Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
संन्यस्त खड:ग यातल्या
संन्यस्त खड:ग यातल्या शेवटच्या ग चा उच्चार पूर्ण आहे की अर्धा? , जसा खडक मधला क चा उच्चार पूर्ण नसून अर्धा आहे.
पूर्ण
पूर्ण
खड्ग. अर्धा ड, पूर्ण ग.
खड्ग. अर्धा ड, पूर्ण ग.
समाजीकरण की सामाजिकरण? नक्की
समाजीकरण की सामाजिकरण? नक्की कुठला शब्द बरोबर आहे?
xenophobic ला मराठी शब्द काय आहे?
सामाजिकीकरण socialization?
सामाजिकीकरण socialization?
xenophobic = विद्वेष या
xenophobic = विद्वेष या अर्थाने घेता येतो..... सकारण वा अकारण अज्ञात वा परकीय व्यक्तीविषयी वाटणारी भीती अंगी वसत असेल तर ती झिनोफोबिकची लक्षणे मानली जातात.
'भूमका' (= अफवा) ची
'भूमका' (= अफवा) ची व्युत्पत्ती काय? यंदाच्या माबो दिवाळी अंकातील शब्दकोड्यात हा आहे.
परिणती की परिणीती की अजून
परिणती की परिणीती की अजून काही? परिणती या शब्दाचा काही वेगळा अर्थ आहे का?
palimpsest चा मराठी उच्चार
palimpsest चा मराठी उच्चार सांगा, आणि याला मराठी अर्थपण सांगा, कृपया.
palimpsest /ˈpælɪmpsɛst/
palimpsest /ˈpælɪmpsɛst/ विकिपेडियावर असा उच्चार आहे . त्यानुसार मराठीत पॅलिम्पसेस्ट लिहिणे बरोबर राहील.
एखाद्या कागदावर लिहिलेले खोडून (प्राचीन काळी धूवून काढून) परत दुसरेच लिहिले तरी मुळच्या लिखाणाच्या काही खुणा दिसत रहातात त्याला पॅलिम्पसेस्ट म्हण्तात
æ > अॅ,
ɪ > इ
जीर्णोद्धार म्हणता येईल का
जीर्णोद्धार म्हणता येईल का पॅलिम्प्सेस्टला? भूर्जपत्रं रिसायकल केलीत (म्हणजे त्यावरचे लिहिलेले पुसून नवे लिहिले,) तर त्या अर्थाने वापरलेला शब्द दिसतोय.
डॉक्टर..... पॅलिम्प्सेस्ट
डॉक्टर.....
पॅलिम्प्सेस्ट स्लेटचा वापर बहिरी आणि मुकी मुलेमुली करताना मी जयपूर आणि दिल्ली इथे पाहिले आहे (अन्य मोठ्या शहरातही करत असतील). म्हणजे पाठीवरील स्कूल बॅगेत अशी एक बाय एक ची स्लेट त्यांच्याजवळ असते....त्याना एखादा पत्ता हवा असेल...वस्तू हवी असेल....पुस्तक हवे असेल.... खाण्याचा पदार्थ हवा असेल....तर ही मुले त्या स्लेटवर एका विशिष्ट खडूने लिहितात....तुम्हाला मला दाखवितात....आपण त्याना पत्ता वा संदर्भ देतो, त्याच पाटीवर लिहून. काम झाल्यावर मुलगा तो मजकूर सहजगत्या पुसून टाकतो, नव्याने परत लिहिण्यासाठी....त्यासाठीही टिश्यू पेपरसारखे एक छोटेसे डस्टर असते त्यांच्याकडे.
मात्र अशा स्लेटला मराठीत नेमके काय म्हणावे हा प्रश्न आहेच.
palimpsest la marathi shabd
palimpsest la marathi shabd nahi. JeerNoddhar mhanaje renovation
palimpsest la marathi shabd
palimpsest la marathi shabd nahi>>> रे देवा!! कालपासून नेटवरच्या डिक्शनर्या धुंडाळतेय. तुला विचारायचं सुचलं नाही.
मराठी शब्दच नसेल तर काय लिहावं? पंधराव्या शतकामधला युरोपमधलं कागदपत्र आहे.
tu te vakya mazya fb inbox
tu te vakya mazya fb inbox madhe tak. Udya sakali baghun tula tithe kay bhashantar karta yeil te baghte
जुन्या कागदांचा,
जुन्या कागदांचा, भूर्जपत्रांचा, पुनर्वापर अ से लिहिता येईल
ऐतिहासिक पार्चमेंट हे खरं तर प्राणिज असायचे, आपल्याकडे त्याला प्रतिशब्द सापडणे कठीण
नंदिनी, हिन्खोजवर प्रतिशब्द
नंदिनी,
हिन्खोजवर प्रतिशब्द नाही. मात्र हे सापडलं :
http://dict.hinkhoj.com/hindi-dictionary.php?scode=dict_home&word=palimp...
तिथे बाजूला मनन गुप्ता नामे माणसाने 'उपर्यालिखित' असं लिहिलेलं आढळून येतं. त्याला हा बहुधा प्रतिशब्द म्हणून अभिप्रेत असावा. ते त्यालाच विचारावं लागेल. तिथेच त्याचं चर्यापुस्तिकापान आहे : https://www.facebook.com/manangupta3
पुढील अन्वेषणास शुभेच्छा!
आ.न.,
-गा.पै.
वरदा, >> गापै - नारायण बद्दल
वरदा,
>> गापै - नारायण बद्दल अजून काही दिवस जरा धीर धरा. माहिती मिळाली की लगेचच लिहेन इथे
मिळाली का माहिती? काय सांगू माझी व्यथा! 'अडला नारायण, वरदाचे पाय धरी' झालंय!

आ.न.,
-गा.पै.
पुरोपकंठी म्हणजे गावकूस. तसा
पुरोपकंठी म्हणजे गावकूस. तसा उपयोग ह्या रामाविषयीच्या पुस्तकात पण आढळला. http://books.google.no/books?id=wHk-AAAAcAAJ&pg=PT159&lpg=PT159&dq=%E0%A...
वरदा, पाय सोडतो तुमचे. सापडला
वरदा,
पाय सोडतो तुमचे. सापडला नारायण एकदाचा बरंका!
स्रोत : महाभारत वनपर्व अध्याय १८९ (पीडीएफ पान क्रमांक ३२)
धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.
पक्ष्याने 'शिटलं', असा
पक्ष्याने 'शिटलं', असा वाक्यप्रयोग ऐकला. तर 'शीटणे' हा मराठी शब्द आहे? इंग्रजी 'shit'चा अपभ्रंश असेल असे वाटतेय.
]
[माझी आई कधी कधी 'अवघडल्यासारखे' आणि 'ऑकवर्ड' - असे दोघे मिळून 'ऑकवर्डल्यासारखे' म्हणते, असेच वाटले.
नमस्कार, मला 'आमंत्रण' आणि
नमस्कार,
मला 'आमंत्रण' आणि 'निमंत्रण' ह्या शब्दांमधला फरक जाणून घ्यायचा आहे. कोणी सांगू शकेल काय?
धारा, बरोबर आहे!
धारा, बरोबर आहे!
उपत्यका म्हणजे काय? संदर्भ
उपत्यका म्हणजे काय?
संदर्भ वाक्य - उत्तरेस हिमालय आहे. त्याच्या उपत्यका अजून अज्ञात आहेत.
मनस्विता, एखादं कार्य टाळता
मनस्विता,
एखादं कार्य टाळता येणं शक्यच नसेल, उदा., श्राद्ध, यज्ञ, तेव्हा त्या कार्याचं बोलावणं करण्यासाठी 'निमंत्रण' हा शब्द वापरतात.
एखाद्या कार्यास न जाऊन चालणार असेल, तर 'आमंत्रण' हा शब्द वापरतात.
योकु,
उपत्यका = दर्या
valley,पर्वताच्या खालचा भाग
valley,पर्वताच्या खालचा भाग असा अर्थ इथे आहे. वरच्या वाक्यात घालून काही अर्थबोध होत नाही, चूक/ बरोबर माहित नाही.
http://dict.hinkhoj.com/words/meaning-of-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%...
मोल्सवर्थ शब्दकोश डिजिटल
मोल्सवर्थ शब्दकोश डिजिटल रुपात उपलब्ध होता त्याची लिंक मिळेल काय? मला सध्या फक्त http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/ ही लिंक मिलते आहे गूगलवर. पण सीडी रुपात हा शब्दकोश उपलब्ध होता ते आठवते.
प्रातिभ म्हणजे काय?
प्रातिभ - स्वतःच्या प्रेरणेनं
प्रातिभ - स्वतःच्या प्रेरणेनं मिळालेलं / मिळवलेलं (ज्ञान)
धन्यवाद चिनूक्स. चिन्हांकित
धन्यवाद चिनूक्स.
चिन्हांकित शब्दाचा अर्थ काय?
चिन्हांकित - महत्त्वाचा / ठळक
चिन्हांकित - महत्त्वाचा / ठळक (करणे)
अच्च्युत्य म्हणजे काय, ते शोधतोय.
Pages