केल फॅन क्लब

Submitted by अदिति on 2 September, 2014 - 20:20

केल ही एक बहुगुणी भाजी फार उशिरा नजरेस पडली. हिरव्या भाज्यांमधे हिचा पहिला नंबर लागतो. वेब एमडी मधे हिचा न्युट्रीशन पावरहाउस म्हणुन उल्लेख केला आहे. माझ्या दृष्टीने ह्यातच सगळे आले. पण एकदा तिचा आहारात समावेश झाल्यावर जवळ जवळ दिवसा आड एकाच रेसीपीमुळे कंटाळा आला. (करण्याचा. खायचा नाही Happy ). मी काही रेसीपीज गोळा केल्या आहेत तुम्हीही ह्यात भर घाला.. Happy

केल ची भाजी :१:
लागणारे जिन्नसः
१. बेबी केल
२. १ कांदा बारीक चिरुन
३. ५/६ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरुन
४. ३/४ हिरव्या मिरच्या
५. तेल (ऑ ऑ)
६. मिठ
कृती: तेलावर (ऑ ऑ, थोड जास्त असत, भाजी हेल्दी आहे अस म्हणुन मी स्वत:ला माफ करते स्मित ), बारीक कापलेला कांदा, लसुन, हिरवी मिरची परतवुन कांदा शिजला की त्यात बेबी केल टाकुन हलवुन सारखी करुन झाकण ठेउन शिजवुन घ्यायची. शेवटी चवीपुरते मिठ टाकुन सारखी करुन गॅस बंद करायचा. मेथी करतांना मिठ टाकल्यावर झाकण ठेवल तर भाजीचा रंग बदलतो अस सांगितल गेल असल्यामुळे ह्या भाजीतही मी झाकण ठेवत नाही. फुलक्यांबरोबर एक नंबर लागते.
केल कोवळीच घ्या नाही भाजी शिजायला वेळ लागतो आणि खातांना कचकच लागते.

kel.jpg

केलच्या भाजीचे अजुन एक वेरीयेशनः२:
हिरव्या मिरच्यांच्या एवजी लाल मिरचीची पुड (क्रश्ड रेड पेपर). ह्यात मी कांदा टाकत नाही बाकी कृती वरील प्रमाणेच.

केल ची भाजी मोड आलेल्या मसुर मधे :३:
१. बेबी केल साधारण ३ वाट्या
२. मोड आलेले मसुर
३. १ कांदा बारीक चिरुन
४. १ चमचा अद्रक लसुन पेस्ट
५. १ मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापुन
६. १ चमचा तिखट
७. तेल (ऑ ऑ)
८. मिठ
कृती:
तेलावर अद्रक लसुन पेस्ट ब्राउन झाल्यावर त्यात कांदा परतवुन शिजला की टोमॅटो घालुन एक जीव करुन घ्या. २/३ मिनीटांनी तिखट टाकुन हलवुन २ मिनीट ठेवा. मग त्यात मसुर, केल टाकुन परत एकदा हलवुन घ्या. झाकण ठेवा. मी ह्यात पाणी टाकत नाही त्यामुळे लागल तर झालणावर पाणी ठेवते. मसुर शिजली की मिठ टाकुन एक जीव करुन २ मिनीटात गॅस बन्द करा.

kale.jpg
ह्यात हिरवी मिरची वापरली आहे.

केल चिप्सः
लागणारे जिन्नसः
१. बेबी केल
२. ऑलीव्ह ऑइल
३. मिठ, मिरे चवी पुरते
कृती:
केल ओली असेल तर पेपर टॉवेलने कोरडी करुन एका भांड्यात मिठ मिरे पावडर आणि ऑ ऑ टाकुन चोळुन घ्या. एकीकडे ओव्हन ३५० फॅ ला सुरु करा. ऑव्हन तापले की एका ओव्हन ट्रे मधे केलची पानं एका लेअर मधे पसरवुन ओवन मधे १५/२० मिनीटे क्रिस्पी होउ द्या.
मिड डे स्नॅक्स साठी छान आहे.
kale_0.jpg

केल सॅलेड:
लागणारे जिन्नसः
१. बेबी केल १ कप
२. कोवळी पालक १/४ कप
३. फेटा चीज १/४ कप
४. ड्राईड क्रॅनबेरी/रेसीन किंवा तत्सम काहीही
५. अक्रोड १/४ कप
६. ऑलीव्ह ऑइल बेस्ड ड्रेसिंग
अ. ऑ ऑ +मिरे पावडर्+ लिंबू+चवीला किंचीत मिठ
ब. ऑऑ, लिंबु, मध, कोथींबिर, नखभर मिठ (१/२ वाटी तेलाला ५/६ पानं) मिक्सर मधे एकजीव होईपर्यंत फिरवुन घेते
कृती: वरील सगळे जिन्नस वाढण्याआधी पाच मिनीट आधी एकत्र करुन वाढावे. सोबत ग्रील्ड फिश/ चिकन , वेजी असाल तर सॅलेड मधेच १/२ कप बिन्स मिक्स करायला हरकत नाही.

ग्रीन स्मुदी - विथ केलः
१ कप पालक
१/२ कप केल
१ छोटी काकडी
१/२ अव्हाकाडो
सेलेरी चे १, २ तुकडे
१ कप ज्युस (मी पेरुचा वापरला)

ब्लेन्डर मधे मिक्स करा. मस्त स्मुदी तयार होते. एन्जॉय Happy

smoothie.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉशिन्ग्टन डीसीत व्हाइट् हाऊस परिसरात बॉम्बे पॅलेस(??) की अश्याच बॉम्बे नावाचं मस्त रेस्टॉ. आहे. तिथे अल्टिमेट केल चाट मिळते. केलची पाने तळलेली असतात अगदी कुर्कुरीत आणि त्यावर रीतसर हिरवी, लाल, चिंचेची पुदिन्याची चटणी गोड दही, बारीक शेव असं काही घालून अगदी चविष्ट चाट बनवतात.
तोंपासु

पहिली कृती साधारण स्विस चार्डच्या भाजीकरता करते तशीच आहे. केल कोवळी की जून कशी ओळखायचं?

>>केल कोवळी की जून
पाकिटावर लिहिलेले असते Wink

पानाच्या मधल्या शिरा अर्ध्यासेमीहून लहान म्हणजे कोवळी.
जून असेल तर शिरा काढून टाकायच्या. पाने शिजतात व्यवस्थित.

केल माझी आवडती हिरवी भाजी आहे. एकमेव पाने जी मला शिजवून/ परतून खायला आवडतात. बाकी पालक, मेथी वगैरे आता मोठी झाले म्हणून खायला लागतात. Wink

केल शिजवून खाल्लेली जास्त चांगली असं वेब एमडी की कुठे वाचल्याचं आठवतं आहे.

केलची पीठ पेरून भाजी पण छान लागते. तीच भाजी सारण म्हणून घातल्यास भरवा पराठे पण भारी होतात (...नाठाळ शिंगरांसाठी पौष्टिक आहार यु नो...इश्श :फिदी:)

केल चिप्स!!
केलची पानं धुवून, पुसून कोरडी करायची. मग देठं जाड असतील तर पानं उभी दुमडून देठं सुरीने काढून टाकायची. कोवळी पानं - बारीक देठ असतील तर तशीच वापरायची. आता या पानांना ऑलिव्ह ऑइल आणि मीठ लावायचं आणि ओव्हनमधे ३५० डिग्रीजना साधारण १५ मिनिटं बेक करायची. मस्त कुरकुरीत होतात.

वैधानिक इशारा : या चिप्स अतिशय अ‍ॅडिक्टिव्ह असतात.

केलच्या पानांचं अळूसारखं फतफतंही करतात असं ऐकलं आहे, पण मी चिप्स अ‍ॅडिक्ट असल्यामुळे भाजीबिजी करायला पानं उरत नाहीत.

चिप्स करायला बेबी केल की मोठी केल वापरायची? >>> मी मोठा आणते पण त्याचे bite-size तुकडे करते (चिप्स size). देठ अजीबात घेत नाही. मी २००-२५०F तापमान ठेवते पण जास्त वेळ लागतो. ३५० वर माझा केल slightly करपतो आणि कडवट taste येते...किंवा एक side crispy आणि एक कच्ची अस होत.
basically chips size आणि temp. चा गणित जमल तर केल चिप्स मस्त होतात.

मी सगळ्यासाठीच बेबी केल वापरते कारण कोस्ट्को मधे मोठी बॅग ट्रीपल वॉश्ड वैगरे मिळते. ट्रेडर जो मधुन काही वेळा घेतलेली पण ती कोस्ट्को इतकी कोवळी नसते.

basically chips size आणि temp. चा गणित जमल तर केल चिप्स मस्त होतात. << एकदम बरोबर..

सायो, पहीली कृती मी सगळ्याच पालेभाज्यांना वापरते. मेथी, पालक, केल, स्वीस चार्ड, मुळयाच्या पानांची भाजी ...

रुनी, मेथीचा कडवटपणा आवडत असेल तर केल पण नक्की आवडेल.

वैधानिक इशारा : या चिप्स अतिशय अ‍ॅडिक्टिव्ह असतात. >> सो ट्रु :))

मानुषी , चाट ची पा. कृ. टाक ना.

तृप्ती तु म्हणते आहेस तस अजुन बर्‍याच रेसीपीज ट्राय करता येतील Happy

>> चिप्स करायला बेबी केल की मोठी केल वापरायची?

मी मिळेल ती आणून चिप्स केल्या आहेत.
(>> मग देठं जाड असतील तर पानं उभी दुमडून देठं सुरीने काढून टाकायची. कोवळी पानं - बारीक देठ असतील तर तशीच वापरायची << हे लिहिलं ना.)

आता इथे इन्ग्रोतही मिळतात केलच्या जुड्या. (सायो, चाँद पॅलेसजवळच्या सब्जी मंडीत.)

>> basically chips size आणि temp. चा गणित जमल तर केल चिप्स मस्त होतात.
बरोबर. एकदा (माझ्या एका मैत्रिणीने :P) हावरेपणाने दोन ट्रे ठेवले ओव्हनमधे. मधल्या रॅकमधल्या छान झाल्या, वरच्या (धगीच्या जवळ असलेल्या रॅकमधल्या करपल्या.

वर अदिती यांनी लिहिली आहे तशी कांदा-लसूण-हिरवी मिरची घालून (जेनेरिक रेसिपी) भाजी आईनेही केली होती - फक्त ऑ.ऑ.ऐवजी गोडंतेल. सुं-द-र लागते. (पण मी करणार नाही. कारण.... :P)

इथे वाचून बेबी केलचं एक पुडकं आणून फ्रिजमध्ये टाकलंय. आता ते फ्रिजमध्ये शहीद होण्याआधी त्याचं काहीतरी करुन बघते Happy

मैत्रिणीला Proud म्हणावं मीठ बेताचं घाल. बेक झाल्यावर का कोण जाणे खारटपणा अंमळ वाढतो.

का करणार नाही केलची भाजी? गोडंतेल संपवलंत की काय इतक्यातच? ते कुठे मिळालं? भारतातून आणलं का? (आम्ही भारतच म्हणतो, हिंदुस्थान नाही)

सायो, गोडेतेल म्हणजे पीनट ऑइल गो. इथे मिळते नव्हे का सब्जीमंडीत!
भाजी नाही करणार म्हटलें ते चिप्स केल्यावर पाने उरत नाहीत म्हणून.

('मग दोन जुड्या आणाव्या' असे मात्र आता म्हणू नकोस हो! माझें को. पूर्वज तळमळतील! :P)

मिळतं. लक्ष्मी ब्रॅन्डचं चांगलं असतं.
'धारा' नाव वाचून घेतलेल्या तेलाला वाइट्ट वास होता. ते घेऊ नकोस.

आणि भाजीला तेच हवं असं नाही, कॅनोलाही चालेल, माझ्याकडे तेव्हा इन्सिडन्टली ते होतं. आलटून पालटून पीनट, कॅनोला आणि व्हेजीटेबल तेल घेत असते.

टीप : केलचा धागा भरकटवल्याबद्दल (केलची) माफी मागायला हवी. Proud

माझ्या मैत्रिणीनं केल चिप्स केल्याचं सांगितलंच नाही की मी. तिला स्वतःचं डोकं चालवायची भारी हौस असल्यानं तिनं ऑऑ ऐवजी चिऑऑ घातलं आणि समोरच दिसलं म्हणून गार्लिक सॉल्ट. भारी लागले चिप्स (म्हणे). रेस्पी दिल्याबद्दल धन्यवाद Happy

वा वा!

विशेष म्हणजे चिप्स उरल्या(च) तर हवाबंद डब्यात चांगल्या राहतात (आणि पोस्टाने पाठवताही येतात रेसिपी सांगणार्‍याला. :P).

लक्ष्मी ब्रँडचं का? ट्राय करेन नक्कीच.
चिऑऑ म्हणजे काय आता? चिली ऑऑ का? मला ते ऑऑत लसूण आणि मिरच्या मुरवत ठेवायची उस्तवार करायची आहे.

मी ऑऑ मधे रोझमेरी (घरी बॅकयार्ड मधे असल्यामुळे) आणि लसनाच्या १/२ पा़कळ्या त्यात चेचुन टाकते. माझ्याकडे एका ऑऑ ऑइलच्या बाटलीत कायम हे असता. हे मी ड्रेसींग साठी वापरते कधीकधी कुकिंग साठीही वापरते. ऑम्लेट मस्त लागत हह्या तेलात Happy

तृप्ती हेमट्या म्हणजे काय?

ट्ण्या काय केलेस तु केल चे? आवडले का?

स्वाती चिप्स उरतात तुझ्या ?:))

अदिती, गेल्या वेळी (न करपवता) २-३ ट्रे केले. आई म्हणाली की सगळ्या एकाच दिवशी खाल्ल्यास तर हिरवी होशील, मग ठेवल्या थोड्या. Proud

Pages