जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'चला हवा... ' इथे बघा...

http://www.tvforumonline.com/bb2db5cc-e22d-426f-969c-9a014ac91042.aspx?1...

चिपो यंदा दिवाळी अन्काच्या मुखपृष्ठावर झळकतेय <<<< घ्या... आणि मी नुवार्कला विमानतळावर वाट बघत उभा... इबोला आला तरी हिचा पत्ता नाही.... :रागः
.
.
.
.
.
Proud

इबोला आला तरी हिचा पत्ता
नाही.... :रागः >>> असू द्या हो . तुम्ही चिपोका आहात ना ! मग अबोला सोडा Proud Lol Wink

चनसः कुठे चिपोच्या दंतकळ्या कुठे अर्चूच्या जबडाफळ्या.... Proud

जाई: इबोला पेक्षा अबोला बरा ना..... पण आली की लगेच सोडेन हो....... म्हणजे अबोला Wink

जबडयाफ़ळ्या >>>>> Rofl Wink
पसंद अपनी अपनी राहील की Biggrin
. पण आली की लगेच सोडेन हो....... म्हणजे अबोला>>>> पुढच लिहिलेत ते बरे केलेत हो गोगा . Lol

झोपी गेलेला धागा जागा झाला का!!!
चिपो>> Happy मेदे पेक्षा हे नाव बरंय Happy हल्ली हसते अधून मधून चक्क.. बरी दिसते... पूर्वीच्या काळी म्हणायचे तशी ठेंगणी ठुसकी... फक्त फार सुबक नाहीये पण उंची असती आणि चेहरा थोडा लांबुडका असता तर खरंच छान दिसली असती. फारच वाटोळा चेहरा आहे बयेचा अगदी कंपासने वर्तुळ आखावं इतका!! पण तिचं स्माईल आवडतं मला फार. जोरात हसल्यावर मात्र नाही बरी वाटत... ब्रेकला न जुमानता गचके देत काही अंतर कापणार्‍या गाडीसारखी हसते. आणि शर्मिष्ठा चं हसणं तर अय्यय्यो!! मागे लिहीलंच आहे उचक्यांची अविरत आवर्तने किंवा लहान मुलाने वाजणार्‍या खेळण्यावर पाय देऊन सतत नाचल्यावर आवाज येईल तशी हसते.

चुकून काल परवाचा एपि पाहीला... सुमो आपले आर्मस्ट्राँग महत्प्रयासाने देसाई वाड्यावरून ओवाळून टाकत होती... वर होकस फोकस गिली गिली अख्खा छू अस्ला काही मंत्रपण पुटपुटत होती... आणि झुप्पकन देसाई वाडा झगमगतो... आयला भारीये.... नालासोपार्‍यात आणायला हवंय सुमोला होकस फोकस छू करायला!! (हिचं अ‍ॅब्री. लई आवडतं कस्लं परफेक्ट मॅच होतं शरीर"यष्टी"ला...)

सत्यमेव जयतेला परवा समाज प्रबोधन मालिकेचं अ‍ॅवार्ड मिळालं... तसं झी मराठी वाल्यांनी या मालिकेला द्यायला हरकत नाहीये... शिरेल मधल्या लग्नाळू मुलींचं, एकमेकांचं, त्या तीन आगाऊ मुलांचं, मेघनाचं आणि तिच्या का रे दुरावा खेळणार्‍या पालकांचं, प्रेक्षकांचं सदोदीत जबरदस्तीने प्रबोधन केलं जातंय!!

बेफी भापो!!! Proud

रच्याकने... दिवाळी आहे आतातरी त्या बायकांना चांगले ड्रेस द्या म्हणावं दिग्दर्शकाला.... अर्चूच्या साड्या मात्र सुरेख आहेत. मेघनाला अंगठी बिंगठी काय देतो हा आदे? त्याऐवजी नवे दोन चार ड्रेस आणि साडी दे बरं... ब्लाऊजपीस पण नवीन मिळेल त्यासोबत!! नेहमी ते हिरवे पिवळे बुट्टीदार ब्लाऊजेस घालते कोणत्याही साडीवर!

जबडाफळ्या अशी शारीरिक व्यंगावर टिपण्णी करणारे व त्यावर गडाबडा लोळणारे पुढच्या जन्मी बोळके घेऊन जन्मतील आणि बोळकेच घेऊन जगतील.

हो ना विनीता , अर्चुपेक्षा मेदे परवडली .

बाकीच्यांना पसंद अपनी अपनी . दिल आया गधी पे तो परी क्या चीज है .

जबडाफळ्या अशी शारीरिक व्यंगावर टिपण्णी करणारे व त्यावर गडाबडा लोळणारे पुढच्या जन्मी बोळके घेऊन जन्मतील आणि बोळकेच घेऊन जगतील.>>> चिडलात की काय!

पण ती ओव्हरअॅक्टिंग करते की नाही? कधी कधी तर तिच्या ओरडण्यामुळे आमच्या घरचा टीव्ही बंद पडतो, म्हणून मी तिला नावे ठेवत नाही.

चिडलात की काय!<<< नाही. फक्त रक्तदाब वाढला आहे, हातपाय थरथरतायत, डोळे विस्फारले आहेत, दात ओठ खाल्ले जात आहेत आणि मनात सैतानी विचार येत आहेत. चिडतोय कसला!

फक्त रक्तदाब वाढला आहे, हातपाय थरथरतायत, डोळे विस्फारले आहेत, दात ओठ खाल्ले जात आहेत आणि मनात सैतानी विचार येत आहेत. चिडतोय कसला!>>अर्चू इम्पॅक्ट सॉलिडच आहे म्हणायचा!

ही चित्रा कोण या साठी चक्क २ भाग पाहीले . हो हो रीया तीचा आदे वर क्रश च आहे .आपल्याला जो संशय आहे तो खराच आहे .नायतर तीचा प्रियकर एकदातरी दाखवला असता . त्यांना वाटतं बघणार्यांनी स्वतः चा सिक्थ सेंन्स पेटीत लपवुन ठेवलाय तीच्या त्या पत्रां सारखा . ती त्या दोघांच्यात फुट पाडणार .मग ती रडारड . शेवटी परत ऑन डिमांड आदे मेदे तावुन सुलाखुन पुन्हा एकत्र .
dreamgirl मस्त लिहिलय Lol ते हिचं अ‍ॅब्री. लई आवडतं>>>> अ‍ॅब्री काय ? नेहमी नाय बघत त्यामुळे

चिपो हुशार असेल तर भाऊबीजेच्या निमित्ताने त्या चित्राला आदेला ओवाळायला सांगेल! सगळ्यात सोपा उपाय Wink

Pages