Submitted by हर्ट on 26 September, 2014 - 11:06
दिल्लीमधील एका प्राणीसग्रहातील ही कालची घटना आहे. एक मुलगा वाघाला बघता बघता खाली पडला आणि वाघाची शिकार ठरला. सुमारे १५ मिनिटे तो जीव वाचावा म्हणून धडपडत होता. तूनळीवर ही घटना बघताना शहारे येतात. तो २० वर्षाचा मुलगा मदतीसाठी प्रयत्न करतो आहे आणि आजूबाजूला विखुरलेली जनता फक्त बघते आहे. प्राणी संग्रहालय निर्माण करताना तिथल्या अधिकाराला जराही सुरक्षितेची खबरदारी करता आली नाही ह्याचे फार नवल वाटते. १५ मिनिटाच्या काळात काहीतरी मदत करता आली असती.
अशा प्रसंगी तुम्ही जर तिथे असता तर काय करु शकला असता जेणेकरुन त्या मुलाचे प्राण वाचवता आले असते? ह्या धाग्याचा उद्देश हा आहे की जे झाले ते झाले पण जे झाले ते खूप वाईट झाले ... अशावेळी आपली भुमिका काय असावी?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या मुलाचा आता पुनर्जन्म
त्या मुलाचा आता पुनर्जन्म झाला असेल. तेरावं झालं ना ? बन्द कराआता
वॉट्ट्सअॅपवर वाचलेले हे, या
वॉट्ट्सअॅपवर वाचलेले हे,
या फंड्यात अजून एक भर, वाघाच्या पिल्लाची मानेजवळची कातडी त्याद्रुष्टीने भरभक्कम असते.
वाघाच्या अनेक शिकारी मी तू
वाघाच्या अनेक शिकारी मी तू नळीवर पाहिल्या आहेत त्यावरुन एक निरिक्षण केली मी की वाघ हा शिकार करताना स्वतःला फार जपतो. ह्या मुलाच्या बाबतही तो हात जोडत असताना वाघ मागे मागे सरकत होता. पण वाघाचे एक मात्र आहे की आपण थोडी जरी धडपड केली की तो अगदी आक्रमण करतो. एकदा त्याच्या पुढ्यात शिकार आली की तो सावकाश दम खातो. इकडे तिकडे बघतो. कधी कधी जिभेने शिकार चाटतो. गोंजारतो आणि मानेला धरुन श्वास रोखतो. श्वास रोखताना बहुतेक माणसाला सर्वात कमी त्रास होत असावा. माणसाचा नैसर्गिक मृत्यु देखील श्वास बंद पडूनच होतो. जर हा मुलगा उभा राहिला असता तर वाघानी त्याचे पाय पकडून त्याला घाली पाडले असते. वाघ आपली शिकार नेहमी खाली पाडण्याचा प्रयत्न करतो.
माझ्या डोक्यात आले जर एखादा दुसरा प्राणी आतमधे सोडला असता तर.. म्हणजे आजूबाजूला कुत्री बकर्या असत्या तर त्यातला एक प्राणी आतमधे सोडला असता तर? पण असे करणे म्हणजे इतर जीवाची पर्वा न करण्यासारखे आहे.
हे मी आज वाचले, खरे असू शकते.
हे मी आज वाचले, खरे असू शकते.
माझ्या माहीतीप्रमाणे
माझ्या माहीतीप्रमाणे फॉरेंसिकची लोक मृत्युचे कारण ( मानेला दात लागुन अती रक्तस्त्रावा अथवा गुदमरुन ) , वेळ हे सांगु शकतात.
पण वाघाला दगड मारणार्या पब्लिकचे दगड त्या माणसाला लागु नयेत, म्हणुन पब्लिकच्या दगडमार्यापासून वाचविण्यासाठी त्याच्या मानेला पकडुन दुर नेताना मानेला दात लागुन मृत्यु झाला हे त्या फॉरेंसिकच्या लोकांना त्या वाघाने सांगितले की काय?
शेरोवाली दुर्गा मातेचा अपमान
शेरोवाली दुर्गा मातेचा अपमान केल्याने तिच्या शेराने त्या माणसाला नवरात्राचा मुहूर्त साधून शिक्षा दिली यात पण बर्याच लोकांना तथ्य वाटत आहे!!
हो. वाघाने सांगितलेले असू
हो. वाघाने सांगितलेले असू शकते. एस्पेशली वाघ असा असेल तर.....................
Maitreyee, you said it.
Maitreyee, you said it.
>> कोकणस्थ आणि मैत्रेयी
>> कोकणस्थ आणि मैत्रेयी
ह्याही धाग्यावर कधी हसू येईल
ह्याही धाग्यावर कधी हसू येईल असे वाटले नव्हते, तेही आले.
This was an unfortunate
This was an unfortunate event. Hopefully the authorities will ponder over this and take new measures. There was nothing anyone could have done. There was a slight chance of him being alive if there was pin drop silence.
Enough discussion has been done and now this is not even funny anymore. Recycled whatsapp messages. I request the admin to lock or delete this thread. Let the poor young man get peace in death.
+१
+१
मुळात प्राणीसंग्रहालयात गर्दी
मुळात प्राणीसंग्रहालयात गर्दी करणे, आपण त्या गर्दीचा हिस्सा होणे आणि नंतर प्राण्यांना चिडवणे, संरक्षक भिंतीवर पहायला आलेल्यानी चढणे, सुरक्षाकर्मींचे तिथे नसणे : या सगळ्यात मृत्यू पावलेल्या मुलाचा सहभाग ही होताच की..
आणि हसण्याबद्दल म्हणाल, तर कुणाच्या मृत्यूवर रडण्याचे दिवस भारतात राहिले आहेत कुठे?
भारतात मानवी आयुष्य कवडीमोलाचे आहे, याचा प्रातिनिधिक प्रसंग आहे हा!
जगणार्यानी दु:ख करायचे तरी किती दिवस?
डीविनिता, माझा प्रतिसाद
डीविनिता,
माझा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाही
डीविनिता, जमल्यास फोटो काढणार
डीविनिता, जमल्यास फोटो काढणार का? पुन्हा पुन्हा तो समोर येत राहिला की फार कालवाकलव होते मनात. फार वाईट वाटतं.
सगळीकडे ते फोटो, व्हिडीयो फिरत आहेत. लोक पहात आहेत. त्याना तर सांगता येणारच नाही पण मायबोलीवर विनंती करता येईल म्हणुन लिहीत आहे. अजुनही कोणी फोटो टाकला असेल व तो इथुन काढु शकलात तर पहा. जबरदस्ती कोणावरच नाही.
थँक्स डीविनिता..
थँक्स डीविनिता..
बी, माझ्या डोक्यात आले जर
बी,
माझ्या डोक्यात आले जर एखादा दुसरा प्राणी आतमधे सोडला असता तर.. म्हणजे आजूबाजूला कुत्री बकर्या असत्या तर त्यातला एक प्राणी आतमधे सोडला असता तर?
>>>>>>>
बी,
आपण तेच ना जे त्या दिवशी श्रद्धा-अंधश्रद्धेच्या धाग्यावर मांसाहार करणे म्हणजे जीवाचा बळी घेणे म्हणत मांसाहारी लोकांना अमानुष ठरवत होतात.
ऋ, तू पुर्ण वाक्य वाचून तुला
ऋ, तू पुर्ण वाक्य वाचून तुला टिका करता येईल तेवढेच वाक्य घेतलेस
पुर्ण वाक्य असे आहे:
माझ्या डोक्यात आले जर एखादा दुसरा प्राणी आतमधे सोडला असता तर.. म्हणजे आजूबाजूला कुत्री बकर्या असत्या तर त्यातला एक प्राणी आतमधे सोडला असता तर? पण असे करणे म्हणजे इतर जीवाची पर्वा न करण्यासारखे आहे.
बी, टिका करता येईल
बी,
टिका करता येईल तेवढेच
>>>>>>
बी,
मी टिका नाही करत आहे, मला सखेद आश्चर्य वाटले असा विचार तुझ्या डोक्यात आलेला बघून.
तू पुढे जरी ते वाक्य जोडले असलेस तरी तू इथे इतरांना हा एक मार्गच सुचवला आहेस असे नाही का वाटत?
असा मार्ग मी जरी मला सुचला
असा मार्ग मी जरी मला सुचला तरी तो मार्ग अयोग्य आहे हेच मला माझ्या शेवटच्या वाक्यातून सांगायचे आहे.
ओके बी, मला पर्सनली तो मार्ग
ओके बी,
मला पर्सनली तो मार्ग अयोग्य नाही वाटत, उलट चांगली कल्पना सुचवल्याबद्दल तुझे कौतुक.
तशीच वेळ आली तर मी तरी हा मार्ग अवलंबेन, फार तर त्या मुक्या जीवाला मारल्याचे पातक मला लागेल.
पण दुसर्या अंगाने विचार करता, त्या वाघाचा रोजचा खुराकही मटणच असणार ना?
ऋ, असे निर्णय क्षणात घ्यायचे
ऋ, असे निर्णय क्षणात घ्यायचे असतात. संकटाच्या वेळी बुद्धीने घेऊन वेळेवर एखादा उपाय सुचायला पाहिजे. मला ह्या प्रकारात सर्व जन मुर्खच वाटत आहेत.
त्या मुलाच्या दिशेने एखादी काठी फेकता आली असती. एखादे लायटर फेकता आले असते. मोबाईल फेकता आला असता आणि तोच मोबाईल बाहेरुन कुणी तरी डायल केला तर आवाजाने वाघ पळून गेला असता.
बी, काही अतिउत्साही लोकांच्या
बी, काही अतिउत्साही लोकांच्या चुकीच्या फेकाफेकीमुळेच तो वाघ बिथरलेला ना..
मोबाईल रिंगटोनला वाघ घाबरला असता ???
रोजचा खुराक मटण<<<
रोजचा खुराक मटण<<< त्याच्यासाठी रोज मुद्दाम प्राणी मारला जात नाही. कत्तलखान्यातून म्हशीचे मांस आणले जाते. आठवड्यातून एकदा फक्त एक जिवंत प्राणी पिंजर्यात सोडला जातो, वाघाची शिकारीची सवय नीट राहावी म्हणून!
ऋ, दगड फेकला म्हणून असे झाले
ऋ, दगड फेकला म्हणून असे झाले असे गृहीत धरणे चुकीचे आहे. २१ वर्षाचा मुलगा. काय समजत ह्या वयात!!! पडला असेल घसरुन. ढकलल असेल कुणी. फोटो काढताना पडला असेल. दोष प्रसंगाला न देता सुरक्षेला द्या.
त्याच्यासाठी रोज मुद्दाम
त्याच्यासाठी रोज मुद्दाम प्राणी मारला जात नाही. कत्तलखान्यातून म्हशीचे मांस आणले जाते. आठवड्यातून एकदा फक्त एक जिवंत प्राणी पिंजर्यात सोडला जातो, वाघाची शिकारीची सवय नीट राहावी म्हणून!
>>>
१) कत्तलखान्यात जनावर मारलेच जाते ना? कि नैसर्गिक मृत्यु आलेले प्राणी देतात?
२) आणि आठवड्याला एक जिवंत प्राणी असाही सोडतातच मग तसाच हा.
बी, तू वेगळ्या ट्रॅकवर चालला
बी,
तू वेगळ्या ट्रॅकवर चालला आहेस. दगड अतिउत्साही लोकांनी फेकल्यामुळे, न की त्या मुलाने फेकल्याने.
माफ करा, पण ही चर्चा
माफ करा, पण ही चर्चा थांबायच्या ऐवजी वाढतच काय चालली आहे?
वाढतसुद्धा अशी आहे की अतिशय नगण्य किंवा असंबद्ध मुद्दे वारंवार येत आहेत.
एका अतिशय जातिवंत हिंस्त्र जनावराचा एक पिंजरा व थोडा परिसर आहे. ते जनावर पाहण्यासाठी आलेल्या गर्दीतील एक तरुण त्या परिसरात पडतो. ते जनावर नैसर्गीक कुतुहलाने त्याच्याजवळ जाते. आपण ह्याला घाबरावे की हा आपल्याला घाबरेल ह्याचा अंदाज घेऊन मग ते जनावर थोडा वेळ उभे राहते. तो तरुण करत असलेली गयावया समजणे त्या जनावराला शक्यच नसते. त्या जनावराला इतकेच समजते की एरवी बाहेरून निघून जाणारी गर्दी अचानक चेकाळली आहे व आरडाओरडा करू लागली आहे. तसेच आपल्याला काही दगड वगैरे मारण्यात येत आहेत. पुन्हा नैसर्गीक उर्मीने (दचकणे / भीती / संताप / प्रतिक्षिप्त क्रिया ह्यातील काहीतरी एक) ते जनावर अपेक्षित तेच कृत्य करते. सगळा राग त्या पडलेल्या तरुणावर काढून त्याच्या गळ्यात दात रोवून त्याला ओढत नेऊन मारून टाकते. (किंवा अधिक काही प्रकार होऊ नये म्हणून घाबरून पहिल्यांदा त्या तरुणाला मारून टाकते व गर्दीपासून लांब घेऊन जाते). आणि पुन्हा तितक्याच नैसर्गीकपणे ते त्या तरुणाचे मांस खात नाही. त्याला फक्त जीवे मारते.
ह्यातः
आणखीन एखादा प्राणी आत सोडण्याचा उपाय सुचणे
लोकांना मूर्ख ठरवणे (जे लोक प्रचंड धक्का बसलेल्या मनस्थितीत जमेल व सुचेल तितकेच करत आहेत)
तरुणाचा मनोरुग्ण म्हणून सतत उल्लेख करणे
सुरक्षा व्यवस्थेवर टीकेची झोड उठवणे (त्यांनी पाट्या लावलेल्या आहेत, वाघाला पूर्ण जेरबंद करून अनअॅक्सेसिबल केलेले आहे).
हे असले प्रकार का येत आहेत?
आपण माणसे आहोत तर आपण माणसाप्रमाणे असा विचार करायला हवा ना, की एक भयानक दुर्घटना झाली, आता ती विस्मरणाच्या पडद्याआड ढकलू?
कत्तलखान्यात जनावर मारलेच
कत्तलखान्यात जनावर मारलेच जाते ना? कि नैसर्गिक मृत्यु आलेले प्राणी देतात?<<<
प्राणीसंग्रहालयातील हिंस्त्र पशूंना अन्न मिळावे म्हणून कत्तलखान्यात जनावरे मारत नसतात.
आपण माणसे आहोत तर आपण
आपण माणसे आहोत तर आपण माणसाप्रमाणे असा विचार करायला हवा ना, की एक भयानक दुर्घटना झाली, आता ती विस्मरणाच्या पडद्याआड ढकलू?
ढकलु नका, तर कायमची लक्षात ठेवा, फक्त आता चर्चा बंद करा.
असा प्रसंग कधीही कुठेही येऊ शकतो आणि अशा वेळी काय कराय्चे ते निदान या प्रसंगाने कळलेय तर ते कायमचे लक्षात ठेवा.
बी, जीवो जीवस्य जीवनम हा निसर्गाचा मंत्र आहे. त्यात बरे वाईट काही नाही, तर आप्ला जीव जगवणे ही नैसर्गिक प्रेरणा त्यामागे आहे.
आपल्याला मांसाहार करणे क्रौर्याचे वाटले तरी काही प्राणी केवळ मांसाहारी आहेत, त्यांनी तो सोडला तर ते मरतील.
असो. यावर चर्चा करावी तितकी थोडीच. त्यामुळॅ इथेच थांबलेले बरे.
Pages