हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.
जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.
नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.
https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit
(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):
अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.
स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.
वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.
(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :
विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).
मनोज धागा वर आणल्याबद्दल
मनोज धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद.खरोखर ह्या निरर्थक अंधश्रद्धा सोडल्या तर देशाचे चित्र हे आशादायी असेल आपोआप अच्छे दिन येतील. ते आणण्यासाठी कुणाच्या तोंडाकडे पाहत बसावे लागणार नाही .
नार्वेकर गुरुजींच्या
नार्वेकर गुरुजींच्या मृत्युपत्राची लिंक चालत नाही ना आता. २००९ मधे चालत होती.>>>aschig,प्रकाश घाटपांडे आपणाकडे हि लिंक असल्यास कृपया येथे पुन्हा द्याल का
सध्या माझ्याजवळ ते पुस्तक
सध्या माझ्याजवळ ते पुस्तक नाही आणि सर्वर गेला आहे
शक्य होईल तेंव्हा स्कॅन टाकीनच, पण तोपर्यंत आणखी कोणी ते करु शकलं तर बरं होईल
नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र
नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र इथे पहा
https://drive.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit?usp=sh...
प्रकाश, अनेक धन्यवाद! इतक्यात
प्रकाश, अनेक धन्यवाद!
इतक्यात काही लोक ते मृत्युपत्र न वाचताच या धाग्यावर लिहीत होते. निदान ते आता वाचू शकतील (इच्छा असल्यास).
हे मृत्युपत्र पान ९३ दिसते
हे मृत्युपत्र पान ९३ दिसते ज्यात केवळ २-३ ओळी आहेत. या पुढचे काही दिसत नाही. मृत्युपत्र पुर्ण न वाचता प्रतिसाद देणारे ग्रेट आहेत.
नितीनचंद्र, हे घ्या
नितीनचंद्र, हे घ्या :
हे घाटपांड्यांनी अपलोड केलेल्या पीडीएफचे स्क्रीनशॉट आहेत.
<हे मृत्युपत्र पान ९३ दिसते
<हे मृत्युपत्र पान ९३ दिसते ज्यात केवळ २-३ ओळी आहेत. या पुढचे काही दिसत नाही> स्क्रोल डाउन केल्यावर पुढची पाने दिसताहेत की.
नार्वेकर गुरुजी, दाभोलकर सर
नार्वेकर गुरुजी, दाभोलकर सर ह्या सारख्या समाजप्रवाहाच्या उलट दिशेने पोहणाऱ्या समाज सुधारणेसाठी जीवन वेचणाऱ्या माणसांचा गर्व वाटतो. ह्यांचे कार्य पाहुल स्फूर्ती मिळते. सध्या जो अंधश्रद्धेचा काळोख पसरला आहे त्यात पणती लावून त्यांनी जो प्रकाश निर्माण केला त्याबद्दल त्यांच्यापुढे विनम्रतेने डोके झुकवावे लागते.
धन्यवाद इब्लिस नेमकेपणाने
धन्यवाद इब्लिस नेमकेपणाने दिल्याबद्दल. आता लोक वाचतील.
धन्यवाद इब्लिस,
धन्यवाद इब्लिस,
अंधश्रद्धाच नव्हे, तर
अंधश्रद्धाच नव्हे, तर श्रद्धासुद्धा नाकारावी - शरद बेडेकर
आता बोला!
आता बोला असे दोन शब्द लिहून
आता बोला असे दोन शब्द लिहून पळ का काढताय?
काय चुकिच लिहिलं आहे त्यानी?
अस्चिग म्हंजे आता यावर
अस्चिग म्हंजे आता यावर लोकांनी बोलावे अस म्हणायच आहे.. मी तर नेहमीच नैमित्तिक भाष्य करीत असतोच. http://www.maayboli.com/node/49918
पण या निमित्ताने मला हे सांगायचे की काही लोकांचा आक्षेप असा असतो की अंधश्रद्धा निर्मूलन या नावाखाली यांना श्रद्धेचच निर्मूलन करायचे आहे.या ला अशा बातम्यांनी पुष्टी मिळते.
खरतर हे सगळे शब्दच्छल आहेत. जोपर्यंत मेंदुत भावना नावाचा प्रकार आहे तो पर्यंत या ना त्या प्रकारच्या श्रद्धा रहाणारच
तो पर्यंत या ना त्या
तो पर्यंत या ना त्या प्रकारच्या श्रद्धा रहाणारच
<<'
असं तुमचं मत आहे.
असं त्याना सांगितलं की मग ते
असं त्याना सांगितलं की मग ते देशावर,आईवडिलावर, सत्कृत्यावर , सत्यावर असलेल्या प्रेम आणि आदराला श्रद्धा आणि विश्वास ठरवून मोकळे होतात आणि म्हणतात बघा अमुकतमुकवर आहे ना तुमची श्रद्धा!
तशी आमच्या वर्गात होती एक
तशी आमच्या वर्गात होती एक श्रद्धा..
पण तिचं अन आमचं कधीच काही जमलं नाही
त्यामुळे,
- (अजिब्बात श्रद्धा नसलेला) इब्लिस.
श्रद्धा म्हणजे तरी काय शेवटी
श्रद्धा म्हणजे तरी काय शेवटी भावनेपोटी निर्माण झालेल्या मनाच्या काही समजुती. हाय काय नाय काय?
अय्या! हो? आता ही भावना कोण
अय्या! हो?
आता ही भावना कोण नवीनच?
प्रकाश घाटपांड्यांची भुमिका
प्रकाश घाटपांड्यांची भुमिका अंनिसच्या भुमिकेला जवळची आहे. समाजामध्ये काम करताना थेट देवावर विश्वास/श्रद्धा ठेवू नका असे सांगत काम करता येत नाही, त्यामुळे बहुसंख्य समाज दूर जातो. त्यापेक्षा थेट अंधश्रद्धांवर (बुवाबाजी, ज्योतिष इत्यादी) हल्ला चढवत, त्यांचे दुष्परिणाम सांगत लोकांपर्यंत अधिक चांगले पोचता येते, प्रबोधन करता येते.
टण्या, याच्याने स्वतःच्याच
टण्या,
याच्याने स्वतःच्याच पायाला सुरुंग लागतो. मग उपयोग उरत नाही.
क्ष वस्तूवरच श्रद्धा ठेवायची, तर
तुमचा तो परमेश्वर अन आमचा तो म्हसोबा काय? तुम्ही आकाशातल्या अमूर्तावर 'श्रद्धा' ठेवा, आम्ही धोंड्याच्या म्हसोबावर ठेवू. श्रद्धा म्हणून तुम्ही खीरीचा नैवेद्य दाखवा, आम्ही बोकड मारू.
हे असे लॉजिक तयार होते.
अन सध्याच्या काळातले भारी लॉजिक म्हणजे तुमच्या धर्मातला देव बोगस. आमच्या धर्मातला भारी. मध्ययुगातल्या क्रुसेड्समधे ज्या कारणाने लोक हिरिरीने जीव घ्यायला निघायचे, तेच कारण अन तीच हिरिरी दिसते आहे सगळीकडे.
किमान डिस्कशन फोरम्सवर चर्चेत तरी मूलगामी विचार मांडला गेला पाहिजे की नुसतीच गुळमुळीत भूमीका घ्यायची?
मग असल्या भूमिकांविरुद्ध बोलणार्या लोकांना जोर येतो, अन आसाराम बापूंची होळी पाणी वाचवते, नदीत बुडवलेले पीओपीचे गणपती पाणी शुद्ध करतात असली संशोधनं येतात इथे.
घाटपांडे काका फारच जपून
घाटपांडे काका फारच जपून बोलतात.
आणि त्याना बोलायचे असते त्यापेक्षा वेगळे बोलतात.
>>किमान डिस्कशन फोरम्सवर
>>किमान डिस्कशन फोरम्सवर चर्चेत तरी मूलगामी विचार मांडला गेला पाहिजे की नुसतीच गुळमुळीत भूमीका घ्यायची?<<
http://www.maayboli.com/node/49918?page=1#comment-3189597
इथे मी गुळमुळीत पणा बद्दल लिहिले आहेच
प्रकाश तुमची मतं माहीत आहेत
प्रकाश तुमची मतं माहीत आहेत म्हणूनच पुढे बोला असं लिहिलं
कारण नुसतं 'आता बोला' हे म्हणजे ते वक्ते काहीतरीच बोलले असं वाटतं
नुसतं फोरम वर बोलण्यापेक्षा लॉबीईंग जास्त उपयुक्त ठरावं (पण कुठे?)
जास्त लोक असे बाफ वाचत नाहीत, आणि वाचले तरी मनाला लावून घेत नाहीत.
अनेक लोक (बहुतांश) त्या समाजाचाच (योग्य की अयोग्य) विचार करुन काहीच बोलात नाहीत.
(पण या विषयाशी संलग्न ते जर काही प्रकल्प राबवत असतील तर त्फ्याबद्दल त्यांनी जरूर सांगायला हवं)
ट्ण्या , अस्चिग पोस्टि
ट्ण्या , अस्चिग पोस्टि आवडल्या .
नार्वेकरांचे पत्र आवडले पण
नार्वेकरांचे पत्र आवडले पण पदोपदी मुलांकडून इतक्या अपेक्षा का धरल्यात त्यांनी? जसे त्यांनी केले तसेच मुलांनी देखील करावे हे थोडे जाचक वाटते. एखाद्या रितीरिवाजावर विश्वास का ठेवावा आणि का ठेवू नये दोन्ही बाजूने अनेक मते मांडता येतील. काही मते बुद्धीला धरुन असतील तर काही भावनेला. आता एक उदाहरण देतो. पितरांना आपण जेवू घालतो श्राद्ध करुन. माहिती आहेत, फोटोपुढील ताट कुणी खात नाही पण एक मानसिक समाधान मिळते की आपला माणूस जेवला. तेवढेच बरे वाटते. आता ज्याचे हृदय हळवे असेल त्याला असे करणे बरे वाटते आणि ज्याला बुद्धी जास्त आहे त्याला हे थेर वाटेल. जो तो आपल्यानुसार प्रथा चालवेल.
एखादी प्रथा जाचक नसेल तर इतका उहापोह केलेला नको वाटतो.
नार्वेकरांनी इथे संतांच्या ओव्या दिल्यात. त्या संतांनी देखील देवावर श्रद्धा नाही ठेवली का?
नार्वेकरांनी विद्युतगृहाचे कौतुक केले आहे पण विद्युतगृहात प्रेत जाळायला उर्जा लागत नाही का? ती उर्जा वाया जाणार नाही का? त्यापेक्षा माझे प्रेत पुरवून टाका असे का नाही सुचवले मुलांना?
मला हे पत्र थोडे विचित्र वाटले. पुर्णपणे बुद्धीला नाही पटले. आपली पत्नी आपल्यासोबतच मरावी हे वाक्य वाचून तर फारच वाईट वाटले.
पुणेरी पाटी: "येथे
पुणेरी पाटी:
"येथे १२-१३-व्याचा उत्तम स्वयंपाक करून मिळेल.
१५ दिवस आधी पूर्वसूचना आवश्यक."
बी: "जसे त्यांनी केले तसेच
बी: "जसे त्यांनी केले तसेच मुलांनी देखील करावे हे थोडे जाचक वाटते."
जगातील सर्व धर्म-कर्मकांड व शकुन-अपशकुन अंधश्रद्धा अशाच सुरु झाल्यात आणी रुजल्य़ात.
नार्वेकरांनी स्वत:च्या मृतदेहाची कशी विल्हेवाट लावावी याच्या सूचना आपल्या मुलांना दिल्या,
मुलांनी त्यांच्या स्वत:च्या मृत्यूनंतर [आपापल्या मृतदेहाचे] काय करावे ते सांगीतले नाही!
स्वत:च्या मृतदेहावर आणि आपल्या मुलां वर तेवढा तरी अधिकार असावा ना माणसाचा!
श्रद्धा, भक्ती, भावना, सगळ्या
श्रद्धा, भक्ती, भावना, सगळ्या चालतील,
पण त्यांना आपण चाललो पाहिजे!
अन त्यांचा तसा मूड पाहिजे
होळीचे 'पतंग' आम्ही, दिवाळीच्या 'पणत्यांना' चाललो पाहिजे!
अन सध्याच्या काळातले भारी
अन सध्याच्या काळातले भारी लॉजिक म्हणजे तुमच्या धर्मातला देव बोगस. आमच्या धर्मातला भारी. मध्ययुगातल्या क्रुसेड्समधे ज्या कारणाने लोक हिरिरीने जीव घ्यायला निघायचे, तेच कारण अन तीच हिरिरी दिसते आहे सगळीकडे.
किमान डिस्कशन फोरम्सवर चर्चेत तरी मूलगामी विचार मांडला गेला पाहिजे की नुसतीच गुळमुळीत भूमीका घ्यायची?
मग असल्या भूमिकांविरुद्ध बोलणार्या लोकांना जोर येतो, अन आसाराम बापूंची होळी पाणी वाचवते, नदीत बुडवलेले पीओपीचे गणपती पाणी शुद्ध करतात असली संशोधनं येतात इथे.>>>>>
पूर्ण अनुमोदन....
खुपच पटले....
पण तरीही इब्लिस विज्ञानावर श्रद्धा आहेच ना तुमची! तिला नाही कसे म्हणणार! देव हा या विज्ञानाचा सुद्धा निर्माता आहे... असे नाही का तुम्हाला वाटत?
Pages