सध्याच्या काळात गुंतवणूकीला पर्याय नाही. सुरक्षित भविष्यासाठी आपले पैसे वेळीच योग्य ठिकाणी गुंतवायला हवेत याची जाणीव बहुतांश जोडप्यांना आहे. त्या दृष्टीने नवरा-बायको मिळून वा एकेकटे अनेक ठिकाणी उपलब्ध पैसे, गरज आणि पर्यायांनुसार गुंतवणूक करत असतात. प्रश्न असा आहे, की अशा गुंतवणूकीची माहिती, त्यांची कागदपत्र कुठे ठेवली आहेत हे एकमेकांना माहित असतात का?
मध्यंतरी व्हॉट्सॅपवर एक मेसेज फिरत होता- नवरा सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि बायको सीए. दोघांचे उत्पन्न भक्कम, गुंतवणूकही पुरेशी. परंतु गुंतवणूकीसंदर्भात सर्व काही माहिती नवर्याने कंपनीच्या लॅपटॉपमध्ये स्टोअर केली होती. कसल्याही कागद/ पावत्या/ प्रिन्ट आऊट्स नाहीत. नवर्याचा अकस्मात मृत्यू झाला. लॅपटॉप कंपनीच्या ताब्यात गेला. पत्नीला तर मुळात कंपनीमध्ये या संदर्भात कोणाशी बोलायचे हेही ठाऊक नव्हते. सीए असूनही अशा वेळी काहीही उपयोग झाला नाही वगैरे वगैरे.
हे एक उदाहरण झाले. मूळ मुद्दा असा, की पती-पत्नी म्हणून आपण कुटुंबासाठी, मुलांसाठी, आपल्या भविष्यासाठी जी गुंतवणूक केली आहे तिची माहिती, त्या गुंतवणूकीचे कागदपत्र, ते कुठे ठेवले आहेत, तातडीच्या समयी आधी कोणती गुंतवणूक सोडवायची इत्यादी माहिती आपण एकमेकांना देतो का? सर्व गुंतवणूक ही एकत्रित दोघांच्याही नावे आहे ना? नसेल, तर त्याचे नॉमिनेशन व्यवस्थित केले आहे ना? मृत्यूपत्र केले आहे का? त्यातले तपशील एकमेकांना ठाऊक आहेत ना? ते वकिलाकडे अथवा स्नेह्यांकडे सुरक्षित ठेवले आहे ना?- या प्रश्नांचा उहापोह आपण कधी केला आहे का?
आजकाल ऑनलाईन गुंतवणूक, ऑनलाईन बॅन्किंग आपण सर्रास करतो. हे पासवर्ड एकमेकांना माहित असतात का? ते बदलले तर आपण एकमेकांना कळवतो का? गुंतवणूकीसंदर्भात जर आपला एजन्ट असेल तर त्याची ओळख, त्याचा नंबर, त्याचे ऑफिस कुठे आहे हे दोघांनाही माहित आहे का? कोणे एके काळी एक एक्सेल दोघांनी मिळून केली असेल तर ती वेळोवेळी अपडेट केली आहे का? सर्व तपशीलांचे प्रिन्टआऊट्स/ कागदपत्र/ पावत्या या आवश्यक आहेत. त्या आहेत का? कुठे आहेत हे दोघांनाही ठाऊक आहे का? अजून एक साधे उदाहरण- इन्श्युरन्स पॉलिसी जवळपास प्रत्येकाकडे असतात. आपण त्याचे हप्तेही वेळेवर भरतो. पण पॉलिसी डॉक्युमेन्ट आपण कधी वाचून पाहिले तरी आहे का? किमान ते कुठे आहे हे तरी आपल्याला ठाऊक आहे का?- ही माहिती आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं ना?
सध्या तुम्ही एकटे असाल/ अविवाहित असाल/ कुटुंब नसेल तर तुमच्या गुंतवणूकीसंदर्भात तुम्ही व्यवस्थित नॉमिनेशन केले आहे का? त्याची माहिती संबंधितांना आहे का? यापुढे जेव्हा तुम्ही दुकटे व्हाल/ तुमचे कुटुंब अस्तित्वात येईल तेव्हा तुम्हाला गुंतवणूक करताना तुमच्या जोडीदाराचाही विचार घ्यावा लागेल. तसेच नॉमिनेशनही बदलावे लागेल- याची कल्पना तुम्हाला आहे ना?
खरं म्हणजे या विषयाला. अनेक कंगोरे आहेत. धाग्याचा उद्देश हे विचारण्यासाठी आहे, की आपण पुरेसे जागरूक आहोत का? केवळ गुंतवणूक केली म्हणजे जबाबदारी संपत नाही. त्याची संपूर्ण माहिती एकमेकांना देणे आवश्यक आहे. तशी माहिती नसेल तर ती प्राधान्याने करून घ्यायला हवी.
तुम्ही या बाबतीत काय करता, तुमचे अनुभव, सल्ले इथे शेअर करा. तुमच्या टिप्सही तुम्ही इथे इतरांसाठी दिल्या तर अनेकांना त्याचा फायदा होऊ शकेल.
महत्त्वाचा विषय आहे. धन्यवाद
महत्त्वाचा विषय आहे. धन्यवाद पौर्णिमा. यावर अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल.
चांगला धागा.मलाही हे प्रश्न
चांगला धागा.मलाही हे प्रश्न पडतायत सध्या
विषय खरंच महत्वाचा आहे.
विषय खरंच महत्वाचा आहे. माहिती वाचाय ला आवडेल
चांगला आहे धागा.
चांगला आहे धागा.
आपल्या सगळ्या मुव्हेबल व
आपल्या सगळ्या मुव्हेबल व इम्मुव्हेबल मालमत्तेचे नॉमिनेशन करुन त्याच्या पावत्या, सर्टिफिकेट्स, पासबूक्स व इतर माहिती त्या त्या नॉमिनीच्या नावाचे फोल्डर्स बनवून त्यात घालून ठेवावेत. नविन सेव्हिंग्ज किंवा इतर व्यवहार केल्यास त्या त्या वेळी लगेचच त्या त्या फोल्डर्स मध्ये घालून ठेवावेत.
सगळ्या मालमत्तेची एकत्रित माहिती एखाद्या ठिकाणी लिहून ठेवावी व ती कुठे ठेवली आहे त्याची माहिती खात्रीच्या व्यक्तीस सांगून ठेवावी.
पौर्णिमा, चांगला धागा
छान धागा.
छान धागा.
चांगला धागा
चांगला धागा पौर्णिमा.
परस्परांना प्रत्येक गुंतवणूकीबद्दल सविस्तर माहीत असणे आवश्यकच आहे.
याबाबतीत आपण काय करतो हे इथे सांगावे की नको यावर विचार चालू आहे.
याबाबतीत आपण काय करतो हे इथे
याबाबतीत आपण काय करतो हे इथे सांगावे की नको यावर विचार चालू आहे. >>
जे करतोस ते सांग, जे करत नाहीस ते सांगू नकोस. किंवा उलट
संवाद महत्त्वाचा. विश्वास असतोच. पण 'आत्ता काय घाई आहे? बघू नंतर' असा साधारण आऊटलुक असतो. तो कधीकधी घातक ठरू शकतो. वेळीच अपडेट केलेलं बरं असतं एकमेकांना.
अरुंधती उत्तम धागा !!!
अरुंधती उत्तम धागा !!!
बँक खाती, गुंतवणुकी व
बँक खाती, गुंतवणुकी व मालमत्ता यांच्या नॉमिनेशन्स संदर्भात - यांची एक लिखित स्वरूपातील एकत्रित यादी स्वतःजवळ व जोडीदाराजवळ किंवा नेक्स्ट ऑफ किन यांच्याकडे सुरक्षित सोपवलेली असणे कधीही चांगले.
सॉफ्ट कॉपीही ठेवावी. वेळोवेळी ती अपडेट करत जावी.
अरुंधती उत्तम धागा !!!>> पूनम
अरुंधती उत्तम धागा !!!>> पूनम गं पूनम.
परस्परांत संवाद, विश्वास असणं महत्त्वाचं. 'तुला काय कळतंय?' हा अॅटीट्युड असेल तर ओम फस्!
संवाद आणि विश्वासाबरोबर व्यवस्थितपणाही महत्त्वाचा.. नाहीतर कागद कुठे ठेवलेत माहिती नाही, पावत्या नेटक्या लावलेल्या नाहीत, एखाद्या कागदावर सही करायची राहिली वगैरे असेल तर निसरताना नाकीनऊ येते.
आमच्या ओळखीत एकांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांना शब्दशः 'ट्रेजर हंट' खेळावा लागला होता. ड्रॉवरमधे फाईल, फाईलीत लॉकरचा नंबर, लॉकरची चावी कुठे ठेवली आहे त्याबद्दल असंदिग्ध शब्दांतलं लिखाण, त्याचा अर्थ लागल्यावर वारसांना 'युरेका' झालं. चावी सापडल्यावर लॉकर उघडाला तर त्यात दुसर्या लॉकरचे तपशील असा सगळा सावळा गोंधळ!
अतिशय महत्त्वाचा पण
अतिशय महत्त्वाचा पण दुर्लक्षित विषय मांडल्याबद्दल धन्यवाद, पौ.
माझ्या वडीलांना सर्वांची
माझ्या वडीलांना सर्वांची कागदपत्रे संभाळून ठेवण्याची सवय होती. ते गेल्यानंतर आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही या संदर्भात. तिच पद्धत आमच्या घरात सुरु आहे. गुंतवणुकीसंबंधी सर्व कागदपत्रे एकाच फाईलमधे असतात. ती घरातील सर्वानाच माहीत असते.
माझ्या बाबतीत माझे सर्व पासवर्डस मी माझ्या विलमधे लिहून ठेवले आहेत. त्याच्या दोनतीन कॉपीज घरातील मंडळींना दिल्या आहेत. बँकात नॉमिनेशन केलेले आहेच.
माहिती वाचाय ला आवडेल अतिशय
माहिती वाचाय ला आवडेल अतिशय महत्त्वाचा विषय.
माझ्या बाबतीत माझे सर्व
माझ्या बाबतीत माझे सर्व पासवर्डस मी माझ्या विलमधे लिहून ठेवले आहेत. >>>पण आजकाल सुरक्षिततेसाठी बदलायला सांगतात ना पासवर्ड्स, मग सारखे विलमधले कसे बदलायचे?
सगळे महत्त्वाचे प्रश्न मूळ
सगळे महत्त्वाचे प्रश्न मूळ लेखात कव्हर केलेत. त्या प्रश्नांना क्रमांक देऊन एकाखाली एक दिले तर आपण काय दुर्लक्षित करतोय हे लक्षात येईल.
१) तो व्हॉट्स अॅप मेसेज वाचला होता. त्यातून समजलेला मुद्दा हा की कोणतीच गोष्ट कागदावर नव्हती आणि कोणतेच पासवर्ड्स (लॅपटॉप, इमेल, बँक अकाउंट, डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, अकाउंट यांचे पासवर्ड्स माहीत नव्हते.) . जे आठवतेय त्यावरून सगळीकडे होल्डर एकच = नवरा होता. बायको असली तर नॉमिनी होती.
माझी थोडी भर :
१) गुंतवणुकीची केवळ माहिती जोडीदाराला असणे पुरेसे आहे की गुंतवणुकीचा निर्णयही दोघांचा मिळून असायला हवा?
२) आता या सगळ्या गोष्टी परस्पर विश्वासावर अवलंबून आहेत. पण अनिवार्यही आहेत.
कदाचित तुझा, माझा आणि आपला असा बँक अकाउंट, गुंतवणुकीही ठेवता येतील.
३) म्युच्यल फंड्स, बँक खाती यांत एकच खातेधारक असेल तर नॉमिनेशन अनिवार्य असते किंवा त्याची वारंवार आठवण करून दिली जाते.
४) गुंतवणूक शक्यतो दोघांच्या नावांवर असावी. जोडीदाराबरोबरच्या अंडरस्टँडिंगप्रमाणे joint, either or survivor, former or survivor(उपलब्ध असेल तिथे) असा पर्याय निवडावा अथवा nomination करावे. दोघेही होल्डर असतील तिथे अन्य कोणी नॉमिनीही हवा. मुले अज्ञान असतील तर त्यांनाही नॉमिनी करता येते, पण त्यांचा कोणी गार्डियन (फ्युचर) नोंदवावा लागतो. त्यांनाही कळवायला हवे.
५) सगळे ऑनलाइन असले तरी या सगळ्याची लेखी नोंद हवीच. त्यात होल्डिंग बेसिस, नॉमिनेशन यांचीही नोंद हवी.
६) आपल्या कामाच्या ठिकाणी असलेल्या योजनांची माहिती करून घेऊन जोडीदाराला सांगायला हवी. जसे प्रॉव्हिंडंट फंडाचे नॉमिनेशन, ग्रॅच्युइटी, कंपॅशनेट ग्रॅच्युइटी, फॅमिली पेन्शन, चैद्यकीय सुविधा, खर्चाची पूर्तता reimbursement इ.
७) बँक व अन्य खाती एकाच्याच नावावर असतील व त्याचा पासवर्ड माहीत असेल तरीही त्याच्या पश्चात तो पासवर्ड वापरून ते खाते चालवणे कायद्याच्या नजरेतून चूक आहे. एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाला हे कळताच वित्तीय संस्थांनी त्याची नोंद करणे अपेक्षित असते व दुसरा खातेधारक नसल्यास पुढच्या प्रोसिजर्सची पूर्तता होईतो खाते फ्रीज करणेही अपेक्षित असते.
हे सगळे एका जोडीदाराच्या जाण्यानंतर मागे राहिलेल्याला कमीतकमी त्रास व्हावा याबाबत झाले.
खूप उपयुक्त धागा !!!! माझ्या
खूप उपयुक्त धागा !!!!
माझ्या बाबतीत माझे सर्व पासवर्डस मी माझ्या विलमधे लिहून ठेवले आहेत. >>>पण आजकाल सुरक्षिततेसाठी बदलायला सांगतात ना पासवर्ड्स, मग सारखे विलमधले कसे बदलायचे
हो ना.. पार भज होत डोक्याच.
ह्यावर काही उपाय आहे का ?
हा लेख एका काँटिजन्सीचा विचार
हा लेख एका काँटिजन्सीचा विचार करून त्याबाबत कोणती काळजी घ्यायची याचा विचार करतो. पण त्याव्यतिरिक्तही दस्तावेजांबद्दल आपण कोणती काळजी घ्यायला हवी याचाही विचार करायला हवा.
वरचे सगळे प्रश्न नॉन-फायनान्शल असेट्स (घर, वाहन, इ.) आणि त्याच्याशी संबंधित कागदपत्रे, नियम, प्रोसिजर्स, बाबतही विचारात घ्यायला हवेत
अतिशय उपयुक्त धागा .
अतिशय उपयुक्त धागा . परस्परांना एकमेकांनी केलेल्या गुंतवणुकीची माहिती नक्कीच हवी. सगळी महत्वाची. माहिती एका वही मध्ये लिहून ठेवावी आणि त्याची सगळी माहिती परस्परांना द्यावी.
बँक अकौट्स( एकट्याच्या नावावर /जोईन्ट नावावर) कुठली शाखा . त्यात एफडी केल्या असतील तर किती . त्याचा मासिक/ त्रै मासिक का वार्षिक व्याज . ते त्या त्या बँकेच्या सेव्हिंग अकौंट मधेच पडत का आणखीन दुसर्या ब्याकेत . त्याचे सर्व डीटेल्स. नॉमिनेशन करावच कराव
लोकर घेतला असेल तर कुठल्या ब्यान्केचा. चावी नंबर. त्याचे वर्षाच भाड किती जात. लोकर मध्ये काय काय ऐवज आहे त्याच तपशीलवार वर्णन. एफडी व्यतिरिक्त आणखीन कशा कशात गुंतवणूक केली आहे. त्याचे डीटेल्स . मेडिक्लेम घेतला असेल तर त्याची कागदपत्र एका फाईल मध्ये लावलेली असतात . ती फाईल कुठे आहे. लगेच कुणाला कोन्तक करायचे. मेडिक्लेम एजन्ट चे नाव/ पत्ता/ फोन नंबर. आणखीन इतर कुठल्या पोलिसिज घेतल्या असतील तर त्याचे सगळे डीटेल्स .
महत्वाच म्हणजे मृत्युपत्र करावेच करावे . ( स्वताच्या हस्ताक्षरात ) ते सतत डोळ्याखालून घालावे आणि . काही बदल घडले किव्वा करावेस वाटले ( परिस्थितीनुसार )तर वेळीच अपडेट करत जावे. आणि या सगळ्याची माहिती जोडीदाराला देऊन ठेवावी . अपत्य सज्ञान असतील तर त्यांना हि सांगून ठेवावे . हि सगळी माहिती एका वहीत लिहून ठेवावी . ती वही शक्यतो लोकर मध्ये ठेवावी आणि ती लोकर मध्ये ठेवली आहे हे घरच्यांना सांगून ठेवावे आणि लोकर ची संपूर्ण माहिती त्याची चावी कुठे आहे इत्यादी इत्यादी . लोकर एकट्याचाच नावावर घ्यावा आणि त्याचे नॉमिनेशन करून ठेवावे.
सगळ्यांनी कशी कशी काळजी घेतली आहे ते वाचायला नक्कीच आवडेल
मेडिक्लेम पोलिसी बद्दलची माहिती मात्र मी जोडीदाराला मेल करून ठेवली आहे . वेळ पडल्यास एजंट कोण . त्याचा कोन्तक नंबर . त्याचा ऑफिस चा पत्ता. मेडिक्लेम ची फाइल कुठे ठेवली आहे ( ती कपाटातच असते ) इत्यादी इत्यादी .ताबडतोब पुढची कार्यवाही करता यावी याकरताच:)
चांगल्या पोस्ट्स! चांगला धागा
चांगल्या पोस्ट्स! चांगला धागा पौर्णिमा! आणखीन वाचायला आवडेल.
चांगल्या अॅडिशन्स येत आहेत.
चांगल्या अॅडिशन्स येत आहेत.
मी मध्यंतरी एक 'फॅमिली मिटिंग' अशी संकल्पना वाचली होती. सर्व कुटुंबाने (इथे मुख्यत्वे नवरा-बायको) एकत्र बसून, वेगळा वेळ काढून दर महिन्याला या संबंधी अपडेट्स एकमेकांना द्यायचे. त्याच वेळी दोघांनी मिळून वही/ एक्सेल शीट भरायची. गुंतवणुकीचा आढावा घ्यायचा. बदल करायला लागणार असतील तर कसे, कोणते करायचे हे ठरवायचं. त्यावर अॅक्शन कोण घेणार आहे हेही ठरवायचं. पुढच्या मिटिंगला गेल्या वेळी जे जे ठरवलं होतं ते झालं का याचा आढावा घ्यायचा. ऑफिसमध्ये आपण जशा मिटिंग्ज करतो, तसंच. लेखिकेचं म्हणणं असं, की सुरूवातीला याला एक तास लागेल. मग मात्र पंधरा मिनिटांचं काम. मला ही कल्पना आवडली आहे.
पौर्णिमा, आमची अशी मिटिंग
पौर्णिमा, आमची अशी मिटिंग वर्षाच्या शेवटी होते. अनायासे सुट्टी असल्याने सगळ्यांनाच निवांत वेळ असतो. इअर एंड बोनस, पगारवाढ वगैरे माहीत झालेले असते. त्यानंतर शक्यतो क्वार्टर्ली मिटिंग सगळे ट्रॅकवर आहे ना बघायला. आम्ही मुलगा ६ वीत गेल्यावर त्यालाही सामिल करु लागलो. एकंदरीत गेम प्लॅन त्यालाही माहित असल्याने खर्चाचे बजेट करताना त्याचेही सहकार्य मिळायचे/ मिळते.
बाकी दस्त ऐवजांच्या बाबतीत मूळ कागद पत्रे, त्याच्या कॉपीज, आणि कागद पत्रे स्कॅन करुन इलेक्ट्रॉनिक मेडियात. आमच्या इथे टोरनॅडो/फ्लडिंगचा धोका लक्षात घेवून मूळ कागदपत्रे लॉकर मधे. कॉपीजचा एक सेट ब्रीफकेसमधे - ५ मिनिटात घर सोडायची वेळ आली तर, एक सेट मुलाकडे दुसर्या गावी. ऑनलाईन अकाउंट्स असे नाहित. स्टेटमेंट्स ऑनलाईन मिळतात, त्याची क्वार्टर्ली/ इयर एंड स्टेटमेंट्स. बाकी नॉमिनेशन्स वगैरे सगळे असतेच.
भारतात आईबाबांचे व्यवहार -नॉमिनेशन्स आहेत , विल आणि पॉवर ऑफ अॅटॉर्नीचे काम या महिन्या अखेरीस पूर्ण होईल. मी परदेशात असल्याने माझी मावशी-काका, कझिन्स यांना सगळ्या व्यवहारांची माहिती आहे तसेच मी तिथे नसणार हे गृहित धरून पॉवर ऑफ अॅटॉर्नी केल्यात.
धन्यवाद माहितीसाठी. मंथली /
धन्यवाद माहितीसाठी. मंथली / quarterly मीटिंग हे आवडलं. हे सगळं माहितअसून, करायची इच्छा असूनही वेळेवर होत नाही आणि घरात जिकडे तिकडे कागद/ आन्व्हलप मध्ये कायकाय ठेवलेलं असतं. ते अगदीच अंगाशी आलं की आवरतं बसायचं, पुन्हा येरेमाझ्यामागल्या. 'दोघांनी/ मुलं मोठीझाली की त्यांच्या बरोबर ठराविक वेळेला' आता करून बघतो.
रच्याकने मंजूडी, त्याबद्दल असंदिग्ध शब्दांतलं लिखाण,>> संदिग्ध पाहिजे ना ?
अमितव, ते मिटिंग प्रकरण
अमितव,
ते मिटिंग प्रकरण आम्हाला फार उपयोगी पडले. विशेषतः २००८ चे रिसेशन आणि त्यानंतरच्या काळात पॅनिक मोड मधे न जाण्यासाठी खूप उपयोग झाला. सगळ्या चर्चा ऐकून, १९ व्या वर्षी स्वतःच्या रॉथ अकाउंटचा विचार करण्याइतपत लेक शहाणा झाला -तो बोनस.
मस्त धागा पौर्णिमा!!
मस्त धागा पौर्णिमा!!
लोकर एकट्याचाच नावावर घ्यावा
लोकर एकट्याचाच नावावर घ्यावा आणि त्याचे नॉमिनेशन करून ठेवावे. >>
सुजा, असं का बरं? जॉइंट लॉकर अस्लं तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो?
पौर्णिमा, खूप उपयोगी
पौर्णिमा, खूप उपयोगी धागा!
चांगल्या अॅडिशन्स येत आहेत. >> +१
>>लोकर एकट्याचाच नावावर
>>लोकर एकट्याचाच नावावर घ्यावा आणि त्याचे नॉमिनेशन करून ठेवावे. >>असे का करावे हा मलाही प्रश्न पडलाय. आमच्याकडे सगळ्यांचे जॉइंट लॉकर आहेत.
१९ व्या वर्षी स्वतःच्या रॉथ
१९ व्या वर्षी स्वतःच्या रॉथ अकाउंटचा विचार करण्याइतपत लेक शहाणा झाला -तो बोनस.>>> स्वाती२ मस्तच!!
पौर्णिमा धागा चांगला आहे. माहीती वाचत आहे.
मी व पत्नी दर महिन्यात २ तार
मी व पत्नी दर महिन्यात २ तार खेस सकाळी ९ वाजता बसतो व एक्सल शीट अपडेट करतो. याशिवाय हार्ड क्~ओपिज टॅली करून एक मेकास देतो.
माझे सर्व पास व्र्ड्स तिला ठावूक आहेत
Pages