४ मोठे लालबुंद कडक सालीचे टोमॅटो
१ गाजर
१-२ पाती कांद्याचे छोटे कांदे
कोबी थोडा चिरून
बिट चे २-३ पातळ स्लाईस
काकडी (गोल चकट्या व थोडी बारीक चिरुन)
डाळींबाचे दाणे
पुदीना व कोथिंबीर सजावटीसाठी
चाट मसाला
टोमॅटो स्वच्छ धुवून, पुसून घेऊन त्याच्या वरच्या बाजूला अर्ध्यापर्यंत दोन खाचा अशा मारा की मध्ये परडीची दांडी तयार होईल.
जिथपर्यंत अर्धवट कापल आहे त्याची एक एक बाजू मध्यावरून सरळ कापुन घ्या.
दोन्ही बाजू कापल्यावर असे दिसेल.
आता दांडीला लागलेला व राहिलेल्या टोमॅटोच्या भागातील गर काढून टाका म्हणजे असे बास्केट तयार होईल.
गाजर स्क्रॅपरने सोला आणि स्क्रॅपरच्या दातांच्या सहाय्याने गाजरावर सरळ रेषा ओढून गाजराचे गोल काप करा.
कांदा पातीच्या छोट्या कांद्यांना सोलून त्याचे मुळ काढून त्याला सुरीने खाचा पाडून त्याचे फुल बनवा व हवी तेवढीच दांडी ठेवा.
बिटाच्या पातळ स्लाईसला गोल दुमडा
कोबीच्या पानाचा छोटासा भाग घेऊन त्याची गुंडाळी करा.
आता बास्केट भरायला घ्या.
एका बास्केट मध्ये सगळ्या सलादची फुले भरून परडी सजवा. प्रत्येक परडीत पुदीना किंवा कोथिंबीरीची पाने सजावटीसाठी एक्-दोन ठिकाणी ठेवा.
आपल्याला हव्या त्या सलादच्या परड्या तुम्ही भरू शकता.
मी दूसरी परडी गाजराच्या फुलांची केली.
तिसरी परडी काकडीचे तुकडे व डाळींबाचे दाणे
चौथी परडी बारीक चिरलेल्या कोबीने भरली.
अशा प्रकारे चार परड्या भरून घेतल्या.
काकडीचे गोल काप करून ते डिशमध्ये मध्ये ४ व भोवती गोलाकार लावले. मधल्या चार कापांवर ४ परड्या ठेवल्या व बाजूच्या कापांच्या मध्यभागी फुलाच्या परागाप्रमाणे डाळींबाचे दाणे लावले. एका ठिकाठी पुदीन्याची छोटी फांदी घेऊन ती दोन काकड्यांच्या कापांमध्ये अडकवून त्यावर हलकी गाजराची फुले ठेवली.
आता चवीसाठी वरून चाट मसाला भुरभुरवला. आणि अशाप्रकारे टोमॅटॉ बास्केट सलाद तयार झाले.
सलादचे महत्व आपल्या अन्नामध्ये किती आहे हे मला तुम्हा सुज्ञांना सांगायलाच नको.
लहान मुले अशी बास्केट पाहुन खुष होतात.
तुमच्या आवडीप्रमाणे त्यात अजून सलादचे प्रकार घालू शकता.
माझ्या सा.बांनी तर सुंदर दिसते म्हणून तोडलेच नाही तसेच फ्रिजमध्ये ठेवले.
सही !!! त्यात बाकी पण मिश्रणं
सही !!!
त्यात बाकी पण मिश्रणं करून भरता येतील..
नाव योग्य त्या फॉर्मॅटमध्ये दे ना !
छान दिसतेयं फायनल डिश.. मी
छान दिसतेयं फायनल डिश.. मी पण नुस्ताच शो साठी ठेवेन डायनिंग टेबलवर
ह्यात शिजायची बातच नाही, मग
ह्यात शिजायची बातच नाही, मग गणेशोत्सवाकरता का नाही?
मस्त दिसतंय सॅलड.
मस्तच! फोटो भारि नेहमीप्रमाणे
मस्तच! फोटो भारि नेहमीप्रमाणे
मस्त!
मस्त!
खूप छान दिसतायत परड्या आणि
खूप छान दिसतायत परड्या आणि पौष्टिक पण!
वा मस्तच.
वा मस्तच.
सुपर्ब!!
सुपर्ब!!
जागू मस्त ग . सुंदर दिसतायत.
जागू मस्त ग . सुंदर दिसतायत.
मस्तं!
मस्तं!
छान दिसतेय सलाद . शब्दखुणात
छान दिसतेय सलाद .
शब्दखुणात मायबोली गणेशोत्सव २०१४, आता कशाला शिजायची बात, उपक्रम हे शब्द घाला.
मस्त दिसतंय
मस्त दिसतंय
अप्रतिम ... जागु
अप्रतिम ... जागु
अप्रतिम !
अप्रतिम !
जागूतै, तुसी ग्रेट हो अशा
जागूतै, तुसी ग्रेट हो
अशा तर्हेने ठेवलेले सॅलड हिट्ट होईल
पुढच्या वेळेला हेच करणार
मस्तच
मस्तच
किती मस्त्त्त्त
किती मस्त्त्त्त
छानच. यात केचप टाकले तर छान
छानच. यात केचप टाकले तर छान चव येते.
भारीच की गं
भारीच की गं
घरच्या पार्टीला टोमॅटो आणि
घरच्या पार्टीला टोमॅटो आणि मनीमोहोरंच सेलर काकडी सॅलड ठेवेन. दोन ऑप्शन मधून लोकं घेतील.
झंपे एक्झॅक्टली कसलं
झंपे एक्झॅक्टली
कसलं इनोव्हेटीव्ह वाटेल ते
आणि लोकं आपल्यालाच नावाजतील
व्वा... अप्रतिम जमलय!!
व्वा... अप्रतिम जमलय!!
मस्त!
मस्त!
खूप छान ! मी पण करून पाहाणार
खूप छान ! मी पण करून पाहाणार
खूप सुंदर आणि कल्पक. मुलांना
खूप सुंदर आणि कल्पक. मुलांना या कच्च्या भाज्या खायला लावण्यासाठी तर छानच उपाय आहे!
वॉव....मस्त आहे गं.....टोमॅटो
वॉव....मस्त आहे गं.....टोमॅटो आवडत नाहीत विशेष .. पण त्यात जो माल मसाला भरलेला आहे तो मला आवडेल फस्त करायला......
भारी आहे..
भारी आहे..
sagalyanche manapasun
sagalyanche manapasun dhanyavad.
jaee shabdkhunat badal kelaa aahe. thanks.
एक एक परडी उचलून तोंडात
एक एक परडी उचलून तोंडात टाकावीशी वाटते..
कल्पकतेला सलाम जागू
कल्पकतेला सलाम जागू
Pages