मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षे करेक्ट. मागे एक शॉट बघितला होता तेव्हा सुबोध भावे त्याला, मी तुला २५००० पगार देईन म्हणाला होता.

त्या अदिती चे ड्रेसेस इतके भयन्कर काय दाखवलेत!!! आअणि गाउन तर बापरे.
आपण कधी आवडला म्हणून एकाच टाइप चे ड्रेसेस घालतो क?. ती जानू पण तसलेच. एकच pattern पण रन्ग वेगवेगळे. तरी बर दोघीही नोकरी करणार्या दाखवल्यात.
अदिती तर श्रीमन्त घरातली आहे ना. मग घरून येताना कहीच नसेल अणल? लग्नाआधीही नोकरी करत होती ना .?
Logically पटत नै बुआ.

धानी१ > पहिल्या २-३ एपिसोडमधे दाखवलं होत की त्यांच लव्ह मॅरेज आहे, तिच्या बाबांचा विरोध आहे वगैरे ..
नंतर मी सिरीअल बघायच सोडुन दिलं

ती नयना मागे श्रेयस तळपदेच्या 'झुंज मराठमोळी' मधे होती (नेहा शितोळे). कसली कचाकचा भांडायची ती, बापरे. कदाचित टी आर पी साठी असेल.

या आदिती ला माहेरच्या माणसांची आठवण येतच नाही का? जय सुद्धा "आपली नाती: मध्ये आदितीच्या घरच्यांना consider करत नाही.
एवढा चांगुलपणा भरलाय अदिती मध्ये, सगळी नाती सांभाळते मग माहेर पण जोडाव असा नाही का वाटत? त्या वाहिनी चे एवढे टोमणे ऐकून ते नात टिकवलंय मग वडलांच थोड ऐकून घ्यायला काय प्रोब्लेम आहे? सिरियल मधल्या सदगुणी बहु मध्ये माहेर तोडणे हा पण criterai असावा बहुतेक.

criterai >>>criteria

हो झी वर मालिका आणायची असेल तर लेखकाना ताकीदच दिली असावी: एकतर माहेर तोडा किंवा माहेरच्या माणसाना अव्यवहारी तत्वे शिकवा... उदा. पिंट्या, किंवा बाबाजी

आता हि आदिती कसली सुपरवुमन दाखवली आहे. Uhoh
गिरगाव हून विरार ला जाऊन स्वयपाक करून मग परत नोकरीला जाणार म्हणे Uhoh
वाट्टेल तेच

आता हि आदिती कसली सुपरवुमन दाखवली आहे. Uhoh
गिरगाव हून विरार ला जाऊन स्वयपाक करून मग परत नोकरीला जाणार म्हणे Uhoh
वाट्टेल तेच

खर्‍याखुर्‍या परिवारांच्या अपेक्षा वाढतात>>>>>नवरा,साबा,साबु सगळ्यान्च्या अपेक्षा,आकान्क्षा अशी ची बाराखडी वाढते.

अतीशय मागसलेले विचार पसरवतात अशा सिरियल मधल्या गोष्टी त्यामुळे जो संदेश जातो तोच हल्ली मुलींच्या आरोग्यावर व जीवावर उठतो. त्यापेक्षा फु बाई फु परत पाहीलेले बरे असच मला वाटतय Happy

अतीशय मागसलेले विचार पसरवतात अशा सिरियल मधल्या गोष्टी त्यामुळे जो संदेश जातो तोच हल्ली मुलींच्या आरोग्यावर व जीवावर उठतो.>> करेक्ट! हा ट्रॅक मुळीच आवडला नाही.

त्यांना आता जय-अदितीच्या आयुष्यात अजून कशी कॉम्प्लिकेशन्स दाखवायची हे समजेनासं झालंय. अशावेळी सोशिक सून, आदर्श सून हा ट्रॅक सोपा, ट्राईड आणि टेस्टेड आणि टीआरपी शाबूत ठेवणारा आहे. त्यामुळे तोच दाखवतात झालं! :प कोणताही वेगळा विचार करायला नको, त्यावर कष्ट घ्यायला नकोत. दळण चालू ठेवायचं...

सिरीयसली. आपल्याला कुणी मूर्ख बनवत आहे, आपला वापर करून घेत आहे हे कळूनही न कळल्यासारखं वागायचं तर उपयोग काय त्या शिक्षणाचा आणि विचारमौक्तिकांचा? रजनी आणि शोभाची काय सही जुंपली असती, श्या: जयची निवड चुकलीच. Proud

आशू Lol Rofl

जय पण बावळटच आहे सगळ्या साळकाया माळकाया त्याच्यावर लाईन मारतात पण याचे एक उत्तर विश्वासार्ह नसते...

थोडक्यात महाआदर्श बायको नि बावळट नवरा.. चालले एकता कपूर मार्गावर

एक बाई विनाकारण आपल्या वर विनाकारण काही निर्णय लादतेय अणि हा जय मूग गिळून गप्प आहे. आणि ऑफिसात काय हे असलं करायला जातात का हे लोक? Uhoh

तिचं काम चांगलं वाटतंय कारण जय अगदीच गुळमुळ्या दाखवला आहे.
निदान तु पोळ्या आणण्याची गरज नाही, विचारल्याबद्दल धन्यवाद.
इ. तर तो पोलाईटली बोलू शकतो. ते ही जमत नाही.

पोळी भाजीखेरीज आयुष्य नाही का ह्या लोकांना...रोज उठून बोरिंग डबा दाखवत बसतात. आहारशास्त्र अन पा. कृ. पेज दाखवा जरा.

अतीशय मागसलेले विचार पसरवतात अशा सिरियल मधल्या गोष्टी त्यामुळे जो संदेश जातो तोच हल्ली मुलींच्या आरोग्यावर व जीवावर उठतो.>+१११
मला पण नयना आवडते Happy

Pages