युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमा , कणिक फ्रीझमध्ये ठेवतानाच , शक्य असल्यास गोळे करून मोजुन ठेवा . उरलेले पीठ फ्रीझर्मध्ये टाका. टिकायला पाहिजे
>>>
याह गुड आयडीया....

फ्रीजमधे ठेवली कणीक की मला पोळ्या चांगल्या जमत नाहीत >> प्राजक्ता , का जमत नाही ते बघा .
कारण मी वर म्हटल्याप्रमाणे , कणकेला थोड पाणि सुटत . जर कणिक फार मउ झाल्यामुळे जमत नसतील तर अगोदरच थोडी घट्ट मळा. ( मलाही नाही जमत , सैल पीठाच्या. साबा थोडी सैल भिजवतात कणिक मग दूसर्यादिवशी ती आणखी मउ होते , मग सकाळी सकाळी कोरडे पीठ घालून परत दुरुस्त करायचा उपद्व्याप करावा लागतो . ( "कणिक सैल झालीय ? काल मी याच कणकेच्या केल्या होत्या " ईति साबा. ) .

किन्वा जर मावे असेल तर कणकेचे लहान गोळे करून ३०-४० से . डिफ्रॉस्ट करा , तेल लावून कणिक थोडीशी मळून घ्या व्यवस्थित होते .

फ्रीज मध्ल्या कणकेच्या पोळ्या थोड्या काळसर दिसतात माझ्या. शक्यतो ठेवत नाहीच त्यामुळे.
>>>
सेम हियर ...पण मी कणिक परत मळते जरा कारण माझ्याकडुन उरतेच.

माझ्याकडे ही २-३ दिवसांची कणिक मळलेली असते. पण ३ दिवसांपर्यंत ती काळी नक्कीच पडत नाही. चांगल्या डब्यात ठेवा. किंवा जाड प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवायची. मी नॉर्मली फ्रिजातून कणिक काढली आणि लग्गेच पोळ्या करायच्या असतील तर कणिक ३० सेकंद मावेत ठेवते, बर्‍यापैकी नॉर्मल ला येते कणिक.

उरलेली कणीक स्टीलच्या चपट्या डब्यात ठेवून तो डबा डीप फ्रीझरखालच्या ट्रेमध्ये ठेवावा.(फ्रीझरच तळाला असलेल्या फ्रीजमध्ये कुठे ठेवायचा याची कल्पना नाही). दुपारी मळलेली कणीक दुसर्‍या दिवशीच्या दुपारपर्यंत चांगली राहते. (तीन दिवस कधी ठेवलेला नाही Wink )

मी दोन ते तीन दिवसांची कणीक फ्रीझमध्ये मळून ठेवते. कणीक ठेवताना डब्यामध्ये पूर्ण भरलेली हवी आणि झाक्ण घट्ट हवं, मग कणीक काळी पडत नाही. जितक्या पोळ्या करायच्या असतील तितकीच कणीक बाहेर काढून घेते. वेळ असेल तर रूम टेम्पला येइपर्यंत ठेवते अन्यथा मायक्रोवेव्हमध्ये १० ते १५ सेकंद.

ओके

पूर्वी पोळीवाल्या आदल्य दिवशी दुसर्‍या दिवशीची कणीक मळून ठेवायच्या. मी सकाळी बाहेर काढायचे पण पोळ्या चांगल्या नाही होयच्या. आता वरील सर्व उपाय एकेक करून ट्राय करेन Happy , धन्यवाद सर्वांना Happy

कणीक फ्रीजमधून काढून पूर्ण नॉर्मलला आणून मग परत फ्रीजमधे ठेवली आणि पुढल्या वेळेला परत त्याच कणकेच्या पोळ्या केल्या तर त्या काळपट होतात. त्या पोळ्यांना एक प्रकारचा वेगळाच वासही येतो, जो खमंग नसतो.

फ्रिजमधली कणीक असेल, तर पोळ्या करण्यापूर्वी तेलाचा हात लावून पुन्हा भरपूर मळून घ्यायची. म्हणजे तिचा सैलसरपणा जातो, कणकेचा गोळा जरा आळल्यासारखा होतो, पोळ्या नीट लाटता येतात आणि काळसरही दिसत नाहीत.

मंडळींनो मी खव्याचे मोदक करायला घेतले आहेत. खवा, साखर गॅसवरून उतरवल्यावर थंड करत ठेवले पण त्याला मऊ टेक्चर नाही आलेय. खरबरीत झालेय. त्याचे मोदक नाही बहुतेक होणार असं वाटतंय. मिक्सरमधून काढू का हे मिश्रण? का खूप चिकटेल भांड्यात. प्लीज सुचवा. प्रसादासाठी घेऊन जाणार आहे. Uhoh

कॉर्नफ्लोर चिमटीत घेऊन पहा.. थोडेसे करकरीत लागेल..
तेच जर मैदा घेऊन चिमटीत घासून पाहिले तर जरा मऊसर लागेल..

हा आपला ढोबळ फरक बरंका..

बासमती भात मी शक्यतो कुकरमधे न शिजवता बाहेर शिजवते. दुपटीपेक्षा कमी पाणी, किंचित मीठ, पाव चमचा तूप किंवा बटर घालून मोकळ्या पातेल्यात शिजवावा. शिजल्यावर झाकण ठेवू नये. लगेच परातीत मोकळा करुन घ्यावा आणि काट्याने हलवावा, वाफ धरु नये म्हणून. छान सुटा, मोकळा शोजतो बासमती अशाने.

धन्यवाद शर्मिला, अरुंधती !

करते प्रयत्न. मागाच्या वेळेस मी भात तसाच पातेल्यात ठेवल्याने गिच्च झाला बहुतेक.

चारूता

मोकळा भात करायच्या २-३ टीप्स आहेत.
१. तांदूळ धून निथळून ३० मिनीते तरी ठेव
२ तुप गरम करून त्यात तांदूळ २-३ मिनीते परतून घे.
३. मग त्यात दुप्पट उकळते पाणी घाल. आच मोठी ठेव. शीत शिजत आले की आच बारीक करून झाकण ठेवून शिजव

पाहुण्यांची कोकम सरबताची फर्माईश आहे. मागच्या वर्षी कोकम सरबताचा कॅन होता त्यामुळे चालून गेले, यावर्षी फक्त आमसुलं आहेत. तर प्रश्न हा आहे की कोकम सरबत आई नेहेमी ताज्या कोकमापासूनच बनवायची. मी कधीच स्वतः बनवले नाहीये, फक्त पाहिलेय. तर आमसुलापासून बनवताना काय काय काळजी घ्यावी? प्रमाण सांगता आले तर अति उत्तम. आगाऊ धन्यवाद.

सध्या तरी, आमसुल रात्रभर भिजत घालीन आणि मग मिक्सरमधून फिरवीन. त्यात साखर टाकून संध्याकाळपर्यंत जे मिश्रण मुरेल त्याला गाळून घेऊन (आणि वाटल्यास ऐन वेळी मीठ-मिरेपूड टाकून) जे बनेल त्याला कोकम सरबत म्हणण्याचा विचार आहे. Wink

Cranberry juice/ concentrate Madhe chavi nusar meeth, sakhar aani bhajalelya jeeryachi pood ghatali ki uttam kokam sarabat banate Happy

भाजीसाठी आणलेला दुधी साल सोलतानाच जाड वाटतोय. टाकावा की दु.हलवा वगैरे होऊ शकेल?
गेले काही महिने कितीही कोवळा दिसणारा दूधी आणला तरी मेला अस्साच निघतोय (कोतबो)

अगं मोठ्या (लग्नात्ल्य भाज्यांच्या असायच्या आधी तशा) फोडी करुन कुकर ला लाव भाजी (फोडणी कुकर मधेच करुन मग फोडी टाकुन सरळ एक शीटी काढायची! पाणी घालायचं नाही!)
.. नाही तर कोफ्ता करी कर!

साल सोलण्याने काढ, बारीक फोडी कर.. कुकरमधे फोडणीला जिरं, मोहरी, कढीपत्ता, हळद, लसुन खोबरं अन वाटलेली मिरची टाकुन भोपळा टाक.. ३-४ मिन परतुन घे.. मग त्यात भिजवलेली मुगडाळ घाल. थोडं पाणी घालुन २ शिट्ट्या कर.. अन लगेच गॅस बंद कर... कसाही भोपळा असला तरी मस्त होतो.. लसुन भरपुर घालायचा

अन असा नाही आवडला तर सरल मिक्सर मधुन काढायचा.. कणीन अन बेसन पीठ घालायचं.. भरपुर कोथिंबीर, भरपुर ओवा, लाल तिखट, मीठ अन याचे पराठे करायचे.. हे तर नक्कीच मस्त होतात

Pages