कही दीप जले कही दिल...
माझ घर १४ व्या माळ्यावर आहे. कधी कधी गुलझारचा चंद्र समोर उभ्या असलेल्या २६ व्या माळ्याच्या इमारतीवर येतो तर कधी "एकसो सोला चांदकी राते..." म्हणत म्हणत तो माझ्या तनामनात शिरतो.
आणखी दोन दिवसांनी अमावस्या आहे. सिंगापुर सारखी शहरे आणखीच लकाकायला लागतात अवसेच्या रात्री. आज धनत्रयोदेशी निमित्त मी दक्षिण दिशेला खिडकीत यमदीप तेवला आणि रुममधील दिवा मालवताना तो मंद मंद प्रकाश बघून मला कमालीचे प्रसन्नचित्त वाटले. तेलातुपाच्या मिणमिणत्या दिव्यामधे एक वेगळेच चैतन्य असते. कधी कधी ह्या दिव्याच्या प्रकाशाने आपल्याही मनातला एखादा उदासिन, काळोखी कोपरा कधी उजळून निघतो हे कळत देखील नाही.
आमच्याकडे कणकेच्या दिव्याचा खूप मान असतो. माडी पौर्णिमेला माझी आई कणकेचे माडे बनवते. हे दिवे उभट असतात. माडी सारखे उंच म्हणून ह्यांना माडे म्हणतात. भुलाबाया ज्या दिवशी उठतात अर्थात कोजागिरीला त्या दिवशी बाजारात नुसते मातिचे माडे विकायला येतात. हल्ली येतात .. पण पुर्वी घरीच माडे बनवत. बावधनच्या आमच्या घराशेजी माती वगैरे मिळत नाही म्हणून आईने कणकेचे माडे बनवले होते.
मी कमळाचे फुल पाहिले ते फक्त चित्रात आणि कधीमधी एखाद्या सिनेमात. कंबोडियाला मात्र कंमळाची फुले गवत उगवावे तसे जिथे तिथे पहायला मिळात. त्यांना ह्या फुलाचे मुळीच वाण नाही. बुद्धाला कमळाचे फुल अर्पण करतात फुलाचे लांब लांब देठ हातात धरुन प्रसन्न शांत चित्ताने भाविक पुढे पुढे पाऊल टाकतो आणि पाठित कमरेत न वाकता गुडघा टेकवून मान वाकवतो आणि बुद्धाला नमस्कार करतो ती त्यांची नमस्काराची पद्धत खूप भावली. एक गरीब देश पण मनाची संस्कृतीची केवढी श्रीमंती!!!!
दिवाळीला विकायला येणारी कमाळाची फुले खरे तर कळी ह्या रुपातच असतात. लवकर नाही घेतली की कळ्यांच्या माना बदकासारख्या खाली वाकतात. मी एकदा एकच कमळाचे फुल घेतले. घरी आणून एका ग्लासात पाणी घरुन त्यात देठ बुडवणार येवढ्यात ग्लास लवंडला कारण देठ जड होते. मग मी फ्रिजमधे ते फुल ठेवले. संध्याकाळी पुजेला बाहेर काढणार तर काठाला असलेल्या पाकळ्या अध्धर बाहेर आल्यात. पणतीसारखा त्यांचा आकार बघून मग मी सगळ्याच पाकळ्या उकलून एक खरी पणती .. एक पाकळी.. एक पणती.. एक पाकळी असे करत करत हे एक ताट सजवले. दिवे मालवले आणि त्या सोनेरी गुलाबी प्रकाशात मी न्हाऊन निघालो.
आयटीमधे काम करणार्यांच्याकडे पुजा कधी होत असेल? मला तर दहा अकरा सहज वाजतात. आज मी ११ वाजता दिवे लावले. काल पाण्यात बुडवून ठेवले होते. पहाटे तिरपे करुन ठेवले जेणॅकरुन पाणी निथळून दिवे कोरडे होतील. आज दोन दिवे खिडकीत, दोन दारापुढे, एक रेस्टरुमधे, एक किचनमधे असे सात दिवे लावलेत. १४ माळ्यावरुन पणतीच्या ज्योतीकडे बघताना समोरचे गगनचुंबी जग किती फिके वाटते!!!!
तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या उदंड शुभेच्छा!!!!! आयुष्यात आपण आपले आयुष्य उजळून निघायला खूप प्रयत्न करतो. आपल्या आजूबाजूला खूप अंधार आहे. तुमच्या मनात स्वतःसाठी जळणार्या दिव्याचा थोडासा प्रकाश त्या अंधाराकडे पोहचू द्या!!!
बी
वाह ! बी लेख आवडला. दिव्यांची
वाह ! बी लेख आवडला. दिव्यांची आरास आणि त्यामागची भावना सुद्धा पोहोचली
तुला पण दिवाळीच्या अनंत शुभेच्छा!
बी, तुम्हाला देखील दिवाळीच्या
बी, तुम्हाला देखील दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! पणत्या सुरेख दिसतायत!
लेख वाचून home sick झाले! घरापासून दूर ७वी दिवाळी what is our search worth? What is our destiny! Say oye oh hoye!
मस्तच बी!
मस्तच बी!
टची लिहीले आहे .. दिवाळीच्या
टची लिहीले आहे .. दिवाळीच्या शुभेच्छा!
पहिल्या फोटोत कसली फुलं आहेत? आणि दुसर्यात पाकळ्या आहेत त्या कमळाच्या आहेत की गुलाबाच्या?
बी अगदी पणत्यांच्या
बी अगदी पणत्यांच्या ज्योतीच्या प्रकाशासारखा आहे हा तुझा लेख, ज्यामुळे डोळे आणि मन दोन्ही प्रसन्न झाले.
तुलाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
सशल, पहिल्या फोटोतली फुले
सशल, पहिल्या फोटोतली फुले बुचाची/आकाशनिंबाची आहेत आणि दुसर्या फोटोमधील पाकळ्या कमळाच्या आहेत.
धन्यवाद सर्वांना!!!!!
धन्यवाद बी .. मला बुचाची आहेत
धन्यवाद बी .. मला बुचाची आहेत असं वाटत होतं ..
कमळाच्या पाकळ्या लांबट उभ्या असतात असं वाटत होतं .. अशा गोल्ही असतात का?
मस्तच बी! दिवाळीच्या शुभेच्छा
मस्तच बी! दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला व सर्वाना!
छान लिहलयं .. दिवाळीच्या
छान लिहलयं .. दिवाळीच्या शुभेच्छा
सशल, ह्याला लक्ष्मीकमळ
सशल, ह्याला लक्ष्मीकमळ म्हणतात. ह्या कमळाच्या पाकळ्या गोलसर खोलगट असतात.
छान लिहिलाय लेख फार. फोटोपण
छान लिहिलाय लेख फार. फोटोपण मस्त आहेत. त्या कमळाच्या पाकळ्या आवडल्या.
मस्त लिहीलयस बी. दिवाळीच्या
मस्त लिहीलयस बी. दिवाळीच्या शुभेच्छा.
कित्येक वर्षानंतर बुचाचे फुल बघितले.
मस्त! दिवाळीच्या शुभेच्छा!
मस्त! दिवाळीच्या शुभेच्छा!
बुचाही फुल, आमच्या घरासमोर एक
बुचाही फुल, आमच्या घरासमोर एक झाड होत, काय मस्त वास अस्तो ह्याचा!
दिवाळीच्या शुभेच्छा!!
शिर्षकावरुन काहीतरी रडवणारी स्टोरी असेल अस वाटल होत
मस्त लिहिलयसं बी, सर्वांना
मस्त लिहिलयसं बी,
सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा !
छान लिहिलं बी. दिवाळीच्या
छान लिहिलं बी. दिवाळीच्या शुभेच्छा!
छान लेख ! सर्वांना
छान लेख ! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा !
आपल्या आजूबाजूला खूप अंधार आहे. तुमच्या मनात स्वतःसाठी जळणार्या दिव्याचा थोडासा प्रकाश त्या अंधाराकडे पोहचू द्या!!! >> +१०००
छान लिहीले आहे!! दिवाळीच्या
छान लिहीले आहे!!
दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना !
छान आहे लेख. दिवाळीच्या
छान आहे लेख. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाचायला आवडला आणि फोटोही छान आहेत.
दिवाळीच्या शुभेच्छा ! चांगलं
दिवाळीच्या शुभेच्छा ! चांगलं लिहिलय.
सुंदरच लिहिलंय, अगदी
सुंदरच लिहिलंय, अगदी मनापासून.
दिवाळीच्या शुभेच्छा !
छानच लिहलयं फोटो पण
छानच लिहलयं फोटो पण मस्त.
>>तुमच्या मनात स्वतःसाठी जळणार्या दिव्याचा थोडासा प्रकाश त्या अंधाराकडे पोहचू द्या!!!<< हे खुप आवडलं
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
बुचाची फुले फारच मस्त दिसत
बुचाची फुले फारच मस्त दिसत आहेत!
क्या बात है, बी!!! सुरेख
क्या बात है, बी!!!
सुरेख लिहिलं आहेस.
तुलाही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
छान लिहिलेत बी. तुम्हालाही
छान लिहिलेत बी. तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
छानच लिहलयं फोटो पण
छानच लिहलयं फोटो पण मस्त.
तुलाही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
छानच लिहलयं फोटो पण
छानच लिहलयं फोटो पण मस्त.
तुलाही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!>> +१
बी,कितीसुरेख लिहिलं आहे.
बी,कितीसुरेख लिहिलं आहे. आमच्याकडे ,माझी आई कणकेत थोडी हळद टाकून उभट दिवे बनवायची.पहिल्या आंघोळीच्या दिवशी फराळ म्हणून ५ प्रकारचे पोहे असतात (.आपला नेहमीचा फराळ पण केला जातो ).ताटाभोवती रांगोळी काढून औक्षण केले जाते.दर दिवाळीत या बालपणीतल्या आठवणी डोकावतात.
तुम्हालाही दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
बी, तुझं सुंदर्,मनापासून
बी, तुझं सुंदर्,मनापासून लिहिलेलं लिखाण खूप आवडलं, विशेष म्हंजे अंतर्बाह्य उजळल्यासारखं वाटलं..
दुसर्यांकरता काहीतरी छान छान करावसं वाटलं..
तुलाही दिवाळी च्या खूप सार्या शुभेच्छा!!
तुझ्या घरच्या पणत्या ही खूप सुंदर आहेत..
दिवाळीच्या अनेक शुभेच्छा,
दिवाळीच्या अनेक शुभेच्छा, बी.
सुरेख लेख आणि फोटोही.
<<तुमच्या मनात स्वतःसाठी जळणार्या दिव्याचा थोडासा प्रकाश त्या अंधाराकडे पोहचू द्या>> हे मात्रं अगदी खास
Pages