हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.
जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.
नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.
https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit
(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):
अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.
स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.
वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.
(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :
विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).
मला थंडी चालत नाही....
मला थंडी चालत नाही.... हिमालयातले बर्फ घालवा, मग मी येते ताबा घ्यायला.
साधना, तुझा गैरसमज होतो आहे.
साधना, तुझा गैरसमज होतो आहे. त्या वाक्यात तुझे नाव आले पण मी तो फक्त एक शब्द म्हणून तिथे वापरला आहे. तरी सुद्धा माफी असावी.
साधना, बर्फ घालवलास तर पूर
साधना, बर्फ घालवलास तर पूर येतील ना. अशी कशी गं तू!
बी, साधनाला हिमालय दिलास. मला निदान सह्याद्री तरी दे ना. गेला बाजार मलबार हिल पण चालेल.
अरे, ही सगळी गंमत चालली आहे. नावावरुन कोटी चालू आहे.
सश्रद्धांची मतं बदलणार नाहीत
सश्रद्धांची मतं बदलणार नाहीत म्हणून ती बदलायचा प्रयत्न करायचा नाही
की त्यांची संख्या जास्त आहे म्हणून करायचा नाही?
की त्यांचं आपल्यापरीने बरोबरच आहे (असेल) म्हणून?
प्रश्न नेहमीच त्यांचा उपद्रव किती आहे (स्वतःला आणि समाजाला) यावरून येतो
नुसताच (म्हणजे काय?) सत्यनारायण केला तर हरकत नसावी
पण त्याबरोबर साधु वाण्याची गोष्ट वाचली, ती इतरांना ऐकवली, इनडायरेक्टली स्वत:च्या धर्माला वरच्या स्तरावर नेऊन ठेवलं तर चुकीचे पायंडे पडणं सुरु होतं
हे जर समजूनही तिकडे कानाडोळा केला तर ते अयोग्य आहे असं मला वाटतं
बरं, मग?
बरं, मग?
केदार, पेशवा, अगदी मुद्देसुद
केदार, पेशवा, अगदी मुद्देसुद पोस्ट्स.
सश्रद्धांची मतं बदलणार नाहीत
सश्रद्धांची मतं बदलणार नाहीत म्हणून ती बदलायचा प्रयत्न करायचा नाही >>> का करायचा?
उपद्रव कुणाचाही (सश्रद्ध / अश्रद्ध) असला तर त्याला विरोध नक्की करावा.
स्वतःच्या घरी बसून कुणी श्रद्धेने सत्यनारायण करत असेल, त्या पुजेत समावेश असलेली कथा वाचत असेल तर कुणी का विरोध करावा? पण त्याच बरोबर ढणाढणा स्पीकर्सवरुन "ऐका सत्यनारायणाची कथा..." किंवा इतर गाणी वाजवत असेल आणि त्याचा त्रास होत असेल तर विरोध करावा. ज्यांना ती कथा बोअर होते त्यांनी ती ऐकू नये. पूजा करणार्यानेही कथा वाचायला सुरुवात करताना कुणाला ऐकायची असेल तरच ऐकायला बसवावे. जबरदस्ती करु नये. त्याने ऐकणार्याला डुलक्या येऊ लागतात.
स्वतःचा धर्म इतर धर्मांची कुचेष्टा न करता/कुणालाही त्रास न देता/कुणाला इजा किंवा हत्या न करता कुणी पाळत असेल तर त्यात चुकीचा पायंडा काय असू शकतो?
ता.क. मी आजपर्यंत फक्त एकदाच सत्यनारायणाची पूजा केली आहे. आणि तेव्हाही अर्धी पूजाभर मी, नवरा आणि गुरुजी हसत बसलो होतो कारण सहस्रनामांचा आणि तुळशीपत्र वाहण्याचा स्पीड काही जमेना. म्हणजे खरंतर आम्ही स्वतःवरच हसत होतो.
आशिष, त्यांच्या संखेचा काय
आशिष,
त्यांच्या संखेचा काय संबंध? एकेकाळी मी ही सश्रद्धच होतो आणि मला त्याची लाजही वाटत नाही. पण माझ्या त्या सश्रद्धतेच पण कुठला बळी बसत नव्हता.
प्रयत्न करायचा नाही असे लिहिलेले नाही. प्रयत्न करायचाच. पण त्यात तू मूर्ख आणि मी शहाणा, ही मांडणी चुकीची आहे असे मी लिहितोय. वैज्ञानिक भाषेत, गणित समजावून, स्टेप बाय स्टेप सोडवावे, लगेच उत्तर काढण्याची घाई चुकीची आहे. जी निदान ह्या फोरमवर वारंवार दिसतेय.
प्रश्न नेहमीच त्यांचा उपद्रव किती आहे (स्वतःला आणि समाजाला) यावरून येतो >> एकदम रास्त ! कसं बोललास !
इतकावेळ इथे श्रद्धा ही एकाच पारड्यात तोलणे चालू आहे ते चुकीचे आहे. प्रत्येक श्रद्धेचे उपद्रव मुल्यच काढावे लागेल. कुणी आई जर मुलाला पाया पड म्हणत असेल तर त्यात काहीही उपद्रव सध्या नाही, पण बळी ही कोणाची श्रद्धा असेल तर त्याला सजा व्हावीच. आणि म्हणूनच मग कायदे केले जातात. आणि ते पाळले जावेत.
१८५० मध्ये सती कुणाची तरी श्रद्धा होती की, पण आज २०१४ मध्ये ते चित्र बदललं, तस्मात पेशन्स आणि सारखे योग्य ते ज्ञानदान ( ते पण न चिडता, वैतागता) महत्त्वाचे, मगच समाज वगैरे बदलेल. अहो समाजाचे जाऊ द्या एक दोनदा बोलून नास्तिक माणूस आपल्या स्पाऊसला बदलू शकत नाही. निदान मी तरी इतक्या वर्षानंतर फक्त काही बेसिक गोष्टीच कन्विन्स करू शकलो. आणि ते सांगायला मला त्रास नाही.
एकदा सत्यनारायण घातली की
एकदा सत्यनारायण घातली की आयुष्यभर खरे बोलावे लागते. तो एक वसा आहे.जर खोट बोलल तर सत्यनारायण कोपतो. एकदा का सत्यनारायण कोपला की मग काही खर नाही बर का!
केदार मस्त लिहितोयस. आपल्या
केदार मस्त लिहितोयस. आपल्या भूमिकेवर ठाम असलास तरी माझी भूमिकाच बरोबर आहे हा अट्टाहास न बाळगल्याचे कौतुक वाटतेय.
इब्लिस, सिरियसली? तुम्ही
इब्लिस, सिरियसली? तुम्ही उचकवण्याकरता लिहित आहात हे तुमच्या स्मायलीवरुन ओळखून लोकांनी ते सिरियसली घेऊ नये हे समजायचं? म्हणजे आता तुम्ही काहीही लिहिलं तरी आधी विचारुन घ्यायचं की सरळ लिहित आहात की उपरोधक आणि मग उत्तर द्यायचे? What a waste of time!
उपरोधक बोलणं कधी कधी गमतीदार वाटतं पण सारखच काये?
केदार, वेल्कम बॅक आणि चांगलं लिहितोयस खरं पण हे इब्लिस फक्त उचकवाउचकवी करण्यात धन्यता मानतात त्यामुळे Don't waste your time and energy.
इथे परत गाडी वरिजिनल ट्रॅक वर आणायची गरज आहे असं दिसतय. आपल्या स्वतःची किंवा समाजामधली अंधश्रद्धा कमी व्हावी ह्या करता आपण काय वैयक्तिक प्रयत्न करत आहोत ह्याबद्दल लिहा कोणीतरी. फक्त सारखं लोकांना हुडूत हुडूत करत, मुर्खात काढतो हा वैयक्तिक प्रयत्न असू शकत नाही हे लक्षात घेऊन मगच लिहा कृपया.
>> पण सारखच काये? >> फक्त
>> पण सारखच काये?

>> फक्त सारखं लोकांना हुडूत हुडूत करत, मुर्खात काढतो हा वैयक्तिक प्रयत्न असू शकत नाही
इब्लिस, I usually enjoy your brand of sarcasm, पण बुवा म्हणतात त्यात तथ्य आहे.
इतके दिवस मला इब्लिस यांच्या
इतके दिवस मला इब्लिस यांच्या सातत्याने श्रद्धा/अंधश्रद्धा खोडून काढत राहाणार्या पोस्टस आवडायच्या.पण पण पण...
त्या सत्यनारायणापायी आता त्या सगळ्याची व्हॅलिडिटी संपली माझ्यासाठी.
बाप रे २००+ ! वाचूयात
बाप रे २००+ !
वाचूयात हळूहळू...
योगायोग म्हणजे दोनच
योगायोग म्हणजे दोनच दिवसांपूर्वी असं वाटलं होतं की गावोगावी जेव्हां विद्युतदाहीन्या लोकप्रिय होतील तेव्हां लोकांच्या मनोवृत्तीत बराच फरक पडलेला असेल. कारण ब-याचशा समजुती या जन्म मृत्यूशी संबंधित आहेत. बदलत्या काळानुसार अंत्ययात्रा काढणे हे ही खूळ निकालात निघत चालले आहे. तसंच सर्वांनी सुटी टाकून असेल त्या गावाहून पोहोचेपर्यंत प्रेत सडवत ठेवणे हे ही इतिहासजमा होत चालले आहे. वेगवान जीवनशैलीमुळे हे बदल होत असतील तर ब-याचशा समजुती आणि प्रथा या रिकामटेकडेपणातून आलेल्या असाव्यात. नॉर्वेकर गुरुजींचं म्रुत्यूपत्र य ना वालवलकर यांच्या एका चांगल्या लेखात वाचायला मिळालं होतं. ते पुन्हा एकदा वाचायला मिळाल्याने आभार मानायला हवेत धागाकर्त्याचे,
धाग्याचा विषय भविष्याशी संबंधित आहे. सुरुवातीच्या आणि शेवटच्या पोष्टीत त्याबद्दल काही आढळले नाही.
प्रथा परंपरा या लिखीत
प्रथा परंपरा या लिखीत स्वरूपात नाही.
भारताच्या राज्यघटनेच्या कलमांबद्दल देखील ही कलमे अनावश्यक आहेत असं काही लोकं बोलतात. पण ही कलमं टाकण्याचा उद्देश काय आहे याच्या चर्चा वाचल्या तर मत बदलू शकतं.
एका धार्मिक संघाच्या शिबिरात असं शिकवतात की माणूस हा मूळचा निरागस असतो. जन्मतः त्याच्यावर कुठलीही पुटं चढलेली नसतात. पण चार दिशांच्या देवता त्याला खेळवत असतात. तो जे काही बोलतो, वागतो ते त्यांच्या इच्छेप्रमाणे. म्हणून पूर्व दिशेच्या देवतांना समर्पण करताना हे पूर्व दिशेच्या दैवतांनो, माया मोह हा माझा मूळचा गुण नाही. हे तुमचे गुण तुम्ही परत घ्यावेत यासाठी मी तुम्हाला शरण जातो. तसंच दक्षिणेला काम वासना, पश्चिमेला लोभ, इर्षा यासाठी तर उत्तरेला क्रोध, अहंकार यासाठी साकडे घालायचे.
आता या पाठीमागे उद्देश असा असावा की माणसाच्या मनातून या भावना आपल्यातून नाहीशा झाल्यात असे वाटावे आणि हळूहळू त्याच्या मनाचे कल्टीवेशन होऊन निगेटीव्ह गोष्टींचं प्रमाण कमी व्हावं. जर हा उद्देश माहीत नसेल तर मग या दैवतांचं स्तोम काही काळाने माजून त्याचं विकृतीकरण होईल. त्यात आणखी काय काय गोष्टी अॅड होतील आणि ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे काहीच्या काही प्रकरण कालांतराने ऐकू येईल.
ही एक शक्यता फक्त उदाहरण म्हणून. असंच असेल असं नाही. मुद्दा प्रोसेसचा आहे. ही प्रथा जेव्हां केव्हां सुरू केली तेव्हां बुद्धीचा वापर केला जाणार नाही हे अपेक्षित असावं. यावर बौद्धीकं झडलीच तर मूळ कल्पनेतच दोष आहे. म्हणून त्याचा कीस पाडला जाऊ नये. अपेक्षित परिणाम काय साधायचा आहे तो साधला जात असेल तर उद्देश सफल झाला म्हणायचं.
याच्या उलट उदाहरण पाहू.
नास्तिक दर्शनातल्या बौद्ध तत्त्वज्ञानाप्रमाणे आत्म्याचा पुनर्जन्म होत नाही. पुनर्जन्म ही कल्पना मान्य नाही. त्याऐवजी स्कंधांचा पुनर्जन्म मान्य केला गेला आहे. स्कंध म्हणजे षडरिपू, रूप, रंग, ठेवण, बुद्धी, विचार, विकार, वाणी इ.इ. . हे एका पिढीकडून दुसरीत ट्रान्सफर होत असतं. हे देखील लिखीत स्वरूपात नाही. मधल्या काळात याचे अनेक विपर्यास होऊन अशाच छोट्या छोट्या शिकवणींमधून भलत्याच गोष्टींनी जन्म घेतल्याने बौद्ध धर्माच्या भिक्खूंमधे वैशाली इथं तिसरी परिषद होऊन त्यात प्रचंड वादविवाद होऊन तीन पंथ झाले. त्यातल्या एकाने विपर्यस्त स्वरूपात शिकवण चालू ठेवली तर एका पंथाने मूळ उद्देश काय होता यावर भर दिला. आज सुदैवाने विज्ञानाने जीन्स, डीनए हे सिद्ध केल्याने मूळ उद्देश माहीत होतोय.
म्हणण्याचा उद्देश - टीका करण्याआधी थोडावेळ मूळ उद्देश काय असावा याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा,
( टीप : मी नास्तिकच आहे आणि अंधश्रद्धांचं भलामण करण्याचा कुठलाही हेतू नाही. मयतानंतर केल्या जाणा-या काही विधींमागे शोकावरून लक्ष विचलित करणे आणि इतर गोष्टीत बिझी करणे हा हेतू असेल तर काही प्रथांमधे कुठलाच लॉजिकल उद्देश दिसत नाही. विधी करणा-यांची सोय इतकेच असावे. दोन पोष्टींमधे विरोधाभास का आहे असा अपेक्षित प्रश्न असल्याने आधीच हा उद्योग. कल हम रहे ना रहे, जवाब याद रहे ना रहे
)
तसेही हिमालय भुकंपामुळे
तसेही हिमालय भुकंपामुळे निर्माण झाला हे सांगून श्रद्धेला थोडाफार धक्का बसला, अगदी सौम्य असेल तो पण इतके सध्यासाठी पुरे. >> केदार, हे तुझे शास्त्राबद्दल अज्ञान की सश्रद्ध लोकांच्या स्थितप्रज्ञतेवर विश्वास?
भुकंपामुळे हिमालय तयार झाला म्हणजे रिश्टर स्केलची सूई लाखाच्या नंबरला तरी टेकली असेल आणि म्हणे सौम्य धक्का बसला.
रिश्टर स्केलच्या सात, आठ, नौ,
रिश्टर स्केलच्या सात, आठ, नौ, दहा या आकड्यांमधल्या भूकंपाची तीव्रता एकमेकापेक्षा किती पटीने अधिक असते ?
ओके. सत्यनारायण घालू आता
ओके.
सत्यनारायण घालू आता इथे.
१. श्रद्धावान हे मूर्ख असतात, असे म्हणायला सुरुवात कुणी केली? मी?? धागा नीट वाचा. तो शब्दप्रयोग सर्वप्रथम पेशवा यांनी केला आहे..
तेव्हा माझ्यावर टीका एक्स्पेक्टेड होतीच.
२. तीच री ओढत, माझ्यावर 'तुम्ही तुमच्या घरी अमुक करता का? घरच्यांना तमुक करू देता का?' असे प्रश्न विचारून, मग तुम्ही श्रद्धाळूंना मूर्खात काढत आहात, असले स्ट्रॉमॅन आर्ग्युमेंट केदार जोशी यांनी नेहेमीच्या स्टायलीत सुरू केले.
३. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे त्यांचे भक्त इथे आहेत म्हणे
४. समोरचा काही चुकीचे करीत असेल, तर त्याला तू चुकीचे करतो आहेस, हे स्पष्टपणे सांगणे, याला मूर्खात काढणे म्हणायचे का?
५. केदार जोशी यांचे ते आर्ग्युमेंट वाचून सत्यनारायणाची पूजा घालण्याबद्दल मी लिहिलेला माझा प्रतिसाद १००% योग्य आहे असेच माझे अजूनही मत आहे.
६. अन हो. मी मते बदलतो, माझी चूक असल्यास सपशेल माफीदेखिल माबोवरच मागितलेली आहे. पण इथे ती शक्यता अजीब्बात नाही.
सश्रद्धांच्या श्रद्धेस हाताशी धरून त्यांना मूर्ख बनविण्याचे अनेक उद्योगधंदे डोळ्यासमोर धडधडीत दिसत असतानाही, त्यावर जर कुणी या प्रथा मूर्खपणाच्या आहेत, असा अर्थ निघणारे बोलले, तर तो चुकीचा, असे कसे काय ठरते?
पुन्हा एकदा माझा सत्यनारायण वाचा. 'पूजा घालेन' असा शब्दप्रयोग आहे तिथे. त्यावरून इब्लिसांच्या स्टायलीबद्दल सुरू आहे. माझ्या तोंडून संयत भाषा यायलाच नको असेल, तर जहाल बोलायची अन त्यापोटी वाईटपणा घ्यायची सवय मला आहेच.
पण इथे खरंच कैच्याकै सुरू आहे. चर्चा न वाचताच लिहितात ब्वा लोक इथे.
मुद्दा सुरू झाला तो आदिमानवापासून अंधश्रद्धा आल्या, अन त्यामुळेच माणूस टिकला या प्रतिपादनापासून.
घरात आई/आजी/बाबा/आजोबा कुणीतरी 'देवाला' नमस्कार करायला शिकवतो. अमुक केलं तर 'देव' शिक्षा करील हे सांगत जातो इ. पासून लहान मुलांची श्रद्धा निर्माण होते, हे प्रतिपादन मी केले. (देवावरील) श्रद्धेचे ओरिजिन तिथे आहे. ती रेशियल मेमरी नाही, हे मला सांगायचे होते.
त्यासोबत एक सत्यनारायणाचे उदाहरण दिले, जे केदार जोशी यांच्या 'मूर्खात काढणे' या स्ट्रॉमॅन आर्ग्युमेंटसंबंधी होते. मी म्हणालो, की तिथे जर मी चारचौघात डिक्लेअर केले, की मी पूजा करणार नाही, तर तिथले 'सश्रद्ध' लोक मला मूर्खात काढतील की नाही?
याला केजो यांनी होय असे उत्तर देऊन सत्यनारायण धोपटायला सुरुवात केली.
ही अशी चर्चा चालते इथे? पेशवे मला सांगतात, इब्लिस भुई धोपटतो. मुद्दे मांडा!
चंमतग आहे सगळी. गापै जास्त चांगली चर्चा करायचे यापेक्षा..
***
स्ट्रॉ-मॅन आर्ग्युमेंट :
वादविवाद करताना, समोरच्याच्या बोलण्याचा धागा पकडून एक वेगळाच बागुलबुवा (पेंढ्याचा माणूस/ स्ट्रॉ मॅन) तयार करणे अन मग तेच मूळ आर्ग्युमेंट आहे, असे भासवत, त्या पेंढ्याच्या पुतळ्याला बडवत सुटणे, ही स्ट्र्याटेजी न खोडता येणार्या मुद्यांचा प्रतिवाद करताना वापरतात.
'मूर्खात काढणे' हे अशा प्रकारचे आर्ग्युमेंट आहे.
***
इती श्री सत्यनारायण कथा समाप्त.
:ड्युआय मोड: गण्या
:ड्युआय मोड:
गण्या +१०००००००००००००००००००००००००००००
:ड्युआयमोड ऑफः
रिश्टर स्केलच्या सात, आठ, नौ,
रिश्टर स्केलच्या सात, आठ, नौ, दहा या आकड्यांमधल्या भूकंपाची तीव्रता एकमेकापेक्षा किती पटीने अधिक असते >> ते कुणाच्या श्रद्धेला किती सौम्य किंवा प्रचंड तडा जातो तसे बदलते, व्यक्तीसापेक्ष असावे कदाचित.
बरं, खालीलपैकी नेमके काय करणे जास्तं हीन असते किंवा माणूसकीला धरून नसते ते कोणी तरी सांगा....
लोकांना मुर्खात काढून किंवा मूर्ख समजून त्यांचा अवमान करणे?
की
लोकांसमोर मूर्ख विधाने करून त्यांच्या प्रामाण्यावादाच्या खतपाण्यावर वाढलेल्या बुद्धीला झीट आणणे?
चमन, अरे तो सौम्य त्याच्या
चमन, अरे तो सौम्य त्याच्या श्रद्धेला बसलेल्या धक्क्याला म्हणत आहे ना? ज्या भुकंपाच्या धक्क्यानी हिमालय तयार झाला त्याला नाही.
१) तू पोस्ट नीट वाचली नाहीस की २) पोस्ट नीट वाचली पण उपरोधाने बोलत आहेस?
नं २ असेल तर नो प्रॉबलेम.
I agree with kedar here. Too
I agree with kedar here.
Too scared to write anything more.
सत्यम ब्रूयत प्रियम ब्रूयात.
इथे सगळेच उपरोधानेच बोलत आहेत
इथे सगळेच उपरोधानेच बोलत आहेत यावर माझी श्रद्धा बसत चालली आहे.
रिश्टर स्केलप्रमाणे ७.० आणि
रिश्टर स्केलप्रमाणे ७.० आणि ७.१ या स्केलमधे प्रचंड फरक आहे. प्रत्यक्षात ६.० आणि ७.० यातलं अंतर अनेक पटींनी असतं. हे दहाच्या लॉगरिथप्रमाणे असल्याने सात आणि आठ मधे दहा पटींचं अंतर असतं तर निर्माण झालेली उर्जा ही ३१.६ पटीने अधिक असते. सहा रिश्टर स्केलचा भूकंप हा विनाशकारी असेल तर दहा पटीने मोठा भूकंप किती असेल याची कल्पना आपण करू शकू का ?
इथे मला 'मी इतरांना मूर्खात
इथे मला 'मी इतरांना मूर्खात काढतो' असे बळेच म्हणून माझा अवमान करणे सुरू आहे.
तिसर्याचे वाक्य कोट करून 'इब्लिस असे म्हणतात', असे म्हणणार्या प्रतिसादावरून माझ्याबद्दल मत देणार्या प्रतिसादांना खरंतर उत्तर द्यायची गरज नाही. पण धाग्यावर माझी प्रत्येक पोस्ट मूळ स्वरूपात उपलब्ध असताना ती न वाचताच पोस्टी येत असतील तर वाईट वाटल्याशिवाय राहवत नाही.
सत्यम ब्रूयत प्रियम
सत्यम ब्रूयत प्रियम ब्रूयात.
<<
If you don't come into the flock you get promises of Hellfire and Brimstone! And much more.
But if you try to assert your atheism, in similar terms, it is wrong? Why?
दोन श्रद्धा नावाच्या मुली
दोन श्रद्धा नावाच्या मुली असतात. त्यातल्या एकीला दिसत नसतं.
तसेही हिमालय भुकंपामुळे
तसेही हिमालय भुकंपामुळे निर्माण झाला हे सांगून श्रद्धेला थोडाफार धक्का बसला, अगदी सौम्य असेल तो पण इतके सध्यासाठी पुरे. >> केदार, हे तुझे शास्त्राबद्दल अज्ञान की सश्रद्ध लोकांच्या स्थितप्रज्ञतेवर विश्वास?
भुकंपामुळे हिमालय तयार झाला म्हणजे रिश्टर स्केलची सूई लाखाच्या नंबरला तरी टेकली असेल आणि म्हणे सौम्य धक्का बसला. >>
चमन !! अरे चमन, बाबारे मी बी च्या श्रद्धेला सौम्य धक्का बसला असे म्हणले आहे रे! हिमालयाला नाही. !
Too scared to write anything more. >> + १ म्हणून घेतो वरचे वाक्य पाहून.
शास्त्राबद्दल अज्ञान की
शास्त्राबद्दल अज्ञान की सश्रद्ध लोकांच्या स्थितप्रज्ञतेवर विश्वास? >> ह्याचं ऊत्तर लिहायला घ्या बुवा म्हणजे ऊपरोध आहे की नाही ते कळेल
स्कॉटलंड वेगळा न झाल्याने एकूण अॅवरेज माणशी ब्रिटिश सार्कॅझम ची तीव्रता टिकली, वाढली की घटली कशी?
अलिबाबा आणि चोर दिसले का कुणाला?
गण्या तुम्ही नंबर गेम करू नका राव, ईफेक्ट बद्दल बोला. कोणाचं बूड किती जाडजूड त्यावर त्याच्यावर भूकंपाचा किती परिणाम होणार हे ठरणार की नाही, मग भूकंप रिष्टर स्केल वर ७ असो किंवा ३१.६.
म्हणून मी म्हण्तो भूकंप मोजू नका, बुडाची जाडी (स्थितप्रज्ञता) मोजा. ते जास्त अॅक्युरेट परिमाण आहे.
Pages