Submitted by दुसरबीडकर on 4 October, 2014 - 08:40
देहास जाळण्याला,मी ही अधीर नाही..
अग्नीस जोर यावा,ऎसा समीर नाही..!!
आता तरी कळू दे,इजहार काळजाचे..
इन्कार ऎकण्याचा,कानास धीर नाही..!!
माझे मलाच कोडे,श्रावण कसा छळेना..
आता कळून आले,नयनात नीर नाही..!!
दैवास दोष नाही,असलो जरी उपाशी..
ग्रीष्मातल्या झळांचे,कारण शिशीर नाही..!!
प्रेमात मी झुरावे,वाटे जरी मनाला.
पण कुंडलीत त्याने,लिहिलीच हीर नाही..!!
रचल्यात कैक गझला,कोणास याद नाही..
नंतर कळून आले,मी फैझ-मीर नाही..!!
-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरी शुभेच्छा
बरी
शुभेच्छा
छान
छान
कवी गणेश शिंदे दुसरबिडकर
कवी गणेश शिंदे दुसरबिडकर ह्यांच्या ह्या गझलेत परभाषिक शब्दांचा अंतर्भाव किंचित अधिक आहे व खयालांमधील ताजेपणा किंचित कमी आहे. कुंडली ही हिंदूंमध्ये असते तर हीर इराण्यांमध्ये वा मुघलांमध्ये!
पहिल्या ओळीत 'मी ही अधीर नाही' ह्यात ही हे अक्षर मी ला जोडलेले नसल्यास 'ही मी' असा स्त्रीमुखी भाव प्रकटू शकतो ह्याची नोंद घ्यायला हवी.
मात्र कवी गणेश शिंदे दुसरबिडकर उर्फ श्रीगणेशा ह्यांनी एक गुणी रचना सादर केलेली असून त्यांच्या पुढील कसदार गझल लेखनास आपण सर्वांनी मनःपूर्वक शुभेच्छा देऊयात.
कळावे
गं सं
वैवकु,आभार...जुनीच
वैवकु,आभार...जुनीच आहे...गझलची नुकतीच ओळख होत होती तेव्हाची..दुरुस्ती करायची होती पण कंटाळा झाला ...:-)
अरविंदसर आभार..
गंभिरसमिक्षकजी.. __/!\__ अगदी सहमत...मनपुर्वक आभार..
वा आश्वासक रचना नेहमीप्रमाणे
वा आश्वासक रचना
नेहमीप्रमाणे २ शेर सुचले ते डकवतो आणि निघ्तो ...
दुग्धात हे कशाला तांदूळ टाकले तू
ठावूक कय नाही मी खात खीर नाही
तिकिटे पहा मिळवली ही गझलरंगची मी
फुकटात आत जाया मी बेफिकीर नाही
(बेफींचा एक मस्त शेर होता >>> मजा जगाची बघू तिकीटाविना जराशी । हळूच जाऊ मरून कोणी विचारले तर <<<< )
___________
पुढील गझललेखनास हार्दिक शुभेच्छा