जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी.:हाहा:

मी आत्ता टाटा स्काय वर मालिकांचे डिटेल्स दाखवतात ना तिथे पाहिलं-
तिथे लिहिलय की सुप्रियाचं अजित शी लग्न होतं
म्हणजे पुर्वी मेघना ऐवजी सुप्रिया आणि आदित्य ऐवजी अजित असणार होतं Happy

काय चालल्य इथे?
काल सहज चॅनल उलट्पुलट करताना पाहिले की देसाइ फॅमिली संगित खुर्ची खेळत होते? कशाला ते? कि आता तेवढच बाक्की राहिलय करायला?:फिदी:
मधुन मधुन बघितले तर संदर्भ लागला नाही.
हो आणि अमित विजया उगाच लाडात आलेले Wink काते?

झंपी ..मी पण डोकावले काल अधुन मधुन.
फक्त अमित -विजयाच नाही तर अर्चू-सतीश आणि शेवटी आदे-मेदे पण लाडात आलेले. का तर म्हणे सगळं सुरळीत झालंय तर बरं वाटतंय असे काहीसे संवाद होते.

बोर आहेत सगळे...
काय ती लुटुपुटीची भांडण दाखवायचे आदे-अर्चु, अदे-अर्चु, आदे-अदे Angry

अर्चूने काल कलेजा खलास केला.

हिरवागर्द की हिरवाजर्द की हिरवागार ड्रेस! आरश्यासमोर आवरता आवरता नवर्‍याला उचकवले. आणि मग नवर्‍याला उश्यांनी मारहाण केली.

बाकी नेहमीचे दळण होते. दोन तीन जुजबी फरक इतकेच की आदेचा मोठा भाऊ आणि वहिनी प्रथमच पतीपत्नीप्रमाणे वागताना दाखवले, बाबाजी घर सोडून गेले आणि मेघनाने फोन ठेवल्यावर 'बाबा घर सोडून गेले' असे म्हंटल्यावर प्रत्येकाच्या चेहर्‍यावर वेगवेगळे आश्चर्य दाखवण्यात वेळ घालवला गेला नाही.

खरं तर मेदेच्या आईचा चेहरा इतका बापुडवाणा आहे की आनंदही बापुडवाणा, केविलवाणा, दु:खी वाटतो अगदी त्याला ती बिचारी काय करेल? चला पाककला संपल्या आता क्रिडाप्रकार चालू झाले का? वा छान!!! (आता हआहैको सारखं क्रिकेट मॅच पण दाखवा, एखादा टफी दाखवा... त्याचा अभिनय तरी नैसर्गिक वाटू देत) बाकीचे चॅनेल्स बदलायची तसदी घेऊ नये प्रेक्षकांनी अशी उदार इच्छा असणार!

बेफी किती ती नजर लावायची एखाद्याला Proud

आदित्य देसाई एक्झिट घेणार असे दिसतेय मग मराठी 'बाबुल' चालू होणार ...>>>

अर्र, मग काय "राम" राहिल त्या मालिकेत? आणि मग कोणाकरता बघायची ति मालिका? Proud

आपलीमराठी.कॉम वर गोळाबेरीज म्हणुन एक चित्रपट आहे पुलंच्या व्यक्तीवल्लींवर आधारित ..
त्यात बुटकं बैंगन aka मेघना लावणी नाचत होती ..
http://www.mtalky.com/o/m.aspx?m=1107&s=1&g=Watch%20Movie&c=83200

रिये तुझ्या एका वाक्यात जुयेरेगा वर काय सुरू आहे ते कळलं बघ.
नाहीतर तिथं काय चाललंय तेच विचारायला आलेले. आजकाल ही सिरियल रात्री रिपिट नसल्याने बघणं होतं नाही (नशिब माझं :फिदी:)

नशिब माझं >> खरच खरच Lol

मी आत्ता मधे ३ दिवस सुट्टीवर होते म्हणून पाहिली Happy
मलाही पाहिला नाही मिळतं (नशिब माझं पण Lol )

बाबाजी सध्या घर सोडून गेलेत ना.... तर देसाईंच्या घरची भोचक अर्चू सहज म्हणून बोलून गेली मेघनाच्या आईला तुम्ही कसे राहता या माणसाबरोबर, सोडून द्या त्यांना... मग सगळे आता असाच विचार करतायत फक्त मेघना सोडुन. यावर नाना-माईंचे ज्ञानामृत पाजणे चालू आहे.
मेघना डिस्टर्ब आहे खरंच आई बाबा वेगळे होणार का या भितीने... बाकी काही नाही चालू आहे.

Pages