Submitted by हर्ट on 26 September, 2014 - 11:06
दिल्लीमधील एका प्राणीसग्रहातील ही कालची घटना आहे. एक मुलगा वाघाला बघता बघता खाली पडला आणि वाघाची शिकार ठरला. सुमारे १५ मिनिटे तो जीव वाचावा म्हणून धडपडत होता. तूनळीवर ही घटना बघताना शहारे येतात. तो २० वर्षाचा मुलगा मदतीसाठी प्रयत्न करतो आहे आणि आजूबाजूला विखुरलेली जनता फक्त बघते आहे. प्राणी संग्रहालय निर्माण करताना तिथल्या अधिकाराला जराही सुरक्षितेची खबरदारी करता आली नाही ह्याचे फार नवल वाटते. १५ मिनिटाच्या काळात काहीतरी मदत करता आली असती.
अशा प्रसंगी तुम्ही जर तिथे असता तर काय करु शकला असता जेणेकरुन त्या मुलाचे प्राण वाचवता आले असते? ह्या धाग्याचा उद्देश हा आहे की जे झाले ते झाले पण जे झाले ते खूप वाईट झाले ... अशावेळी आपली भुमिका काय असावी?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राणीसंग्रहालयातील हिंस्त्र
प्राणीसंग्रहालयातील हिंस्त्र पशूंना अन्न मिळावे म्हणून कत्तलखान्यात जनावरे मारत नसतात.
>>>>>
म्हणजे उद्या मी कत्तलखान्यातील जनावर खाल्ले तर माझ्या माथी मांसाहाराचे पाप लागणार नाही का?
(असंबद्ध वाटले तर बी आणि माझी चर्चेचा संबंध घ्या)
आणि हो, फुकट तर मिळत नसणार ते, त्याची किंमत चुकवावी लागत असणार. आणि किंमत चुकवावी लागत असेल तर खास त्यासाठी म्हणून मारले जात नाही हा मुद्दा बाद ठरतो.
असो, तसेही आठवड्याला एखादे जिवंत जनावर देतात हेच पुरेसे ठरावे.
असो, तसेही आठवड्याला एखादे
असो, तसेही आठवड्याला एखादे जिवंत जनावर देतात हेच पुरेसे ठरावे.<<<
तुम्ही काय लिहीत आहात ते तुमच्या लक्षात येत आहे का?
वाघाला शिकारीची सवय राहावी म्हणून आठवड्याला एखादी बकरी किंवा कोंबडी आत सोडतात. आता घडलेल्या घटनेच्या वेळी करण्याचा उपाय म्हणून बी ह्यांना एक अचाट व अगाध कल्पना सुचली की जवळपास एखादा दुसरा लहान प्राणी असता तर तो उचलून आत टाकता आला असता.
१. म्हणजे माणूस आत पडलेला पाहून गर्दीने आधी स्वतःला सावरणे
२. जवळपास एखादी कोंबडी, बकरी, मेंढी, हरीण यासारखे काहीतरी असणे
३. ते आत टाकले तर वाघ माणसाकडे दुर्लक्ष करेल असा अगाध उपाय कोणालातरी सुचणे
४. सुचल्यावर तो लहान प्राणी पटकन धरणे व उचलून आत टाकणे
ह्या सगळ्यावर तुम्ही आणि बी गंभीरपणे चर्चा करत आहात. त्यात बींचा मुद्दा असा की त्यांना इतर प्राण्यांबद्दल एरवी वाटणारी कणव ह्या प्रसंगी गुंडाळून ठेवण्यास ते तयार होतीलसुद्धा कारण शेवटी एक माणूस हकनाक मरणार आहे म्हणून! त्यात तुमचा मुद्दा असा की नाहीतरी वाघ रोज मटण खातोच, तर असा दुसरा प्राणी पटकन उचलून आत टाकला तर त्याच्या हत्येचे वाईट वाटण्याचे कारण नाही.
ह्यावर मी लिहिले की रोजचे मटण हे असा प्राणी आत सोडून पुरवले जात नाही व त्यावर ही पुढची चर्चा झाली.
फक्त एका साध्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे किंवा बींकडे आहे का?
समजा एखादी शेळी धरली, उचलली आणि दिली आत भिरकावून, तर वाघ तिला मारून ती शेळी खायच्या आधी ह्या माणसालाही नुसतेच मारणार नाही ह्याची काही गॅरेंटी आहे का? किंवा आधी माणसाला मारून मग शेळीला सहज पकडणार नाही ह्याची काही खात्री वगैरे?
म्हणून आधी जरा विनंतीपूर्वक म्हणालो की विषयाला फाटे फुटून ह्या दुर्दैवी घटनेच्या धाग्यावर हास्यविनोद किंवा वादावादी होईल असे कृपया काही लिहू नका. ही फक्त एक वैयक्तीक विनंती होती. मान्य करणे न करणे तुम्हा दोघांवर आहे.
आठवड्याला एखादे जनावर जिवंत आत सोडणे आणि माणूस वाचावा ह्यासाठी वाघाचे दुर्लक्ष व्हावे म्हणून कोणतातरी प्राणी अचानक आत सोडणे ह्यात किती तफावत आहे ते लक्षात येऊ शकेल का? वाघाच्या एका पंजाच्या फटक्यात शेळ्या मेंढ्या मरतात. त्याचे सुळे आणि मानेचे मसल्स इतके भयंकर असतात की त्याने अलगद दात रोवले तरी एखादे मोठे जनावर श्वास घेता न आल्यामुळे मरते. माणसानंतर एक शेळीही मस्तपैकी आत येऊन पडली हे पाहून वाघ त्या माणसाकडे काही काळ दुर्लक्ष करेल ही अपेक्षा - माफ करा, पण - अतिशय हास्यास्पद आहे.
बेफिकीर. हसल्याबद्दल सॉरी, पण
बेफिकीर.:फिदी: हसल्याबद्दल सॉरी, पण बी ला खरच साष्टान्ग नमस्कार. मूळात तो काय लिहीतो, काय विचार करतो हे त्यालाच समजत नाही. पण तुमच्या या पोस्ट् ला भरपूर अनुमोदन.
बेफीकिर यांना
बेफीकिर यांना अनुमोदन्...मार्जार जातीच्या सगळ्याच प्राण्याचे सुळे भयंकर म्हणजे भयंकरच असतात्...एवढेच कशाला आपल्या घरातल्या पाळिव मांजराचे घ्या त्याला पण शंका आली की फिस्स करुन धावते तुमच्यावर आणि जर तुंम्ही ओळखीचे नसाल तर चावते पण,त्यांचा चावा पण जबरदस्त असतो...तळहातातुन जवळजवळ सुळे आरपार जातात(स्वानुभव)...
सीमा खरय हे. शेजारच्या काकुनी
सीमा खरय हे. शेजारच्या काकुनी सान्गीतलेला एक अनूभव. त्यान्च्या घरात रोज एक मान्जर यायची आणी दूध पिऊन, भान्डी वगैरे पाडुन पळुन जायची. शेवटी राग येऊन त्यानी तिला किचनमध्ये कोन्डली. खिडकी बन्द असल्याने तिला बाहेर पळता आले नाही.
मग तासाभराने दाराची कडी त्यानी हळूच काढली, आणी मान्जर कुठे दिसतेय का ते वाकुन बघत होत्या, तर २ मिनीटात त्या मान्जरीने अक्षरशः त्यान्च्या अन्गावर उडी मारली आणी रागाने गुर्र गुर्र करुन त्याना बरेच ओरबाडले. बहुतेक तिला कोन्डुन ठेवले म्हणून तिला राग आला असेल तो तिने असा व्यक्त केला. त्या दिवसापासुन त्या मान्जरीपासुन दूर रहायला लागल्या.
जनरली हे प्राणी स्वतःहून कुणाला ईजा करत नाहीत. अगदीच गरज पडली तर स्वतःच्या लहान पिल्लासाठी वगैरे दुसर्यावर धाऊन जातात. नाहीतर पिसाळलेले वगैरे असतील तरच हल्ला करतात. परवा केरल मधले दाखवले. मिरवणूकीत एक हत्ती बेफाम झाला, आणी त्याने माहुताला तसेच दुसर्या हत्तीला पण धक्का देऊन पाडले.
शेवटी आपणच खबरदारी घ्यावी. ही मुकी जनावरे काय बोलु शकणार त्यान्ची व्यथा? पण त्या मुलाच्या आई बद्दल पण वाईट वाटले. दुसरा आधार होता तो पण गेला.:अरेरे:
बेफिकीर, एवढ्या मोठ्या
बेफिकीर, एवढ्या मोठ्या पोस्टबद्दल धन्यवाद
माझ्या आणि बी मधील चर्चेला वेगळी पार्श्वभूमी होती जी आपल्याला माहीत नसल्याने आपल्याला हा त्रास झाला त्याबद्दल क्षमस्व
ऋ, फेफिकिर ह्यांना कीबोर्ड
ऋ, फेफिकिर ह्यांना कीबोर्ड बडवायला फक्त संधी हवी असते. त्यांच्या बहुतेक पोष्टी एक दोन पानाच्या असतात. आणि रश्मी ह्या फार विचारवंत आहेत. त्यांना आपल्यासारख्याचे विचार वाचून आपण इथे जे लिहितो ते कधीच पटत नाही.
बी | 8 October, 2014 - 15:48
बी | 8 October, 2014 - 15:48 नवीन
ऋ, फेफिकिर ह्यांना कीबोर्ड बडवायला फक्त संधी हवी असते.<<<
ठीक आहे, मोठ्या मनाने माफ करा.
बरोबर आहे माझा स्वानुभव पण मी
बरोबर आहे माझा स्वानुभव पण मी असाच घेतलाय्...शेजार्यांचे झोपलेले मांजर मांडीवर उचलुन घेतले मग त्याने माझा हातच फोडला...अगदी जोरात रक्तस्त्राव झाला आणि ३ दिवस मी मनगटापासुन पुढचा हात हलवुपण शकत नव्हते...
वाघाने चावा घेतल्यावर काय होईल याची कल्पना पन नाही करु शकत्...त्या मुलाच्या मानेच्या जागी वाघाने जिथे पकडले होते ते फोटो पहा भयंकर आहेत.
ठीक आहे, मोठ्या मनाने माफ
ठीक आहे, मोठ्या मनाने माफ करा.>> माफी वगैरे मागून उगाच लाजिरवाणे करु नका. पण तुम्हाला जसे लिहावेसे वाटते तसे इतर कुणालाही वाटते इथे. थोड लिहिल तर लगेच कल्ला करतात इथे काही लोक.
सीमा फोटो नाही पाहीले, आणी
सीमा फोटो नाही पाहीले, आणी खरच हिम्मत पण नाही झाली.:अरेरे:
बेफिकीर पुन्हा एकदा तुमची माफी मागते, पण मला विचारवन्त अशी महान पदवी छोट्याशी बी ने दिल्या मुळे कीबोर्ड बडवताना प्रचन्ड हसू आले.
बी मला तुझे शाकाहारी विचार न पटल्याबद्दल सॉरी. तू एवढा सारासार विचार करु शकतोस हे बघुन बरे वाटले.
बाफ भरकटु नये म्हणून माझी इथे शेवटची पोस्ट.
अवान्तरः जे शाकाहारी लोक परदेशात काही व्हेज पदार्थ मिळत नाही म्हणून पेस्ट्री वगैरे खातात, त्या पेस्ट्रीच्या कव्हर मध्ये डुकराचे की दुसर्या कुठल्या प्राण्याची चरबी मिक्स केलेली असते हे वाचलेय. हे मला आधी अजीबात माहीत नव्हते, पण परदेशात गेल्यावर चला व्हेज खाऊया म्हणून ती मटार वाली पेस्ट्री खाल्ली आणी नेटवर नन्तर वाचल्यावर आपण बाटलोत हा साक्षात्कार घडला. तेव्हा शाका-मान्साहार बाफावर अशी पेस्ट्री खाल्लेल्यानी तिथे वाद घालताना विचार करावा.
वाघांना देखील शाकाहारी बनवा.
वाघांना देखील शाकाहारी बनवा. न रहेगा बांस ना बजेगी बांसुरी. वाघ माणुस मधे पडला तरी खाणार नाही
बेफि छान पोष्ट. वाघांना देखील
बेफि छान पोष्ट.
वाघांना देखील शाकाहारी बनवा. न रहेगा बांस ना बजेगी बांसुरी.
<<
<<
तुम्ही स्वत: का नाही पुढाकार घेत, या कार्यात.
घेतले असते पण मीच मांसाहारी
घेतले असते पण मीच मांसाहारी आहे.
त्यामुळे तुम्हीच पुढाकार घ्या
मान्जराशी कधीही पंगा घेऊ नये.
मान्जराशी कधीही पंगा घेऊ नये. विशेषतः त्याला खोपचीत घेऊन त्याची कोंडी करणे वगैरे प्रकार तर आवर्जुन टाळावेत. सुटकेचा काहीही मार्ग शिल्लक नाही असे जर लक्षात आले तर मांजर उडी मारुन थेट नरडीचाही घोट घेऊ शकते, त्याच्यात एवढी ताकद आणि हिम्मत असते. इति माझी आई. मी थोडाफार अनुभव घेतलाय मांजरांचा, त्यावरुन आईचे बोल खरे आहेत याची खात्री आहे.
हो एकदम बरोबर साधना..मी पण ३
हो एकदम बरोबर साधना..मी पण ३ वेळा मांजरहल्ला चा अनुभव घेतला आहे भयानक पद्धतीने पण मलाच खुमखुमी होति...३ वर्षे लागोपाठ रेबीज ची ५-५ ईंजेक्शन्स पन डॉक्टर पन वैतागला आणि खुप रागावलेला मला..काय करनार आई मांजर पाळु देत नव्हती मग मी सोसायटीच्या सगळ्या मांजरांना आपले मानायची पण मांजरे मला खाण्यापुरतीच आपले मानायची.
पण एक मात्र नक्की हे प्राणी खुप जोरात हल्ला करतात मानेवर..मी आतापर्यंत हातावरच निभावले आहे..
पुतण्याचा विषय चालू आहे ना
पुतण्याचा विषय चालू आहे ना माझी का चर्चा करताय
केड्या पुतण्या नाही
केड्या पुतण्या नाही भाचा
मांजर म्हणजे वाघाची मावशी
बाकी चर्चा चालू द्या. (ज्यातून साध्य काहिही होणार नाहीये)
मोबाईल फेकता आला असता आणि तोच
मोबाईल फेकता आला असता आणि तोच मोबाईल बाहेरुन कुणी तरी डायल केला तर आवाजाने वाघ पळून गेला असता.>>>
१) कोणाचा मोबाईल फेकणार? स्वत:चा
२) मोबाईल फेकल्यावर चालू राहील /बंद पडेल?
देवकी गवतावर जर मोबाईल फेकला
देवकी गवतावर जर मोबाईल फेकला तर फुटत नाही. खूप उंचावरुन अथवा वेगाने फेकला तरच तो फुटु शकतो. मोबाईल सतत डायल करायचा असता.
मी फक्त एक उदा दिले.
शाळेमधे असताना हिन्दीच्या पुस्तकामधे एक धडा होता. एकदा एका चाचाला जंगलात वाघ भेटतो आणि तो खायला जवळ जवळ येतो तर ते छत्री उघडून तिला उघड-मिट....मिट-उघड करतात. आणि अशानी तो वाघ पळू जातो. मी जेंव्हा ही बातमी ऐकली तेंव्हा मला तोच धडा आठवला. पुर्ण गोष्ट आता आठवत नाही. चित्र आठवते सुरवातीचे.
अहो बृहस्पती ,गलितगात्र शब्द
अहो बृहस्पती ,गलितगात्र शब्द ऐकला आहे काय?
नसेल तर माहित करुन घ्या .जेव्हा fight or flight ऑप्शन उपलब्ध नसतो तेव्हा प्राण्यांमध्ये freeze रिस्पॉन्स ट्रीगर होतो. हे समदे Autonomus nervous systemकडून होते. आपण कॉन्शीयसली काहिच करु शकत नाही अशा वेळी.याला गलितगात्र होणं म्हणतात, आलं का ध्यानात.तो मुलगा फ्रिझ झाला होता.
Pages