पुनर्जन्माच्या विषयाला वाहिलेली अमेरिकन संस्था
पुनर्जन्म हा तसा अनेक मायबोलीकरांच्या आणि तथाकथीत बुध्दीपामाण्यावाद्यांच्या दृष्टिने चेष्टेचा, टिंगल टवाळीचा आणि टीका करण्याचा विषय आहे. भारतात हिंदु धर्म असा आहे की जो कर्मसिध्दांत आणि त्याला जोडुन असलेले प्रारब्ध्द आणि त्याला जोडुन येणारा पुनर्जन्म ह्या विषयाला मान्यता देणारा आहे. याच कारण हा धर्म किंवा जड वाटत असेल तर संस्कृती म्हणा एका पुस्तकाच्या आधाराने चालणारा नाही. अनेक ग्रंथ गुढ अश्या विषयावर भाष्य करताना दिसतात तसेच आजच्या जीवनाशी त्याची सांगड घालताना दिसतात.
मी एका पुस्तकाच्या वाचनाने फ़ारच प्रभावीत झालो त्याच नाव " कर्माचा सिध्दांत " हे पुस्तक माजी सनदी अधिकारी व वेदांत अभ्यासक श्री हरिभाई ठक्कर यांनी लिहले आहे. ह्या पुस्तकाची अनेक भाषात भाषांतरे होऊन त्याच्या अनेक अवृत्या निघाल्या.
यात प्रथम कर्म - प्रारब्ध्द आणि पुनर्जन्माची साखळी वाचवयास मिळाली. अनेक धार्मिक पुस्तकात याचा उल्लेख येत होताच. शिवाय माझे आजोबा भृगुसंहीता या ग्रंथाच्या सहायाने ज्योतिष सांगत ज्यात प्रामुख्याने मागला जन्म आणि त्या संदर्भाने हा जन्म हा विषय येत असे.
नजिकच्या काळात डॉ. प.वि. वर्तक यांचे पुनर्जन्मावरचे पुस्तक ही वाचले. ज्यात बहिणाबाई यांचे आधीचे त्यांनी लिहुन ठेवलेले १३ जन्म किंवा तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले आधीचे दोन जन्म याच्या वाचनाने मला विश्वास वाटु लागला की हे कल्पनेचे जग नाही. जेव्हा पास्ट लाईफ़ रिग्रेशन या थेअरीचा जन्म परदेशात झाला आणि तो एका मानसशास्त्री व्यक्तीने घडवला ते वाचल्यानंतर मात्र http://en.wikipedia.org/wiki/Past_life_regression अधिक अधिक खात्रीच झाली की या विषयाच्या अभ्यासाला चांगले दिवस येणार.
आयुर्वेद आणि योग ज्याचे पुढे योगा झाल्यानंतर माहात्म्य भारताला पटले या धर्तीवर आता पुनर्जन्म ही थेअरी जर पटली तर मला सर्वात जास्त आनंद होईल. अर्थात कुणी जबरदस्तीने पटवुन घ्यावी असा आग्रह मात्र अजिबात नाही.
मागे एका चर्चेत स्वामी विवेकानंदांच्या राजयोगात वर्णीलेल्या प्रयोगाचे पुनर्जन्म या संदर्भात मी प्रकटीकरण केले तेव्हा मायबोलीकर तुटुन पडले होते. प्रयोग असा होता. कोंबडीची तीन अंडी आणि बदकाची तीन अंडी कोंबडीकडे उबवायला दिल्यावर जन्माला आलेली तीन बदकाची पिले पाण्याकडे धाव घेतात तर कोंबडीची तीन पिले पाण्याला भितात. याचा अर्थ स्वामी विवेकानंद म्हणतात की बदकाची पिले मागच्या जन्मी जलचर होती म्हणुन त्यांना पाण्याची भिती वाटत नाही. यावर मायबोलीकर यांनी तो जीन्सचा प्रभाव आहे असे प्रतिपादीले होते. हे ही पटण्यासारखे होते म्हणुन ठोस संशोधनाशिवाय हा विषय काही मान्य होणार नाही असे जाणवले.
आजच्या " तेज" चॅनलवरच्या बातमीने मी शोध घेतला तेव्हा अमेरीकेत ह्या विषयावर खुपच संशोधन झाल्याचे माहित पडले.http://www.iisis.net/index.php?page=semkiw-reincarnation-past-life-lives... या साईट्वर Institute for the Integration of Science, Intuition and Spirit या संस्थेने २०,००० व्यक्तींच्या मागच्या जन्माचा अभ्यास करुन अनेक पुस्तके लिहली आहेत तसेच रिसर्च पेपर्स ही लिहले आहेत. Principles of Reincarnation-Understanding Past Lives या नावाची नविन थेअरी या वेबसाईटवर चर्चीलेली आहे ज्यायोगे हे संशोधन झालेले आहे.
भारतात जन्माला आलेले पं जवाहरलाल नेहरु ( यांच नाव आधी लिहतो म्हणजे भाजप विरोधक खुष होतील ) हे मागच्या जन्मी बहादुरशहा जफ़र होते तर पुढच्या जन्म त्यांनी पाकिस्थानात झुल्फ़ीकार अली भुट्टो यांच्या घराण्यात बेनझीर भुट्टो यांच्या रुपाने घेतला असा दावा या वेबसाईटवर आहे.
इंदिरागांधी मागच्या जन्मी नानासाहेब पेशवे होत्या असे ही वेबसाईट म्हणते. डॉ. प.वि, वर्तक यांनी वर्णिलेला जन्म साहचर्याचा भाग इथेही दिसतो कारण बहादुरशहा जफ़र आणि नानासाहेब पेशवे समकालीन होते. ( बहुदा ) त्यांची भेटही झाली होती किंवा पत्रव्यवहार होता आणि १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता.
आजच्या तेज च्या बातमीचा महत्वाचा भाग श्री नरेंद्र मोदी यांच्या मागच्या जन्माचा शोध हा होता. ही वेब साईट म्हणते की नरेंद्र मोदी मागच्या जन्मी सर सय्य्द अहमद खान होते ज्यांनी मुस्लीम स्त्रीयांच्या शिक्शणासाठी काम केले ज्याचे पुढे अलिगढ विद्यापिठात रुपांतर झाले. सर सय्यद अहमद खान पाकिस्थानची मागणी करणारे पहिले मुसलमान होते.
अमिताभ बच्चन मागच्या जन्मातही नट होते ज्यांनी शेक्सपियरच्या नाटकात अनेक भुमिका केल्या होत्या. तसेच शाहरुख खान मागच्या जन्मी प्रसिध्द बंगाली स्त्री नटी होते असे या वेबसाईट वर आहे.
या शिवाय टिप्पु सुलतान, डॉ अब्दुल कलाम इ. प्रसिध्द भारतीयांच्या पुनर्जन्माचा ( पुढच्या जन्माचा शोध ) घेतला गेलेला आहे.
मागच्या जन्मातली कौशल्ये आणि सुप्त इच्छा आपण घेऊन जन्माला येतो तसेच पास्ट लाईफ़ रिग्रेशनचा शोध लागताना मागच्या जन्माची दु:खे - न्युनगंड याचा शोध घेतला गेला होता हे या लेखाच्या निमीत्ताने अधोरेखीत होते.
अभ्यासुंनी जरुर वाचन करावे आणि आपली मते मांडावी. आपल्या मतांचा मला आदर आहेच. कोणतीही नविन थेअरी आली की त्याला आक्शेप ही येणारच या दृष्टीने आपली मते मी जरुर वाचीन. विनंती इतकीच की एखादा माझा चुकीचा लिहलेला शब्द धरुन टिका करु नये. काही साधक बाधक लेखन झाल्यास मला ही आवडेल. ज्यांचा पुर्वग्रह दुषित आहे आणि काहीतरी लिहुन प्रभाव टाकताना ज्यांनी इतका अभ्यास करुन हे सिध्दांत मांडले आहेत त्यांचा अपमान होतो हे लक्शात घ्यावे. मी फ़क्त भारवाहक आहे.
जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख
जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख वेबसाईटवर नसुन बॉर्न अगेन या पुस्तकात आहे.
" Born Again " by Walter Semkiw, MD
Are we born again? What if we had another life, at another time and place, in another body? Why is it that two children of the same parent have totally different mental tendencies which they display at a very early age? How is it that some people are able to learn a foreign language very easily? Is who I am today a result of my past life and will the choices I make today determine who I am in another?
In this provocative book, Dr. Walter Semkiw asks a startling question - ARE WE BORN AGAIN? He takes the subject of past lives and reincarnation to a new level of possibility. He has researched in to the lives of our international celebrities and India's Political legends and film stars and has come up with some startling information which is hard to ignore given the very methodical way in which he has proceeded to establish the past life connection. Facial matches, personality matches - the result is a fascinating new angle on history, culture and the continuity of life.
Personalities covered - Dr. APJ Abdul Kalam, Indira Gandhi, Jawahar Lal Nehru, Sonia Gandhi, Amitabh Bachchan, Jaya Bachchan, JK Rowling and many more...
सुप्रसिद्ध माणसे गेल्या
सुप्रसिद्ध माणसे गेल्या जन्मीही सुप्रसिद्द (किंवा कुप्रसिद्ध म्हणा) होती हे दाखवायचा टिआरपी अट्टाहास या संशोधनाला नडला.
पुर्वी नागपूरच्या उत्तरा
पुर्वी नागपूरच्या उत्तरा हुद्दार या बाईंच्या पुनर्जन्माच्या बाबत ची केस आजचा सुधारक मधे आली होती. तपशील नीट आठवत नाही.
"तेज " वरची ती बातमी पुन्हा
"तेज " वरची ती बातमी पुन्हा ऐकली आणि ऑडीओ रेकॉर्ड ही करुन ठेवली आहे.
जवहारलाल नेहरु मागच्या जन्मात बहादुरशहा जफर आणि पुढच्या जन्मात बेनझीर भुट्टो होते.
उत्तरा हुद्दार (आणि
उत्तरा हुद्दार (आणि पूर्वाश्रमीची बंगाली शारदा) ही केस तपशीलात माणूस नियतकालिकातही आली होती. ८० च्या दशकात.
Discovery बघा तेज, इंडिया
Discovery बघा तेज, इंडिया टिव्ही सारखे ___ बघू नये
Discovery बघा तेज, इंडिया
Discovery बघा तेज, इंडिया टिव्ही सारखे ___ बघू नये
<<
<<
Discovery, इंडिया टिव्ही हे माहीती आहे. पण हे 'तेज' काय आहे?
सगळे मनुश्यच होते. किडा मुंगे
सगळे मनुश्यच होते. किडा मुंगे कुनेच नव्हत
<कमाल आहे पण लोकांची ज्या
<कमाल आहे पण लोकांची ज्या बद्दल आक्षेप नाही त्याबद्दल कुणीच काही लिहीत नाही. पुनर्जन्म नसतोच ही भावना इतकी प्रबळ आहे त्या पोटी इतके मोठे संशोधन क्षणात खोटे पाडण्याची कला काही और आहे>
मृत्यू होण्याआधीच अमक्या व्यक्तीचा , तीही जगप्रसिद्ध (दोन्ही जन्मांत !) पुनर्जन्म झाला असे संशोधन सांगत असेल तरीही त्यावर प्रश्नचिन्ह लावायचे नाही का?
संशोधन तुमचे नाही. मग ते खोटे पाडले गेल्याचे वाईट वाटायचे कारणही नाही.
Discovery बघा तेज, इंडिया
Discovery बघा तेज, इंडिया टिव्ही सारखे ___ बघू नये>>>>
Discovery पण सगळ खरं नसतं, भ्रमातुन बाहेर या.... बर्याच गोष्टी चुकिच्या दाखविल्या आहेत. अर्थात त्या क्षेत्रातलं माहिती होतं म्हणुन ते लक्षात आलं. तरीही बाकच्या तद्द्न भिकार चॅनेलांपेक्षा Discovery १०१% चांगलं चॅनेल आहे.
हो, डिस्कव्हरी आणि हिस्टरी
हो, डिस्कव्हरी आणि हिस्टरी चॅनल्सच्या मते अजंठ्याची लेणी सुद्धा परग्रहवासीयांनी बनवलेली आहेत, आहात कुठे?
मग आस्थाच बघा सगळचं खर्र आणि
मग आस्थाच बघा
सगळचं खर्र आणि खुर्र असते
वरदाजी पअ मला वैयक्तिक
वरदाजी
पअ मला वैयक्तिक पिरामिड वर मानवाने बनवलेला वाटत नाहीच
एक जण वेगळं संशोधन
एक जण वेगळं संशोधन करतोय.
त्याचं म्हणणं आहे की डायबेटीस एकाच फॅमिलीत बहुतेक वेळा सर्वांना असतो, याचं कारण काय ? तसंच एकाच फेमिलीत थायरॉईड एकापेक्षा जास्त लोकांना असतो. आजच्या सायन्सचा दृष्तीकोण चुकीचा आहे. फ्ल्यु, मलेरीया कसा एकाकडून दुस-याला होतो तसंच डायबेटीसचे जंतू एकाकडून दुस-याच्या शरीरात शिरतात. थायरॉईडचे देखील जंतू असेच संक्रमित होतात. सायन्स मधे डायबेटीस का होतो याचं उत्तर नाही. जर हे जंतू सापडले तर लस पण बनवता येईल आणि या दोन महाभयंकर रोगांचं उचाटन होईल. अमेरिकेत यावर काही चालू असेल तर कळवा प्लीज.
Uk मधे चालू आहे संशोधन मधुमेह
Uk मधे चालू आहे संशोधन
मधुमेह आटोक्यात आला असा दावा करत आहेत
संशोधन तुमचे नाही. मग ते खोटे
संशोधन तुमचे नाही. मग ते खोटे पाडले गेल्याचे वाईट वाटायचे कारणही नाही
थेअरी न वाचता ? वाईट याचेच आहे. तुम्हाला असे वाटते का हे प्रश्न न पडता जर्नल वाले छापु शकतील ?
कुणीतरी हा प्रश्न त्यांच्या वेबसाईट्वर त्यांच्या कॉन्ट्क्ट अस मधे विचारुन अपेक्षीत उत्तर न मिळाल्यास खोटे पाडल्यास मला आनंद होईल.
तुम्ही मराठी वेबसाईटवर पुर्वग्रह दुषीत ठेऊन प्रचार केल्याने परदेशातला प्रचार/ संशोधन थांबत नाही.
या दोन केस मधे ( मृत्यु होण्या आधी पुनर्जन्म ) याचे उत्तर मला माहित आहे. हे उत्तर या अमेरीकेतल्या संस्थेकडून प्रमाणित होण्याची वाट मी पहात आहे.
.
<कुणीतरी हा प्रश्न त्यांच्या
<कुणीतरी हा प्रश्न त्यांच्या वेबसाईट्वर त्यांच्या कॉन्ट्क्ट अस मधे विचारुन अपेक्षीत उत्तर न मिळाल्यास खोटे पाडल्यास मला आनंद होईल.>
हे काम (आनंद होण्याचं नव्हे, तर प्रश्न विचारण्याचं), तुमच्यासारख्यांकडूनच (म्हणजे या विषयात रस असलेल्यांकडून) होणं अपेक्षित का नसावं?
हे काम (आनंद होण्याचं नव्हे,
हे काम (आनंद होण्याचं नव्हे, तर प्रश्न विचारण्याचं), तुमच्यासारख्यांकडूनच (म्हणजे या विषयात रस असलेल्यांक डून) होणं अपेक्षित का नसावं?
बुध्दीप्रामाण्य वाद्यांनी काय पुर्वग्रह दुषीत ठेऊन झोडपायच ?
तुमचा ग्रहही पूर्वग्रह असूच
तुमचा ग्रहही पूर्वग्रह असूच शकतो.
आपण ज्याची भलावण करतोय , ते त्या योग्यतेचं आहे की नाही हे स्वतःच तपासून पाहावे अशी रीत असावी बहुतेक. आपल्या विरोधकांनाच ते काम सांगायची नवी रीत असल्यास कल्पना नाही.
इथे बुप्रा असण्याचाही काही संबंध नाही. अगदी बुप्रा नसणारे लोकही प्रत्येक गोष्टीवर डोळे मिटून विश्वास ठेवत नाहीत. ती मानण्यासाठी काही ना काही आधार शोधतात.
मुळात इथे स्वतःला पटण्यापेक्षा दुसर्याला ते कसे पटत नाही याचाच जास्त ओरडा चाललाय.
मला जे पटते ते मला पटते
मला जे पटते ते मला पटते म्हणुन मी लिहीतच नाही. संशोधनाचे प्रयोग संख्याशास्त्रीय पध्दतीने सिध्द व्हावे लागतात. थेअरी इस्टाब्लीश व्हावी लागते.
ही सर्व प्रक्रिया या वेव साईटने पुर्ण केलेली आहे. अभ्यासुंनी तपासुन पहावी असेच माझे म्हणणे आहे.
मुळ लेखात पटवुन घ्यावे असा आग्रह नाही असे आधीच म्हणले आहे.
तुमच्याच काय कुणाच्याही योग्य मतांचा मला आदरच आहे.
< अभ्यासुंनी तपासुन पहावी
< अभ्यासुंनी तपासुन पहावी असेच माझे म्हणणे आहे>
दोन अभ्यासूंनी प्रत्येकी एक सॅम्पल केस घेऊन तपासून पाहिले. त्यात थिअरी फेल झाली असे त्यांचे मत झाले. त्यावरही तुमचा आक्षेप आहे.
डेटा पब्लिश करतानाही त्या 'संशोधकां'नी पुरेशी काळजी घेतलेली नाही हे तरी त्यातून दिसते.
चंद्रुभौ, अमुक वेबसाईटने तमुक
चंद्रुभौ,
अमुक वेबसाईटने तमुक केले याला काडीचाही अर्थ नसतो.
तुमच्या मते, पीअर रिव्ह्युड लिटरेचर, अन सायंटिफिक रिसर्च कशाला म्हणतात ते जरा लिवा बरं?
नेहरूंच नक्की काय झालं ? हे
नेहरूंच नक्की काय झालं ? हे वाचा
http://krishna.org/prabhupada-and-nehrus-incarnation/
<<< आजच्या सायन्सचा दृष्तीकोण
<<< आजच्या सायन्सचा दृष्तीकोण चुकीचा आहे. फ्ल्यु, मलेरीया कसा एकाकडून दुस-याला होतो तसंच डायबेटीसचे जंतू एकाकडून दुस-याच्या शरीरात शिरतात. >>>
मधुमेह हा जनुकीय कारणांमुळे होणारा आजार आहे. जन्तुंशी त्याचा संबंध नाही.
<<< मागच्या जन्मातली कौशल्ये आणि सुप्त इच्छा आपण घेऊन जन्माला येतो. >>>>
इच्छा म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आपल्याला हवी तशी व्हावी हि भावना. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे कि भावना या मेंदूत जन्मतात. दे आर फंक्शन ऑफ हुमन ब्रेन. जेंव्हा शरीर मृत होते तेंव्हा मेंदू मृत होतो. पर्यायाने भावना व विचार मृत होतात.
जरी वादासाठी क्षणभर आत्म्याचे व पुनर्जन्माचे अस्तित्व मान्य केले, तरी आत्मा इच्छा व कौशल्ये आपल्या बरोबर घेवून जाऊ शकणार नाही.
बरेच लोक आत्म्याकडे शरीरातील चेतना या दृष्टीने पाहतात. फक्त ती चेतन एका शरीरातून दुसर्या शरीरात जाते . त्यांच्या मते सुद्धा भावना व विचार या आत्म्याशी जोडलेल्या नाहीत.
फआयनली काय ठरले ? नेहरु कोण
फआयनली काय ठरले ? नेहरु कोण झाले ? भुत्तो की कुत्रा ?
फआयनली काय ठरले ? नेहरु कोण
फआयनली काय ठरले ? नेहरु कोण झाले ? भुत्तो की कुत्रा ?
गरीब बिचारे प्राणी ! प्रभुपाद
गरीब बिचारे प्राणी ! प्रभुपाद गुरुजे म्हणजे जशी आहे तशी वाले का ?
भारतात चार देवळे काढुन आणि धा
भारतात चार देवळे काढुन आणि धा वीस पुस्रकं विकुन तो पैसा अमेरिकन ट्रस्टला पाठवणारे गुर्जी मनुष्यरुपातच अमेरिकन कुत्र्याचे आयुष्य जगत असतात.
त्यांनी देशप्रेमी , देशविकासक मनुष्यरुपी नेहरु पुढच्या जन्मी कुत्रा झाले असे गळे का काढावेत?
पाद गुरुजीम्चे नेहरूंवर प्रचंड प्रेम असणार. म्नेहरुंचा वढादिवस १४ नोवेंबरला बालगोपाळ साजरा करत होते. त्याच दिवशी गुरुजींना त्यांच्या गोपाळाने वर बोलावुन घेतले.
@ राजेश के काय राव ! थांबायचं
@ राजेश के
अती घाई संकतात नेई
काय राव ! थांबायचं असतं जरा
मोहन भागवत मागच्या जन्मी
मोहन भागवत मागच्या जन्मी अफजलखान होते असं संशोधन झालंय का ?
Pages