Submitted by फारएण्ड on 27 November, 2013 - 01:49
सचिन च्या मॅचेस, व्हिडीओ क्लिप्स, स्कोअरकार्ड्स चे संदर्भ देऊन त्याबद्दल फॅन-टॉक करण्यासाठी हा धागा उघडला आहे. बे एरियात आज ही चर्चा सुरू असताना इतरांनाही ती दिसावी व लिहीता यावे यासाठी. तुम्हीही लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला देवाने दिलेला
मला देवाने दिलेला वर
द्वारकानाथ संझगिरी
आपला सचिन तेंडुलकर आज ५१ वर्षाचा झाला.
कुठलीही सार्वजनिक सुट्टी नसताना, किंवा राजकीय नेता किंवा अध्यात्मिक गुरू प्रमाणे मोठ मोठी पोस्टर्स लागत नसताना क्रिकेटप्रेमी सचिनचा वाढदिवस विसरत नाहीत.
तो निवृत्त होऊन १० वर्ष झाली. तो सतत प्रकाशझोतात नसतो. क्रिकेटच्या तर अजिबात नाही. तरीही त्याचा वाढदिवस सर्वसामान्य लोकांना लक्षात असतो, अगदी आयपीएलच्या धामधुमीत सुद्धा. त्याचं कारण अस आहे की तो ज्ञानेश्वरांप्रमाणे लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर आला, त्याच्या क्रिकेटच्या ज्ञानेश्र्वरीची त्याने प्रस्तावना लिहिली, तिथपासून तो श्रीमंतापासून गरिबापर्यंतच्या कुटुंबांचा भाग झाला, तो कायमचा.
माझ्या आणि आमच्या कुटुंबासाठी सचिनचं मैत्र हा देवाने दिलेला वर आहे. तो खेळत असताना, त्याच्या खेळावर मी भरभरून लिहीत असताना मैत्रीचे धागे घट्ट होत गेले, ते आजही तसेच घट्ट राहिले. पूर्वी तो वर्षातुन एकदा किंवा कधी दोनदा अंजलीसह घरी येत असे, मैदानावर भेटत असे. त्याच्या क्रिकेटच्या पाळण्यातल्या पायापासून त्याला थेट आभाळाला भिडताना मी त्याला पाहिलंय. वर भिडल्यावर अनेकांचे जमिनीपासून दूर गेलेले पाय पाहिले. ह्याचा पाय तसूभरही सरकला नाही.
मागे वळून पाहताना काही छोट्या छोट्या आठवणीं आज उसळून आल्या. सचिनवर प्रेम अख्ख्या क्रिकेटजगाने केलं. पण सचिनचं प्रेम, मैत्र, आदर मिळालेले भाग्यवान जगात मूठभर आहेत. त्यात मी आहे. ही परमेश्वराने मारलेली मैत्रीची गाठ होती.
त्याला नुसतं भेटणं ऊर्जा
देऊन जायची.
१९९० साली इंग्लंड दौऱ्यावर तो सतरा वर्षाचा होता. दुधाचे दात शिल्लक असावेत. मी हार्ट अटॅक मधून उठून जेमतेम दोन वर्ष झाली होती. दिवसभर लंडनला फिरून मी आणि बायको खेळाडू रहात असलेल्या हॉटेलात येऊन बसलो. मी बायकोला म्हटलं, " उठून बोलायचे त्राण नाहीत आता." इतक्यात भारतीय संघ आला. संजय मांजरेकरने मला पाहिलं. तो माझ्याकडे आला. म्हणाला " सचिनशी बोल. तो खूश आहे." डर्बीशायर विरूध्द त्याने शतक ठोकलं होत. सचिनशी मी बोललो आणि माझा थकवा गेला. कारण आम्ही बोलत असताना माधव मंत्री तिथे आले. ते व्यवस्थापक होते. ते सांगत होते, " हा माझ्याकडे आला आणि म्हणाला सर मला वर फलंदाजीला जायचं आहे. ( त्यावेळी तो खालच्या क्रमांकावर खेळायचा.) मी म्हटलं का तर म्हणाला, " मला इयान बिशपची गोलंदाजी खेळायची आहे. मी वेस्ट इंडियन वेगवान गोलंदाज कधी खेळलो नाही. त्याने शतक ठोकलं. आणि त्यानंतर माझ्या रूम मध्ये येऊन पायाशी खाली बसला आणि म्हणाला सर माझ्या खेळात काही चुका सापडल्या का?"
त्या काळात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांना खेळायाच म्हटल्यावर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू सहाव्या क्रमांकावर जायचा. हा सहाव्या क्रमांकाचा तिसऱ्यावर जायला धडपडत होता.
त्यानंतर माझा थकवा कुठे गेला कळलेच नाही.
मी ताजातवाना होऊन बाहेर पडलो.
त्याच्या वागण्यात सुपरस्टारचा तोरा कधी नव्हताच.
कपिलने हेडलीचा विक्रम मोडला तेंव्हाची गोष्ट सांगतो. तिसऱ्या दिवशी मला अहमदाबाद
वरून परतावं लागलं.सामना संपला नव्हता. मला त्या सामन्याचा स्टंप हवा होता. त्यावर मला कपिलची स्वाक्षरी हवी होती. मी तिथे असणार नव्हतो. मी सचिनला म्हटलं, " माझ्यासाठी सामन्याचा स्टंप आणशील? कपिलची स्वाक्षरी घेऊन?"
सचिन हो म्हणाला. मी टीव्हीवर मॅचचा शेवट पहात होतो. मॅच संपली आपण जिंकलो. सर्व ड्रेसिंग रूमकडे निघाले. सचिन थोडा पुढे आला मग पळत मागे गेला त्याने स्टंप घेतला. मी सुस्कारा सोडला. मुंबईत आल्यावर कपिलच्या स्वाक्षरीसह मला स्टंप मिळाला. कोण करेल एवढं?, अस्सल प्रेम असल्याशिवाय.? तो फलंदाजीचा राजा झाला होता तेंव्हा! आणि मी कोण होतो?
त्याला त्याच्या ३५व्या विक्रमी शतकाच्यावेळीही मी त्या मॅचचा स्टंप त्याला त्याची स्वाक्षरी करून द्यायला सांगितलं होतं.त्याने स्टंप घेई पर्यंत इतरांनी सर्व स्टंप उचलले होते. सचिनने त्यातला एक मागून घेतला त्यावर स्वाक्षरी केली आणि मला दिला. ह्या वागण्याचं , अकृत्रिम प्रेम, मनाचा मोठेपणा,ह्यापेक्षा वेगळं काय वर्णन करू?
२००५ साली माझी दुसरी अँजिओप्लास्टी झाली. त्यावेळी सर्व अचानक घडलं. कुणालाच सांगितलं नव्हतं. सचिनला कसं कळलं देव जाणे! मला ऑपरेशन थिएटर मध्ये नेत असताना माझ्या फोनवर सचिनचा फोन आला. तो फोन मुलाकडे असावा. त्याने धीर दिला. सचिनचा एक फोन, एक स्मित, एक शतक, सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. एक आनंदाची लहर अंगातून जाते. तशी ती गेली. अँजिओप्लास्टीचा दबाव
निघून गेला.
दीड वर्षापूर्वी कॅन्सरने माझ्यावर निर्घृण हल्ला केला. ज्या दिवशी अजित तेंडुलकरच्या पार्टीला मी जाणार होतो त्याच दिवशी तो हल्ला झाला. अजितला मी कळवल. त्यानंतर काही दिवसात सचिनचा फोन आला. त्याने शांतपणे मला समजावलं " तुम्ही फायटर आहात. तुम्ही लढणार आणि जिंकणार" अशीच त्याची सुर्वात होती. त्यानंतर तो एक महत्वाचं वाक्य म्हणाला, " जेंव्हा जिंकाल तेंव्हाच स्कोअर कार्ड पहा. नावावर मोठा स्कोअर असेल "
त्यानंतर काही महिन्यात त्याचा फोन पुन्हा आला. "उद्या मी, नितीन आणि अजित तुम्हाला भेटायला घरी येतोय." साक्षात ऊर्जा घरी येणार होती. तो आला. दोन तास सर्व विसरून आमच्या गप्पा झाल्या. त्यात ठरलं सचिनची पन्नाशी षण्मुखानंद हॉलमध्ये साजरी करायची. पण त्यामागची पार्श्वभूमी वेगळी होती. माझ्या औषधांचा खर्च अवाढव्य होता. त्या कार्यक्रमातून तो उभा करायचा असं ठरलं. कुणी उचलून दिलेल्या मदतीपेक्षा, स्वतः कार्यक्रम करून पैसे उभ करणं मला मानसिक समाधान देणारं होत. त्याकाळात त्याच्यावर पुस्तकही लिहून त्याच प्रकाशन करायचं ठरलं. ग्रंथाली त्यासाठी पुढे आली. आमच्या श्रीहर्ष फेणेने त्यात पुढाकार घेतला. सचिनने त्याच्या मुलाखतीसाठी ३ ,४ तास दिले. त्याच्याच घरी जाऊन त्याचा पाहुण चार घेऊन त्याची पुस्तकांसाठी मुलाखत झाली. कार्यक्रमासाठी, सचिन येतो म्हटल्यावर इतर क्रिकेटपटू, सिनेमातली मंडळी पुढे आली. कार्यक्रमासाठी पैशाची भरघोस मदत , माझे मित्र विघ्नेश शहाणे, राजेश आजगावकर, अनिल जोगळेकर, अनिल नवरंगे वगैरे मित्रांनी केली.
दोन महिने मी झपाटल्यासारखे पुस्तक लिहिलं. मी गादीवर झोपलेलो असायचो. लेखनिक लिहून घ्यायचा. त्याचबरोबर कार्यक्रमाचं काम सुरू होत. त्यात माझं एक छोटं ऑपरेशन सुध्धा झालं. पण सचिन नावाची ऊर्जा मला माझा गंभीर आजार विसरऊन माझ्याकडून काम करून घेत होती.
तुडुंब भरलेल्या हॉल मध्ये सचिनचे २८०० चाहते होते. त्यांना वाटत होत सचिनचा ५०वा वाढदिवस साजरा होतोय त्यांना कल्पना नव्हती की सचिन ते कुणासाठी करत होता.
सचिनला मला पुन्हा नॉर्मल झालेलं पहायचं होत. तो चार तास कार्यक्रमाला बसला. तासभर मला सुंदर मुलाखत दिली.
त्या रात्री मी झोपू शकलो नाही. डोळे आनंदाश्रुनी भरले होते.
ज्याला नुसतं पाहायला, एखादी स्वाक्षरी, एखादी सेल्फी घ्यायला लोक धडपडत असतात त्याने आपल्यासाठी इतकं भरभरून करावं?
म्हणूनच मी सुरवातीला म्हटलं, " सचिन हा माझ्यासाठी देवाने दिलेला वर आहे."
देवाने त्याला त्याच्या आयुष्याचं शतक पूर्ण करताना असं स्वास्थ्य द्यावं की त्याला शतकानंतर पुन्हा नवा स्टान्स घ्यावासा वाटेल.
फारच सुंदर लेख. इथे
फारच सुंदर लेख. इथे टाकल्याबद्दल धन्यवाद
संझगिरींच्या लेखांत नेहेमी
संझगिरींच्या लेखांत नेहेमी "मी" "मी" असतं, सॉर्ट ऑफ पप्पुगिरी (नो पन इंटेंडेड).. संझगिरींनी कणेकरांच्या शैली बरोबर थोडा आब देखिल उचलायला हवा होता...
"मी" "मी" >> :खीखी:
"मी" "मी" >>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
लेख वाचून मला वाटलं की आता सचिनच्या नावाने देऊळ बांधतायत की काय?
लेखाचा विषय आणि आशय बघा रे..
लेखाचा विषय आणि आशय बघा रे..
पण इथे त्यावर वाद नको
जे सचिनने केले त्यावर फोकस करा..
आणि त्यावर ही वाद होणार असेल तर सचिन भारतरत्न चर्चेचा दुसरा धागा देतो
>>लेखाचा विषय आणि आशय बघा रे.
>>लेखाचा विषय आणि आशय बघा रे.. जे सचिनने केले त्यावर फोकस करा..<<
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे वेड्या, तेच तर म्हणतोय संझगिरीच्या लेखाबाबत. फोकस सचिनवर असुद्या, स्वतःवर नको..
बाय्दवे, आधिची कोटि वाया गेली म्हणायची...
संझगिरींचे लेख (मिठाच्या
संझगिरींचे लेख (मिठाच्या कणीबरोबर) वाचतो. पण मध्यंतरी आर. डी. बर्मनवरच्या एका लेखात त्यांनी वापरलेले किस्से शब्दशः एका पुस्तकातून घेतल्याचं (अर्थात क्रेडिट न देता, स्वतःची माहिती म्हणून छापले होते) जेव्हा त्या प्रकाशकानं पुस्तकांच्या स्क्रीनशॉट्स सह सिद्ध केलं आणि त्याचं काहितरी लंगडं समर्थन संझगिरींनी केलं, तेव्हापासून त्यांच्या लिखाणाकडे पहाण्याचा माझा अँगल बदललाय.
बाय द वे, तेंडल्या ५१ वर्षाचा
बाय द वे, तेंडल्या ५१ वर्षाचा झाला!!! अश्यानं आम्ही म्हातारे होऊ.
हॅपी बर्थडे सचिन!!!
Pages