी इतकी अटॅच झाली होती कि आपले पर्सनल प्रॉब्ज माझ्याबरोबर शेअर करत असे.

ड्रामा इंडस्ट्री खूप स्ट्राँग आहे तिकडली, सिनेमा मात्र एकदम डाऊन Sad
बाय द वे, तू उमर शरीफ च्या जुन्या कॉमेडी ड्रामाज पाहिलेत का?? यू ट्यूब वरची क्वालिटी तितकीशी चांगली नाहीये या ड्रामाज ची ..,' बकरा किश्तों पे' हे माझा सर्वात आवडता ड्रामा आहे..
आताशी कॉमेडी ड्रामाज , एक, दोन सोडल्यास इतके स्टँडर्ड नाही राहिलेत

"बेहद" चा जरा भारतीय पण तीतकासा चांगला नसलेला भाग https://www.youtube.com/watch?v=oXk9MmZPFf0 हा आहे . हिरो चा अभिनय फवाद च्या आसपास देखिल नाही .हिरोईन बरी आहे ,आधी कशात तरी होती केकता च्या सिरीयलीत पाहिल्याचं आठवते .त्याच्या खालच्या कमेंन्ट्स पण इंटरेस्टिंग आहेत. Happy काही म्हणा फवाद भारी दिसतो .प्रपोज करण्याचा सीन तर सुंदरच .बेहद आहे तुनळीवर :स्मित:.

त्यातलीच हिरोईन अजुन एका मालीकेत 'कशफ' च्या आईबरोबर दिसलेली मी एकच भाग पाहीला मधलाच 'धुप छांव' चा त्यात मुलगी आणि तीचा नवरा फारच भांड्त होते . पण सिरियल ही चांगली वाटली संपली बहुतेक.

वर्षू नील, खरंय! पाकिस्तान bashing ऐकतच लहानाचे मोठे होतो आपण. त्यामुळे मनात पूर्वग्रह निर्माण होतात. तसंही या मालिकांत दाखवलेला पाकिस्तानी एलिट क्लास हा भारतीय हिंदी मालिकांमधल्या एलिट क्लासपेक्षा कितीतरी अधिक पुरोगामी आणि सुसंस्कृत वाटतो! उर्दूत सांगायचं तर बहोत ही रोशनखयाल और इन्साफपसंद Happy
आपल्या मालिकांमधले उच्चभ्रू लोक बऱ्यापैकी hypocrites (hypocrite ला मराठीत काय म्हणतात? मला जाम आठवत नाहीये!) असतात.एकीकडे बहूवर अन्याय, कट कारस्थानं आणि दुसरीकडे भक्तीभावाने देवापुढे सुबह शाम पूजापाठ! अर्थात हे केवळ मालिका पाहून बनलेलं मत आहे. दोन्हीकडच्या खऱ्याखुऱ्या एलिट क्लासशी माझा फारसा संबंध नाही!
मी पण बकरा किश्तो पें ची खूप तारीफ ऐकली आहे. आता युट्युबवर शोधून बघेन!

चांगल्या मालिका पाहताना कौतुक वाटतं पण मनातून इर्षा आणि खेद वाटत राहतो.>>>>>>>>>>>आपल्याकडच्या तमस बुनियाद,अमानत मराठीत(नाव आठवत नाहीपण प्रत्येक भागात वेगळी गोष्ट असायची ) वगैरे मालिका तशाच चांगल्या होत्या. नंतरच्या काळातील, सिरिज मी पहात नसल्याने त्याबाबत सांगू नाही शकत.ज्यावेळी कथेशी प्रामाणिक राहून मालिका केल्या जातात्,त्यावेळी त्या सशक्त असतात. केवळ दूध कम्,पाणी ज्यादा झाले कीमालिकेची वाट लागते.

हमसफर आवडली ती मुख्यतः वरच्या कारणाने. भारजरी साड्या,दागिनेनसणे आणि मंद पार्श्वसंगीत (ज्यामुळे संवाद नीट कळतात.) आणि वेगळे वातावरंण. जिंदगी गुलजार है बरीच रटाळ वाटली.पण त्यातले लग्नाचे प्रसंग केवळ फोटोतून दाखवले आहेत ते मस्त वाटले. नाहीत४-५ भाग त्यावर खर्च झाले असते.

बाकी हे भाग बघताना त्यावरच्या कॉमेंटस वाचताना मजा येते.'प्रत्येक वेळी भारताशी तुलना केल्याशिवाय हे लोक नाही जगू शकत. एखाद्या भारतीयाने मालिकेमधिल पात्रावर टीका केली तरी भांडत रहातात.असो .हे अवांतरच.

दुर्रे शहवार चं भारतीय नामकरण केलेलंय ,' धूप छाँव'
खूप सुंदर आहे ही मालिका.. अवश्य बघण्यासारखीये.. हळू हळू चांगलीच पकड घेते

दुर ए शहवार (धूप छाँव) थोडीशी पळवत पळवत पाहिली. आवडली आणि नाही आवडली.
आवडली: कारणे नेहमीचीच यशस्वी - अभिनय, संवाद, स्क्रिप्ट. समीना पीरजादा (जि.गु.है. मधली कशफची आई) आणि सनम बलोच दोघींनी अप्रतिम काम केलं आहे!
नाही आवडली: कारण खूप chauvinist approach दाखवला आहे. मर्द कभी झुक नही सकते, औरतोंको ही झुकना पडता है वरना उनका घर टूट जाता है टाईप ची वाक्ये आजिबात पटली नाहीत. आजच्या काम करणाऱ्या स्त्रियांची समस्या खूप नीट दाखवली आहे पण त्यावर उपाय मात्र बाबा आदमच्या जमान्यातला का बरं? नाहीच पटलं! किमान तो उपाय कसा लागू पडला ते एखाद्या एपिसोड मध्ये दाखवलं असतं तर बरं झालं असतं.
त्या औन झारा मध्ये पण Aun easily gets away with his mistakes without apologizing to anyone.

धुप छांव खरंच खुप छान मालिका होती विशेषतः शेवटच्या भागात तर फारच गहिवर जाणवला. मुलीला "समंजसपणे वाग, तू सासरी सर्वांना खात्रीने जिंकून घेशील "असे अगदी ठामपणे सांगणारे मुलीचे वडील प्रत्यक्षात मात्र आपण मुलीचे सासर निवडताना मोठीच चूक केली अशी खंत आयुष्यभर मनाशी बाळगत असतात हे त्यांच्या मृत्यूनंतर मुलीला जेव्हा समजते तेव्हा तिच्यासोबत प्रेक्षकांना देखील तो एक मोठाच धक्का असतो.

बडी आपा ही सर्वात जास्त आवडलेली मालिका. मालिकेचा शेवट झालाय हे डोक्यात जाणवेपर्यंत शेवट होऊनच जातो इतक्या थंडपणे, क्वचितच कुठे पाह्यला मिळेल. जी खलनायिका सुरुवातीपासून सर्वांना दुखविते, हिणविते, दुसर्‍यांना सतत चूक ठरविते; तिच्या चुका सर्वांसमक्ष उघड पडल्यावर देखील सहनशीलतेची मर्यादा गाठलेले सद्वर्तनी नायक व नायिका तिला कुठलेही बोल न लावता उलट घर, सर्व मालमत्ता, इत्यादी तिच्या नावे करून शांतपणे निघून जातात ही एक खणखणीत चपराक आहे सर्व प्रेक्षकांना जे अगदी आतुरतेने वाट पाहत असतात की आता खलनायिकेची नायकाकडून चांगली खरडपट्टी निघेल. अतिशय आश्चर्यकारक व जबरदस्त शेवट अगदी मनापासून अदबीने कुर्निसात करावा असा. वाईटातील वाईट शत्रूशी इतक्या चांगुलपणाने वागा असा आणि इतका कमालीचा समंजस उपदेश कदाचित गांधीजी देखील इतक्या समर्पकपणे त्यांच्या अनुयायांना करू शकले नसतील कधी.

बडी आपाचे १-२च भाग बघितले, विशेष आवडली नाही. आक्रस्ताळी आडदांड बाई वाटली. मग पुढे बघितलंच नाही.

थकन बरीच बघितली, बरी होती.
ती शहवालची कुठली होती? नावंच लक्षात रहात नाहीत माझ्या. आवडलेली ती पण. त्यातली सासू या आईना दुल्हन का मधे पण आहे पण सासूचीच भुमिका असून बेअरिंग मात्र टोटली वेगळं आहे. खासियत आहे त्या कलाकारांची.

मराठी मालिकान्मधला रटाळ्पणा अगदी म्हण्जे अगदिच डोक्यात जायला लाग्ला म्हणून माबो वरची चर्चा वाचून पकिस्तानी सीरिय्ल (त्यान्च्या भाषेत ड्रामे) बघाय्ला लाग्ले. आणि प्रेमात पडले तिकडे होणार काम बघून. मला प्रकर्षाने जाणवलेले मुद्दे
१. ऊत्तम निर्मीती मूल्य.
२.strong characterisation.ट्त्यामुळे ती फार खरी वाटतात.
३.नाविन्यपूर्ण कॅमेरा अअ‍ॅन्गल्स आणि यथोचित लायटिन्ग. खरतर वाक्यामधे विरामचिन्हाना जेव्ढ महत्व्त असत तेच महत्त्वा सिने मॅटोग्राफर च्या लायटिन्ग ला. त्यामुळे एक मूड निर्माण होतो. आपल्या कडे रोल कॅमेरा म्हन्टला की कॅमेरामन नुस्त बटण दाबतो अस वाटत.
४.अभिनायाचा दर्जा उत्तम. कोणी धाय मोक्लून रडत नाही कि गडगडाटी हसत नाही. ़हूप रीअलिस्टीक अभिनय.
५. कप्डेपट मस्तत्। थुकपट्टी काम नाही. म्हणजे आपल्याकडच्यसार्का एक च ड्रेस, एक पअ‍ॅटर्न रन्ग वेगवेगळे असा प्रकार नाही.
६.बॅकग्राउन्ड म्युसिक अत्यन्तश्रावणीय. कथेत भर घालणार.बरेच्दा एका सीन मधून दुसर्या सीन मधे जाताना, काही वेळा पुढच्या सीन चा डायलॉग आधीचा सीन फेड आउट होताना सुरु होतो. । हे साउन्ड डिसाइन कथेला वेग द्याय्ला वापरतत याचा उत्तम वापर.
७.कथेचा पर्यायाने मालिकेला definite end.
८. सन्वादात पेरलेले शब्द. ऊगाच शब्दबन्बाळ वाक्य नाहीत. ऊगाच सन्स्कारान्चा, विचारन् चा भडीमार नाही.
९.सुन्दर सन्गीत.
आणि सर्वात भावलेला मुद्दा.
१०. शारिरीक जवळीक न दाखवता चितारलेला रोमन्स. नुस्ता हातात हात घेउन उत्त्म अभिनय आणि सन्गीताच्या जोडीने ही सीन मध्ये श्रून्गार आणता येतो आणी बघताना भावतो उदा. जि.गु.है , हम्सफर.
थोडक्यात तुम्च्यासार्खीच मीही इन ड्रामोन्के मोहब्बत् मे.

शारिरीक जवळीक न दाखवता चितारलेला रोमन्स. नुस्ता हातात हात घेउन उत्त्म अभिनय आणि सन्गीताच्या जोडीने ही सीन मध्ये श्रून्गार आणता येतो आणी बघताना भावतो>>>>>>>>एकदम बरोबर. अगदीच नाईलाज झाला तर हातात हात घेतले आहेत.एरवी नाहीच.

राम कपूरची एक मालिका, त्यात बेडसीन्ही दाखवले होते.(अ‍ॅड+ मैत्रिणींच्या गप्पा यावरून म्हणतेय.)

मला माहिती नाही की तन्हाईयां ही १९८५ साली आलेली मालिका झी झिंदगी वर दाखवतील की नाही पण मी ती नुकतीच युट्युबवर बघायला सुरुवात केली आहे आणि अतिशयोक्ती अलंकाराचा उपयोग करून सांगायचे तर ही बेस्टेस्ट मालिका आहे! At times I feel I might die laughing because I am laughing till I can not breathe! फक्त संवादाच्या /शब्दांच्या ताकदीवर इतका चांगला विनोद! I am impressed! पुढे काय होईल मालिकेत मला माहिती नाही पण so far it is one of the best and unlike any serial before!! One word of caution: It is quite high on Urdu and no subtitles.
अपडेट: ही मालिका पाहून संपवली. पहिल्या काही भागात जितकी छान वाटली होती तितकी छान राहिली नाही शेवटपर्यंत Sad खूप patchy आणि उगीच वाढीव प्रसंगांनी भरलेली आहे. विनोदाची पातळीही तितकी दर्जेदार नाही राहिली! Disappointed!

.

Pages