गणपती बाप्पा मोरया!
१४ विद्या ६४ कलांचा अधिनायक असा गणपती बाप्पा आणि हा त्याचाच उत्सव! त्याला वंदन करून झब्बूच्या ह्या खेळाची सुरुवात करूया. ६४ कलांपैकी एखाद्या कलेचे सादरीकरण दर्शवणारी प्रकाशचित्रे देणे इथे अपेक्षित आहे. उदा. नृत्य करणारी नृत्यांगना, गाणारी गायिका, मूर्तीकाम करणारा कुंभार. अर्थात ६४ कलांपैकी सर्वच कला प्रकाशचित्रांद्वारे दाखवणे शक्य नाही ह्याची जाणीव आहेच, त्यामुळे जे शक्य आहे त्याची प्रकाशचित्रे द्यावीत.
संदर्भासाठी ६४ कलांची यादी शेवटी देतो आहोत.
चला, तर मग सुरुवात करूया खेळायला -
त्याआधी हे वाचून घ्या :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. एका प्रकाशचित्रामध्ये एकच कला आली पाहिजे.
३. दोन सलग पोस्टींमध्ये एकाच कलेची पुनरावृत्ती नसावी.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
संदर्भ- ६४ कला खालीलप्रमाणे-
१. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा व पेय तयार करणे.
२. धातुवद- धातू वेगळे करणे.
३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान - खाणींविषयी सखोल ज्ञान असणे.
५. वृक्षायुर्वेद योग- वाटिका, उद्याने तयार करणे.
६. पट्टिका वेत्रवाणकल्प- वेत वगैरेनी खाट विणणे.
७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९. वैजापिकी विद्याज्ञान- विजय मिळविणे.
१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे
११. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- स्वयंपाक करणे.
१५. पुस्तकवाचन- पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७. कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला सुंदर बनविणे.
१८. हस्तलाघव- हस्तकौशल्यादी कलेची कामे करणे.
१९. प्रहेलिका - उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०. प्रतिमाला - अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१. काव्यसमस्यापूर्ती - काव्य पूर्ण करणे.
२२. भाषाज्ञान - देशी-विदेशी भाषांचे ज्ञान असणे.
२३. चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे.
२४. कायाकल्प - वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५. माल्यग्रंथ विकल्प - वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
२६. गंधयुक्ती - सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७. यंत्रमातृका - यंत्रांची निर्मिती करणे.
२८. अत्तर विकल्प - फुलांपासून अत्तरे बनविणे.
२९. संपाठय़ - दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०. धारण मातृका - स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१. छलीक योग- चलाखी करून फसविणे.
३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३. मणिभूमिका - जमिनीवर मण्यांची रचना करणे.
३४. द्यूतक्रीडा - जुगार खेळणे.
३५. पुष्पशकटिका निमित्त ज्ञान - प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्यकथन करणे.
३६. माल्यग्रथन - वेण्या, हार, गजरे बनविणे.
३७. मणिरागज्ञान - रंगावरून रत्नांची पारख करणे.
३८. मेषकुक्कुटलावक - युद्धविधी- प्राण्यांच्या (बोकड, कोंबडा इ.) झुंजी लावणे.
३९. विशेषकच्छेद ज्ञान - कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे बनवणे.
४०. क्रिया विकल्प - वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१. मानसी काव्यक्रिया - शीघ्र कविता करणे.
४२. आभूषण भोजन - सोन्या-चांदी किंवा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३. केशशेखर पीड ज्ञान - मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४. नृत्यज्ञान - नृत्याबद्दल शास्त्रोक्त ज्ञान असणे.
४५. गीतज्ञान - गायनाबद्दल शास्त्रीय ज्ञान असणे.
४६. तंडुल कुसुमावली विकार - तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७. केशमार्जन कौशल्य - डोक्याला तेलाने मालीश करणे.
४८. उत्सादन क्रिया - अंगाला तेलाने मालीश करणे.
४९. कर्णपत्र भंग - पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०. नेपथ्य योग - ऋतुकालानुसार वस्त्रालंकार निवडणे.
५१. उदकघात - जलविहार करणे.
५२. उदकवाद्य - जलतरंग वादन.
५३. शयनरचना - मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४. चित्रकला - नक्षी, वेलबुट्टी व चित्रे काढणे.
५५. पुष्पास्तरण - फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६. नाटय़अख्यायिका दर्शन - नाटकांत अभिनय करणे.
५७. दशनवसनांगरात - दात, वस्त्रे, काया रंगविणे.
५८. तुर्ककर्म - चरखा व टकळीने सूत काढणे.
५९. इंद्रजाल - गारुडविद्या व जादूटोणा यांबद्दल ज्ञान असणे.
६०. तक्षणकर्म - लाकडावर कोरीवकाम करणे.
६१. अक्षर मुष्टिका कथन - करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२. सूत्र तथा सूचीकर्म - वस्त्राला रफू करणे.
६३. म्लेंछीतकला विकल्प - परकीय भाषांबद्दलचे ज्ञान.
६४. रत्नरौप्य परीक्षा - अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.
उदाहरणार्थ :-
कलेचे नाव : हस्तलाघव- हस्तकौशल्यादी कलेची कामे करणे.
प्रचिश्रेय साभार - जिप्सी
हे लै भारी आहे. ६४ कला कळल्या
हे लै भारी आहे. ६४ कला कळल्या त्या निमित्ताने.
गुड वन संयोजक ! अफाट कल्पना आहे.
५१. उदकघात - जलविहार करणे.
५१. उदकघात - जलविहार करणे.
नाटय़अख्यायिका दर्शन -
नाटय़अख्यायिका दर्शन - नाटकांत अभिनय करणे.
१३. बालक्रीडाकर्म- लहान
१३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
५१. उदकघात - जलविहार करणे.
५१. उदकघात - जलविहार करणे.
लले, त्या चित्रात नक्की लहान
लले, त्या चित्रात नक्की लहान कोण आहे?
आदी मोठा वाटतोय..
आदी मोठा वाटतोय..
चित्रशब्दापूपभक्षविपाक
चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- स्वयंपाक करणे
"चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया" याचा उच्चार करतानाच दम लागला.
गीतज्ञान - गायनाबद्दल
गीतज्ञान - गायनाबद्दल शास्त्रीय ज्ञान असणे.
मी सध्या शास्त्रीय संगीताची विशारद प्रथम परीक्षेचा अभ्यास करत आहे
कॉलनीत झालेला पाउसगाणी कार्यक्रम
चित्रयोग - चित्रे काढून
चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे
संयोजक यामध्ये स्वतःच प्रचि
संयोजक यामध्ये स्वतःच प्रचि चालेल का? >> हो, तुम्ही स्वत:ची परवानगी घेतली असेल तर!
-संयोजक मंडळाच्या वतीने
घेतली परवानगी आणि डकवलय...
घेतली परवानगी आणि डकवलय... गीतज्ञान मध्ये... बघितल का?
५. वृक्षायुर्वेद योग- वाटिका,
५. वृक्षायुर्वेद योग- वाटिका, उद्याने तयार करणे.
चित्रयोग - चित्रे काढून
चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे.
१८. हस्तलाघव- हस्तकौशल्यादी
१८. हस्तलाघव- हस्तकौशल्यादी कलेची कामे करणे.
(२३. चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे.)
५७. दशनवसनांगरात - दात, वस्त्रे, काया रंगविणे.
कंसातली कला वाचू नका. आधीच्या झब्बूमधे आलीये..
या तिन्हींमधे मिळून कुठेतरी ही कला बसेल असे वाटतेय. अगदी बेसिक प्रकारचा प्रोस्थेटिक मेकप. मेकपच्या वर्कशॉप्समधे हा डेमो देते विद्यार्थ्यांना. ४-५ वर्षापूर्वी एका वर्कशॉपमधे फोटोही काढला होता.
चित्रशब्दापूपभक्षविपाक
चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- स्वयंपाक करणे
जिप्सीना अनुमोदन, वरील शब्दाचा उच्चार करताना नाकात दम आला.
३६. माल्यग्रथन - वेण्या, हार,
३६. माल्यग्रथन - वेण्या, हार, गजरे बनविणे
अत्तर विकल्प : मला ह्या बद्दल
अत्तर विकल्प : मला ह्या बद्दल फोटो काय टाकू असा विचार पडला होता पण एबीपी माझा ने अगदी वेळेवर ह्याच थीमवर आमच्या कामासंबंधाने एक छोटीशी मुलाखत घेतली आहे. यूट्यूब लिंक आहे. आपल्या नियमात बसत नसेल तर उडवा पण एकदा बघून घ्या.
https://www.youtube.com/watch?v=qfVlqa2SLos
चॅनेलने येथील वाचूनच कलांची थीम घेतली काय असे वाट्ते आहे.
मस्त खेळ संयोजक. माहितीत
मस्त खेळ संयोजक. माहितीत भर.
सुंदर प्रचि . सर्वच.
५१. उदकघात - जलविहार करणे.
५१. उदकघात - जलविहार करणे.
अश्विनी मला तुझ्याकडच्या
अश्विनी मला तुझ्याकडच्या चरख्याचा फोटो बघायचा होता तो ह्या निमित्ताने बघायला मिळाला.
संयोजक, खूपच छान उपक्रम. ह्या निमित्ताने माबोकरांच्या ६४ कला बघायला मिळत आहेत. खूप धन्यवाद.
१८. हस्तलाघव
१८. हस्तलाघव
३७. मणिरागज्ञान - रंगावरून
३७. मणिरागज्ञान - रंगावरून रत्नांची पारख करणे.( प्रयत्न आहे )
नेटवरचे फोटो प्लीज टाकू नका
नेटवरचे फोटो प्लीज टाकू नका
नृत्यकला
वास्तुविद्या- महाल, भवन,
वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
रामोजी फिल्म सिटी - हैदराबाद येथील महालाचा सेट
१३. बालक्रीडाकर्म - लहान
१३. बालक्रीडाकर्म - लहान मुलांचे मनोरंजन करणे
४४. नृत्यज्ञान - नृत्याबद्दल
४४. नृत्यज्ञान - नृत्याबद्दल शास्त्रोक्त ज्ञान असणे
नंदिनी, तुझ्या फोटोतली
नंदिनी, तुझ्या फोटोतली नर्तिका म्हणजे 'मंजुलिका' आहे अगदी...
आशुतोष, गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेतला फोटो आहे का हा?
१८. हस्तलाघव
१८. हस्तलाघव
माल्यग्रंथ विकल्प ( वस्त्र
माल्यग्रंथ विकल्प ( वस्त्र प्रावरणांची योग्य निवड करणे ) साध्या भाषेत साड्या खरेदी
Pages