दिवाळीची मेजवानी - २०१४

Submitted by दिनेश. on 20 October, 2014 - 08:47

परवा सईने आठवण काढली होती म्हणून.. साधेच पदार्थ आहेत. गोड मानून घ्या.

प्रसादाचे लाडू.. केळ्याचे लाडू

साधेसे सलाद

खास आफ्रिकन खाऊ, फ्राईड कसावा

ज्या बाळांचे मॅगीशिवाय चालतच नाही, त्यांच्यासाठी.. पण भाज्याही खाव्याच लागतील

ग्रील्ड पोटॅटोज

ग्रील्ड कॉलिफ्लॉवर ( पाककृती सौ. इब्लिस..... सौ. म्हणजे सौजन्य Happy )

अवलने बिरडे लिहिल्यावर करावेसे वाटले. पण आमच्याकडे वाल नाहीत. ब्लॅक बीन्स भिजवून, सोलून वापरलेत.

ब्लॅक बीन्स भिजवल्यावर असे दिसतात.

आणि सोलल्यावर असे दिसतात.

मॅगी नूडल्स विथ फ्राईड पाक चोई आणि पीनट सॉस

इमाम बेशुद्ध पडला.. हो याच नावाची तुर्कि डिश

इंजेरा.. इथिओपियन डोसा

अंगोलाची खास गोल भेंडी आणि बटाटा भाजी

चना कोफ्ता इन योगहर्ट सॉस

डबलबीन्सची भाजी

माखी दाल ( रेसिपी सौ. स्नू... सौ म्हणजे.... Happy ) आणि घरची रोटी

एका इजिप्शियन मित्राच्या बायकोने शिकवल्याप्रमाणे त्यांच्या पद्धतीची मसूर डाळ

नैरोबी स्पेशल... खिचू

पास्ता इन मश्रूम सॉस

मिरची का सालन

झुकिनी आणि कॉर्न स्टर फ्राय

झटपट ब्रोकोली ग्रातिन

मावेत केलेला नान आणि फ्लॉवर बटाटा भाजी

हे काय आहे ते मात्र ओळखायचे आहे. हा चायनीज ( बर्मीज, थाई, कंबोडीयन वगैरे वगैरे ) पदार्थ नाही.

ऋषीपंचमीची सात्विक भाजी

डाळ खिचडी, सांडगी मिरची, लसूण.. सोबत मॉरिशियसहून आणलेले हॉग प्ल्म्स चे लोणचे

प्रसादाची खीर

अवाकाडो मूस

माझे आवडते फळ.. कुमक्वॅट ( उच्चार बरोबर असावा ) हे फळ साल, बियांसकट खायचे असते.

आवडले ना ?

ही दिवाळी सर्व मायबोलीकरांना आनंदाची आणि सुखसमृद्धीची जाओ.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी Lol
दा, आता वर्षभर उपवास करायला हरकत नाही Happy
तोंपासु फोटो!
कम्क्वॅट्स सुगंधी आणि गोड फळं, प्रेग्नन्सीत लै हादडालीत Happy सॅलॅडसाठी आणायचे आणि तसेच गट्ट्म व्हायचे Proud

मस्त च दिनेशदा. Happy

ओळखा पाहू मधे फणसाचे सुकवलेले गरे आहेत का?

तुम्हालाही ही दिवाळी आनंदाची आणि सुखसमृद्धीची जाओ.

कित्ती छान वाटलं म्हणून सांगू !
ओळखा पाहू मधे चपात्या कात्रीने कापून कांद्यावर परतलेल्या आहेत, हा प्रकार ब्रेकफास्टसाठी छान लागतो. कात्रीने कापायला पण मजा येते आणि खातानाही ओळखता येणार नाही, असे जमून जाते.

मला वेगवेगळ्या रंगांच्या डिशेस संग्रहात ठेवायला आवडतात. पूर्ण सेट नाही, २/३ असतात. या रंगांनी फोटो खुलून दिसतात. आणि हो कॅलरीज आणि वजनाची अजिबात काळजी करायची नाही. हे बहुतेक प्रकार कमीत कमी तेल तूप वापरून केलेले आहेत. डीप फ्राय मी कधी करतच नाही.

कुमक्वॅट्स आंबट गोड संत्र्यासारखे लागतात. सालीमूळे किंचीत कडवट.

मी हे सर्व प्रकार एक कला म्हणूनच एंजॉय करतो. एवढे ब्लॅक बीन्स सोलायला सहज २ तास लागले. पण मी ते अगदी एंजॉय केले. वाढतानाही पदार्थ छान दिसावा असा प्रयत्न करतो. तूम्हा सर्वांना प्रत्यक्ष खिलवायची संधी मिळेल तो माझ्यासाठी सुदिन !

दिनेशदा..... किती किती हा छळवाद.... कु. फे. हे. पा. Lol
सगळेच पदार्थ खूप छान दिसत आहेत आणि तुम्ही केलेत म्हणजे अतिशय चविष्ट, रुचकर इ. इ. असतीलच..

कधी तरी नक्की येणार तुमच्याकडे हादडायला.. Happy

(तसही खाण्या पिण्याच्या बाबतीत फार ओळख-पाळख मानत नाही मी,,,, आणि तुम्ही माबोकर म्हणजे आमचेच आहात की.. फक्त मी आयतं खाणार. स्वैपाकात मदत अजिबात नाही करणार!!!)

तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा Happy

चपात्या अशा कापुन परतल्या? धन्य आहे तुमची........

आतापर्यंट ज्या रेस्प्या दिलेल्या नाहीत त्या लगोलग द्या आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांची लिण्क फोटोखाली द्या....

फोटो सगळे मस्त आहेत. काही फोटोत पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला, त्या निमित्ताने रेस्प्या परत आठवल्या. Happy

मस्तच सर्व पदार्थ आणि फोटो.
मिरची का सालन, मसूर डाळीची रेसिपी सांगा.
चपात्या अशा कापुन परतल्या असतील असे वाटतच नाही ,मस्तच.
दिवाळीच्या शुभेच्छा!

धन्य आहे तुझी दिनेश... किती आर्टिस्टिकली कापल्या आहेत चपात्या.. मला तर असल्या आयडियाज सुद्धा सुचत नाहीत Sad

जिप्स्या Rofl Lol खर्रय अगदी...

वॉव दिनेशदा... अप्रतिम.

दिपावलीच्या शुभेच्छा.

दा............. ___/\___
कस्ले सह्ही आहेत सर्व पदार्थ!!
तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! Happy

भारी आहेत, फोटु. Happy

इमाम बेशुद्ध पडला.. हो याच नावाची तुर्कि डिश <<< अरे देवा! 'इमाम बेशुद्ध पडला' हे पदार्थाचे नाव आहे? काय? आता मीच बेशुद्ध पडेन. Lol

आभार आणि शुभेच्छा.. परत एकदा.

राहिल्यात त्या पाककृती दिवाळीनंतर लिहितो.. चपात्यांचा प्रयोग मात्र अवश्य करून बघा.

वत्सला.. नैरोबी म्हणजे मिनी गुजराथच आहे.
इब्लिस.. नाही हे वेगळे फळ. भारतात नाही बघितले मी !
हो गजानन.. हेच नाव आहे ( अरबी भाषेत अर्थात Happy )

चपात्या कात्रीने कापून कांद्यावर परतलेल्या आहेत, >>>> बापरे!मनलं तुम्हाला..
एवढे ब्लॅक बीन्स सोलायला सहज २ तास लागले>>>>>> मूग सोलताना जी युक्ती वापरतात तीच ब्लॅक बीन्स सोलायलापण कामी येईल ना.अर्थत तुम्हाला माहित असेलच.

मस्तच.

रिमझिम,
मोड आलेले मूग सोलताना एक एक मूग न सोलता पाण्यात घालून २-३ तास ठेवायचे.बरीच साले फसफसून वर तरंगतात.त्यानंतर थोडे थोडे मूग दुसर्‍या भांड्यातल्या पाण्यात ओतताना मधे एका हाताची ओंजळ धरायची.त्यात येणारी साले फेकायची.अगदी शेवटी राहिलेली चुकार साले(अगदी थोडीच रहातात) नेहमीप्रमाणे सोलायची किवा मूग शिजत असताना वर येतात ती चमच्याने काढायची.वाचताना किचकट वाटले तरी करताना तेवढे नाही.

Pages