वाघापासून त्या मुलाला वाचवता आले असते का?

Submitted by हर्ट on 26 September, 2014 - 11:06

दिल्लीमधील एका प्राणीसग्रहातील ही कालची घटना आहे. एक मुलगा वाघाला बघता बघता खाली पडला आणि वाघाची शिकार ठरला. सुमारे १५ मिनिटे तो जीव वाचावा म्हणून धडपडत होता. तूनळीवर ही घटना बघताना शहारे येतात. तो २० वर्षाचा मुलगा मदतीसाठी प्रयत्न करतो आहे आणि आजूबाजूला विखुरलेली जनता फक्त बघते आहे. प्राणी संग्रहालय निर्माण करताना तिथल्या अधिकाराला जराही सुरक्षितेची खबरदारी करता आली नाही ह्याचे फार नवल वाटते. १५ मिनिटाच्या काळात काहीतरी मदत करता आली असती.

अशा प्रसंगी तुम्ही जर तिथे असता तर काय करु शकला असता जेणेकरुन त्या मुलाचे प्राण वाचवता आले असते? ह्या धाग्याचा उद्देश हा आहे की जे झाले ते झाले पण जे झाले ते खूप वाईट झाले ... अशावेळी आपली भुमिका काय असावी?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक प्रश्न सिरीअसली पडलेला -

जर आपण तिथे असता आणि आपल्याकडे बंदूक वगैरे शस्त्र असते. परवाना असलेले. तर त्याचा वापर केला असता का? वाघाला घायाळ करून किंवा वेळप्रसंगी त्याचा जीव घेऊन त्या मुलाला वाचवले असते का? आता बंदूक कशी असेल असा प्रश्न मनात आल्यास असे समजा की आपण तेथील सुरक्षा रक्षक आहात आणि पिंजर्‍यात पडलेली व्यक्ती आपल्या ओळखीची नात्यातील आहे......
वाघाच्या जीवाची किंमत जास्त लावली असती की माणसाच्या? आपल्या जीवलग माणसाच्या? आणि मग वाघाची हत्या केलीच असती तर कोर्टाचा निकाल काय असता?

<<<<< झु प्रशासनाची जबाबदारी ह्या प्रकरणात सर्वात मोठी आहे.त्या तरुणाच्या कुटुंबाला नुकसानभरपाई दिली गेली पाहिजे.तरुण जर खरोखरच मनोरुग्ण असेल तरी त्याच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळायला हवी. मनोरुग्ण व्यक्तीचे मनस्वास्थ्य ठीक नसते आपण काय करत आहोत नि ह्याचे परिणाम काय होतील ह्याची सारासार विचार करण्याची शक्ती नष्ट झालेली असते >>>>

जे घडल ते दुर्दैवी होतं. पण …….
तो मनोरुग्ण होता यात झु प्रशासनाची काय चूक? हि बाब त्यांना माहित असणे कसे अपेक्षित आहे? मनोरुग्ण व्यक्तीच्या देखभालीची काही जबाबदारी कुटुंबाची नाही काय? (त्यांना त्याच्या आजाराचे स्वरूप, तो कश्या प्रकारची धाडसे करतो व त्याचे परिणाम काय होवू शकतील याची निदान कल्पना तरी होती) शेवटी भारतातली प्राणीसंग्रहालय हि काही मनोरुग्ण प्रूफ नाहीत. पुण्यातील कात्रजच्या सर्पोद्यानात एका मोठ्या हौदात साप आहेत. माझ्या माहितीप्रमाणे तिथे काही कुंपण सुद्धा नाही.
केवळ मनोरुग्ण होता म्हणून नुकसानभरपाई हे लॉजिक काही समजले नाही. पण मनोरुग्णाची सारासार विचार करण्याची क्षमता हि सामान्य माणसाप्रमाणे नसते हे मान्य.

पण २ गोष्टी आहेत.
१) मनोरुग्ण असो किंवा नसो; त्या सुरक्षा रक्षकाने त्याला आत जाऊ द्यायला नको होते. बळाचा वापर करून त्याला अडवायला हवे होते.
२) असे कोणी पिंजर्यात पडल्यावर काय करावयाचे याचे प्रशिक्षण, त्याचा सराव, मनुष्बळ व ते अमलात आणण्यासाठीची साधने हे असायला हवे.

पण ह्या झाल्या आदर्श गोष्टी. आपल्या देशात आदर्श गोष्टी घडतात का हा यक्षप्रश्न आहे.

.

त्या तरुणाची मस्ती त्याला नडली हे का समजत नाही तुम्हाला.
मुळात कठडा ओलांडून वाघाला आ और मुझे खा अस खूले आमंत्रण दिले त्याने.
काही वर्षापुर्वी पुण्यात पेशवे पार्कात अशीच घटना घडली होती त्या वेळी एक तरुण वाघाच्या पिंज-यात आतल्या बाजूला लटकून वाघाला डिवचत होता वाघाने उडी मारुन त्याला पिंज-यात ओढला.
अशा मुर्खांचे करायचे तरी काय ?

वाघाच्या जवळ जाऊ नये याची योग्य ती काळजी झू प्रशासनाने घेतलेली नाही त्यामुळे या घटनेला तेही तितकेच जबाबदार आहेत. त्यांचा निषेध. वाघांची जागा जंगलात आहे पिंज-यात नाही ,पिंज-यात राहिल्याने वाघ जास्त आक्रमक होतात हे तितकच खरे आहे. उगाच उपचाराच्या नावाखाली त्यांना पिंज-यात डांबून झू पार्क चालवायची गरज आहे काय.

अल्पना.. माहितीसाठी आभार.
प्राणीसंग्र्हालयातले प्राणी हे काही माणसाळलेले प्राणी नसतात. त्यांचा माणसांवर राग असण्याचीच शक्यता आहे.
पुर्वी ज्याकाळी जंगलातले प्राणी प्रत्यक्ष बघणे अवघड होते त्या काळातली हि संकल्पना. आता तर अनेक चित्रपटांत. माहितीपटात त्यांना आपण त्यांचे नैसर्गिक जीवन जगताना बघू शकतो. ज्यांना हौस आहे ते प्रत्यक्ष जंगलात देखील जाऊन बघू शकतात, मग हा प्राणीसंग्रहालयाचा अट्टहास कशासाठी ?

अल्पना, तुमचा प्रतिसाद सकाळी वाचला होता, आवडला.

अनेकांनी हळहळ व्यक्त केली व असेही लिहिले गेलेले आहे की तो मनोरुग्ण आहे म्हणून सगळे सोडून द्यावे का? तसेच प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांवर व सुविधांवरही टीका झालेली आहे.

तो व्हिडिओही काल पाहिला होता व सकाळी तो पाहिल्यानंतर दिवसभर डिस्टर्ब्ड होतो. आज सकाळीच पुन्हा कसाबसा पाहू शकलो तो व्हिडिओ. आता पुन्हा पाहणे होणार नाही बहुधा!

पण तरीही मला किरण कुमार ह्यांचे मत पटते की त्या माणसाने तो स्वतः आत पडू शकेल अश्या परिस्थितीत जायलाच नको होते. म्हणजे जर प्राणीसंग्रहालयाचे सर्व कर्मचारी अद्ययावत शस्त्रास्त्रे (अगदी वाघ एका सेकंदात मरेल अश्या तयारीची) घेऊन पिंजर्‍याभिवती तैनात असले, त्यांना वेळ पडली तर वाघाला मारायचे आदेश असले, वाघ नरभक्षक नसला, पडल्यानंतरही बाहेर पळायचे मार्ग उपलब्ध असले तरीही कोणी जीवावर उदार होऊन असे कुठेही उभे राहावे का?

समजा मनोरुग्ण असला तर मला वाटते की त्याच्या मनावर असा प्रभाव असावा की वाघाने खाणे हा मरणाचा सर्वाधिक भीतीदायक प्रकार असून त्या भीतीवर आपण मात मिळवू शकलो तर आपण सुखात जगू शकू. असा माणूस एका विचित्र मनस्थितीत अचानक बेभान होऊन वाघासमोर उडी मारेल व प्रत्यक्षात वाघ एक फुटावर असताना गर्भगळीत होईल व त्याच्यातील सामान्य माणूस जागृत होईल. तो सामान्य माणूस मरण टाळण्यासाठी प्रत्यक्षात काहीही करू शकत नसला तरी निव्वळ केविलवाणी प्रार्थना करत राहील जी वाघाच्या लक्षात येणे शक्य नाही.

त्यामुळे, मनोरुग्णांची त्यांच्या परिवारानेच सर्वाधिक काळजी घेणे अत्यावश्यक वाटते.

दोन गोष्टी खासकरून जाणवल्या:

१. माणसाच्या तुलनेत वाघ प्रत्यक्षात दिसायला केवढा अजस्त्र असतो. (मी बिबट पालन केंद्रातील बिबटे अगदी सहा इंच अंतरावरून पाहिले होते. २९ बिबटे होते. त्यातील कित्येक अंगावर येत होते आणि मध्ये स्टीलचे कुंपण नसते तर निव्वळ खुन्नस म्हणून त्यांनी माणूस मारला असता असे आविर्भाव होते. तरीसुद्धा ते बिबटे साधारण चार फूट उंच व पाच एक फूट लांब होते व ह्या वाघाइतके अजस्त्र तर मुळीच नव्हते. )

२. एक सरासरी साठ सत्तर किलोच्या माणसाला दोन अडीच सेकंदात वाघ किती वेगाने व किती सहज कुठल्याकुठे दातात धरून नेऊ शकतो.

त्या वाघाला आता मारुन टाकले जाईल का? >>>> अस केल तर ती हाईट ऑफ क्रुअ‍ॅलिटि होईल... वाघाने काही पूर्ववैमनस्यातुन त्या मुलाला मारल नाहीये... तो मुलगा जेव्हा वाघासमोर आला तेव्हा त्या वाघालाही काही वेळ लक्षात आल नाही की या प्राण्याकडुन मला धोका आहे अथवा नाही, पण बघ्यांनी मारलेल्या दगडांपैकी एक दगड त्याला लागल्याने त्याने स्वसंरक्षण या बेसिक इन्स्टींक्ट मधुन त्या मुलावर हल्ला केला.. मला तरी या घटनेत जास्त चुक ही बाहेर उभ्या असलेल्या मॉबची वाटते.. त्यांनी दगड मारताना हा विचारच केला नाही की आपण ज्याला दगड मारतोय तो कुत्र्या, मांजरासारखा पाळीव प्राणी नसुन वाघ आहे...

विनित दवे,
खरेय
मागे एकदा आत्मदहन करून जळणार्‍या व्यक्तीचेही विडिओ आणि फोटो पाहिले होते. पण त्याऐवजी त्याला वाचवायला हातपाय झाडता येईल का हा विचार नाही का त्यांना सुचला.

जे झाले ते खरच दुर्देवी होते, पण … वाघांची संख्या कमी होतेय वाघांना मारले जातेय त्याच्या body parts साठी त्याची कधी एवढी मोठी बातमी नाही झाली आणि आज वाघाने एकाला मारले ते पण त्या माणसाच्या चुकीमुळे तो पडला आणि वाघाचा शिकार झाला त्याची एवढी मोठी बातमी होते

शलाका पाटील,
कारण आपण माणसे आहोत, आपण माणसांच्या मारले जाण्यानेच हळहळ व्यक्त करणार हे नैसर्गिक आहे. (मला स्वार्थीपणा नाही म्हणायचेय याला)
वाघांच्याही संवर्धनाबद्दल हल्ली आपण जागरूक झालो आहोत ते फक्त एवढ्यासाठीच की वाघ हा निसर्गचक्र आणि अन्नसाखळीतील महत्वाचा घटक आहे याची जाण आपल्याला असल्याने. वाघांचा विशेष कळवळा आहे हे कारण नाही.
अन्यथा मांसाहार करणारे आपण (सर्वच नसू, काही लोक शाकाहारीही असतात, पण तो मुद्दा नाहीये इथे) कोण्या पशूच्या जीवाबद्दल का हळहळ व्यक्त करू?

माझ्या महितीप्रमाणे (कदाचित चुकिचेही असु शकेल), स्वसंरक्षणासाठी देखिल वाघ मारता येत नाही.

पण सगळ्यांनी मिळुन जेथुन तो आत पडला तेथुन त्याला दुप्ट्टे, बेल्ट्स, दोरी इत्यादी वस्तु वापरुन ५ -१० मि बाहेर काढता आले असते तसा प्रयत्न तरी करायला पाहिजे होता,

पण हे खुप कॉमन झाले आहे. एखादा अपघात झाला कि लोकांना त्यात बघायची इतकी उत्सुकता असते कि समोरच्याला वाचवायला येण्यार्या अँब्युअल्न्सला देखिल रस्ता रहात नाही. इतके लोक त्यावर ड्ब पडलेले असतात कि समोरचा शुध्द्दीवर असेल तर त्याला गुदमरायला व्हावे. आणि यातले उच्च प्रकार म्हणजे रस्त्यावर गाडी लावुन अपघात बघायला जाणारे. Sad

>>>पण हे खुप कॉमन झाले आहे. एखादा अपघात झाला कि लोकांना त्यात बघायची इतकी उत्सुकता असते कि समोरच्याला वाचवायला येण्यार्या अँब्युअल्न्सला देखिल रस्ता रहात नाही. इतके लोक त्यावर ड्ब पडलेले असतात कि समोरचा शुध्द्दीवर असेल तर त्याला गुदमरायला व्हावे. आणि यातले उच्च प्रकार म्हणजे रस्त्यावर गाडी लावुन अपघात बघायला जाणारे. <<<

निपा,

ह्या विशिष्ट प्रकाराच्या बाबतीत मात्र वरील मत नाही पटले.

तो व्हिडिओ पाहिला तर असे आढळेल की बघे हे स्वतःच हादरलेले होते व नुसतेच घाबरून 'ए, ए' असे ओरडू शकत होते. डोळ्यासमोर एक माणूस असा वाघासमोर पडलेला असणे आणि वाघ त्याच्यापासून फुटावर असणे हे दृष्य सामान्य माणूस पाहू शकतही नसतो आणि इच्छितही नसतो. त्या अवधीत त्याला काही मार्ग सुचणे जवळपास अशक्य असते. त्यातल्यात्यात वाघाला घाबरवून मागे हटवण्यासाठी बिचार्‍यांनी वाघालाच दगड वगैरे मारले. त्यांना कल्पनाही नसेल की त्यांचे हे कृत्य उलट वाघालाच डिवचेल.

त्यांना कल्पनाही नसेल की त्यांचे हे कृत्य उलट वाघालाच डिवचेल.>> बेफी इन्फॅक्ट हेच. कि लोकांना नेमके काय करायचे हेच नाही कळत. आता प्राणी संग्रहालयातील लोक सांगताहेत कि लोकांच्या गर्दी आणि कोलाहलामुळे त्याला वाचवण्यात अडचणी आल्या,

इफ यु कान्ट हेल्प, अ‍ॅटलिस्ट प्लिज डोन्ट बीकम ऑब्स्टॅकल.

खरे आहे निपा, माझे म्हणणे इतकेच आहे की आपण त्या माणसाच्या सुटकेतील एक अडथळा बनत आहोत हे समजण्याइतकीही आकलनशक्ती अश्या प्रसंगी न राहणे हे सहज शक्य आहे व नेमके तेच झाले. Sad

व्हाटसप्प वर मला आलेला एक मेसेज :

सध्या एका वाघाने माणसाला खाल्ले हा विडियो सर्वत्र फिरत आहे पण एखाद्या वर असा प्रसंग आला तर त्याला कसे वाचविता येईल या बाबत कुणी काही बोलत नाही किंवा कुणाला काही माहिती नाही असे वाटते. म्हणून माझ्या कडून एक छोटासा प्रयत्न.

वाघ किंवा कोणतेही जंगली जानवर आगीला खूप घाबरतात हे एक सत्य कुणाला फारसे माहिती नसते. तो माणूस खाली पडल्या वर जर एखाद्या माणसाने आपल्या शर्ट चा बोळा करुन आग लावून पडलेल्या माणसा जवळ टाकला असता तर तो वाघ घाबरुन पळून गेला असता व बराच वेळ आला नसता. दरम्यान एक लाकडाला कापड बांधून त्या वर तेल डिझेल जे मिळेल ते टाकुन टेम्भा बनवून टाकला असता व त्या माणसाने तो टेम्भा हातात धरला असता तर तो वाघ घाबरुन तिथे आलाच नसता. नंतर माणसाला दोराने वर ओढून काढता आले असते.

मी दहा वर्षाचा असतांना (49 वर्षा पूर्वी) वडिलांबरोबर एक मित्राच्या शेतात हुरडा पार्टी ला गेलो होतो. (जळगाव जिल्हा सावदा नावाचे गावी) रात्री 8 वाजले असावे. खेडेगाव असल्याने सर्वत्र अंधार होता. पार्टी चालू असताना एक कामगार पळत आला आणि त्याने सांगितले की त्याने जवळच वाघ पहिला. शेत मालकाने त्याच्या कामगारांना जळते टेम्भे घेउन चारी दिशांना पाठविले. थोड्या वेळाने ते कामगार परत आले आणि त्यांनी सांगितले की वाघ घाबरुन पळून गेला.

विश्राम देशपांडे

चौथा कोनाडा, केनयात गाडीचे हेडलाईट्स ( वेगळे काढलेले ) गाडीच्याच बॅटरीवर चालवून सिंहाचा पळवून लावायचा
प्रयोग यशस्वी झाला आहे. तिथे सिंह पाळीव गायींवर हल्ला करतात.

पण त्या प्रसंगात बघ्यांना हे सुचणे अशक्य आहे. सुरक्षा रक्षकांना उपलब्ध असलाच तर पाण्याचा जोरदार फवारा मारून वाघाला पळवता आले असते. पण अशा प्रसंगी कसे वागायचे याचे प्रशिक्षण सुरक्षा रक्षकांना तरी मिळाले असेल का ? याची मला शंका आहे. शिवाय त्या मूलालाही आपण काय करतोय ? आता आपल्याला धोका आहे, पळायला पाहिजे याचेही भान राहिले नसणार.

उंटावरून शेळ्या हाकणारेच बरेचसे.

एकतर नियम पाळायचे नसतात. आम्ही कसे जिथपर्यंत जायला परवानगी होती त्याच्याही पुढे गेलो याचेच फालतू कौतुक. आणि मग घटना घडली की व्यवस्थेच्या नावाने, इतर लोकांच्या नावाने बोंब.

एक माणूस वाघाच्या पिंजर्‍यात पडला हाच शॉक नसेल का बघणार्‍याला?
काय करावे वगैरे सुचून ते अमलात आणेपर्यंत खाल्ले त्या वाघाने त्या माणसाला..

लोकांना लहानपणी वाचलेल्या टारझन वगैरेच्या कथा, सिनेमामधे बघितलेली हिरो आणि वाघाची फाइट हे सगळे फिक्शन आहे हे माहित नसतं का? अश्या प्रकारच्या प्रसंगात डोकं जाग्यावर ठेवून पटकन कार्यवाही करायची याचे ट्रेनिंग सैन्यात वगैरे देत असावेत. सामान्य माणसाला नसते हे ट्रेनिंग.

मुळात सामान्य माणसाला नियम पाळण्याचे आणि भलत्या ठिकाणी आपला शूरवीरपणा न दाखवायचे ट्रेनिंग दिले जाण्याची गरज आहे.

सामान्य माणसाला नियम पाळण्याचे आणि भलत्या ठिकाणी आपला शूरवीरपणा न दाखवायचे ट्रेनिंग दिले जाण्याची गरज आहे.>>> अनुमोदन

असे ट्रेनिंग कुटुंबीय, शिक्षक व भीती ही भावना निर्माण करणारा आपला मेंदू ह्यांच्याकडून मिळते. पण शेवटी 'एवढं काही लगेच होत नाही' वगैरेसारखे विचार माणसातील इगो जागृत करून त्याला नको तितके धाडसी बनवतात. (असेच सहसा रस्त्यावरच्या अपघातांमध्येही होते).

माणूस मनोरुग्णच असला तर गोष्ट वेगळी!

प्राणीसंग्रहालयात बाकी काही नसले तरी ठिकठिकाणी सूचनांच्या पाट्या तरी असणारच. तेवढ्या वाचून त्यानुसार वागले तरी सुरक्षितपणे प्राणी बघता येतील हे कळण्यासाठी डोके ठिकाणावर ठेवणे आवश्यक आहे.

सामान्यतः वाघ आणी सिन्ह हे असे दोन प्राणी आहेत, की जे पोट भरलेले असेल तर दुसर्‍या कुणाकडे ढुन्कुनही पहात नाही. या उलट बिबट्या, तरस आणी लान्डगे असे आहेत की जे कुणालाच तसे सोडत नाहीत. खातील एकाला आणी मारतील ४ जणाना. हे मी जन्गलाबद्दल बोलतेय कारण जन्गलात हे प्राणी निसर्ग नियमानुसारच वागतात.

आता याना प्राणी सन्ग्रहालयात का कोन्डले जाते? यान्चे शोपीस का बनवले जाते हे सरकारच जाणो. कदाचीत जन्गालातुन भटकुन मनुष्य वस्तीत येऊन गोन्धळ माजवल्याने प्राणी सन्ग्रहालयाची गरज निर्माण झाली असेल. बर्‍याचदा अस्वले, कोल्हे, माकड हे छोटे प्राणी माणसाच्या स्वार्थी पणाला बळी पडल्याने नाचा-नाची करतात. त्यान्चे स्वातन्त्र्य हरवले जाते, ते होऊ नये म्हणूनही झू निर्माण झाले असेल. पण शेवटी तो पिन्जराच ना.

कात्रज झू मध्ये वाघोबा ( चॉकलेटी आणी पान्ढरा) दोन्ही बघीतले. पेशवे पार्कात लहानपणी पहातच होतो. पण लोक वाघ पाहील्यावर खरच येडे चाळे करतात. त्याला शुक्शुक काय, टाळ्या काय. तरी ते दोघे लाम्ब होते. पण मध्ये कुम्पण मोठे नव्हते. तो बाबाजी ठरवले तरी नक्कीच उडी मारुन येऊ शकला असता. बिबट्याचे त्या मानाने वरपर्यन्त गज होते.

एन जी सी वर त्यानी सान्गीतले की वाघाची डरकाळी किन्वा नुसते प्रत्यक्ष दर्शन देखील भक्ष्याच्या छातीत धडकी भरवणारे असते. वाघ समोर अचानक उभा राहील्यावर प्राणी/ व्यक्ती हिप्नोटाईज होतेच होते. फार दुर्मिळ असते अशा वेळी जीव वाचवणे. वाघ जर तृप्त असेल तर तो तुमच्याकडे ढुन्कुनही पहाणार नाही. मग त्याला त्या वेळी डिवचुन काय साधले देव जाणे.

प्रसन्गावधान राखणे ही मनाची स्थिती. मनातच दहशत असेल तर काय कप्पाळ सुचणार ?

हो क ? त्यांची मुंडी मोघलानेच मोडली ना?

मोदीना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायला सांगा. णाहीतर पुढच्या निवडनुकीत जनता त्यांचे डोस्के काठीला लावुन नाचवेल.

हे जाहीर विधान करणार्‍या संमिला वाघाने खाल्ला असता तर किती चांगले झाले असते. वाघच तो त्याला माणसासारखी कुठे अक्कल असते.

नवीन... तुम्ही हा नवीन वीषय काढुन ह्या प्रकरणाला राजकिय रंग देन्याचा प्रयत्न करताय... आता सचीन पगारे पण सक्रिय होतिल..

Lol नाय ते चौकात उभे राहुन जामोप्याना ओरडुन निरोप देतायत. त्याना जामोप्यान्च्या गल्लीत, आतपर्यन्त जायचे नसेल.:फिदी:

Pages