गणपती बाप्पा मोरया!
कोण्या शहराची 'ती' शान तर कोण्या शहराची ओळख. कोणासाठी 'तिचा' प्रवास म्हणजे सहज हौस तर कोणासाठी गरज. अशी ही बालगीतातली झुकझुक गाडी पुढे मेट्रो, लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस अशा वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते. तीच तुम्हाला बोलावते आहे मायबोली गणेशोत्सव २०१४ मध्ये, झब्बू खेळण्यासाठी! 'गाडी बुला रही है!'
आगीनगाडीचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हाला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ रेल्वेची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत. खर्या, खोट्या, चालू, बंद अशा कोणत्याही रेल्वेचे प्रकाशचित्र चालेल.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :-
(कोलकता ट्राम)
आमची कॅल-ट्रेन.
आमची कॅल-ट्रेन.
(No subject)
ही आमची पहिली एण्ट्री. टेनेसी
ही आमची पहिली एण्ट्री. टेनेसी मधे चॅटनूगा जवळ लूक आउट माउंटन आहे तेथेच ही Incline Train आहे. तिचा ट्रॅक पुढे डोंगरावर चढताना दिसेल फोटोत. अटलांटा हून साधारण तीन तासांचा ड्राइव्ह आहे. येथेच जवळ रूबी फॉल्स म्हणून एक गुहेत आत धबधबा आहे तो ही छान आहे.

न्यू जर्सीतल्या 'टर्टलबॅक
न्यू जर्सीतल्या 'टर्टलबॅक झू'मधली झुकझुकगाडी:
सगळ्यांचे फोटो मस्तच. सुरभि,
सगळ्यांचे फोटो मस्तच.
सुरभि, Royal Gorge Train मधून काढलेले फोटो 'पंचमहाभूतां'च्या झब्बूवर येऊ द्या.
ही स्वित्झर्लंड मधे र्हाइन
ही स्वित्झर्लंड मधे र्हाइन फॉल्स ला नेणारी गाडी. तेथे प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी रेल्वेचे कनेक्शन अगदी जवळपर्यंत आहे. हे स्टेशनही तसेच, तेथून पाच मिनीटांवर. पुढे या बोगद्यातून गाडी त्या धबधब्याच्या अगदी वरतून जाते, तो ही फोटो टाकतो नंतर.

मंडळी, ही ट्रेन बघा बरं आवडली
मंडळी, ही ट्रेन बघा बरं आवडली का?
खरं तर ही ट्रेन नाहीच, रामोजी फिल्म सिटी - हैदराबाद येथे बनवलेलं ट्रेनचं मॉडेल आहे हे, एका बाजूला गावातील रेल्वे स्टेशन तर दुसर्या बाजूला शहरातील, असा सेट बनवून ठेवलाय कायमचा. ज्याला हवं त्याने यावं अन पैसे भरून शूटींग करावं
वा.. एक से बढकर एक झब्बू..
वा.. एक से बढकर एक झब्बू..
आता त्या बोगद्यात शिरायच्या
आता त्या बोगद्यात शिरायच्या आधी याच र्हाइन फॉल्स वरून येणारी गाडी!

फारेन्ड मस्तय! फॉल पाहिला पण
फारेन्ड मस्तय! फॉल पाहिला पण गाडे नव्हती पाहिली.
बर्लिन ते कोपनहेगन जाणारी ही
बर्लिन ते कोपनहेगन जाणारी ही गाडी, ICE (Inter City Express).

जास्तीत जास्त ३०० किमी/तास या वेगाने जाणारी गाडी हे अंतर ७ तासात पूर्ण करते. जर्मनी ते डेन्मार्क मधला ४५ मिनिटांचा बाल्टीक समुद्रातील प्रवास ती जहाजातून पार करते.. पूर्ण प्रवास इथे चित्रबद्ध केला आहे, https://www.flickr.com/photos/35973140@N04/sets/72157644902869088/
अभिजीत, बर्याच दिवसांनी
अभिजीत, बर्याच दिवसांनी दिसलास माबोवर
फोटो मस्तच आहेत सगळे. पण जहाजावर गाडी बघण्याची अपेक्षा मात्र पूर्ण झाली नाही. 
सगळेच फोटोज खुप सुंदर मामे
सगळेच फोटोज खुप सुंदर
मामे तुमाखमै


पुण्यातल्या फिनिक्स मॉल मधली ट्रेन अगदी रॉयल दिसते पण
माझ्याकडे आहे फोटो पण प्रताधिकार धोरणात बसत नाही त्यामुळे टाकता नाही येतेय
गोव्याच्या दूधसागर
गोव्याच्या दूधसागर धबधब्यावरून पण ट्रेन जाते ( वास्को-कॅसलरॉक-लोंढा लाईन ) मी त्याचा एक फोटो इथे पुर्वी टाकला होता.. आता गायब झालाय.
हो.हो. शाखा प्रेमी.. तोच तो चे.ए. वाला !
माधव, धन्यवाद! हो, मायबोलीवर
माधव, धन्यवाद!
हो, मायबोलीवर बर्याच दिवसांनी पोस्ट केले, रीड-ओन्ली मोडमध्ये अधूनमधून असतोच. 
ही घ्या इस्तंबूल (तुर्कस्थान) मधील ट्राम. मागे "हाजी सोफिया"/"आया सोफिया" दिसतेय. (http://en.wikipedia.org/wiki/Hagia_Sophia)
मायबोलीवर अपलोड करताना क्वालिटी कमी होते. माझे मूळ चित्र इथे आहे, https://www.flickr.com/photos/35973140@N04/sets/72157644906196178/
मुंबई नॅशनल पार्कातील वनराणी
मुंबई नॅशनल पार्कातील वनराणी
अरे वन राणी म्हणजे अमर अकबर
अरे वन राणी म्हणजे अमर अकबर अँथनी मधल्य गाण्यात ऋषी कपूर च्या कडव्यातील ती हीच का?
अलास्कातील देनाली नॅशनल
अलास्कातील देनाली नॅशनल पार्कमधिल एका मोटेलचे ऑफिस.
Royal Gorge Park Colorado
Royal Gorge Park Colorado मधील incline railway
माथेरानची राणी
माथेरानची राणी
Hermann Park, Houston मधील
Hermann Park, Houston मधील झुकझुकगाडी
स्वित्झर्लंडमधील सुप्रसिद्ध
स्वित्झर्लंडमधील सुप्रसिद्ध ग्लेशियर एक्प्रेस. झरमॅट स्टेशनवर उभी आहे.
व्वा! एकसे एक झब्बु देतायत
व्वा! एकसे एक झब्बु देतायत सगळे !
The London Eye मधून लंडन आणी
The London Eye मधून लंडन आणी ट्रेन
ही घ्या ऑस्ट्रेलियातली
John Hancock Center, Chicago
John Hancock Center, Chicago मधे नाताळच्या दिवसांत लावलेली ईलेक्ट्रीक ट्रेनः
अॅमस्टरडॅमची लाईफलाईन असलेली
अॅमस्टरडॅमची लाईफलाईन असलेली ही ट्रॅम..
मोठे चित्र इथे आहे, https://www.flickr.com/photos/35973140@N04/sets/72157645316237115/
भारी फोटो!
भारी फोटो!
लंडन पॅडींग्टन स्टेशनमधल्या
लंडन पॅडींग्टन स्टेशनमधल्या ह्या ३ गाड्या..

मोठे चित्र इथे आहे, https://www.flickr.com/photos/35973140@N04/sets/72157644961071680/
सगळेच झब्बू ज ब र द स्त आहेत!
सगळेच झब्बू ज ब र द स्त आहेत!
Pages