स्फुट

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मी सध्या थ्री कप्स् ऑफ टी हे पुस्तक वाचत आहे .. साधारण ७०% एव्हढं वाचून झालं आहे .. आतापर्यंत पुस्तक खूप खूप एन्जॉय केलं .. अजूनही करतेच आहे पण काल-परवापासून जो भाग वाचत आहे तो वाचून थोडं उद्विग्न झाल्यासारखं वाटलं म्हणून हा प्रपंच ..

सध्या वाचतेय त्या भागात कारगिल युद्धाच्या वेळचे रेफरन्सेस् आहेत .. युद्ध हे कोणाहीकरता वाईटच हाच टोन आहे आणि अजिबात कुठेही भारताबद्दल अपशब्द नाहीत (अजून तरी) .. म्हणजेच त्या भागावरून (LOC) आपल्यात आणि पाकीस्तान मध्ये जे टेन्शन आहे ते अगदी व्यवस्थित पॉलिटिकली करेक्ट शब्दांत मांडलं आहे .. पण आता जो भाग वाचतेय त्या वर्णनांत भारतीय हल्ल्यामुळे तिथली खेडी, तिथे वस्तीला असणारे लोक ह्यांचं कसं अतोनात, भरून न निघणारं शारिरीक आणि मानसिक नुकसान झालं ह्याचं वर्णन आहे .. जे झालं त्याबद्दल खेद तर आहेच पण कुठेतरी भारतीय अस्मिता आड येतेय आणि सारखा विचार येतो की आमच्याकडच्या निरागस लोकांनांही बळी पडावं लागलंच आहे ना .. पण फक्त केवळ ह्या पुस्तकात उल्लेखलेला माउंटेनिअर पाकीस्तान मध्ये असलेलं K2 सर करताना एका खेड्यात पोचला आणि नंतर त्याने कृतज्ञतेच्या भावनेतून तिकडच्या लोकांनां कशी मदत केली, शाळा आणि वेळेला बेसिक गरजा भागवण्याकरता मदत निधी अमेरिकेतून गोळा करून .. पण वाचणार्‍याला वाटेल भारताने कारगिल युद्धात किती निरागस पाकीस्तानी लोकांचं नुकसान केलं, त्यांनां बेघर केलं .. अपरूट केलं वगैरे वगैरे ..

आमच्याकडच्या अशा लोकांचं, त्यांच्या बाबतीत काय घडलं हे सांगणारं "थ्री कप्स् ऑफ टी" कुठे आहे? त्यांनां मदत करणारा ग्रेग मॉर्टेन्सन नाही का घडला अजून? मला नक्की कसला राग आलाय हे नीट सांगता येत नाहीये .. पण कारगिल युद्धात जर त्यांच्याकडच्या निरागस माणसांचं असं न भरून निघणारं नुकसान झालंय तसं आमचंही झालंय .. हे सगळं हायलाईट करून जगापुढे आणणारी पुस्तकं आहेत का? कोणाला माहित आहेत का?

ह्याबद्दल नीट ज्ञान, माहिती मला नाही म्हणून अज्ञानापोटी असू शकेल उद्विग्नता पण ती जाणवली आणि व्यक्त कराविशी वाटली एव्हढंच ..

विषय: 
प्रकार: 

वाचलेले नाही त्यामुळे कल्पना नाही. हल्ल्यांचे वर्णन ऑब्जेक्टिव्ह रीत्या लिहीलेले दिसत नाही. त्यामानाने फाळणीबद्दल हिंदू/मुस्लिम किंवा भारतीय्/पाकिस्तानी या दृष्टीकोनातून न बघता दंगेखोर व सामान्य लोक या दृष्टीकोनातून लिहीलेले वाचले आहे.

मधे न्यू यॉर्क टाईम्स च्या बेस्टसेलर लिस्ट मधे कायम दिसत असे हे पुस्तक.

फार पूर्वी वाचले होते आता नक्की आठवत नाही. पण भारतात असे पुस्तक घडणे कठीण आहे कारण कितीही हानी झाली तरी भारताच्या गोष्टीत "ड्रामा एलीमेंट" जो पुस्तक बेस्ट सेलर व्हायला आवश्यक असतो तो सापडणार का?
१) फक्त २९% पाकिस्तानी महिला हायस्कुलात जातात. भारतात हे प्रमाण ५०% इतके आहे.
२) प्रायमरी शाळेत ६२% तर भारतात ९४%
३) भारतात शाळा किंवा इतर विकासाच्या प्रयत्नात अडथळे येतात पण त्याचे स्वरूप आपल्या शेजारी देशांच्या इतके जीवघेणे, ड्रामा नसतो - मुलीला शाळेत जाते म्हणून पोलिसांनी ठार मारले इ इ. लाल फीत, लाच, मानसिकता असले विषय असतात.
४) भारत जरी तटस्थ देश असला तरी ९०च्या दशकात जेव्हा कोल्ड वाॅर नुकतेच संपले होते तेव्हा अमेरिकेतून भारतात येणारे आणि अमेरिकेत भारताच्या विकासासाठी पैसा उभे करणारे लोक फार थोडे होते. त्यांचे प्रयत्न पुस्तकस्वरूपात अजून तरी वाचनात आले नाहीत.
५) अमेरिका- पाकिस्तान संदर्भाने अजून एक दोन मुद्दे आहेत पण माझा राजकारणाचा अभ्यास नसल्याने थांबते.

स्त्री शिक्षणा/जीवना बद्दल 'रीडिंग लोलिता इन तेहरान' पण मिळाले तर ट्राय कर. उद्विग्न नाही वाटणार Happy

>> हल्ल्यांचे वर्णन ऑब्जेक्टिव्ह रीत्या लिहीलेले दिसत नाही

हो .. म्हणजे सिव्हिलियन भागांवर शेलींग झालं आणि कॉन्फ्लिक्ट संपल्यावरही शेलींग चालू होतं, तेही सिव्हिलियन भागांत असे उल्लेख आहेत ..

सीमंतिनी, भारतात असं पुस्तक घडावं, ग्रेग मॉर्टेन्सन हवाच आहे असं नाही .. कारण अर्थातच तू दिले आहेस ते स्टॅट्स .. आणि तिकडच्यासारखा ड्रामा आपल्याकडे नाही असं तू दिलेलं कारणही अगदी पटलं .. पण या बेस्ट सेलर मधून कारगिल युद्धा बाबत पाकीस्तान करता सहानुभती निर्माण झालेली मला सहन झाली नाही .. म्हणून उद्विग्नता .. असं एखादं बेस्ट सेलर भारतावर निघालं २००८ च्या हल्ल्यांतून किंवा आतापर्यंत जेव्हा जेव्हा अतिरेकी कारयावांत पाकीस्तानी हस्तक्षेप दिसून आलाय अशा कुठल्याही घटनेत होरपळून निघालेल्या निरागस लोकांविषयी की मग कळेलच किती मिळतेय सहानुभुती इंटरनॅशनली ..

"रीडींग लॉलिता इन तेहरान" या रेकमेन्डेशन करता धन्यवाद .. नक्की वाचेन .. Happy

आताही भारत-पाकिस्तान सीमेवर गोळीबार आणि गोळाबारी (तोफ गोळे) चालू आहे. भारतातल्या वृत्तपत्रांत, वृत्तवाहिन्यांवर आपल्या देशात झालेल्या हानीचे वर्णन असते. तिकडची परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी अधूनमधून तिकडची वृत्तपत्रे पाहतो. एरव्ही दोन्हीकडची वृत्तांकने पलीकडून होणार्‍या unprovoked firing , त्यात झालेले नुकसान व आपल्याकडून दिले जाणारे उत्तर अशीच असतात.
पण आज डॉनमध्ये ही बातमी दिसली.
दोन्ही बाजूंच्या सिव्हिलयन्सच्या सफरिंगवर फोटो फीचर आहे.

हा प्रतिसाद विषयाला सोडून वाटला तर सांगा. उडवेन.

२००८ च्या मुंबई हल्ल्यावर एक ब्रिटीश पत्रकारचे पुस्तक आहे. मागच्या वर्षी प्रकाशित झाले आहे. पुस्तकाचे नाव " द सीज" असे आहे.Author: Levy Adiran & Scott Clark Cathirine , The ultimate account of 26/11 from two acclaimed investigative journalists.
Publication - Penguin India.

हे पुस्तक वाचून मी पण एकदम भारावून गेले होते. पण ह्या पुस्तकाबद्दल पुढे बरीच कॉन्ट्रोव्हरसी झाली. हे पुस्तक nonfiction म्हणून लिहिले गेले, तसा त्याचा क्लेम होता, पण प्रत्यक्षात असे लक्षात आले की हे fiction आहे, ह्यातल्या सगळ्याच घटना प्रत्यक्ष घडलेल्या नसून लेखकाने रचलेल्या देखील आहेत. शिवाय त्याच्या charity बद्दल देखील खूप प्रश्न उठले होते…
मला पुस्तक आवडलं होतं, पण ह्या सगळ्यामुळे माझी खूप चिडचिड झाली होती, की काय खरं, नक्की कशावर विश्वास ठेवायचा असं वाटून !

समहाऊ, मला प्रामाणिकपणे आश्चर्य वाटतं!

जे अमेरिकेत राहणार्‍यांना नाही वाटत ते भारतात राहणार्‍या मला आपोआप किंवा अचानक का वाटतं, ह्याचं!

ह्यात कोठेही दर्पोक्ती वगैरे अजिबातच नाही ह्याबद्दल खात्री बाळगावीत. प्रामाणिक मत आहे.

प्रामाणिकपणे असे वाटते की अश्याच दृष्टिकोनाचे पुस्तक अमेरिकेत उचलून धरले जाईल ह्याची त्या लेखकाला जाण असावी. किंवा प्रामाणिकपणे असे वाटते की अमेरिकन शासनातील कोणीतरी अश्याच आशयाच्या पुस्तकाला महत्वाचे मानेल व इतरांनी मानावे अशी त्याची पब्लिसिटी होऊ देईल.

प्रामाणिकपणे असे वाटते की भारताची प्रतिमा मलीन करणे हा अमेरिकेतील कोणत्यातरी एका घटकाचा नक्कीच अजेंडा असावा. प्रामाणिकपणे असे वाटते की पुस्तकावर झालेले आरोपही पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठीच झालेले असावेत.

जग लहान झालेले आहे. भारतातील निष्पापांच्या दुर्दैवी कथा जगाला समजत नसतील ह्यावर विश्वास बसू शकत नाही.

प्रामाणिकपणे असे वाटते की अमेरिका नेहमीच त्यांना सहाय्य करेल जे त्यांच्याशी शत्रूत्व घेण्याचा विचारही करू शकणार नाहीत. अमेरिका नेहमीच त्यांना पाण्यात बघेल जे देश अमेरिकेच्या तुलनेत असतील तर खूपच कमकुवत, पण अमेरिकेचे डॉमिनेशन सहन करणार नाहीत.

>>>कुठेतरी भारतीय अस्मिता आड येतेय<<< देस पराया छोडके आजा!

>>>आमच्याकडच्या अशा लोकांचं, त्यांच्या बाबतीत काय घडलं हे सांगणारं "थ्री कप्स् ऑफ टी" कुठे आहे? <<<

तुम्ही घ्या लिहायला! कोणी थांबवलंय?

>>>त्यांनां मदत करणारा ग्रेग मॉर्टेन्सन नाही का घडला अजून? <<<

भारतीय निष्पाप लोकांचे दुर्दैव जगापुढे आणण्यास भारतीय माध्यमे सक्षम आहेत. एखादा परकीय ग्रेग मॉर्टेन्सन येथे आवश्यक नाही.

मला नक्की कसला राग आलाय हे नीट सांगता येत नाहीये .. <<<

बहुधा आपण जिथे आहोत तिथे असायला नको असूनसुद्धा असावे लागत आहे ह्याचा! कारण तिथे हे पुस्तक सलग तीन वर्षे बेस्ट सेलर होऊ शकते.

>>>पण कारगिल युद्धात जर त्यांच्याकडच्या निरागस माणसांचं असं न भरून निघणारं नुकसान झालंय तसं आमचंही झालंय .. हे सगळं हायलाईट करून जगापुढे आणणारी पुस्तकं आहेत का? कोणाला माहित आहेत का?<<<

रिपिटेशन!

=====

सशल,

तुम्हाला उद्देशून एक वाक्यही वैयक्तीक नाही वरील प्रतिसादात! उलट तुमचे अभिनंदन, की तेथे राहूनही तुम्हाला आपल्या लोकांबद्दल अश्या भावना बोलून दाखवाव्याश्या नुसत्या वाटल्याच नाहीत तर त्या शेअरही कराव्याश्या वाटल्या.

दुखावला गेला असलातच तर क्षमस्व!

-'बेफिकीर'!

बेफि, काही गोष्टी पटल्या. अमेरिकेत भारताची news value फार कमी आहे. का ते मला माहिती नाही..कदाचित आपली nuisance value देखिल कमी आहे म्हणून असेल. पण american news मध्ये मुख्यतः (उतरत्या क्रमाने) middle east, Africa China, south america, Pakistan, Europe इ. ठिकाणच्या न्यूज ची चलती असते. अर्थात हा क्रम काळानुसार थोडा फार बदलू शकतो पण एकूण नावे तीच! Australia, New zealand तर दुसऱ्या ग्रहावर असावेत की काय अशी शंका येण्याइतपत कमी झळकतात.

प्रतिसादांकरता धन्यवाद ..

रार, मला अजिबात माहित नव्हतं ह्या काँट्रोव्हर्सी बद्दल .. थँक्यू .. हे पुस्तक २-३ वर्षांपुर्वी कोणीतरी मला गिफ्ट दिलं होतं आणि ती व्यक्ती आणि अजून एक (ज्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे )ज्यांनीं हे पुस्तक मी वाचावं म्हणून रेकमेन्ड केलं होतं त्यांनां तेव्हा ह्या काँट्रोव्हर्सी बद्दल माहिती नसावी किंवा त्यांनीं ती मला दिली नसावी .. ह्यातलं काही खोटंनाटं असू शकेल असा विचारही आजतागायत माझ्या मनाला शिवला नव्हता आणि त्यामुळेच त्या दृष्टीने कधी काही समोर आलं नाही .. दोन-अडीच वर्षं गेल्यावर ते पुस्तक सिरीयसली वाचायचा मुहुर्त लागला पण ..

सशल, हे खरंच वाईट आहे.

माझं अमेरिकन मिडियाचं जे एक्स्पोजर आहे त्यात पाकिस्तानचं नाव अफगाणिस्तान, इराकच्या जोडीने घेतलं जातं. तिथे कोणीही अमेरिकन सुखासुखी जात नाही. मलाला केसबद्दलही खूप वाचलंय.
याउलट इंडियाची आय टी इंडस्ट्री, मार्स मिशन याबद्दल चांगलं वाचलंय. योगा वगैरेची क्रेझ असते. योगा रिट्रीटसना, राजस्थानला, गोव्याला फिरायला जायचं असतं. इंडियन फूड तर अगदी आवडतं.
पाकने ९/११ व अबोटाबादनंतर अमेरिकन्सचं प्रेम गमावलंय.