Submitted by हर्ट on 26 September, 2014 - 11:06
दिल्लीमधील एका प्राणीसग्रहातील ही कालची घटना आहे. एक मुलगा वाघाला बघता बघता खाली पडला आणि वाघाची शिकार ठरला. सुमारे १५ मिनिटे तो जीव वाचावा म्हणून धडपडत होता. तूनळीवर ही घटना बघताना शहारे येतात. तो २० वर्षाचा मुलगा मदतीसाठी प्रयत्न करतो आहे आणि आजूबाजूला विखुरलेली जनता फक्त बघते आहे. प्राणी संग्रहालय निर्माण करताना तिथल्या अधिकाराला जराही सुरक्षितेची खबरदारी करता आली नाही ह्याचे फार नवल वाटते. १५ मिनिटाच्या काळात काहीतरी मदत करता आली असती.
अशा प्रसंगी तुम्ही जर तिथे असता तर काय करु शकला असता जेणेकरुन त्या मुलाचे प्राण वाचवता आले असते? ह्या धाग्याचा उद्देश हा आहे की जे झाले ते झाले पण जे झाले ते खूप वाईट झाले ... अशावेळी आपली भुमिका काय असावी?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह्ह १५ मिनिटे तो दुर्दैवी
ओह्ह १५ मिनिटे तो दुर्दैवी खेळ चालू होता. व्हॉट्सअॅपवर ३-४ मिनिटांचा विडीओ पाहिला. जर १५ मिनिटे तो तग धरून होता तर नक्कीच काही तरी करायला हवे होते. पण नक्की काय करावे हे खात्रीशीरपणे तिथे उपस्थित कोणाला सुचले नसावे आणि गोंधळ केला तर वाघ बिथरून त्यावर आणखी हल्ला करेल या भितीने लोक शांत बसले असावेत ..
बी तू प्रत्यक्षात कधी वाघाला
बी तू प्रत्यक्षात कधी वाघाला बघीतलेस का? पुण्याला आता असशील तर कात्रज झू मध्ये जाऊन ये. वाघाने नुसते हू केले तरी लोक कपडे चाचपतात. ते पेपरमधले दृष्यच पाहुन शहारे आले. कमाल तुझी, तू व्हिडीओ पाहीलस.
टाईम्स मध्ये वाच, कळेल सर्व. तो मुलगा फोटो काढताना तोल जाऊन पडला. मुळात वाघाचे इतके जवळुन फोटो काढायचेच कशाला? ऐश्वर्या आहे का तो? पोज द्यायला? अरे कात्रजमध्ये पण लाम्बुन बघताना तन्तरली होती माझी.
रश्मी, मी वाघ पाहिला आहे पण
रश्मी, मी वाघ पाहिला आहे पण मी कधीच निसर्गाच्या वाट्याला जात नाही. कधी निसर्ग आपल्यावर उलटेल सांगता येत नाही. म्हणून दुरुन डोंगरा साजरा दिसतो ना तेवढे पुरे आहे. माझा इथे मुद्दा असा आहे की जे बघणारे होते त्यांनी काहीतरी डोके लावून मदत करायला हवी होती. एक लायटर घेऊन आग निर्माण करायची असती. आगीला बघून प्राणी घाबरात. कपडे एकमेकांना बांधून एक रोप तयार करायला हवा होता. त्या मुलाला नक्कीच काही सुचणार नव्हते कारण तो एकदम वाघाच्या तावडीत सापडला होता.
काय डेन्जर प्रसंग घडतात जगात
वाचवता आले असते.. वाघाला
वाचवता आले असते.. वाघाला बेशुध्द करायची बंदुक वेळेवर उपलब्ध झाली असती तर. बंदुक भरलेली होति पण. सुरक्षा रक्षक लोकांना शांत करण्यात गुंतुन राहिले... त्यातिल कोणीतरि धावत जाउन बंदुक आनलि असती तर कदाचीत वाचवता आले असते. पण प्रश्न हा पण आहे की वाघाला किति वेळ लागला असता बेशुध्द होन्यासाठी..
यातुन महत्वाचा एक धडा मिलतो.. वाघाच्या कुंपणा भोवती अजुन एक सुरक्षा कुंपण घालने गरजेजे आहे.. म्हंजेच कोनी पडला तर तो डायरेक्ट वाघाच्या समोर जाणार नाहि..
तो मुलगा आधी वाघाला दगड मारत
तो मुलगा आधी वाघाला दगड मारत होता ना ?
घडली घटना तर घडून केली . पण
घडली घटना तर घडून केली . पण अशी आणीबाणी झाल्यास काय उपाय तत्काळ करता येतील ते करायला हवे झू वाल्यांनी .
बंदुकीची गोळी ,
मोठ्या आवाजाचे फटाके [हे झू वाल्यांकडे ]
पाण्याचा मोठा फवारा ,अश्रुधूर यापैकी.
आता चर्चा व्यर्थ आहे पण काहीतरी उपाय व्हायला हवा असे सारखे मनात येतेच
उपाय... वाघाच्या कुंपणा भोवती
उपाय... वाघाच्या कुंपणा भोवती अजुन एक सुरक्षा कुंपण घालने... म्हंजे कोणी जास्त जवळ जानारच नाहि...
अशा प्रसंगी तुम्ही जर तिथे
अशा प्रसंगी तुम्ही जर तिथे असता तर काय करु शकला असता जेणेकरुन त्या मुलाचे प्राण वाचवता आले असते?
आता विचार करून /मते मांडून गेलेला जीव परत येणार का? त्यावेळी जी उत्स्फूर्त क्रिया घडते ती महत्वाची.
आपल्याकडे प्राण्यांना शांतपणे पहात नाहीत ,हे वास्तव आहे.वाघसिंहांच्या पिंजर्याकडे,काही उत्साही लोक डरकाळीची नक्कल करतात.यांच्याबरोबर बायका-लहान मुले असली की विचारू नका. बारीक खडे मारणे, आरडाओरड करणे हा प्रकार सर्रास असतो.वाघसिंहांनी यांना डरकाळी फोडून दाखवलीच पाहिजे अशा काही अवास्तव अपेक्षा असतात.
खूप वर्षांपूर्वी राणीच्या बागेत, शिवा गेंड्याच्या पिंजर्यात मुलाची चप्पल पडली म्हणून बापाने खाली पिंजर्यात उडी मारली.त्या आवाजाने तो गेंडा बिथरला आणि त्याने त्या माणसाला ठार मारले.यात चूक कोणाची?
वाघाच्या बाबतीत तेच झाले. १०-१५ मिनिटे वाघाने काही केले नव्हते.पण वरून दगड मारल्यावर तो चवताळला .
मी त्या झूमध्ये गेलो आहे,
मी त्या झूमध्ये गेलो आहे, तिथेही शेवटच्या रेलिंगआधी एक कुंपण आहे, परंतु लोक इतक्या संख्येने असतात आणि फोटो किंवा गर्दीवर मात म्हणून ते पार करून जातात की नियंत्रणासाठी सैन्याची तुकडीच बोलवावी लागेल. जो व्हीडीओ उपलब्ध आहे तोसुद्धा, माणूस पडल्यावरही, ते कुंपण ओलांडून चित्रीकरण करणार्या महान प्राण्यामुळे उपलब्ध झाला आहे.
पंधरा मिनिटे जर तो माणूस जिवंत होता, तर व्यवस्थापन वा सुरक्षारक्षक काही का करू शकले नाहीत हे मात्र कळत नाही. शेवटी ज्या सहजतेने वाघ तोंडातून घेऊन गेला ते पाहून त्याच्या Raw Power ची भीषण पुनर्कल्पना आली.
वाघाच्या बाबतीत तेच झाले.
वाघाच्या बाबतीत तेच झाले. १०-१५ मिनिटे वाघाने काही केले नव्हते.पण वरून दगड मारल्यावर तो चवताळला .
>>>>>>
अरे देवा, कोणीतरी दगड मारला का अश्या परिस्थितीत ? त्या मुलाच्या बरोबरीचे मित्र होते का?
शिवा गेंड्याचे ठाऊक आहे. असाच दुर्दैवी प्रकार. गेंड्याचे ते मोकळे मैदान भलेमोठे असल्याने पटकन उतरून चढू असे वाटले असावे .. मुर्खपणाच हा.
मी त्या झूमध्ये गेलो आहे,
मी त्या झूमध्ये गेलो आहे, तिथेही शेवटच्या रेलिंगआधी एक कुंपण आहे,
>>>>
चुकून खाली पडल्यावर तिथे पुढे कुंपण हवे असे सुचवायचे असेल त्यांना. मग एकवेळ कठड्याच्या आधी नसले तरी चालून जावे.
तो' तरुण मनोरुग्ण
तो' तरुण मनोरुग्ण होता!
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Man-Killed-By-White-Tiger-...
सचिन, तो तरुण मनोरुग्ण जर
सचिन, तो तरुण मनोरुग्ण जर असता तर असा इकडे तिकडे फिरकला असता का? आणि जीव कुणाचाही असो तो मोलाचाच असतो. मनोरुग्ण असणार्यांचे जीव वाचवायचे नसतात का? तो मुलगा वाघापुढे हात जोडतो आहे. भयानी व्याकुळ होतो आहे. उलट ह्या प्रतिक्रिया त्या मुलानी दिल्यात त्या बघून मला फार आश्चर्य वाटले की तो इतका रिअॅक्ट करु शकला. अशा प्रसंगी भितीनेच माणूस गप्पगार होतो.
तो मुलगा वाघाला दगड मारत होता
तो मुलगा वाघाला दगड मारत होता आणि फोटो काढत होतो हे सर्व चुकीचे आहे. तो कसा पडला हे मुळात कुणालाच माहिती नाही. वाघाला बघूण ह्या वयातली मुले थोडेफार असे चाळे करतातच. ह्यात नवल काही नाही. आपला बिनडोक समाज आणि बिनडोक सुरक्षा
ऋन्मेऽऽष + १.. दुहेरी कूंपण
ऋन्मेऽऽष + १..
दुहेरी कूंपण जर पडलाच एक मानसां साठी.. आणि एक वाघासाठी.. मधे मोठी पोकळी.. मला वाटते तस सुरक्षा कवच जिथे हि घटना घडली तिथे पन आहे.
हे पाहुन तो फोटो काढ्न्यासाठी गेला होता हे खर वाटत नाहि..
मुलाच्या बरोबरीचे मित्र होते
मुलाच्या बरोबरीचे मित्र होते का?असा प्रश्न वरती ऋन्मेऽऽष ह्यांनी विचारला आहे त्यांना हि माहिती दिली.
ह्या गोष्टीवरून विषय निघाला असता एक मित्र म्हणाला कि तो मुलगा २० वर्षाचा होता त्याच्या बरोबर त्याचे मित्रही असतील त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा होता तेव्हा ते पटले. परंतु नंतर हि बातमी वाचनात आली नि ती धाग्याच्या अनुषंगाने दिली आहे.
एक मनोरुग्ण मुलगा झू मध्ये जातो त्याच्या कुटुंबीयांनी लक्ष द्यायला हवे होते.
बी, तो मुलगा मानसिक आजारावार
बी, तो मुलगा मानसिक आजारावार उपचार घेत होता (बहूतेक राममनोहर लोहिया इस्पितळातून) हे खरे आहे. त्याच्या आईचे स्टेटमेंट आहे असे. तो बर्याचदा फक्त वाघ बघायला झू मध्ये जायचा असेही त्याच्या आईने आणि शेजार्यांनी सांगितले आहे.
त्याला कुंपण ओलांडताना सुरक्षा रक्षकाने अडवले होते. तरीही तो फोटो काढायला कुंपण ओलांडून शेवटच्या टप्प्यापर्यंत गेला आणि तिथून फोटो काढताना किंवा अजून काही करताना तोल जावून खाली पडला. तो खाली पडल्यावर वाघाने मरेपर्यंत १० मिनीटे गेली. सायरन वाजवून वाघाला पिंजर्यात बोलवण्याचा प्रयत्न केला गेला.बेशूद्ध करण्यासाठी गन लोडेड होती, तो ज्या ठिकाणी होता तिथे जावून त्याला गोळी मारणं जमलं नाही तिथल्या केअरटेकरला. लगेचच बेशुद्ध केलं असतं तरी त्यागनमधील औषधाचा परिणाम व्हायला साधारण १५ मिनीट लागतात. तेवढ्या काळात तो वाघ गोळी लागल्याने अजूनच चवताळला असता. (लगोलग बेशुद्ध करता येईल अशी औषधी झू मध्ये उपलब्ध नाही. )
तिथे १०० च्या वर लोक होते आणि एक सुरक्षारक्षक, जो लोकांना शांत करायचा प्रयत्न करत होता. लोक शांत न होता, त्यांच्या परीने ओरडून, दगड फेकून वाघाला हुसकवण्याचा प्रयत्न करत होते, ज्यामूळे वाघ शांत न होता चवताळला आणि त्याने हल्ला केला.
अशी घटना पुढे होवू नये म्हणून - सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवायला हवी. त्यांना झू मध्ये काम करण्यासाठी काही स्पेशल ट्रेनींग द्यायला हवे. लगेच परिणाम होवू शकेल असे ट्रँक्विलायझर्स झू मध्ये असायला हवेत. क्रायसिस मॅनेजमेंट्साठी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोजिसर्स बनवून तिथे काम करणार्या लोकांना त्या संबंधी ट्रेनींग द्यायला हवे.
आणि प्रेक्षकांना नियम न तोडणं समजायला हवं.
यातला शेवटचा उपाय सोडला तर बाकीचे उपाय झू ने अंमलात आणायचे आहेत. या सगळ्या उपायांसाठी प्रचंड पैसा लागतो आणि भारतातले सगळ्याच झू ना पुरेसे फंड मिळत नाहीत ही सुद्धा एक वस्तूस्थिती आहे. या घटनेमूळे झू व्यवस्थापनाचे डोळे उघडतिल आणि सुरक्षेच्या उपायांवर अजून खर्च केला जाईल ही अपेक्षा. (बर्याच झू मध्ये प्राण्यांना अन्न देण्यासाठी किंवा योग्य औषधोपचार देण्यासाठी पण पुरेसे पैसे नसतात. )
शेवटी ज्या सहजतेने वाघ
शेवटी ज्या सहजतेने वाघ तोंडातून घेऊन गेला ते पाहून त्याच्या Raw Power ची भीषण पुनर्कल्पना आली.
>>>>
हे मात्र खरेय.
वाघ म्हणजे मोठाला दणकट कुत्रा नव्हे हे ते बघून पटले. चित्रपटांमध्ये वाघाशी मारामारी दाखवतात त्यातील फोलपणा अचानक दिसू लागला.
अल्पना, योग्य मांडलेत सर्व
अल्पना, योग्य मांडलेत सर्व काही, खरेच या बाबींवर विचार व्हायला हवा.
हातावर पोट भरणार्या
हातावर पोट भरणार्या कुटूंबातला मुलगा होता. हमाली कामासारखे काम करायचा. ट्रक लोडींगचे. वडील वेगळे रहात होते. घरी मोलकरणीचे काम करणारी आई, नुकतीच लग्न झालेली व बाळांतपणासाठी माहेरी गेलेली बायको आणि तो इतकेच रहायचे. ३-४ महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होते.. त्यानंतर त्याच्या आईने त्याच्यावर औषधोपचार सुरु केले.
तुम्हाला काय वाटतं, अशा कुटूंबातल्या मुलावर तो मनोरुग्ण आहे म्हणून घरचे लोक खूप लक्ष देवू शकतात. आणि सिव्हिअर आजार नव्हता त्याला काहीही, ज्यासाठी इस्पितळात भरती केले जावे.
अल्पना, मनोरुग्ण होता म्हणून
अल्पना, मनोरुग्ण होता म्हणून काय झाले? तो मुलगा मनोरुग्ण होता म्हणून खाली पडला असे तुला म्हणायचे आहे का? ही शक्यता जरी असली तरी वस्तुस्थिती नसेल. परत परत मनोरुग्न होता .. मनोरुग्न होता हे हायलाईट करण्यामागचा एकच उद्देश की जे झाले त्याला जबाबदार तो मुलगा आहे.
थरकाप उडवणारी घटना. शेवटी
थरकाप उडवणारी घटना.
शेवटी ज्या सहजतेने वाघ तोंडातून घेऊन गेला ते पाहून त्याच्या Raw Power ची भीषण पुनर्कल्पना आली.
>>>>- अगदी सहमत.
भारतातले सगळ्याच झू ना पुरेसे
भारतातले सगळ्याच झू ना पुरेसे फंड मिळत नाहीत ही सुद्धा एक वस्तूस्थिती आहे.
>>>>>
आर्थिक कारणांमुळे मुंबईतील राणीबागही बंद होण्याची शक्यता, तेथील प्राणी कुठेतरी हलवणार, असे काही वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवतेय. पण नंतर प्रश्न मिटला असावा, तसे झाले नाही.
अर्थात यामागे मुंबईच्या मध्यवर्ती भागातील भूखंड लाटायचा कोणाचा विचार असेल तर ठाऊक नाही.
मनोरुग्ण होता, म्हणून त्याने
मनोरुग्ण होता, म्हणून त्याने त्याला पुढे जायला अडवल्यावरही तो पुढे गेला, इतकच.
आणि हो जे झालं तसं होवू नयेत म्हणून झू ने पुढे उपाय करायला हवेतच. पण जे झालं त्याला तो मुलगाही थोड्या प्रमाणावर का होईना जिम्मेदार होता. कुंपण ओलांडून, खंदक ओलांडून पुढे गेला होता तो, त्याला अडवल्यावरही. हे चूकीचंच आहे.
सध्याच्या झू च्या सिच्युएशनमध्ये, तोकड्या कर्मचारी संख्येमध्ये त्याला वाचवता येणं शक्यच नव्हतं.
ऋन्मेऽऽष, औरंगाबादच्या
ऋन्मेऽऽष, औरंगाबादच्या झूमध्ये वाघ-सिंहानां मांस खाऊ घालण्यासाठी पैसे नव्हते. तिथले वाघ सध्या नाथ सीड्स ने दत्तक घेतलेत.
अल्पना तुमच्याशी सहमत. झु
अल्पना तुमच्याशी सहमत.
झु प्रशासनाची जबाबदारी ह्या प्रकरणात सर्वात मोठी आहे.त्या तरुणाच्या कुटुंबाला नुकसानभरपाई दिली गेली पाहिजे.तरुण जर खरोखरच मनोरुग्ण असेल तरी त्याच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळायला हवी. मनोरुग्ण व्यक्तीचे मनस्वास्थ्य ठीक नसते आपण काय करत आहोत नि ह्याचे परिणाम काय होतील ह्याची सारासार विचार करण्याची शक्ती नष्ट झालेली असते.परंतु ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी.त्यातूनच कळेल कि ह्या प्रकरणात खरा दोष कुणाचा आहे
खरे तर झु मध्ये प्राण्यांना
खरे तर झु मध्ये प्राण्यांना कैद करून त्यांचे प्रदर्शन मांडायलाच बंदी केली पाहिजे. प्राण्यांचे खरे निवास्थान जंगल तीच त्यांची योग्य जागा आहे. प्राणी त्यांच्या स्वभाव धर्मानुसार वागणार परंतु माणसाने तरी आपला स्वभाव बदलला पाहिजे.
शेवटी ज्या सहजतेने वाघ
शेवटी ज्या सहजतेने वाघ तोंडातून घेऊन गेला ते पाहून त्याच्या Raw Power ची भीषण पुनर्कल्पना आली.>>१००%
तो मुलगा मनोरुग्ण होता ही पळवाटही असू शकते...
वाघ-सिह असे प्राणी स्वतःच्या
वाघ-सिह असे प्राणी स्वतःच्या टेरीटेरी मधे कुणाला येवु देत नाहीत, त्यात तो मुलगा आपल्याला थ्रेट आहे या एका स्वरक्षण विचाराने वाघाने त्याला मारले असण्याची श्यक्यता जास्त आहे,
१५ मिनिट वेळ होता हे खर असेल तर नक्किच त्या मुलाला दोर वैगरे सोडुन वाचवता आले असते... लोकानी नियम
तोडु नये पण असा अपघात घडलाच तर काय उपाय करायचा याचा बॅक-अप प्लॅन झु कडे असायला पाहिजे.
बापरे! अतिशय दुर्दैवी घटना.
बापरे! अतिशय दुर्दैवी घटना.
मागच्या वर्षी स्विडनमधील कोलमार्डन झूमधे लांडग्यांच्या हल्ल्याला एक महिला कर्मचारी अशीच बळी पडली. अगदी घटना घडत असतानाच, सर्वसुविधा उपलब्ध होती तसेच लांडग्यांना गोळी मारण्याची परवानगी सुद्धा मिळाली होती.
लांडग्यांना न मारताच महिलेला सोडवण्यात यश आले होते पण तिला झालेल्या जखमांमुळे ती प्राणाला मुकली.
दिल्लीतील घटनेदरम्यान सुरक्षाव्यवस्थेची कमतरता होती पण स्विडनमधे तर मुबलक सुरक्षा आणि आपत्तीव्यवस्थापन उपलब्ध असतानाही दुर्घटना थांबवणे शक्य झाले नाही.
अशा घटना घडतात तेव्हा हाच विचार डोक्यात येतो की हा असा प्राणीसंग्राहालयांचा अट्टाहासच कशासाठी?
Pages