मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - गाडी बुला रही है! " ४ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 25 August, 2014 - 10:51

गणपती बाप्पा मोरया!
कोण्या शहराची 'ती' शान तर कोण्या शहराची ओळख. कोणासाठी 'तिचा' प्रवास म्हणजे सहज हौस तर कोणासाठी गरज. अशी ही बालगीतातली झुकझुक गाडी पुढे मेट्रो, लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस अशा वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते. तीच तुम्हाला बोलावते आहे मायबोली गणेशोत्सव २०१४ मध्ये, झब्बू खेळण्यासाठी! 'गाडी बुला रही है!'
आगीनगाडीचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हाला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ रेल्वेची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत. खर्‍या, खोट्या, चालू, बंद अशा कोणत्याही रेल्वेचे प्रकाशचित्र चालेल.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

उदाहरणार्थ :-

tram 2.jpg
(कोलकता ट्राम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही आमची पहिली एण्ट्री. टेनेसी मधे चॅटनूगा जवळ लूक आउट माउंटन आहे तेथेच ही Incline Train आहे. तिचा ट्रॅक पुढे डोंगरावर चढताना दिसेल फोटोत. अटलांटा हून साधारण तीन तासांचा ड्राइव्ह आहे. येथेच जवळ रूबी फॉल्स म्हणून एक गुहेत आत धबधबा आहे तो ही छान आहे.
DSC_0428.JPG

ही स्वित्झर्लंड मधे र्‍हाइन फॉल्स ला नेणारी गाडी. तेथे प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी रेल्वेचे कनेक्शन अगदी जवळपर्यंत आहे. हे स्टेशनही तसेच, तेथून पाच मिनीटांवर. पुढे या बोगद्यातून गाडी त्या धबधब्याच्या अगदी वरतून जाते, तो ही फोटो टाकतो नंतर.
DSC_0980.JPG

मंडळी, ही ट्रेन बघा बरं आवडली का?

खरं तर ही ट्रेन नाहीच, रामोजी फिल्म सिटी - हैदराबाद येथे बनवलेलं ट्रेनचं मॉडेल आहे हे, एका बाजूला गावातील रेल्वे स्टेशन तर दुसर्‍या बाजूला शहरातील, असा सेट बनवून ठेवलाय कायमचा. ज्याला हवं त्याने यावं अन पैसे भरून शूटींग करावं

train.png

बर्लिन ते कोपनहेगन जाणारी ही गाडी, ICE (Inter City Express).
14299353090_8d35ca4cb7_z.jpg

जास्तीत जास्त ३०० किमी/तास या वेगाने जाणारी गाडी हे अंतर ७ तासात पूर्ण करते. जर्मनी ते डेन्मार्क मधला ४५ मिनिटांचा बाल्टीक समुद्रातील प्रवास ती जहाजातून पार करते.. पूर्ण प्रवास इथे चित्रबद्ध केला आहे, https://www.flickr.com/photos/35973140@N04/sets/72157644902869088/

अभिजीत, बर्‍याच दिवसांनी दिसलास माबोवर Happy फोटो मस्तच आहेत सगळे. पण जहाजावर गाडी बघण्याची अपेक्षा मात्र पूर्ण झाली नाही. Happy

सगळेच फोटोज खुप सुंदर Happy

मामे तुमाखमै Happy
पुण्यातल्या फिनिक्स मॉल मधली ट्रेन अगदी रॉयल दिसते पण Happy
माझ्याकडे आहे फोटो पण प्रताधिकार धोरणात बसत नाही त्यामुळे टाकता नाही येतेय Happy

गोव्याच्या दूधसागर धबधब्यावरून पण ट्रेन जाते ( वास्को-कॅसलरॉक-लोंढा लाईन ) मी त्याचा एक फोटो इथे पुर्वी टाकला होता.. आता गायब झालाय.

हो.हो. शाखा प्रेमी.. तोच तो चे.ए. वाला !

माधव, धन्यवाद! Happy हो, मायबोलीवर बर्‍याच दिवसांनी पोस्ट केले, रीड-ओन्ली मोडमध्ये अधूनमधून असतोच. Happy

ही घ्या इस्तंबूल (तुर्कस्थान) मधील ट्राम. मागे "हाजी सोफिया"/"आया सोफिया" दिसतेय. (http://en.wikipedia.org/wiki/Hagia_Sophia)

14300975717_a11c599fa1_z.jpg

मायबोलीवर अपलोड करताना क्वालिटी कमी होते. माझे मूळ चित्र इथे आहे, https://www.flickr.com/photos/35973140@N04/sets/72157644906196178/

Australia Train 1.JPGही घ्या ऑस्ट्रेलियातली कूगाडी. केन्स मध्ये त्या रेनफॉरेस्ट्ला जाताना/येतान एकवेळ केबलकार्/रोपवे घेउन आणि येताना ट्रेन मधून.

Pages