Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35
कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी मिन्त्रावरच पाहिले काही
मी मिन्त्रावरच पाहिले काही कुर्ते बिबाचे. आवडले मला. मे बी मि कुर्ते अगदी ऑकेजन्लीच घालते त्यामुळे मला आवडले. तसेच आजकाल असे बटबटीतच घालतात ना मुली?
नाही बिबा च हे समर कलेक्शन
नाही बिबा च हे समर कलेक्शन चांगलं आहे....एरवी ते गावठी असतं....पण मला काही एलिगंट कुर्ते पहायला मिळाले...विवियाना मॉल ठाणे मधे...
मी नेट साईट्स चेक करत नाही
मी नेट साईट्स चेक करत नाही कधी...त्यात काहीच नसतं...
मॅक्स मधे ही चांगलं कलेक्शन
मॅक्स मधे ही चांगलं कलेक्शन आहे...रेग्युलर टिशर्ट्स ४०० ला २ असे आहेत....कुर्तीज टीन्स साठी आहे...बारिक अंगाच्या बायकांना चांगले दिसतील असे खुप ऑप्शन्स आहेत....कमित कमी ५००-६०० पासुन रेंज चालु आहे....मी ही एक सेमी फॉर्मल स्लीव्हलेस टॉप घेतलाय....
अनि - पुढच्या महिन्यात शॉपिंग
अनि - पुढच्या महिन्यात शॉपिंग एकत्र ... विवियाना मध्ये.
मॅक्स ची किंमत कमी पण
मॅक्स ची किंमत कमी पण क्वालिटी चांगली नसते.
मॅक्स चे काही कपडे चांगले
मॅक्स चे काही कपडे चांगले असतात काही खराब....ते तर सगळी कडेच असतं.....कुठलाही ब्रँड येउ शकतो यात....बिबा ची क्वालिटी कुठे बरी असते. आणी मी फॅब इंडिया मधले कीतीतरी कपडे घेते पण कधीतरी १० तुन ४ खराब निघतातच.....
वेव पण मी वापरते पण त्यातही एक मला खराब आलेला.. धुतल्या नंतर खुप आटला आणि रंग ही निघाला... या वेळी वेव मधे मउ साड्या असतात ना त्या मटेरिअल च्या कुर्त्यांच कलेक्शन आलय...
अनि - पुढच्या महिन्यात शॉपिंग
अनि - पुढच्या महिन्यात शॉपिंग एकत्र ... विवियाना मध्ये.>>>>>>>>. मी जाणारच आहे वल्ले...मला वेव चे काही टॉप्स आवडलेत. २-३ घेईन. चल तुही माझ्यासोबत
बिबाचे कपडे मापात भयंकर फसवे
बिबाचे कपडे मापात भयंकर फसवे असतात. नीट टृआयल घेऊन मगच विकत घ्यावेत.
एक XL मस्त फिट झाला म्हणून दुसरा पण XL घेऊ नये.
मी बरेचदा केवळ आळस न करता ट्रायल घेऊन बरेच पैसे वाचवले आहेत.
एक XL मस्त फिट झाला म्हणून
एक XL मस्त फिट झाला म्हणून दुसरा पण XL घेऊ नये.>>>>>>>>>>. +१
मी फसलेय ४ कुर्ते घेऊन
मी फसलेय ४ कुर्ते घेऊन बिबाचे... फिटींग ढगळ होती आणि म्हटलं टेलर कडून अॅडजस्ट करून घेऊयात. जाम आवडलेले रंग कधी नव्हे ते!! मोस्ट ऑफ द टेलर लोकं बिघडवायचं काम का इमाने इतबारे करतात बेसिकपास्नं नीट समजावलं तरी कोणास ठाऊक.
दोन मते ठाम बनलीयेत आता. शक्यतो बिबा नक्कोच.
डॉक्टर, टेलर आणि पार्लर नशीबवाल्यांनाच बरं मिळतं... (आमचं नशीब याबाबतीत जाम म्हणजे जामच माती खातं)
डॉक्टर, टेलर आणि पार्लर
डॉक्टर, टेलर आणि पार्लर नशीबवाल्यांनाच बरं मिळतं... (आमचं नशीब याबाबतीत जाम म्हणजे जामच माती खातं)>>>>>>>>>>>.. माझं पुर्वी असं व्ह्यायचं...पण आता काही घेतल तरी घालुन पाहिल्याशिवाय घेणे नाही....
हकोबाचे ब्रान्ड (१००%
हकोबाचे ब्रान्ड (१००% cotton )पण खुप छा न आ आहे थोडे महाग आहेत पण भरपुर वर्ष टिकतात
अनिश्का समर स्पेशल मस्त!
अनिश्का समर स्पेशल मस्त!
थँक्यु अंशु
थँक्यु अंशु
हकोबा - कंटाळा आल्यानंतर
हकोबा - कंटाळा आल्यानंतर सुद्धा खूप काळ टिकतात. पण मला डाऊट आहे ते १००% कॉटन असतं का थोडं मिक्स असतं. पण हकोबाचे डार्क रंग कच्चे असतात.
कान्जीवरम - क्रुपया पुण्यात
कान्जीवरम - क्रुपया पुण्यात खरेदीचा अनुभव लिहा. कुठे छान मिळतील. धन्यवाद!
काय प्रकारची खरेदी करायचीये
काय प्रकारची खरेदी करायचीये पुण्यात? कांजीवरम साडी का?
अशा पारंपारिक साड्यांच्या प्रकारासाठी पुण्यात बरीच फेमस दुकाने आहेत. टिळक रोडवर प्रतिमा सिल्क्स, कुमठेकर रोडवर पेशवाई, रुद्राणी, रंगवर्षा वै. तिथेच ऑफ सिटी प्राईड शुज एक चार्वी / चर्वी म्हणुन दुकान आहे तिथेही पारंपारिक, जरीच्या प्युअर सिल्क कांजीवरम, इरकल वै खुप छान मिळतील.
बाकी कासट वै ही दुकानं आहेतच.
मनु - पल्लोड पण मस्त दुकाना
मनु - पल्लोड पण मस्त
दुकाना शिवाय काही स्त्रिया साड्या घरातून पण विकतात.तसेही बघ.
फक्त सिल्क, फक्त कोटा . फक्त चंदेरी अशा पण मिळू शकतात .
पेशवाई, रुद्राणी बरोबरच
पेशवाई, रुद्राणी बरोबरच स्वामिनी पण आहे कुमठेकर रोडला.
_हर्षा_, मृणाल १ ,
_हर्षा_, मृणाल १ , मुग्धटली
खुप आभार
पल्लोड- कुठे आहे?
पल्लोड भांडारकर रोडला.
पल्लोड भांडारकर रोडला.
एका ऑनलाईन शॉपिंग साईटवर
एका ऑनलाईन शॉपिंग साईटवर पार्टीवेअर ड्रेसेस पाहीले. अनारकली, कॉटन सलवार सूट्स आणि डेली यूज ऑफीसवेअर कुर्तीज आहेत. अॅफॉर्डेबल प्राईस रेंज. फेसबूक पेज : https://www.facebook.com/ABTrendz4u
जरीच्या साड्यांचे ड्रेस
जरीच्या साड्यांचे ड्रेस शिवायची कल्पना कशी वाटते?? डझनभर साड्या साठल्यात! नेसण्याचे प्रमाण खुपच कमी!
हल्ली अनारकलीची फॅशन
हल्ली अनारकलीची फॅशन निघालीये. त्यासाठी साड्या सगळ्यात बेस्ट.
हव्वा तेवढा घोळदार अनारकलीचा टॉप शिवायचा साडीतून, मॅचिंग चुडीदार किंवा लेगिंग्ज विकत घ्यायच्या, बेस कलरची प्लेन ओढणी विकत घ्यायची आणि टॉप शिवून उरलेल्या कापडाचे पॅचेस/ काठ लावून एकदम कस्टम मेड दुपट्टा तयार.
च्या मारी हितं गडी मानसाना
च्या मारी हितं गडी मानसाना प्रवेश न्हाय का?::अओ:
साड्यांचे अनारकली ही आय्ड्या
साड्यांचे अनारकली ही आय्ड्या मला जाम आवडली आहे. धन्यवाद नी! पुढच्या वर्षी ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात येइल!
रॉबीनहूड ह्यांनी विचारलेला
रॉबीनहूड ह्यांनी विचारलेला प्रश्नच मनात आला म्हणून प्रतिसाद द्यायचा थांबलो.
गेल्या काही दिवसांत फॅशन डिझायनिंग मधील 'ताई' लोकांच्या गाठीभेटी झाल्या. त्याचबरोबर स्ट्रगलर्स, तो कोर्स करणारे वगैरेंच्याही!
जरीच्या साड्यांच्या (च नव्हे तर इतरही साड्यांपासून) शिवलेल्या ड्रेसेसचे एक प्रदर्शन पाहिले. पण प्रामुख्याने जरीच्या! गर्दी बरीच पण विक्री विशेष नाही. बायका खरेदीच्या बाबतीत अती चोखंदळ असाव्यात असे (पुन्हा एकदा) जाणवले. पण ते ड्रेसेस चांगले दिसत होते.
एक सहज बरी दिसली म्हणून हातात घेऊन बघितलेली साडी फक्त ३९०००.०० (अक्षरी - एकोणचाळीस हजार) रुपयांची होती.
एका साडीवर पन्नास टक्के डिस्काऊंट होते व मूळ किंमत अठरा हजार होती.
अनारकलीमध्ये वेफर थीन मुलगीही जाड दिसते असे एक मत निर्माण झालेले आहे.
असो! सटरफटर बडबड करून झाली. एक शंका!
फॅशन डिझायनिंग करू शकणार्या व्यक्तीमध्ये एक असह्य अॅटिट्यूड असणे ही व्यावसायिक गरज आहे का?
बेफिकीर, तुम्ही ऑनलाईन शॉपिंग
बेफिकीर, तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईट्स बघून घ्या. २५, ३०००० च्या साड्या अगदी सहज दिसतात आणि त्यावर आउट ऑफ स्टॉकचा शिक्का असतो.
तोही मार्केटिंगचा एक प्रकार
तोही मार्केटिंगचा एक प्रकार असेल का सायोनारा?
अर्थात, अश्या महागड्या साड्या विकत घेणार्याही काही बायका होत्या, नाही असे नाही, पण त्यांना त्या साड्यांपेक्षा त्या साड्यांची किंमत आवडली असावी असे मला उगीचच वाटत राहिले.
किंवा किंमत आवडली आहे हे सांगणे आवडले असावे कदाचित!
Pages