आता कशाला शिजायची बात - जागू -टोमॅटो बास्केट सलाद

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 September, 2014 - 15:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ मोठे लालबुंद कडक सालीचे टोमॅटो
१ गाजर
१-२ पाती कांद्याचे छोटे कांदे
कोबी थोडा चिरून
बिट चे २-३ पातळ स्लाईस
काकडी (गोल चकट्या व थोडी बारीक चिरुन)
डाळींबाचे दाणे
पुदीना व कोथिंबीर सजावटीसाठी
चाट मसाला

क्रमवार पाककृती: 

टोमॅटो स्वच्छ धुवून, पुसून घेऊन त्याच्या वरच्या बाजूला अर्ध्यापर्यंत दोन खाचा अशा मारा की मध्ये परडीची दांडी तयार होईल.

जिथपर्यंत अर्धवट कापल आहे त्याची एक एक बाजू मध्यावरून सरळ कापुन घ्या.

दोन्ही बाजू कापल्यावर असे दिसेल.

आता दांडीला लागलेला व राहिलेल्या टोमॅटोच्या भागातील गर काढून टाका म्हणजे असे बास्केट तयार होईल.

गाजर स्क्रॅपरने सोला आणि स्क्रॅपरच्या दातांच्या सहाय्याने गाजरावर सरळ रेषा ओढून गाजराचे गोल काप करा.
कांदा पातीच्या छोट्या कांद्यांना सोलून त्याचे मुळ काढून त्याला सुरीने खाचा पाडून त्याचे फुल बनवा व हवी तेवढीच दांडी ठेवा.
बिटाच्या पातळ स्लाईसला गोल दुमडा

कोबीच्या पानाचा छोटासा भाग घेऊन त्याची गुंडाळी करा.

आता बास्केट भरायला घ्या.
एका बास्केट मध्ये सगळ्या सलादची फुले भरून परडी सजवा. प्रत्येक परडीत पुदीना किंवा कोथिंबीरीची पाने सजावटीसाठी एक्-दोन ठिकाणी ठेवा.

आपल्याला हव्या त्या सलादच्या परड्या तुम्ही भरू शकता.
मी दूसरी परडी गाजराच्या फुलांची केली.

तिसरी परडी काकडीचे तुकडे व डाळींबाचे दाणे

चौथी परडी बारीक चिरलेल्या कोबीने भरली.

अशा प्रकारे चार परड्या भरून घेतल्या.

काकडीचे गोल काप करून ते डिशमध्ये मध्ये ४ व भोवती गोलाकार लावले. मधल्या चार कापांवर ४ परड्या ठेवल्या व बाजूच्या कापांच्या मध्यभागी फुलाच्या परागाप्रमाणे डाळींबाचे दाणे लावले. एका ठिकाठी पुदीन्याची छोटी फांदी घेऊन ती दोन काकड्यांच्या कापांमध्ये अडकवून त्यावर हलकी गाजराची फुले ठेवली.

आता चवीसाठी वरून चाट मसाला भुरभुरवला. आणि अशाप्रकारे टोमॅटॉ बास्केट सलाद तयार झाले.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकाला एक बास्केट ताटात वाढावे.
अधिक टिपा: 

सलादचे महत्व आपल्या अन्नामध्ये किती आहे हे मला तुम्हा सुज्ञांना सांगायलाच नको.
लहान मुले अशी बास्केट पाहुन खुष होतात.
तुमच्या आवडीप्रमाणे त्यात अजून सलादचे प्रकार घालू शकता.
माझ्या सा.बांनी तर सुंदर दिसते म्हणून तोडलेच नाही तसेच फ्रिजमध्ये ठेवले. Lol

माहितीचा स्रोत: 
लहानपणी एका पाहुण्या बाईंनी आमच्या घरी परडी करून दाखवली होती. ती लक्षात होती. त्यात हे सगळे सलाद भरण्याचा विचर माझाच.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच

वॉव....मस्त आहे गं.....टोमॅटो आवडत नाहीत विशेष .. पण त्यात जो माल मसाला भरलेला आहे तो मला आवडेल फस्त करायला......
Happy

sagalyanche manapasun dhanyavad.
jaee shabdkhunat badal kelaa aahe. thanks.

Pages