आणि तो ही दिवस, छे तो ब्राह्ममूहूर्त आठवतो मला...
संध्याकाळ होत आलेली. आपण यमुनातीरी बसलेलो. अचानक तू म्हणाली होतीस, "तुझी बासरी दिवसभर माझ्या आसपास वाजत असते."
अन मग थबकून म्हणालीस, "पण सगळे कुठे दिवसाला सामोरे जाऊ शकतात रे ?"
अन उदास होऊन यमुनेच्या पाण्यात पाय हलवत बसून राहिलीस किती तरी वेळ.
अन मग दिवस कलला, रात्र यमुनेच्या पाण्यासारखी गडद होत गेली. तू तिथेच बसून राहिलीस. मग मी कसा हलणार होतो? सारीकडे शांत शांत होत गेले. आता मी ही पावा बाजूला ठेवला
गोपाळांचे पायारव लांब जात गेले, गायीच्या गळ्यातील घुंगरू नाजूक होत गेले. आता तर गोठ्यात, पार शांतावले ते नाद. मग घर घरातील बाल बोलही थांबले. अन प्रेमळ अंगाई हळुवार झाल्या. हळूहळु माईचे थोपटणेही थांबले.
सारीकडे अलवार शांतता नांदू लागली, एक फक्त यमुनेच्या लाटांचे चुबकावणे, सा-या आसमंतात भरून राहिलेले.
अन तू, त्यात संथ नजरेने दूरवर काही पहात तशीच बसलेली.
अन मी तुला.
कसली, कोणाची वाट पहात होतीस तू ?
असेच अजून काही प्रहर गेले. यमुना, तू, मी अन शांत-क्लांत आसमंत.
आता तर चंद्रही मावळला. चांदण्याची धूसर दुलई पांघरून यमुनाही पहुडली.
तू हळुच पाय काढून घेतलेस. तुझे, माझे अस्तित्वही जाणवू नये अशी खबरदारी घेऊन तू माझ्या सोबत कदंबाला टेकलीस. हळूच पावा माझ्या हातात अलगद टेकवलास. अन नजर उचलून यमुनेच्या खालच्या तीरावर नजर नेलीस.
एक वाकलेली काळी सावली यमुनेला हलकेच स्पर्श करत होती. अगदी यमुनेलाही कळेल, न कळेल इतका अस्पर्श स्पर्श... जगाला, कोणालाही आपले अस्तित्व कळुच नये; यासाठी जीवाचे रान करत; एक एक पाऊल सावकाश टाकत ती पुढे झाली.
अन मला कळलं
मला कळलं, तू कोणाची वाट बघत होतीस.
दिवसाला सामोरी जाऊच न शकणारी ती कुब्जा, रातीच्या अंधारात आपले आन्हिक उरकत होती. तिचा आयुष्यभरचा हा नमस्कार मला आज पोहचत होता. आज तिच्यासाठी; केवळ तिच्यासाठी मी पावा उचलला.
केवळ मला, तुला अन तिला ऐकू येतील असे सूर मी छेडू लागलो. अन चांदण्यात तिची थरथरणारी काया सा-या यमुनेला हेलावून गेली.
तू हळूच पुढे झालीस अन तिला आधार देत बाहेर आणलस.
कुब्जेच्या तोंडी केवळ दोनच शब्द " हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव..."
तिचा नव्हे, माझाच जन्म सफल झाला....
राधे, राधे, केवळ तुझ्यामुळे!
राधे ...
-------
या लेखाची ऑडिओ व्हिज्युअल तयार केलीय.
त्याची ही लिंक http://arati-aval.blogspot.in/2015/01/blog-post.html.
------
राधे ...1. http://www.maayboli.com/node/51393
राधे...2 http://www.maayboli.com/node/51440
राधे...४. http://www.maayboli.com/node/51594
राधे...५. http://www.maayboli.com/node/51968
राधे...६. http://www.maayboli.com/node/52356
राधे... ७. http://www.maayboli.com/node/54215
सुंदर!!
सुंदर!!
अप्रतिम !
अप्रतिम !
सुंदर
सुंदर
सुरेख लेखमाला एका दीर्घं
सुरेख लेखमाला एका दीर्घं कवितेसारखी आहे एकदम
वाह! अप्रतिम!
वाह! अप्रतिम!
कुब्जा चा संदर्भ मी पार
कुब्जा चा संदर्भ मी पार विसरले आहे! थोडा प्रकाश टाका लोकहो!
अवल खुप सुंदर ग! इन्दिरा
अवल खुप सुंदर ग!
इन्दिरा संतांची कुब्जा आठवली!
http://www.aathavanitli-gani.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ajun_Nahi_Jagi_Radha
खुप सुंदर... खुपच सुंदर..!!
खुप सुंदर... खुपच सुंदर..!!
खूपच तरल लेखन!
खूपच तरल लेखन!
खूप तरल लिहिलंयस....
खूप तरल लिहिलंयस....
इन्दिरा संतांची कुब्जा आठवली!
इन्दिरा संतांची कुब्जा आठवली! >>>>
अजून नाही जागी राधा,
अजून नाही जागे गोकुळ;
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ.
मावळतीवर चंद्र केशरी;
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन.
विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यामधले थेंब सुखाचे:
""हे माझ्यास्तव.... हे माझ्यास्तव ....""
सुंदर लिहिलेय. कविता सुंदर,
सुंदर लिहिलेय.
कविता सुंदर, तशी गायलीही आहे सुंदर.. पण अश्या अवेळी मधला अ नीट ऐकू येत नाही.. ( लता असती तर !! )
( लता असती तर !! ) >>> १००
( लता असती तर !! ) >>> १०० मोदक!
खुप खुप सुंदर.
खुप खुप सुंदर.
छान लिहिलं आहे!! धनुकली
छान लिहिलं आहे!!
धनुकली कुब्जा ही पुर्वजन्मीची मंथरा असे ऐकले आहे. पण नक्की आठवत नाही.
मस्त!
मस्त!
धन्यवाद सर्वांना खरं तर
धन्यवाद सर्वांना
खरं तर मलाही पूर्ण माहिती नाही कुब्जेची कथा. काही लहानपणी एेकलेल्या गोष्टी, मोठेपणी वाचलेल्या काही छोट्या गोष्टी आणि हो तुम्हा सर्वांना आठवलेली इंदिराबाईंची कविता.
पूर्वाश्रमीची शूर्पणका, त्या जन्मातील संचित घेऊन कुब्जा जन्मली ती तीन ठिकाणी वाकडेपणा घेऊन. पाठीला कुबड असणारी परंतु सुंदर चेहरा असलेली ही कुब्जा चंदनाच्या मोळ्या विकणारी मथुरेतील, कंसाची एक दासी. तीने दिलेल्या चंदनाने आणि तिच्या भक्तीने भारावून कृष्णाने तिचे व्यंग दूर केले. अशी काहीशी ही कथा. चूक भूल दयावी घ्यावी. तद्न्य अजून प्रकाश टाकतील.
मला यात भावले ते अगदी जगाने दुर्लक्षिलेल्या व्यक्तीलाही कृष्णाने आपले मानले. कोणत्याही बाह्य रुपापेक्षा मनाचे सौंदर्य त्याने महत्वाचे मानले. ते मांडण्याचा हा प्रयत्न.
किती तरल लिहिलं आहेस. अगदी
किती तरल लिहिलं आहेस. अगदी डोळ्यांपुढे सगळं वातावरण उभं राहिलं. अवल, ग्रेट!!!
आवडली.
आवडली.
खूप सुंदर!
खूप सुंदर!
खुप सुंदर लिहिलेस गं. अतिशय
खुप सुंदर लिहिलेस गं. अतिशय आवडले.
अतिशय आवडले ग...! कुब्जा...
अतिशय आवडले ग...! कुब्जा... क्षणभर हेवा वाटला तिचा.
राधेनं कृष्णाला कुब्जेचं असणं
राधेनं कृष्णाला कुब्जेचं असणं जाणवून देणं...
पद्यात कविता आहे ही...
वा.. अवल.. सुरेख. तुझी 'राधे'... वेधक आहे.
अत्यंत समरसतेने लिहिलेले हे
अत्यंत समरसतेने लिहिलेले हे लेखन जणू काही कविताच एखादी. कुब्जा केन्द्रस्थानी ठेवून लिहिताना शब्दांची पखरण अशी काही झाली आहे की सारा परिसरच पावा वाजण्यापूर्वीच रंग भारलेला झाला.
"...केवळ तिच्यासाठी मी पावा उचलला...." ~ होय, हे फ़ार भावले मला.
सुंदर!!
सुंदर!!
धन्यवाद सर्वांना . मानसी,
धन्यवाद सर्वांना .
मानसी, दाद, मामा
आशु, टाकते... "राधे..." थांकु
फार छान लिहिलंयस अवल. सगळं
फार छान लिहिलंयस अवल. सगळं दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं अगदी.
व्वा! खूपच सुंदर! मला यात
व्वा! खूपच सुंदर!
मला यात भावले ते अगदी जगाने दुर्लक्षिलेल्या व्यक्तीलाही कृष्णाने आपले मानले.>>>>>>>>>>देवच तो!
राधे, राधे..............
राधे, राधे..............
Pages