आदरणीय मोदीसाहेब,
वंदन!
आमच्या सोसायटीत आम्ही लहानपणी एक खेळ खेळायचो! त्याला लपाछपी म्हणा, इस्टॉप पार्टी म्हणा नाहीतर डबडा ऐसपैस म्हणा! त्यात जे लपलेले असत, त्यांना ज्याच्यावर राज्य असे त्याने शोधून काढायचे असे. त्या खेळात अनेक गंमतीजमती केल्या जात! अनेकदा राज्य ज्याच्यावर असे तो सतत राज्य त्याच्यावर आल्याने इतका वैतागलेला असे की त्याला लपलेल्यांना एकदाचे ओळखायची प्रचंड घाई झालेली असे. त्यामुळे तो प्रत्यक्ष चेहरा न बघताच, लांबूनच, नुसती कोणाच्या शर्टची झलक दिसली तरी त्याचे नांव घेऊन 'हा हा इस्टॉप' असे ओरडायचा. हे लक्षात घेऊन काही मुलांनी शक्कल लढवलेली होती. लपल्यानंतर शर्ट्सची अदलाबदल करायची आणि मुद्दाम शर्टचा थोडा भाग राज्य असलेल्या मुलाला दिसू द्यायचा. असे केल्याने तो चुकीच्या मुलाला ओळखल्याचे बोंबलून जाहीर करायचा. त्याने उल्लेखलेल्या नावाचा मुलगा जर तेथे निघालाच नाही तर सगळे जण 'अंड, अंड' करत बाहेर यायचे आणि 'राज्यकर्त्यावर' पुन्हा नवे राज्य यायचे.
पुढे जसजसे सगळे मोठे झाले तसतसे मग आपापल्या कामानिमित्त सगळेजण पांगले. कोणी नागपूरला गेला, कोणी बारामतीला, कोणी मुंबईला तर कोणी दिल्लीला!
आज, जवळपास पस्तीस वर्षांनी त्या सर्वांचे पहिल्यांदाच रियुनियन बघायला मिळाले.
आजही एक राज्यकर्ता निवडला गेला. त्याच्यावर 'राज्य' लादण्यात आले ह्याचा त्याला आनंद झाला होता हे एक ठसठशीतपणे जाणवलेले वेगळेपण! लपणार्यांची संख्या २८६ होती. त्यातले वेगळेपण असे की सगळे लपलेले खरे तर समोर बसलेले होते, पण ते त्यांच्या स्वतःच्या पक्षनिष्ठेपासून लपून बसलेले होते. लहानपणी हे लोक तिघे तिघे एकत्र जमून चकत असत. चकणे म्हणजे तिघांनी एकमेकांच्या हातात हात मिसळवणे आणि क्षणात ते सोडवून आपलेच दोन्ही तळवे पालथे किंवा उताणे करून इतरांना दाखवणे! तिघांपैकी ज्याच्या तळव्याची पोझिशन एकमेव असेल त्याच्यावर उदाहरणार्थ राज्य येत असे. आज हे राज्य कोणावर यावे हे 'सर्वानुमते' (?) आधीच ठरलेले असावे. ह्याचे कारण ज्याच्यावर राज्य आणायचे त्याच्या पक्षाचे नांव पुकारण्यात आले. 'चकणे' ह्या वेळखाऊ प्रक्रियेला फाटा देण्यात आला व 'चकणे' ही एक क्रिया न राहू देता ती एक भावना म्हणून तिची पुनर्निर्मीती झाली मोदीसाहेब! तुम्ही हवा होतात आज इथे!
एक खूप मोठ्ठा फरक पूर्वीच्या लपाछपीत आणि आजच्या लपाछपीत जाणवला. तो म्हणजे, पूर्वी चकून राज्य कोणावर आले हे ठरवले जात असे. आज राज्य कोणावर यावे हे आधी ठरवून त्यावर इतरांची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. वयंही वाढलीयत ना आता पोरांची, कोण चकत बसणार!
तर ज्याच्यावर राज्य आले आहे त्याच्यावर ते यावे की नाही ह्यावर सर्वांनी आपापले मत नोंदवायचे होते. पण त्याचे काय आहे मोदीसाहेब, जन्म घेणे आणि मरण पावणे हे दोन विषय सोडले तर उरलेल्या प्रत्येक विषयाला 'मानवी घटनेमध्ये' पळवाटा नेमून दिलेल्या आहेत. त्यातलीच एक पळवाट आज निवडण्यात आली.
'मत नोंदवणे' ह्या क्रियेला असलेली ही पळवाट! कशाल अमतेबिते नोंदवायची?
ज्या महाराष्ट्रावर राज्य करण्यात कोणालाच रस उरलेला नाही त्या महाराष्ट्राच्या माथी एक नवोदीत 'राज्यकर्ता' मारून नुसते विचारायचे, 'हा' तुम्हाला मंजूर आहे?
त्यावर उरलेल्यांनी हो किंवा नाही म्हणायचे.
'हो' म्हणणारे किती? इतके इतके! इतके इतके म्हणजे इतके इतके डेसिबल्स! नाही म्हणणारे किती? तर तेही इतके इतके! तेही इतके इतके म्हणजे डेसिबल्स! कोणते डेसिबल्स जास्त हे ओळखण्यासाठी एक मनुष्य नेमलेला! त्याला ज्यांचे जास्त वाटतील त्यांच्या डेसिबल्सनुसार तो 'राज्यकर्ता' बहुतेकांना मान्य आहे किंवा नाही हे ठरवणार! वर पुन्हा त्याला हे अधिकार की एकदा त्याने हे ठरवले की पुन्हा मत देण्याची गरज नाही हेही तोच सांगू शकणार!
मोदीसाहेब, तुमचा महाराष्ट्रातील मानसपूत्र देवेंद्र फडणवीस ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल त्याचे आणि तुमचे ..... आणि हो...... भाजपच्या दशकानुदशके सुरू असलेल्या तमाम प्रतिमानिर्मीती प्रयत्नांचेही अभिनंदन!
वये वाढल्यामुळे नियम बदलले, बदललेले नियम घटनेनुसार होते, सगळे ठीक आहे!
पण मोदीसाहेब, 'भाजप'ने राज्य असे मिळवावे ह्याची लाज वाटली.
'राज्य देवेंद्रवर आणायचे की नाही' ह्यावर झालेल्या आवाजी मतदानात कोणता 'आव्वाज कोणाचा' हेच कोणाला समजले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादींसारख्यांची जनमानसाला केव्हापासूनच माहीत असलेली मलीन प्रतिमा तुम्हाला दिल्लीश्वर बनवायला कारणीभूत ठरली होती. तुमच्या नेतृत्वात तुमच्या पक्षाने स्वतःची प्रतिमा तितकीच मलीन करून घेणे हे तुमच्या देवेंद्रला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्यास कारणीभूत ठरले मोदीसाहेब!
लहानपणीच्या आणि आजच्या इस्टॉप पार्टी मधील सर्वात मोठा फरक हा होता मोदीसाहेब, की तेव्हा ज्याच्यावर राज्य असे तो त्याच्यावर राज्य आले म्हणून दु:खी असायचा, आज ज्याच्यावर राज्य आले आहे तो सुखी आहे.
मोदीसाहेब, शर्ट कोणी बदलले, अंड का झालं नाही, सहा महिन्यांनी पुन्हा देवेंद्रलाच राज्य मिळणार की कोणा इतरांना, हे सगळे राहूदेत! पण जेव्हा तुम्ही एकटे असाल, जेव्हा तुम्हाला तुमच्या जुन्या कपाटात असलेली खाकी अर्धी चड्डी दिसेल, जेव्हा तुम्हाला तुमच्या पाठीवर बिनदिक्कत हात ठेवू शकणारे भारतीय उद्योजक आणि गाजलेले परदेश दौरे ह्यातून अटलबिहारी वाजपेयी आठवतील, तेव्हा मोदीसाहेब, कोणाच्याही नकळत तुमची मान खाली झुकेल! नक्की झुकेल!
अहो एक साधे अकरा कोटी भारतीयांचे राज्य हे! गेले असते हातातून तर कोणाला मिळाले असते? कोणालाच नाही. ज्या तारेवरच्या कसरती तुमच्या जन्मजात जोकर असलेल्या अमित शहाने केल्या त्या जन्मापासून बोलबच्चनगिरी करणार्या महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांना कराव्या लागल्या असत्या. अहो कोणीही हे राज्य मागण्याआधी डोक्यावर पदर घेऊन, मुंडावळ्या बांधून तुमच्या हाताने कुंकवाची रेघ केसांमध्ये ओढून घेण्यासाठी आले असते.
मोदीसाहेब, यू वन महाराष्ट अॅन्ड लॉस्ट रिस्पेक्ट!
ह्यानंतर भाजप हा आवडता पक्ष असण्याचे कारण केवळ हेच असेल की त्याने काँग्रेसला एक पर्याय असू शकतो हे दाखवून दिले.
बाकी सहा महिन्यांनी तुम्हाला बाळासाहेबांचे चिरंजीवही पाठिंबा देतील कदाचित, पण देवेंद्रवर पुन्हा राज्य यावे म्हणून त्यांनी त्यांचा 'शर्ट बदलला नाही' ही वस्तूस्थिती तुम्हाला एकांतात खात राहील.
मोदीसाहेब, आजवर झालेल्या पंतप्रधानांमध्ये आम्ही तुम्हाला सर्वाधिक प्रभावी पंतप्रधान मानतो कारण तुम्ही तुमची तयार केलेली 'जागतिक नेत्याची' प्रतिमा!
पण कंपनीचे टारगेट एकाच ऑर्डरमध्ये पूर्ण करून जगज्जेत्याच्या थाटात घरी आलेला बाप जेव्हा मुलांना आपला आदर्श वाटत नाही ना मोदीसाहेब, तेव्हा तो बाप कंपनीत प्रमोशन्स मिळवत असतो, पण घरातल्यांच्या मते तो इर्रिलेव्हंट झालेला असतो.
-'बेफिकीर'!
श्या SSSS आमचा बाळ्या की नाही
श्या SSSS
आमचा बाळ्या की नाही किती सालस, गुणी, हुशार असे कौतुक पाहुण्यांसमोर करत असतानाच,
बाळ्या स्पेशल पार्टी करून येऊन भलत्याच अवस्थेत पाहुण्यांच्या देखत घरात यावा तसे वाटत आहे उगाचच.
आणि मग काय पाहूण्यांना मिळतय कोलित आयतच
आता यावर काळ हेच औषध आहे बहुतेक.
आता यावर काळ हेच औषध आहे
आता यावर काळ हेच औषध आहे बहुतेक.
<<
छे हो.
काळं तर तुमचा बाळ्या करून आलाय ना? तेच औषध कसं परत?
' मीं मराठी'वर आत्तांच
' मीं मराठी'वर आत्तांच पवारसाहेब स्वच्छ रस्ता झाडून स्वच्छ करताना दाखवलं गेलं. स्वच्छता अभियानाला त्यानी दिलेला हा प्रतिसाद वाचून किंवा ऐकून [ अर्थात, पाहीला नसावाच] ऑस्ट्रेलियातून मोदीनी त्यांचं कौतुक केलंय, असंही सांगितलं गेलं.
आतां साहेबांची ही खेळी काय बरं असेल, यासाठी वेगळा धागाच काढावा लागेल !!
मस्त भाउ
मस्त भाउ
(No subject)
चांगल्या कामाची सुरुवात
चांगल्या कामाची सुरुवात स्वताच्या 'घरापासून' करावी असे म्हणतात. साहेबांची फक्त 'जागा' चुकलीये..
>>बारामतीतील रस्त्यावर हातात झाडू घेऊन स्वच्छता करण्यात संपूर्ण पवार कुटुंबीयच सहभागी झाल्याने राष्ट्रवादीतील सामान्य कार्यकर्त्यांबरोबरच सत्ताधाऱ्यांनाही बुचकळ्यात पाडले!
(>>http://www.loksatta.com/mumbai-news/sharad-pawar-launches-swachh-campaig...व)
>> मीं मराठी'वर आत्तांच
>> मीं मराठी'वर आत्तांच पवारसाहेब स्वच्छ रस्ता झाडून स्वच्छ करताना दाखवलं गेलं.
भाऊ, द्वीरूक्ती मुद्दाम आहे की चुकून आलीये..?
हा धागा किंवा त्यात चर्चिल्या
हा धागा किंवा त्यात चर्चिल्या गेलेल्या अनेक बातम्यांपैकी एकही भाऊंच्या निष्पक्ष नजरेला पडलेली दिसत नाही.
लवकरच सरकार मधे अजितदादांची
लवकरच सरकार मधे अजितदादांची पाणीपुरवठा मंत्री म्हणुन वर्णी लागल्यास आश्चर्य वाटणार नाही
पाणीपुरवठा मंत्री >> म्हणजे
पाणीपुरवठा मंत्री >> म्हणजे दादा पाणी पुरवणार??
<< द्वीरूक्ती मुद्दाम आहे की
<< द्वीरूक्ती मुद्दाम आहे की चुकून आलीये..? >> योगजी, खरं तर मीं चूकूनही नाही व मुद्दामही नाही केलेली ; 'मी मराठी'वर तो सोहळा दाखवतानाच अशी पुस्ती जोडली जात होती !
<< हा धागा किंवा त्यात
<< हा धागा किंवा त्यात चर्चिल्या गेलेल्या अनेक बातम्यांपैकी एकही भाऊंच्या निष्पक्ष नजरेला पडलेली दिसत नाही. >> मयेकरजी, मीं खरंच तो धागा वाचला/ पाहिला नव्हता. पण दोन गोष्टी स्पष्ट करतो- १] 'स्वच्छता अभियान' या देशात अत्यावश्यक आहे व त्या दिशेने आतांपर्यंत महाराष्ट्रातही [ विशेषतः ग्रामीण भागात ] काँग्रेस व इतर सरकारानी केलेले प्रयत्नही स्तुत्यच आहेत व २] व्यंचितला माझा रोंख 'स्वच्छता अभियाना'वर नसून दिखाऊपणावर आहे व त्यांत 'पक्ष'पात करण्याइतका मीं उथळ नाही, यावर कृपया विश्वास ठेवा.
भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा
भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा राज्याच्या हीतासाठी घेतला असुन राज्यातील धरणे कोरडी पडु नये यासाठी अजित पवार यांना धरणभरन मंत्री हे गुप्त मंत्रीपद देन्यात आल्याचे सुत्र आहे. त्यानुसार अजीत पवार हे पहिल्याच दिवसापासुन कामाला लागल्याने अवकाळी पावसाला सुरूवात झाल्याचे विश्वासनिय सुत्रांकडून समजते.
विश्वास पानपतात 'गेला' म्हणे?
विश्वास पानपतात 'गेला' म्हणे? आता ठेवावे तर काय अन कसे?
<< विश्वास पानपतात 'गेला'
<< विश्वास पानपतात 'गेला' म्हणे? आता ठेवावे तर काय अन कसे? >> सुटला म्हणायचं झालं तुमच्या तावडींतून, आणि काय !
अणि हो, 'विश्वास ठेवा' ही माझी विनंति व्यक्तीशः मयेकराना होती; तुम्हीं नका हो 'आता ठेवावे तर काय अन कसे?', असले प्रश्न स्वतःला विचारून उगीचच हताश होवूं !!
>>>तुम्हीं नका हो 'आता ठेवावे
>>>तुम्हीं नका हो 'आता ठेवावे तर काय अन कसे?', असले प्रश्न स्वतःला विचारून उगीचच हताश होवूं !!<<<
मस्त लेखन!
मस्त लेखन!
ऑस्ट्रेलियात हजारो भारतियानी
ऑस्ट्रेलियात हजारो भारतियानी केलेल्या मोदींच्या स्वागताचीं क्षणचित्रं आत्तांच 'झी २४तास'वर दाखवण्यात आलीं व त्यावरची सलमान खुर्शीद व काँग्रेसचे आणखी एक प्रवक्ते यांची ही प्रतिक्रियाही - ' अमेरिका, ऑस्ट्रेलिया जिथं जिथं मोदी जातात तिथं तिथं हे सर्व लोक भारतातून नेण्यात येतात ! '
भाउ हे फारच
भाउ हे फारच मार्मीक.. आणि आईडिया फारच सुंदर आहे..
भाऊ, विरोधकांची ओरड नको
भाऊ,
विरोधकांची ओरड नको म्हणुन अमेरीकेला एकही पत्रकार सरकारी पैशाने नेला गेला नाही. सामान्य नागरिकांच तर राहुच द्या. नाहीतर पुर्वी पंतप्रधानासोबत सरकारी खर्चाने पत्रकार नेण्याची भारतात प्रथाच होती.
यावरुन राजदीप सरदेसाईला झटका आला आणि त्यांनी मोदी विरोध अमेरिकेत प्रगट केला. पुढे काय झाले हे सांगणे नको.
सबब हे मार्मीक असल तरी वस्तुस्थितीला ( दौर्याच्या खर्चाला ) धरुन नाही असे माझे मत आहे.
<< सबब हे मार्मीक असल तरी
<< सबब हे मार्मीक असल तरी वस्तुस्थितीला ( दौर्याच्या खर्चाला ) धरुन नाही असे माझे मत आहे.>> अहो नितीनचंद्रजी, काय हा गैरसमज ! मीं खुर्शीदच्या विधानाचीच टर उडवलीय व्यंचिमधे आणि कोकण्या यानी त्याच अर्थाने 'मार्मीक' म्हटलंय याचीही मला खात्री आहे !!!
भाऊ, असे असेल तर तो माझा
भाऊ,
असे असेल तर तो माझा गैरसमज झाला. क्षमा असावी.
<< असे असेल तर तो माझा गैरसमज
<< असे असेल तर तो माझा गैरसमज झाला. क्षमा असावी.>> अहो नितीनचंद्रजी, असं कांहीं इथं निषिद्ध असलेलं म्हणाल तर अॅडमिनकडे तक्रार करून इथले लोक तुम्हाला इथं यायलाच मज्जाव करतील !
मीं फक्त माझ्या व्यं.चि.बाबतीतला गैरसमज दूर केला होता इतकंच.
आमच्या सोसायटीत आम्ही लहानपणी
आमच्या सोसायटीत आम्ही लहानपणी एक खेळ खेळायचो! त्याला लपाछपी म्हणा, इस्टॉप पार्टी म्हणा नाहीतर डबडा ऐसपैस म्हणा! त्यात जे लपलेले असत, त्यांना ज्याच्यावर राज्य असे त्याने शोधून काढायचे असे. त्या खेळात अनेक गंमतीजमती केल्या जात!>> लेख पुर्ण वाचला.
ये तो सीधा मारेगी >> मस्तच
भाऊ नमसकर -- आयडिया खरच सुंदर आहे.आणि वर खाखरा आणि थेपला फ्री मिळण्याची शक्यता.
अॅडमिनकडे तक्रार करून इथले
अॅडमिनकडे तक्रार करून इथले लोक तुम्हाला इथं यायलाच मज्जाव करतील ! ंंमी तुमची पर्वा करतो. माझ्या इथे असण्याची नाही.
माझ्या एका धाग्यावर मी काही लोकांना माझ्यावर केस दाखल करा असे पण सांगीतले आहे.
भाऊ व्यंगचित्रे मस्त ..
भाऊ व्यंगचित्रे मस्त .. अभियान, अभिनय..
आणि ते चकदे वाले.. या खुदा ये तो सीधा मारेगी
सरकार बदलल्यामुळं
सरकार बदलल्यामुळं शेतकऱ्यांच्या परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. मोठ्या चोराला छताडावरून बाजूला करून छोट्या चोराला बसवलं आहे, इतकंच सध्या झालं आहे,' अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मित्रपक्ष भाजपवर तोफ डागली आहे.
--
हम भी तो कब से यही तो कह रहे थे के गंगाधर ही शक्तिमान है. ससुरा कोई सुनत ही नाही कोई. अब का बताई .:)
<< स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
<< स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मित्रपक्ष भाजपवर तोफ डागली आहे...... ससुरा कोई सुनत ही नाही कोई. अब का बताई .>>
मस्त भाउ बिहारी थोडी गडबडली
मस्त भाउ
बिहारी थोडी गडबडली आहे _ मोदीपे निशान लगाने वास्ते काहे हमार इस्तेमाल करत हो बबुवा _ हे वाक्य योग्य ठरेल
<< मस्त भाउ >> मला अशी
<< मस्त भाउ >> मला अशी खिलाडूवृत्ती खूप भावते. धन्यवाद.
<< बिहारी थोडी गडबडली आहे >> खरंय. पण तेवढंच सेनेची चमचेगिरी केल्यासारखं झालंच ना !
Pages