Submitted by हर्ट on 26 September, 2014 - 11:06
दिल्लीमधील एका प्राणीसग्रहातील ही कालची घटना आहे. एक मुलगा वाघाला बघता बघता खाली पडला आणि वाघाची शिकार ठरला. सुमारे १५ मिनिटे तो जीव वाचावा म्हणून धडपडत होता. तूनळीवर ही घटना बघताना शहारे येतात. तो २० वर्षाचा मुलगा मदतीसाठी प्रयत्न करतो आहे आणि आजूबाजूला विखुरलेली जनता फक्त बघते आहे. प्राणी संग्रहालय निर्माण करताना तिथल्या अधिकाराला जराही सुरक्षितेची खबरदारी करता आली नाही ह्याचे फार नवल वाटते. १५ मिनिटाच्या काळात काहीतरी मदत करता आली असती.
अशा प्रसंगी तुम्ही जर तिथे असता तर काय करु शकला असता जेणेकरुन त्या मुलाचे प्राण वाचवता आले असते? ह्या धाग्याचा उद्देश हा आहे की जे झाले ते झाले पण जे झाले ते खूप वाईट झाले ... अशावेळी आपली भुमिका काय असावी?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
...
...
रश्मी, उलट बिबट्या, तरस आणी
रश्मी, उलट बिबट्या, तरस आणी लान्डगे असे आहेत की जे कुणालाच तसे सोडत नाहीत. खातील एकाला आणी मारतील ४ जणाना. हे कोणी सांगीतले / कुठे वाचले? नको असताना / भूक लागलेली नसताना कोणतेच प्राणी हिंसा करत नाहीत.
माझ्या माहितीप्रमाणे तरस तर इतरांनी मारलेले खातात. माणसाच्या जवळ राहूनही बिबट्या सारखा तर दुसरा लाजाळू प्राणी नाही.
ह्या दुर्दैवी घटनेच्या
ह्या दुर्दैवी घटनेच्या धाग्यावर हास्यविनोद होऊ नयेत असे मनात आले. बाकी इच्छा ज्याचीत्याची
हर्पेन नॅशनल जीओ आणी अॅनिमल
हर्पेन नॅशनल जीओ आणी अॅनिमल प्लॅनेट सारख्या दर्जेदार चॅनेल वर खोटे सान्गीतले/ दाखवले जाईल का?
लान्डग्यावरच काही वर्षापूर्वी माहिती बघीतली होती.लान्डगा मेन्ढ्यान्च्या कळपात शिरला तर तो खातो एकाला, पण जाताना ३-४ मारुनच जातो. बिबट्या लाजाळु असला तरी शिकार करताना तो काय करु शकतो, हे याच चॅनेलवर बघीतले आहे हो.
बेफिकीर विनोद घडायला नको होते, क्षमस्व!
रश्मी, कुणालाच तसे सोडत नाहीत
रश्मी, कुणालाच तसे सोडत नाहीत आणि लान्डग्यावरच काही वर्षापूर्वी माहिती बघीतली होती.लान्डगा मेन्ढ्यान्च्या कळपात शिरला तर तो खातो एकाला, पण जाताना ३-४ मारुनच जातो. बिबट्या लाजाळु असला तरी शिकार करताना तो काय करु शकतो, हे याच चॅनेलवर बघीतले आहे हो.
ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत का?
कोणालाच मधे मनुष्य प्राण्याचा अंतर्भाव नाही होत का?
जो विषय आत्ता चालू आहे त्यात मेंढ्याच मेल्यात का?
असो.
कोणतेही जंगली प्राणी भुकेले असतानाही मनुष्यापासून दूर रहाणे पसंत करतात. मनुष्य हे त्यांचे प्रथम व नैसर्गिक अन्न नाहीये. अस्वल हे यास अपवाद असते. अस्वल माणसास खात नाही पण घाबरतही नाही.
एक दोरी सोडुन त्या माणसाला वर
एक दोरी सोडुन त्या माणसाला वर खेचुन घेता आले नसते का?
(ऐकण्यात आले आहे की सुरुवातीला त्या वाघाचे लक्ष गेले नव्हते कोणी तरी त्याला दगड मारल्यावर त्याचे लक्ष गेले..)
तो वाघ मुळीच चवताळला नव्हता.
तो वाघ मुळीच चवताळला नव्हता. त्याने त्या मुलाची शिकार करुन फक्त त्याला जीवे मारले. खाल्ले नाही. जेवढे आपण प्राण्यांना घाबरु तेवढे ते आपल्यावर आक्रमण करतात. हाच नियम माणसाचा माणसासाठीही आहे. ह्या जगात जेवढे आपण भित्रे राहू तेवढे लोक आपल्याला छळतील. तो मुलगा बिचारा इतका किडका मिडका, अंगात त्याचा क्षमताच नव्हती रडण्याखेरीज. पण, बाहेरची जनता केवढी मठठ. एकाच्याही मेंदूतून एखादी आयडीया जन्माला आली नाही. समय तत्परता कुणाचकडे नव्हती.
भारतात हे प्राणी संग्रहालय बंद करुन टाकायला पाहिजे. एक जीव गेला तेवढा खूप आहे.
तूनळीवर किती लोकांनी ह्याचे
तूनळीवर किती लोकांनी ह्याचे व्हिडीओ टाकलेत. फोटो टाकलेत. त्यावरुन कळत लोकांनी आपला वेळ फक्त व्हिडीओ काढण्यात घालवला. केवढी येडपट जनता. छी!!!!
अतिशय वाईट घटना पण नीधप+१
अतिशय वाईट घटना
पण नीधप+१
mansmi18 | 27 September, 2014
mansmi18 | 27 September, 2014 - 21:39 नवीन <<<
बी | 27 September, 2014 - 22:15 नवीन <<<
तुम्ही माझे व नीधप ह्यांचे प्रतिसाद वाचले आहेत का? त्यात ह्याबाबत काही स्पष्टीकरण मिळू शकेल.
>>> बी | 27 September, 2014 - 22:18 नवीन <<<
बी, व्हिडिओ एकच आहे, त्याची प्रत वेगवेगळ्या लोकांनी टाकली असावी.
विडिओ एका पेक्षा अनेक असावेत,
विडिओ एका पेक्षा अनेक असावेत, आहेत, व्हॉट्सपवर मी स्वता तीन पाहिले ..
एक मित्र म्हणाला आणखी वेगवेगळ्या अँगलनेही आहेत, ते ही दाखवू का मग मी नको म्हणालो ..
कारण त्या आधीच त्याने ग्रूप वर त्या मुलाचा मेल्यानंतरचा फोटो टाकलेला .. बघवत नव्हते .. खरेच दुर्दैवी मृत्यु .. खास करून जर मृत्यु लवकर आला नसेल तर ..
इथे वर विनोद घडायला नको होते असे मलाही त्या पोस्ट बघून वाटले, पण ते ओघानेच झाले, समजू शकतो..
पण व्हॉटसपवर तर नवरे आता आपल्या बायकांना झू मध्ये घेऊन जात आहेत छाप विनोद फिरताना बघून खरेच वाईट वाटते .. मलेशिया विमान प्रकरणातही असाच बिनडोकपणा चालवला होता.. संवेदना नाही तर ठिक पण सभ्यता तरी पाळा असे सांगावेसे वाटते अश्यांना ..
त्यातल्या त्यात अश्यावेळी काय करायला हवे होते या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातूनही पोस्ट फिरत आहेत हे चांगले.
आगीची सूचना चांगली आहे. फक्त
आगीची सूचना चांगली आहे. फक्त ती आग बर्यापैकी मोठी असायला हवी असे वाटते.
पण लोकांनी दोर फेकून त्या मुलाला बाहेर काढावे हा सल्ला व्यावहारिक वाटत नाही. कदाचित आग लावून वाघाला दूर केल्यावर दुय्यम प्रतिसाद म्हणून ठीक आहे.
खालील लिंकवर सिंहापासून स्वसंरक्षणासाठी टिपा दिल्या आहेत. वाघासाठीसुद्धा त्या उपयुक्त होऊ शकतील कदाचित.
http://www.wikihow.com/Survive-a-Lion-Attack
उभं राहून स्वत:चा आकार प्राण्यापेक्षा मोठा दाखवणे हा पवित्रा ती क्लीप बघताना सुद्धा मनात आलेला. आधी कधीतरी डिस्कवरीवर ऐकलेलं असं वाटलं. पण अलिप्त राहून असा विचार करणे आणि प्रत्यक्ष प्रसंगावधान दाखवणे ह्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
हर्पेन तुमची कमाल आहे. मी
हर्पेन तुमची कमाल आहे. मी अस्वले माणसाना खातात असे कुठे लिहीलय? नीट वाचा जरा. उलट त्याना पकडुन त्याना नाचायला लावले जाते हे माझे वाक्य आहे. तुम्ही वाचताय काय, त्याचे स्वतःच्या मनाला येतील ते अर्थ लावताय काय, दन्ड्वत तुम्हाला.
सामान्यतः वाघ आणी सिन्ह हे असे दोन प्राणी आहेत, की जे पोट भरलेले असेल तर दुसर्या कुणाकडे ढुन्कुनही पहात नाही. या उलट बिबट्या, तरस आणी लान्डगे असे आहेत की जे कुणालाच तसे सोडत नाहीत. खातील एकाला आणी मारतील ४ जणाना. हे मी जन्गलाबद्दल बोलतेय कारण जन्गलात हे प्राणी निसर्ग नियमानुसारच वागतात.>>>>> हे माझे वाक्य आहे, यात माणुस कुठुन आला? लान्डग्यान्बद्दल बोलायचे तर काही वर्षापूर्वीच मी एक डॉक्युमेन्टरी बघीतली ज्यात, लान्डगे आणी इतर हिन्स्त्र प्राणी शिकार कशी करतात, व त्यान्च्यात आणी लान्डग्याच्या शिकारीत कसा फरक असतो ते पण दाखवले होते. लान्डगे अनुष्यान्वर हल्ला करतात असे लिहीलेय का मी?
म्हणजे तुम्ही म्हणता ते खरे आणी मी बघते ते खोटे असेच तुमचे दावे आहेत तर मग मला तुमच्याशी या बाफावर वाद घालायची अजीबात ईच्छा नाही. माझ्याकडुन हा वाद समाप्त, तुम्ही मला उद्देशुन काहीही कितीही कडवट लिहा, नो कमेन्ट्स.
माणूस हा वाघांचे नैसर्गिक
माणूस हा वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही.वाघ शक्यतो माणसांशी संपर्क टाळतो.वाघांचे शिकारीचे तंत्र म्हणजे सावजाच्या गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करणे व श्वसननलिका फ़ोडणे. माणसाची मान हरीण ,रानडुक्कर इत्यादीं पेक्षा जमिनी पासून उंच असल्याने वाघाला माणूस भक्ष्य वाटत नाही
खूप अपवादात्मक परिस्थितीत वाघ माणसावर हल्ला करतो. उदाहरणार्थ जेव्हा मादा वाघ आपल्या बछड्यांसोबत असते तेव्हा जवळ आलेल्या प्रत्येकावर ती आक्रमण करते दुसरे कारण म्हणजे माणसाला चुकून भक्ष्य समजणे . वाकलेल्या किंवा बसलेल्या स्थितीत माणूस वाघाला त्याच्या नैसर्गिक भक्ष्या सारखा वाटू शकत. अथवा जेव्हा माणसाच्या हालचाली किंवा एकंदर परिस्थिती वाघाला धोकेदायक वाटते तेव्हा स्वरक्षणार्थ वाघ हल्ला करू शकतो .
दिल्लीच्या घटनेत तिसरी शक्यता अधिक वाटते . वाघ खूप वेळ त्या माणसाला हुंगत त्याच्या समोर उभा होता . त्याच्या वर्तनात आक्रामकते पेक्षा कुतूहलता अधिक दिसतेय. जेव्हा बाकीच्या लोकांनी आरडा ओरडा करायला आणि वाघाला दगड मारायला सुरवात केली तेव्हा वाघ आक्रमक झाला . त्यात तो माणूस बसलेल्या स्तिथीत असल्याने वाघाला तो आपला भक्ष्य वाटला असल्याची पण शक्यता आहे .याचा एकूण परिणाम म्हणून वाघ त्या माणसाची मान धरून त्याला दूर घेऊन गेला
विनोबा छान माहिती दिली आहे
विनोबा छान माहिती दिली आहे तुम्ही
विनोबा अचूक माहिती.
विनोबा अचूक माहिती.
आजच्याच पेपरमध्ये वाचले.
आजच्याच पेपरमध्ये वाचले. वरच्या घटनेनंतर त्या झू मध्ये जाणा-यांची संख्या वाढलीय. बरेचजण मुद्दाम त्या वाघाला बघायला जाताहेत आणि जर तेव्हा तो वाघ निवांतपणे बसला असेल, या लोकांकडे पाहात नसेल तर मुद्दाम त्याला दगड मारुन, आवाज करुन त्याचे लक्ष वेधण्याचे जोरदार प्रयत्न करताहेत. वाघाने प्रत्येकाला पर्सनली हाय, हॅलो, कसे आहात? झू कसे वाटले? चहा घेणार की कोक? इत्यादी प्रश्न विचारावेत ही अपेक्षा असावी बहुतेक.
तिथे आधी एक रक्षक होता, आता दोन आहेत पण या वाढत्या जमावापुढे दोघेही हतबल ठरताहेत.
http://indianexpress.com/article/cities/delhi/is-that-the-one-which-misb...
त्याच पेपरमध्ये एकाने हत्तींबद्दल लिहिलेय. कुटूंबप्रिय हत्तींना माणुस कसे वागवतो हे वाचुन काटा येतो अंगावर.
http://indianexpress.com/article/lifestyle/elephants-can-remember-how-we...
कठीण आहे! लोका.न्ना नियम कधी
कठीण आहे! लोका.न्ना नियम कधी पाळ्ता येणार? येवढी मोठी घटना नुकतिच घडुनही लोका.ना समज येत नाही का?
वाघ बघायला आले म्हणजे त्याने डऱकाळी फोडलीच पाहिजे का?
एक छान मेस्सेज व्हाट्सॅप वर
एक छान मेस्सेज व्हाट्सॅप वर आज आला... वाघाच म्हणने काय असेल... शेअर करत आहे...
प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी
प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी वाघाला सहसा त्याचे जेवण वरून फेकतात. मला वाटते लोकांनी दगड मारायला सुरवात केल्यावर वाघाचा समज आपल्याला खायला टाकले आहे असा झाला असावा. त्याआधी तो जास्त प्रयत्न करत नव्हता. आणि प्राण्यांची मुलभूत प्रेरणा शिकार मिळाली कि पळून जाऊन लपून खात बसायची असते. तेच या वाघाने केले असावे.
अतिशय दुर्दैवी मुलगा .मुलगा
अतिशय दुर्दैवी मुलगा .मुलगा घाबरुन वाकुन पायावर बसला होता (त्या अवस्थेत काय करणार म्हणा) पण जर तो हात वर करुन उभा राहीला असता तर कदाचित वाचला असता . खरच वाघ त्या मुलाच्या इतका जवळ होता की त्याचं वाचणंच अशक्यच होतं पण उम्मिद पे दुनीया कायम है .एक ट्क्का जरी वाचण्याचि शक्यता असेल तर प्रयत्न नक्की करायला हवेत .या दुर्दैवी घटनेत तर उलट खुप चुका केल्यायत.त्या दुर्दैवी मुलाने, तिथे बघणार्यानी ,प्राणी संग्रहालयानेही .अशा वेळी काय करावे हेच कुणालाच कळलं नाही.मुलगा स्वताच्या मुर्ख धाड्सामुळे आत पड्ला .लोकांनी वाघाला आवाजाने दगडांनी बिथरवलं.प्राणी संग्रहालयात तर अशा प्रसंग घडु शकतात यावर काहीच उपाय योजना नव्ह्ती.त्यामुळे या चुकांमधुन तरी बोध घ्यावा या नंतर.
हा विडीओ शुट करनाराही वर चढला होता तोही आत पडु शकला असता ,यातच सारं आलं .लोकांना आपल्या जीवाचि पर्वा नसावी इथे याहुन दुर्दैव ते काय?
काल व्हाट्सॅप वर एक मेसेज आला
काल व्हाट्सॅप वर एक मेसेज आला या बाबतीत की त्या मुलाचे नाव मकबुल नसुन नदीम होते व त्याने गेल्यावर्षी नवरात्रीत दुर्गामातेच्या मुर्तीवर जनावराचे (गाय का बैल ते आता आठवत नाही) रक्त फेकलेले म्हणुन देवीच्या वाघाने त्याला मारले वै.वै....
काय म्हणावं या लोकांना आता
निवडणुका जवळ आल्यात की असे
निवडणुका जवळ आल्यात की असे मेसेज फिरतात
काय म्हणावं या लोकांना
काय म्हणावं या लोकांना आता
>>>
मी असा मेसेज पाठवणार्याला तिथल्या तिथेच सुनावतो.
अजिबात सुनवायचे नाही सरळ
अजिबात सुनवायचे नाही सरळ पोलिस कंप्लेंट करा.
अजिबात सुनवायचे नाही सरळ
अजिबात सुनवायचे नाही सरळ पोलिस कंप्लेंट करा.
>>>
तो आपलाच मित्र असतो. हा जरा मुर्ख असतो.
आता मित्रापेक्षा तत्वे भारी म्हटले तरी त्या पोलिस कंम्प्लेटलाही काही अर्थ नाही, कारण ते काही प्रत्येक फॉरवर्ड करणार्याला नाही पकडत तर मेसेज ज्याने बनवला त्याला पकडतात. माझ्या तुटपुंजया माहितीनुसार याचा शोध व्हॉट्सअॅप सर्वर वरून लागत असेल. त्यामुळे तो खटाटोप किती गरजेचा आहे हे सायबर सेलच ठरवत असेल.
मी माझ्या मित्राला बहकण्यापासून परावृत्त करत माझे मित्रकर्तव्य निभावतो.
sorry marathi lihita yet nahi
sorry marathi lihita yet nahi tya sathi mafi asavai
pan ek gosht ithe share karavishi vatate ti mhnje,
mi discovery varil programme pahate tyat sadhya chalu aslele
man vs wild madhe ashich ek ghatna dakhvnyat ali hoti.
tyat ase sapsht sangitle ki , jar vagha samor janyacha prasang ala
tr tya vaghachya nakavar marave tya mule vagh halla karat nahi..
he kitpat khar ahe he mahit nahi ...
आज एक नविन फंडा वाचण्यात
आज एक नविन फंडा वाचण्यात आला...त्यानुसार तो वाघ आणि काहीच करत नव्हता पण जेव्हा लोकांनी दगड मारायला सुरुवात केली तेव्हा त्या मुलाला दगड लागू नये म्हणून त्याला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले.
वाघ किंवा अन्य श्वापदे आपल्या मुलांना असेच मानेला धरून सुरक्षित ठिकाणी नेतात. पण वाघ जन्मापासून तिथेच वाढला असल्याने त्याला त्याच्या ताकदीचा अंदाज आला नाही आणि माणूस मेला.
यावर काय प्रतिक्रिया देऊ समजत नाहीये
आज एक नविन फंडा वाचण्यात
आज एक नविन फंडा वाचण्यात आला...त्यानुसार तो वाघ आणि काहीच करत नव्हता पण जेव्हा लोकांनी दगड मारायला सुरुवात केली तेव्हा त्या मुलाला दगड लागू नये म्हणून त्याला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले.
वाघ किंवा अन्य श्वापदे आपल्या मुलांना असेच मानेला धरून सुरक्षित ठिकाणी नेतात. पण वाघ जन्मापासून तिथेच वाढला असल्याने त्याला त्याच्या ताकदीचा अंदाज आला नाही आणि माणूस मेला.
>>>
खुप मस्त आणि पॉझिटीव्ह विचार आहे....
ar vagha samor janyacha
ar vagha samor janyacha prasang ala
tr tya vaghachya nakavar marave tya mule vagh halla karat nahi..
<<
<<
त्या वाघाच्या नाकावर माणसाने फाईट मारली तर वाघ पळुन जाणे तर दुरच, पण वाघाच्या मिशीचा एक केस तरी वाकडा होईल का? उगाच कैच्या कै लॉजीक लावतात लोक.
---
आज एक नविन फंडा वाचण्यात आला...त्यानुसार तो वाघ आणि काहीच करत नव्हता पण जेव्हा लोकांनी दगड मारायला सुरुवात केली तेव्हा त्या मुलाला दगड लागू नये म्हणून त्याला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले.
<<
<<
हा फंडा ज्या कुणाला सुचलाय तो महान माणुस आहे, इतकेच म्हणु शकतो.
Pages