मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू -६४ कलांचा कलाकार! " २९ ऑगस्ट

Submitted by संयोजक on 25 August, 2014 - 10:38

गणपती बाप्पा मोरया!
१४ विद्या ६४ कलांचा अधिनायक असा गणपती बाप्पा आणि हा त्याचाच उत्सव! त्याला वंदन करून झब्बूच्या ह्या खेळाची सुरुवात करूया. ६४ कलांपैकी एखाद्या कलेचे सादरीकरण दर्शवणारी प्रकाशचित्रे देणे इथे अपेक्षित आहे. उदा. नृत्य करणारी नृत्यांगना, गाणारी गायिका, मूर्तीकाम करणारा कुंभार. अर्थात ६४ कलांपैकी सर्वच कला प्रकाशचित्रांद्वारे दाखवणे शक्य नाही ह्याची जाणीव आहेच, त्यामुळे जे शक्य आहे त्याची प्रकाशचित्रे द्यावीत.

संदर्भासाठी ६४ कलांची यादी शेवटी देतो आहोत.

चला, तर मग सुरुवात करूया खेळायला -

त्याआधी हे वाचून घ्या :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. एका प्रकाशचित्रामध्ये एकच कला आली पाहिजे.
३. दोन सलग पोस्टींमध्ये एकाच कलेची पुनरावृत्ती नसावी.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

संदर्भ- ६४ कला खालीलप्रमाणे-
१. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा व पेय तयार करणे.
२. धातुवद- धातू वेगळे करणे.
३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान - खाणींविषयी सखोल ज्ञान असणे.
५. वृक्षायुर्वेद योग- वाटिका, उद्याने तयार करणे.
६. पट्टिका वेत्रवाणकल्प- वेत वगैरेनी खाट विणणे.
७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९. वैजापिकी विद्याज्ञान- विजय मिळविणे.
१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे
११. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- स्वयंपाक करणे.
१५. पुस्तकवाचन- पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७. कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला सुंदर बनविणे.
१८. हस्तलाघव- हस्तकौशल्यादी कलेची कामे करणे.
१९. प्रहेलिका - उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०. प्रतिमाला - अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१. काव्यसमस्यापूर्ती - काव्य पूर्ण करणे.
२२. भाषाज्ञान - देशी-विदेशी भाषांचे ज्ञान असणे.
२३. चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे.
२४. कायाकल्प - वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५. माल्यग्रंथ विकल्प - वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
२६. गंधयुक्ती - सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७. यंत्रमातृका - यंत्रांची निर्मिती करणे.
२८. अत्तर विकल्प - फुलांपासून अत्तरे बनविणे.
२९. संपाठय़ - दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०. धारण मातृका - स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१. छलीक योग- चलाखी करून फसविणे.
३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३. मणिभूमिका - जमिनीवर मण्यांची रचना करणे.
३४. द्यूतक्रीडा - जुगार खेळणे.
३५. पुष्पशकटिका निमित्त ज्ञान - प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्यकथन करणे.
३६. माल्यग्रथन - वेण्या, हार, गजरे बनविणे.
३७. मणिरागज्ञान - रंगावरून रत्नांची पारख करणे.
३८. मेषकुक्कुटलावक - युद्धविधी- प्राण्यांच्या (बोकड, कोंबडा इ.) झुंजी लावणे.
३९. विशेषकच्छेद ज्ञान - कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे बनवणे.
४०. क्रिया विकल्प - वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१. मानसी काव्यक्रिया - शीघ्र कविता करणे.
४२. आभूषण भोजन - सोन्या-चांदी किंवा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३. केशशेखर पीड ज्ञान - मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४. नृत्यज्ञान - नृत्याबद्दल शास्त्रोक्त ज्ञान असणे.
४५. गीतज्ञान - गायनाबद्दल शास्त्रीय ज्ञान असणे.
४६. तंडुल कुसुमावली विकार - तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७. केशमार्जन कौशल्य - डोक्याला तेलाने मालीश करणे.
४८. उत्सादन क्रिया - अंगाला तेलाने मालीश करणे.
४९. कर्णपत्र भंग - पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०. नेपथ्य योग - ऋतुकालानुसार वस्त्रालंकार निवडणे.
५१. उदकघात - जलविहार करणे.
५२. उदकवाद्य - जलतरंग वादन.
५३. शयनरचना - मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४. चित्रकला - नक्षी, वेलबुट्टी व चित्रे काढणे.
५५. पुष्पास्तरण - फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६. नाटय़अख्यायिका दर्शन - नाटकांत अभिनय करणे.
५७. दशनवसनांगरात - दात, वस्त्रे, काया रंगविणे.
५८. तुर्ककर्म - चरखा व टकळीने सूत काढणे.
५९. इंद्रजाल - गारुडविद्या व जादूटोणा यांबद्दल ज्ञान असणे.
६०. तक्षणकर्म - लाकडावर कोरीवकाम करणे.
६१. अक्षर मुष्टिका कथन - करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२. सूत्र तथा सूचीकर्म - वस्त्राला रफू करणे.
६३. म्लेंछीतकला विकल्प - परकीय भाषांबद्दलचे ज्ञान.
६४. रत्नरौप्य परीक्षा - अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.

उदाहरणार्थ :-

कलेचे नाव : हस्तलाघव- हस्तकौशल्यादी कलेची कामे करणे.
IMG_6665 copy.jpg

प्रचिश्रेय साभार - जिप्सी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उप्स यंत्रमातृकाच होती का आधीचीही पोस्ट.. नवीन पेज वर आल्याने चेकायचे राहिले आणि दोन सलग पोस्टींमध्ये एकाच कलेची पुनरावृत्ती नसावी हा नियम मोडला गेला .. काही हरकत नाही, मी हरलो Wink

नमस्कार!
अतिशय रंगत चाललेला हा झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. इथून पुढे नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

@स्वाती, <<एखाद्या कलेचे सादरीकरण दर्शवणारी प्रकाशचित्रे>> यात एखादी कला सादर करणारा कलाकारही येऊ शकतो उदा. गायन किंवा एखादी पूर्ण झालेली कलाकृतीही येऊ शकते उदा. शिल्प.

तेव्हा उत्साही मायबोलीकरांनो, खेळ असाच पुढे चालू ठेवा. Happy

धन्यवाद, संयोजक. Happy
या निमित्ताने ६४ कला कुठल्या ते कळलं - त्यासाठी तुमचे आभार. Happy

हस्तलाघव- हस्तकौशल्यादी कलेची कामे करणे :

carving.jpg

>>पुष्पशकटिका निमित्त ज्ञान - प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्यकथन करणे> हे बरोबर आहे का? शकटिका म्हणजे >>गाडी.( जसे मृच्छकटिकम् म्हणजे मातीच्या गाड्याची गोष्ट )
>>
>>इथे पाहिले तर पुष्पशकटिका आणि निमित्त ज्ञान, या दोन वेगवेगळ्या कला आहेत असे दिसते. (जयमंगल ४८-४९)

लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
पुष्पशकटिका कला आणि निमित्तज्ञान कला ह्या दोन वेगळ्या असाव्यात असेच वाटते आहे.
आम्ही दिलेली सूची पुन्हा तपासून योग्य तो बदल लवकरच करू.

४४. नृत्यज्ञान - नृत्याबद्दल शास्त्रोक्त ज्ञान असणे.

हे आस्ताद देबू आहेत. दुबेजींच्या पहिल्या पुण्यतिथीला पृथ्वी कॉर्नरला काही लोक जमले होते. त्यात आस्ताद देबूही होते. दुबेंजीच्या आठवणीप्रित्यर्थ त्यांनी एक impromptu(मराठी शब्द?) नृत्याविष्कार केला. पृथ्वी कॉर्नरच्या कंपाऊंडची भिंत, कठडा सगळे त्यांचे स्टेज होते.

Aastad-deboo.jpg

नी, परेफेक्ट फोटो Happy

वृक्षायुर्वेद योग- वाटिका, उद्याने तयार करणे.

आमराई आणि त्यामधली खूप जुनी विहीर. Happy

रीया, देवकी, धन्यवाद!

बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.

anghol.jpg

नी, हा तू टाकलेल्या नृत्याविष्काराला झब्बू. Happy भरतनाट्यमच्या ८१ मुद्रा ९ हातांनी दाखवणारे भोलेनाथ.

badami4.jpg

तंडुल कुसुमावली विकार - तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.

ही रांगोळी नवरात्रीत तांदूळ व डाळी वापरुन ऑफिसात काढली होती. दृष्टीदान ही सन्कल्पना होती.

2013-10-09 16.23.24.jpg

Pages