Submitted by फारएण्ड on 27 November, 2013 - 01:49
सचिन च्या मॅचेस, व्हिडीओ क्लिप्स, स्कोअरकार्ड्स चे संदर्भ देऊन त्याबद्दल फॅन-टॉक करण्यासाठी हा धागा उघडला आहे. बे एरियात आज ही चर्चा सुरू असताना इतरांनाही ती दिसावी व लिहीता यावे यासाठी. तुम्हीही लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<< भाऊ, अर्थ काढण्यात गल्लत
<< भाऊ, अर्थ काढण्यात गल्लत होतेय. >> ऋन्मेऽऽषजी, डिक्शनरीत दिलेला 'गिमिक'चा अर्थ -
Gimmick - trick or device esp. ro attract attention or publicity.
जे पुस्तकात आहेच त्याचा प्रसिद्धीसाठी वापर करणे म्हणजे 'गिमिक' नसून प्रसिद्धीसाठी मुद्दाम तसा मजकूर पुस्तकात घालणे [ trick or device ] याला 'गिमिक' शब्द लागू होतो. अर्थ काढण्यात कोणाची गल्लत होतेय तें तुम्हीच ठरवा.
>>होते की त्याचे गुरु
>>होते की त्याचे गुरु मैदानाबाहेर. सत्यसाईबाबा <<
इट्स नन ऑफ एनिबडीज डॅम बिझनेस. खाजगी आयुष्यात त्याने काय करावं/करु नये, हे ठरवणारे आपण कोण?
सचिन उत्तम खेळाडू आहे तसा
सचिन उत्तम खेळाडू आहे तसा उत्तम व्यावसायिक (business minded) आहे. उत्सुकता निर्माण होईल असा पुस्तकातील भाग प्रसिद्ध करणे यात काहीच गैर नाही. मला ते (चॅपेल विषयीचा भाग) पुस्तक प्रसिद्धीसाठी वापरणे गिमिक वाटते, इतरांना तसेच वाटावे हे अपेक्षीत नाही. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने पुस्तक विक्री आणि वाचक वर्ग वाढला तर चांगलेच आहे.
हे पुस्तक आत्मचरीत्र ह्या प्रकाराला कितपत खरे उतरते हे वाचल्यावरच कळेल. सगळ्यांची पुस्तकाविषयीची (कंटेंट विषयी) मते वाचायला आवडतील.
(No subject)
भाऊ, पण गिमिक हा शब्द माझा
भाऊ, पण गिमिक हा शब्द माझा कुठेय, मला तर आज आपल्यामुळे त्याचा अर्थ समजला, आपण माझी पोस्ट कोट करून ते लिहिल्याने मी माझ्या वाक्याबद्दल बोलत होतो न की गिमिक बद्दल
बाकी व्यंगचित्र नेहमीप्रमाणेच
डुप्लिकेट डुप्लिकेट
डुप्लिकेट डुप्लिकेट
भाऊ . त्या आजींचे एक्स्प्रेशन
भाऊ :D. त्या आजींचे एक्स्प्रेशन जबरी आहे.
मस्तच आहे आजींचे एक्स्प्रेशन.
मस्तच आहे आजींचे एक्स्प्रेशन. चित्र अगदि भारीये हा भाऊ नमसकर .
बाजारात तुरी, भट भटणीला मारी.
बाजारात तुरी, भट भटणीला मारी. पुस्तक आले नि वाचून झाले कि बोलूया
भाउकाका.. व्यंगचित्र बाकी
भाउकाका.. व्यंगचित्र
बाकी फॅन्स .. वाचा पुस्तक.. घ्या मजा
पुस्तक चांगले आहे. थोडे
पुस्तक चांगले आहे. थोडे टेक्निकल डिटेल्स अजून असते तर जास्त मजा आली असती असे वाटते. भारताकडून खेळण्याबाबतचे भाग फार मनापासून आले आहेत.
<< पुस्तक चांगले आहे.>> अरे
<< पुस्तक चांगले आहे.>> अरे वा ! वाचूनही झालं ? मानलं तुम्हाला !!
<< भाऊ, पण गिमिक हा शब्द माझा कुठेय... >> ऋन्मेऽऽषजी, माझी आगपाखड ही मीं सचिनभक्त असल्याच्या [ जो मीं आहेच ] जाहिरातबाजीची 'गिमिक' असावी आणि म्हणूनच वरचंही व्यंचि नसून सेल्फ पोर्ट्रेट काढण्याचाच प्रयत्न आहे ! दुर्लक्ष करा , झालं !
कणेकरांचा आजच्या सामन्यातील
कणेकरांचा आजच्या सामन्यातील लेख, नेहमीसारखा कणेकरी शैलीमध्ये -
सचिन-चॅपेल प्रकरणाबाबत, सचिनने तेव्हा हे बोलले असते तर चॅपेल यांची वेळीच हकालपट्टी होऊन भारतीय क्रिकेटचा फायदा झाला असता, आजच्या तारखेला बोलून त्याने आत्मचरित्राचा खप वाढवण्यापलीकडे नेमके काय साधले?
http://www.saamana.com/2014/November/09/Link/Main2.htm
अंशतः सहमत.
किमान आज तरी बोलला ते चांगलेच झाले. मात्र तेव्हा नक्कीच हे बोलायला हवे होते. अर्थात पब्लिकली न बोलता त्याने आतून काही प्रयत्न केले असतील अशीही शक्यता असू शकते. पण तेव्हा मात्र दादा विरुद्ध चॅपेल असेच रूप होते या वादाला. दादाच्या आत्मचरीत्रात या प्रकरणाबाबत काय लिहिले असेल हे वाचण्यास जास्त उत्सुक. त्याचे आत्मचरीत्र धमाल असणार.
सचिन बद्दल बोलायचं झालं तर तो
सचिन बद्दल बोलायचं झालं तर तो असा कुणाबद्दल बोलुच शकत नाही असं त्याचे फॅन्स (मीपण यात येते)ची अपेक्षा असते, पण तो ही आपल्यासारखाच माणुस आहे ,त्याला ही भावना आहेत .त्याने असं चॅपेल यांच्या बद्दल लिहीलं असेल तरी त्याने आता काय फरक पडतो त्याच्या फॅन्सना .सचिनच्या प्रत्येक बॅड पॅच नंतरही जेव्हाही तो खेळायचा .त्यातही तो काही बोलायचा नाही .त्याची बॅटच बोलायची,आणि तो त्यात बेस्ट होता .
कुणी काही बोलो सचिन आपला लाड्का आहे आणि जगात सगळ्या प्लेअर्स वर भारी आहे.
त्याने द्रविडबद्दलही लिहिलं
त्याने द्रविडबद्दलही लिहिलं आहे की मुलतानमध्ये त्याच्या २०० होऊ शकल्या नाहीत यावरुन तो खूप भडकला होता द्रविडवर.
मी पुस्तक अजुन वाचलं नाहीये
मी पुस्तक अजुन वाचलं नाहीये .पण द्रविडबद्दल सचिन असे बोलला असेल तर "दोस्तों मे उतना तो चलता है."
त्याने द्रविडबद्दलही लिहिलं
त्याने द्रविडबद्दलही लिहिलं आहे की मुलतानमध्ये त्याच्या २०० होऊ शकल्या नाहीत यावरुन तो खूप भडकला होता द्रविडवर.
>>>>>
१९४ डिक्लेअर ना ..
तो निर्णय नक्की द्रविडचा होता की द्रविडच्या खांद्यावर बंदूक होती...???
मी टिव्हीसमोर बसून लाईव्ह बघितलाय तो सामना आणि डिक्लेअर करायच्या आधीच्या ओव्हरला दादा गांगुलीने द्रविडला हाताने १ बोट दाखवून "वन मोअर ओव्हर (?)" असे सांगितलेले स्पष्ट दिसले होते .. इनफॅक्ट तेव्हाच शंका आलेली की आता हे सचिनला एकाच ओव्हरमध्ये मार २०० असा संदेश पाठवतील, पण झाले भलतेच .. डायरेक्ट १९४ ला डिक्लेअर करायचा गेमच झाला..
आणि हो, द्रविड त्या मॅचपुरता तात्पुरता कर्णधार होता. अन्यथा कर्णधार दादाच होता.
आता ते डिक्लेअर करणे चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा झाला. पण टेक्निकली कर्णधार द्रविडच असल्याने एण्ड ऑफ द डे हि जबाबदारी त्याचीच आहे.
तो निर्णय द्रविडचाच होता.
तो निर्णय द्रविडचाच होता. दादा व राईट दोघेही अशा वेळी डिक्लेअर करायला सांगणार्यांतले नव्हते. वेळही भरपूर होता. द्रविड चा निर्णय त्याच्या दृष्टीने बरोबरच होता. सचिनला तो न आवडणे हे ही साहजिक होते. दोन मॅच्युअर व्यक्तींमधला वाद होता तो. तेवढ्या प्रसंगापुरता. नंतर मिटलाही लगेच.
सचिन चिडला होता हे जॉन राईटनेही त्याच्या पुस्तकात लिहीले आहे.
मी ही मॅच तेव्हा टीव्हीवर पाहिलेली नव्हती पण क्रिकइन्फो वर फॉलो करत होतो आणि त्याच वेळी डिक्लेअर करण्याएवढे अर्जन्सी नव्हती. पण द्रविडची बाजू चुकीची म्हणता येणार नाही - त्याला पाक टीम ला मेसेज द्यायचा होता की आमच्या दृष्टीने मॅच जिंकणे हेच मुख्य ध्येय आहे. व्यक्तिगत स्कोअर नव्हे. तो स्वतः ९९ वर असता तरी त्याने तितकेच सहज डिक्लेअर केले असते. पण त्याचा प्रॉब्लेम म्हणजे ह्यूमन अँगल चा त्याने कधीच फारसा विचार केला नाही. त्यामुळे दादाला जे कट्टर शिष्य मिळाले ते त्याला मिळाले नाहीत.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64081.html
ही ती मॅच. दुसर्या दिवशी तोपर्यंत ७१ ओव्हर्स टाकून झालेल्या होत्या. १५ ओव्हर्स शिल्लक असताना डीक्लेअर करायचे असे ठरले होते, जे गृहीत धरून सचिन खेळत होता. पण मधेच युवराज आउट झाला व त्यातून जाणारा वेळ धरून द्रविड ने डाव घोषित केला. फक्त "प्रोसेस" महत्त्वाची आहे असे समजणारा लीडर वाटायचा तो. त्यात काम करणार्या लोकांनाही महत्त्व असते याला तो व ग्रेग चॅपेल ने कधी महत्त्व दिले असे दिसले नाही.
हे वाचून एखाद्याला वाटेल काय फालतू प्रॉब्लेम घेउन बसला आहे सचिन. पण हा वाद त्या दिवसापुरताच होता. नंतर लगेच मिटला. जॉन राईटनेही तेच लिहीले आहे. आणखी प्रूफ हवे असेल तर दुसर्या दिवशीची सचिन ची बोलिंग बघा. आदल्या दिवशीबद्दल कुढत बसलेला खेळाडू वाटतो का ते तुम्हीच ठरवा
https://www.youtube.com/watch?v=m7bWKSiUHLM
ही त्या दिवशीची मुलाखत. ही
ही त्या दिवशीची मुलाखत. ही जास्त स्पॉण्टेनियस असणार कारण अनेक वेळा विचार करून ठरवलेले शब्द यात नाहीत.
http://www.espncricinfo.com/ci/content/story/140482.html
मी ही मॅच तेव्हा टीव्हीवर
मी ही मॅच तेव्हा टीव्हीवर पाहिलेली नव्हती पण क्रिकइन्फो वर फॉलो करत होतो
>>>>>
टिव्हीवर बघितली असती तर मी जे उल्लेख केलाय ते पाहिले असते. माझी एकट्याचीच पाहण्यात आणि त्याचा अर्थ समजण्यात गल्लत होऊ शकेल, पण ज्याने ज्याने दादाला त्या दिवशी आधीच्या ओव्हरमध्ये ती विशिष्ट खाणाखुण करताना पाहिलेय ते सारेच शंभर टक्के खात्रीने सांगू शकतील कि हा धाडसी निर्णय द्रविडचा नक्कीच नव्हता
गूगाळून बघायला हवे ते कुठे मिळते का ते ..
नाही दादाने ती खूण केली नसेल
नाही दादाने ती खूण केली नसेल असे मी म्हणत नाही. पण कदाचित 'अजून एक ओव्हर बाकी आहे' असेही तो सांगत असेल. आपण काय अर्थ लावणार त्याचा. आणि डाव घोषित झाल्यावर लगेच ड्रेसिंग रूम मधे राइट व दादा ने जाउन सचिनला सॉरी म्हणणे वगैरे मधूनही तेच दिसते. मुळात दादा असले काही करेल असे अजिबात वाटत नाही. त्यादिवशीच्या मुलाखतीतही त्याने मी सचिनला २०० करू दिले असते असे म्हंटले होते. द्रविड च्या खांदयावरून गोळी मारण्याएवढा तो पाताळयंत्रीही नव्हता आणि डिक्लेअर करायचे ठरवले असते तर स्वतः जबाबदारी घेण्याएवढा डेअरिंगबाजही होता. तसेच द्रविड एवढा तो प्रोसेसच्या बाबतीत काटेकोर नव्हता त्यामुळे स्वतःच्या निर्णयातून त्याने तेव्हा डिक्लेअर केले नसते.
दोघा कप्तानांच्या पद्धतीत मला
दोघा कप्तानांच्या पद्धतीत मला दिसलेला फरकः
द्रविड-चॅपेलः सिस्टीम व प्रोसेस महत्त्वाची. रिझल्ट त्यातूनच येतील. आपल्याला कशी टीम हवी ते आधी ठरवायचे, व त्या त्या पोझिशनला उपयुक्त खेळाडू उपलब्ध खेळाडूंमधून निवडायचे. संघाच्या गरजेनुसार खेळाडूने सांगितलेल्या पोझिशनवर (उदा: सचिन ४ नंबर, वन डे तही), किंवा रोल मधे (इरफान पठाण - पिंच हिटर) खेळायचे.
या दोन वर्षांत भारताला मिळालेले खेळाडू: सुरेश रैना, आर पी सिंग, उथपा
दादा-राईटः कौशल्याइतकेच 'जिगर' ला महत्त्व. खेळाडू आपल्या वेव्हलेन्थ मधे बसतील असे निवडायचे, पण पारखून घ्यायचे एकदा घेतले, की त्यांना सलग बराच काळ द्यायचा (उदा: २००० साली विनोद कांबळी, व २००३ मधे दिनेश मोंगिया), त्यांचे नखरे सहन करून त्यांना फुल सपोर्ट करायचा. त्यांचे कौशल्य भारताला सामने जिंकून देण्याएवढे भारी आहे यावर विश्वास ठेवून त्यांना महत्त्वाच्या वेळी जबाबदारी द्यायची (उदा: २००३ च्या वर्ल्ड कप मधे पाक विरूद्ध दुसरी विकेट पडल्यावर टेन्शन जास्त चांगले हॅण्डल करू शकणार्या मोहम्मद कैफला पाठवणे)
त्यांच्या पाच वर्षात भारताला मिळालेले खेळाडू: लक्ष्मण चे पुनरागमन, सेहवाग, युवरज सिंग, हरभजन सिंग, झहीर खान, धोनी, इरफान पठाण
पण कदाचित 'अजून एक ओव्हर बाकी
पण कदाचित 'अजून एक ओव्हर बाकी आहे' असेही तो सांगत असेल. >>> वेल आय डाऊट असा अर्थ असावा, कारण त्यावेळचे दादाच्या चेहर्यावरचे एक्स्प्रेशन्स .. म्हणूनच तो विडिओ मिळतो का बघायला हवे ..
बाकी डेअरींबद्दल म्हणाल तर येस्स.. दादात असे निर्णय घेण्याची डेअरींग, त्या सामन्यात कप्तान नसतानाही बाहेर बसून द्रविडच्या निर्णयावर प्रभाव पाडण्याची क्षमता होती म्हणून तर....... आणि त्यानंतर सचिनला सॉरी म्हणने हे साहजिकच होते.. तसेच त्या निर्णयामागे एकटा द्रविड नसून मी सुद्धा होतो असे सांगण्याचा प्रश्नच नाही, अन्यथा दादा कर्णधार नसताना त्याने का लुडबुड केली म्हणत आणखी वेगळ्या वादाला तोंड फुटले असते, जे थोडक्यात मिटले असते त्या जागी संघातली धुसफूस वाढली असती.
असो, यात प्रत्येक जण आपल्याच हिशोबाने अर्थ लावेल म्हणून ताणण्यात अर्थ नाही, फक्त द्रविडवर एकट्यावर बिल फाडताना ज्याला याची कल्पना नसेल त्यांना हे ध्यानात आणून दिले, आता ज्याने त्याने आपापल्या मर्जीन अर्थ लावावा.
जाता जाता - या सामन्याच्या दुसर्या दिवशी आम्हा मित्रांमध्ये चर्चा चालू होती की कसे दादाने सचिनला डिक्लेअर केले. तेव्हा ग्रूप मधील एक जण भोळेपणाने म्हणाला, पण कॅप्टन तर द्रविड होता ना ... आणि सारे हसायला लागलेले.
मला हे सारे आजही आठवतेय म्हणून मी माझ्यातर्फे १०० टक्के शुअर आहे त्या निर्णयावर दादाचा प्रभाव होता.
अवांतर - दादा हा माझा सर्वात जास्त म्हणजे सचिनपेक्षाही जास्त फेव्हरेट खेळाडू आहे.
अजून एक यावरून सहज
अजून एक यावरून सहज आठवले,
त्याकाळी मी आणि माझा एक अभ्यासिकेतील मित्र. दोघेही क्रिकेटचे प्रचंड वेडे. तो मुसलमान होता पण कट्टर सचिन भक्त आणि मी मराठी माणूस मात्र दादाचा फॅन. आमची दोघांमध्ये सचिन विरुद्ध दादा अशी जुगलबंदी चालूच असायची. अर्थात माझ्यामते सचिनच जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज होता आणि फलंदाज म्हणून दादापेक्षा कैकपटीने सरस हे ही कबूल होते ते वेगळे, आणि फॅन असने वेगळे.. पण तेव्हा माझी आणि त्या मित्राची चिडवाचिडवी चालायची त्यात मी त्याला "ए १९४" असे चिडवायचो
फारएन्ड सर्व पोस्टी
फारएन्ड सर्व पोस्टी आवडल्या.
<<हे वाचून एखाद्याला वाटेल काय फालतू प्रॉब्लेम घेउन बसला आहे सचिन. पण हा वाद त्या दिवसापुरताच होता. नंतर लगेच मिटला. जॉन राईटनेही तेच लिहीले आहे.>>
इतक्या वर्षांनी आत्मचरित्रात लिहिण्याइतकं ते मोठं प्रकरण होतं का हाच प्रश्न आहे.
वेदिका२१ तुमच्या पोस्ट मधेच
वेदिका२१ तुमच्या पोस्ट मधेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे.>>>>फारएन्ड सर्व पोस्टी आवडल्या. >>>> या वाक्यात.
कारण लोकांना सचिनबद्दलच्या लहान मोठया सर्वच गोष्टी वाचायला आवडतात . स्पेशली क्रिकेट्च्या या मह्त्वाच्या मॅच बद्दलही. दादा , द्रविड आणि सचिनच्या मैत्री व छोट्या कुरबुरी साठीही लोकं वाचण्यास उत्सुक असतात. त्यामुळेच हा भाग ही सचिनच्या आयुष्यातल्या इतर घटनांबरोबर पुस्तकात समाविष्ट करण्यात आला असेल .
बाकी मॅचवरच्या पोस्ट साठी +
बाकी मॅचवरच्या पोस्ट साठी + १००
फारएण्ड तुमच्या वरती लिहिलेल्या ओळी म्हणजे पुस्तकातील वाक्यच वाटत आहेत. मजा आली वाचताना .
आता कोणी पुस्तक वाचुन त्यावर
आता कोणी पुस्तक वाचुन त्यावर लेख लिहा बरं
तेच म्हणते. ९०० रु वर्थ आहे
तेच म्हणते. ९०० रु वर्थ आहे का?
<< ९०० रु वर्थ आहे का? >> पण
<< ९०० रु वर्थ आहे का? >> पण न वाचतां चर्चा करणंही व्यर्थ आहे ना !!
Pages