पुनर्जन्माच्या विषयाला वाहिलेली अमेरिकन संस्था

Submitted by नितीनचंद्र on 9 September, 2014 - 02:34

पुनर्जन्माच्या विषयाला वाहिलेली अमेरिकन संस्था

पुनर्जन्म हा तसा अनेक मायबोलीकरांच्या आणि तथाकथीत बुध्दीपामाण्यावाद्यांच्या दृष्टिने चेष्टेचा, टिंगल टवाळीचा आणि टीका करण्याचा विषय आहे. भारतात हिंदु धर्म असा आहे की जो कर्मसिध्दांत आणि त्याला जोडुन असलेले प्रारब्ध्द आणि त्याला जोडुन येणारा पुनर्जन्म ह्या विषयाला मान्यता देणारा आहे. याच कारण हा धर्म किंवा जड वाटत असेल तर संस्कृती म्हणा एका पुस्तकाच्या आधाराने चालणारा नाही. अनेक ग्रंथ गुढ अश्या विषयावर भाष्य करताना दिसतात तसेच आजच्या जीवनाशी त्याची सांगड घालताना दिसतात.

मी एका पुस्तकाच्या वाचनाने फ़ारच प्रभावीत झालो त्याच नाव " कर्माचा सिध्दांत " हे पुस्तक माजी सनदी अधिकारी व वेदांत अभ्यासक श्री हरिभाई ठक्कर यांनी लिहले आहे. ह्या पुस्तकाची अनेक भाषात भाषांतरे होऊन त्याच्या अनेक अवृत्या निघाल्या.

यात प्रथम कर्म - प्रारब्ध्द आणि पुनर्जन्माची साखळी वाचवयास मिळाली. अनेक धार्मिक पुस्तकात याचा उल्लेख येत होताच. शिवाय माझे आजोबा भृगुसंहीता या ग्रंथाच्या सहायाने ज्योतिष सांगत ज्यात प्रामुख्याने मागला जन्म आणि त्या संदर्भाने हा जन्म हा विषय येत असे.

नजिकच्या काळात डॉ. प.वि. वर्तक यांचे पुनर्जन्मावरचे पुस्तक ही वाचले. ज्यात बहिणाबाई यांचे आधीचे त्यांनी लिहुन ठेवलेले १३ जन्म किंवा तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले आधीचे दोन जन्म याच्या वाचनाने मला विश्वास वाटु लागला की हे कल्पनेचे जग नाही. जेव्हा पास्ट लाईफ़ रिग्रेशन या थेअरीचा जन्म परदेशात झाला आणि तो एका मानसशास्त्री व्यक्तीने घडवला ते वाचल्यानंतर मात्र http://en.wikipedia.org/wiki/Past_life_regression अधिक अधिक खात्रीच झाली की या विषयाच्या अभ्यासाला चांगले दिवस येणार.

आयुर्वेद आणि योग ज्याचे पुढे योगा झाल्यानंतर माहात्म्य भारताला पटले या धर्तीवर आता पुनर्जन्म ही थेअरी जर पटली तर मला सर्वात जास्त आनंद होईल. अर्थात कुणी जबरदस्तीने पटवुन घ्यावी असा आग्रह मात्र अजिबात नाही.

मागे एका चर्चेत स्वामी विवेकानंदांच्या राजयोगात वर्णीलेल्या प्रयोगाचे पुनर्जन्म या संदर्भात मी प्रकटीकरण केले तेव्हा मायबोलीकर तुटुन पडले होते. प्रयोग असा होता. कोंबडीची तीन अंडी आणि बदकाची तीन अंडी कोंबडीकडे उबवायला दिल्यावर जन्माला आलेली तीन बदकाची पिले पाण्याकडे धाव घेतात तर कोंबडीची तीन पिले पाण्याला भितात. याचा अर्थ स्वामी विवेकानंद म्हणतात की बदकाची पिले मागच्या जन्मी जलचर होती म्हणुन त्यांना पाण्याची भिती वाटत नाही. यावर मायबोलीकर यांनी तो जीन्सचा प्रभाव आहे असे प्रतिपादीले होते. हे ही पटण्यासारखे होते म्हणुन ठोस संशोधनाशिवाय हा विषय काही मान्य होणार नाही असे जाणवले.

आजच्या " तेज" चॅनलवरच्या बातमीने मी शोध घेतला तेव्हा अमेरीकेत ह्या विषयावर खुपच संशोधन झाल्याचे माहित पडले.http://www.iisis.net/index.php?page=semkiw-reincarnation-past-life-lives... या साईट्वर Institute for the Integration of Science, Intuition and Spirit या संस्थेने २०,००० व्यक्तींच्या मागच्या जन्माचा अभ्यास करुन अनेक पुस्तके लिहली आहेत तसेच रिसर्च पेपर्स ही लिहले आहेत. Principles of Reincarnation-Understanding Past Lives या नावाची नविन थेअरी या वेबसाईटवर चर्चीलेली आहे ज्यायोगे हे संशोधन झालेले आहे.

भारतात जन्माला आलेले पं जवाहरलाल नेहरु ( यांच नाव आधी लिहतो म्हणजे भाजप विरोधक खुष होतील ) हे मागच्या जन्मी बहादुरशहा जफ़र होते तर पुढच्या जन्म त्यांनी पाकिस्थानात झुल्फ़ीकार अली भुट्टो यांच्या घराण्यात बेनझीर भुट्टो यांच्या रुपाने घेतला असा दावा या वेबसाईटवर आहे.

इंदिरागांधी मागच्या जन्मी नानासाहेब पेशवे होत्या असे ही वेबसाईट म्हणते. डॉ. प.वि, वर्तक यांनी वर्णिलेला जन्म साहचर्याचा भाग इथेही दिसतो कारण बहादुरशहा जफ़र आणि नानासाहेब पेशवे समकालीन होते. ( बहुदा ) त्यांची भेटही झाली होती किंवा पत्रव्यवहार होता आणि १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता.

आजच्या तेज च्या बातमीचा महत्वाचा भाग श्री नरेंद्र मोदी यांच्या मागच्या जन्माचा शोध हा होता. ही वेब साईट म्हणते की नरेंद्र मोदी मागच्या जन्मी सर सय्य्द अहमद खान होते ज्यांनी मुस्लीम स्त्रीयांच्या शिक्शणासाठी काम केले ज्याचे पुढे अलिगढ विद्यापिठात रुपांतर झाले. सर सय्यद अहमद खान पाकिस्थानची मागणी करणारे पहिले मुसलमान होते.

अमिताभ बच्चन मागच्या जन्मातही नट होते ज्यांनी शेक्सपियरच्या नाटकात अनेक भुमिका केल्या होत्या. तसेच शाहरुख खान मागच्या जन्मी प्रसिध्द बंगाली स्त्री नटी होते असे या वेबसाईट वर आहे.

या शिवाय टिप्पु सुलतान, डॉ अब्दुल कलाम इ. प्रसिध्द भारतीयांच्या पुनर्जन्माचा ( पुढच्या जन्माचा शोध ) घेतला गेलेला आहे.

मागच्या जन्मातली कौशल्ये आणि सुप्त इच्छा आपण घेऊन जन्माला येतो तसेच पास्ट लाईफ़ रिग्रेशनचा शोध लागताना मागच्या जन्माची दु:खे - न्युनगंड याचा शोध घेतला गेला होता हे या लेखाच्या निमीत्ताने अधोरेखीत होते.

अभ्यासुंनी जरुर वाचन करावे आणि आपली मते मांडावी. आपल्या मतांचा मला आदर आहेच. कोणतीही नविन थेअरी आली की त्याला आक्शेप ही येणारच या दृष्टीने आपली मते मी जरुर वाचीन. विनंती इतकीच की एखादा माझा चुकीचा लिहलेला शब्द धरुन टिका करु नये. काही साधक बाधक लेखन झाल्यास मला ही आवडेल. ज्यांचा पुर्वग्रह दुषित आहे आणि काहीतरी लिहुन प्रभाव टाकताना ज्यांनी इतका अभ्यास करुन हे सिध्दांत मांडले आहेत त्यांचा अपमान होतो हे लक्शात घ्यावे. मी फ़क्त भारवाहक आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरुख खान मागच्या जन्मी प्रसिध्द बंगाली स्त्री नटी होते असे या वेबसाईट वर आहे.
<<
नरेंद्र मोदी मागच्या जन्मी सर सय्य्द अहमद खान होते ज्यांनी मुस्लीम स्त्रीयांच्या शिक्शणासाठी काम केले ज्याचे पुढे अलिगढ विद्यापिठात रुपांतर झाले. सर सय्यद अहमद खान पाकिस्थानची मागणी करणारे पहिले मुसलमान होते.
<<
<<

हायला, ईंटरेस्टींग प्रकरण दिसतेय हे.

नानासाह्३ब पेशवे त्याच जन्मात स्वामी समर्थ झाले अशीही थेअरी आहे.

म्हणजे स्वामी समर्थ म्हणजे इंदिरा गांधी?

इंटरेस्टींग....

मागच्या जन्मातली कौशल्ये आणि सुप्त इच्छा आपण घेऊन जन्माला येतो

हे बरेच ठिकाणी वाचले आहे. पण वर जी उदाहरणे दिलीत ती यासंदर्भात काहिशी पटत नाहीत.

उदा. सर सय्यद हे अतिशय कडवे मुस्लिम होते हे त्यांचे चरित्र वाचले तर लक्षात येते. पण मग मोदी कडवे मुस्लिम नाहीत. कडवे हिंदू असावेत.

पण 'मुस्लिमांनी उच्च शिक्षण घेऊन (तेव्हाच्या इंग्रज) सरकारात सामिल व्हावे' असा जो सर सय्यद यांचा विचार होता त्या प्रकारच्या विचारांशी साधारण सुसंगत असे मोदींचे विचार असु शकतात.

भारतात जन्माला आलेले पं जवाहरलाल नेहरु ( यांच नाव आधी लिहतो म्हणजे भाजप विरोधक खुष होतील ) हे मागच्या जन्मी बहादुरशहा जफ़र होते तर पुढच्या जन्म त्यांनी पाकिस्थानात झुल्फ़ीकार अली भुट्टो यांच्या घराण्यात बेनझीर भुट्टो यांच्या रुपाने घेतला असा दावा या वेबसाईटवर आहे. >>

नितीन.. लेख लिहायच्या आधी थोडं गुगल केलं असतं तरी काही दावे कसे फोल आहेत हे तुम्हाला कळालं असतं. नेहरूंचा मृत्यू २७ मे १९६४ ला झाला आणि बेनझीर भुट्टो चा जन्म २१ जून १९५३. Happy

ते केवळ "भारवाहक आहेत"

तथ्य तपासुन बघणे त्यांच्या पध्दतीत येत नाहीत.. त्यासाठी त्यावेबसाईटलाच दोषी ठरवा :खोखू:

बहुतेक नेहरुंचा २५ ग्रॅम आत्म्याचा ५ ग्रॅम भाग आधी गेला असेल मग ६४ ला उरलेला २० ग्रॅम भाग गेला असेल Biggrin

नितिनजी, तुम्ही लेख खरच नीट पाहून टाकायला हवा होतात. इथे चेष्टा आणि कुचाळक्या करण्याची संधी कधी मिळते आहे याची वाट बघणारी मंडळी कमी नाहीत हे तुम्हाला समजायला हवे होते. जमल्यास लेख योग्यरित्या संपादित करावा.

आज सकाळपासून मी एक नवा पायंडा पाडला आहे माझ्यापुरता!

आधी प्रतिसाद वाचायचे आणि काही वाद होऊ शकण्याची चिन्हे असली तरच लेख वाचायचा.

पण त्यामुळे प्रॉब्लेम असा होतोय की सगळेच धागे पूर्ण वाचत बसावे लागत आहेत.

नितीनचंद्रजी....
तुम्ही लेख खरच नीट पाहून टाकायला हवा होतात +१००
नेहरूंचा मृत्यू २७ मे १९६४ ला झाला आणि बेनझीर भुट्टो चा जन्म २१ जून १९५३.
त्याच प्रमाणे
शाहरुख खान Born: November 2, 1965 (age 48) आणि साधना बोस Died: October 3, 1973 ह्या दोघांच्या जन्म-मृत्यु मधे तब्बल ८ वर्षांचा फरक आहे.
म्हणजे बादशाह खान बोस बाईंच्या मृत्यु च्या ८ वर्ष आधी जन्माला आला आहे की हो.
आता ही मधली ८ वर्ष खान अचेतन अवस्थेत होता की बोस बाई कोमात होत्या/मृत होत्या हे बघावे लागेल.
Lol

प्रसन्नराव,

न्हेरुंचा ५ ग्र आत्मा पाकिस्तानात जाऊ शकतो तर बोसबैंचा ५ ग्र आत्मा कलकत्त्यातुन दिल्लीला जाईल की.

अजुन काही..

व्यासमुनी ... जावेद अख्तार ( ५० % प्रत्येकी )

वा ल्मिकी ... रामानंद सागर

कोंबडीची तीन अंडी आणि बदकाची तीन अंडी कोंबडीकडे उबवायला दिल्यावर जन्माला आलेली तीन बदकाची पिले पाण्याकडे धाव घेतात तर कोंबडीची तीन पिले पाण्याला भितात.>>>
Biggrin स्वामी विवेकानंदांचा ह्याशी काही सबंध असेल असं वाटत नाही, दुसर्या कोणीतरी हे त्यांच्या नावावर खपवलं असण्याची दाट शक्यता आहे, धागाकर्त्यांना संदर्भ देण्याची विनंती.
ह्या प्रयोगात अपेक्षा काय आहे तेही नाही समजले, कोंबडीने जरी बदकाचे अंडे उबवले तरी त्यातुन बदकच येणार ना आणि ते साहजिकच पोहु शकणार, अर्थात ह्या प्रयोगासाठी, कोंबडी आणि बदकांच्या अंड्यांचा उबवण्याचा कालावधी आणि तापमान सारख असायला हवं, ते आहे की नाही माहिती नाही, कोणाला माहिती असल्यास लिंक टाकावी (पिंक नको, तसही हा प्रश्न माबोकरांपेक्षा, बदकाला आणि कोंबडीला विचारल्यावर लवकर आणि सरळ उत्तर मिळण्याची शक्यता जास्त आहे Wink )

कमाल आहे राव मी शाहरुख खान चा आधीचा जन्म फक्त बंगाली नटी लिहले होते साधना बोस हे नाव मी लिहलेले नाही.

बेनझीर भुट्टो हे नाव मुळ वेबसाईट न वाचता " तेज" च्या बातमीच्या हवाल्याने लिहले आहे.

कमाल आहे पण लोकांची ज्या बद्दल आक्षेप नाही त्याबद्दल कुणीच काही लिहीत नाही. पुनर्जन्म नसतोच ही भावना इतकी प्रबळ आहे त्या पोटी इतके मोठे संशोधन क्षणात खोटे पाडण्याची कला काही और आहे.

नितीनचंद्र....

आपण बोस बाईंचे नाव दिले नाही, हे मान्य पण आपण आपल्या लेखात जी लिंक दिलि आहे (http://www.iisis.net/index.php?page=semkiw-reincarnation-past-life-lives...) त्यात बघुनच मी माझा प्रतिसाद दिला आहे.

http://www.iisis.net/index.php?page=shah-rukh-khan-reincarnation-sadhona...
Past Life of Shah Rukh Khan as a Female Indian Dancer

In sessions with Kevin Ryerson, I asked about Shah Rukh Khan, who has been described as India’s heartthrob. Ahtun Re revealed that Mr. Khan, in a past lifetime, was a well known female Indian dancer and actress who lived in the early years of Indian cinema. After some research, I found a possible candidate in Sadhona Bose. In as subsequent session with Kevin Ryerson, Ahtun Re confirmed that Shah Rukh Khan is the reincarnation of Sadhona Bose, who lived from 1914 to 1973.

उदयन,

अगदी बरोबर आहे. माझ्या मते त्यांनी एक थेअरी शोधली आहे त्यावर आक्षेप घ्यावेत. मी प्रभावित आहे त्यांनी यावर संशोधन केले आहे.

माझा विश्वास आहे पुनर्जन्मावर कारण ज्यामुळे आपला हा सजीव देह अस्तीत्त्वात आहे तो आत्मा बाहेर निघुन गेल्यावर हे शरिर निर्जीव होते म्हणजेच आत्मा मरत नाहि...देहाला बंधने आहेत्...मी कुटेतरी वाचलय की मागच्या जन्मापेक्षा ह्या पुड्च्या जन्मात आपली प्रगती होते....आत्मा विकसित होत जातो..

सीमा२७६.

जन्मापेक्षा ह्या पुड्च्या जन्मात आपली प्रगती होते....आत्मा विकसित होत जातो.. जरुरी नाही. आत्मह्त्या करणारा मानव तिर्यक योनीत जन्माला येतो ( सरडा /पाल ) असे मी वाचले आहे. यावर मायबोलीकर तारे तोडतील की जगात आत्महत्या किती लोक करतात आणि पाल/सरडे किती जन्माला येतात इ.

वरील नियमा प्रमाणे सामान्यतः पाल/ सरड्या पेक्षा दुय्यम समजा की किटक पाल्/सरडे यांच्या जन्माला जात असतील तर माणुस मात्र केवळ अधोगतीने या जन्माला येत असावा.

मला तर वाटतय ही एक game आहे. आन हे सगळ देवान माझ्यासाठी करून ठेवलय . तुम्ही सर्व काल्पनिक आहात खरा फक्त मी आहे , मी कालपन होतो आज पण आहे उद्या पण आसणार . फक्त स्थळ काळ वेगळ आसणार प्रत्येक वेळी . हे न्यूटन शेक्सपिअर अलेक्झांन्डर कधी न्हवतेच तो एक प्रोग्रामचा भाग होता , ते देवाने x मानू या तत्वावर केलं आहे.

आन तुम्ही सुद्धा काल्पनीक आहात कारण मी फक्त मलाच फील करतो मला दुसर्याच्या वेदना जानवत नाहीत मला दूसर्यान खाल्लेल्या गोष्टीची चव कळत नाही त्यामुळे हे सर्व काल्पनिकच असणार यात काहीच शंका नाही .आत्ता सूद्धा तुम्ही आसं रिआक्ट कराल की तुम्ही खरे आहात पण ते खोट आहे .
मला सांगा या आकाशाला एक मर्यादा आहे, किंवा आहे अस मानू म्हणजे एक भींत आहे किंवा एक नदी नायतर एक अशी गोष्ट जी आपल्याला माहीतच नाही पण त्या पलिकडे पण कायतरी असणारच ना मग जे असणार ते पण अनंतच असणार . त्यामुळ देवाची प्लॅन इथच मार खातो.

हि एक game आहे अन ति फक्त प्रुत्वी पुरतीच मर्यादीत आहे अन मी त्या game चा HERO . मला ही गेम पुर्ण करायचीय पण मी माझ aim विसरतोय प्रत्येक वेळी त्यामुळ मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतोय .

सो लोक्स टेंन्सन लेनेका नय

जरुरी नाही. आत्मह्त्या करणारा मानव तिर्यक योनीत जन्माला येतो ( सरडा /पाल ) असे मी वाचले आहे. यावर मायबोलीकर तारे तोडतील की जगात आत्महत्या किती लोक करतात आणि पाल/सरडे किती जन्माला येतात इ.

वरील नियमा प्रमाणे सामान्यतः पाल/ सरड्या पेक्षा दुय्यम समजा की किटक पाल्/सरडे यांच्या जन्माला जात असतील तर माणुस मात्र केवळ अधोगतीने या जन्माला येत असावा.
>>>
सर्वात महत्त्वाची गोष्ट कोण काय म्हणतय याने मला काही फरक पडत नाहि ते माझे विचार आहेत्...आता बाकिच्यांचे वेगळे पण असु शकतात.

वरील नियमा प्रमाणे सामान्यतः पाल/ सरड्या पेक्षा दुय्यम समजा की किटक पाल्/सरडे यांच्या जन्माला जात असतील तर माणुस मात्र केवळ अधोगतीने या जन्माला येत असावा.
>>>
पण प्राण्याचा आणि माणसांचा आत्मा एकच असेल यावर माझा विश्वास नाहि.

बेनझीर भुट्टो हे नाव मुळ वेबसाईट न वाचता " तेज" च्या बातमीच्या हवाल्याने लिहले आहे.

कमाल आहे पण लोकांची ज्या बद्दल आक्षेप नाही त्याबद्दल कुणीच काही लिहीत नाही. पुनर्जन्म नसतोच ही भावना इतकी प्रबळ आहे त्या पोटी इतके मोठे संशोधन क्षणात खोटे पाडण्याची कला काही और आहे.
>> मी पुनर्जन्म आणि त्याबद्दल काहिही लिहिलेले नाहिये. तुम्ही ज्या संदर्भांचा उल्लेख केलाय ते चुकीचे आहेत एवढंच तुमच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न होता. तुम्ही कशावर विश्वास ठेवायचा ते तुमचं तुम्ही ठरवा. मला त्याच्याशी देणंघेणं नाही. पण तुम्हाला काही कारणानं पटलेल्या गोष्टी तुम्ही पडताळून न पाहता पब्लिक फोरम वर टाकता तेव्हा तुमची चूक/तुमचे चुकीचे संदर्भ कोणितरी दाखवून देणारच

मनीष,

मी खुले पणाने मान्य करतोय की मी ते "तेज " वर ऐकले. यातील प्र्त्येक नाव वेब साईटवर पडताळले नाही. मला आवश्यकता वाटली नाही. आपण नाही ( गैरसमजाबद्दल क्षमस्व ) पण मायबोलीवरचे काही लोक बादरायणी संबंध लाउन खोटे पाडायचा प्रयत्न करतात त्याबद्दल लिहले होते.

लोक टीका करणार हे १०० % मान्य. त्यानी करावी.

शिव्या शाप देणे, वैयक्तीक नावानिशी - गाढव इ. शब्दांचा वापर हे प्रकारपण इथे चालतात. चांगले शिकलेले मान्यवर हे करतात. ही वृत्ती इथे दिसते. लिहणार्‍याला नाउमेद केले जाते.

खास करुन असे लोक आहेत ज्यांनी स्वतः काहीच लिहलेले नाही. पण दुसर्‍याला खोटे पाडणे ह्यात त्यांना आसुरी आनंद मिळतो.

Pages