रामायण घरात वाचावे, महाभारत देवळात वाचावे

Submitted by जागोमोहनप्यारे on 24 September, 2011 - 06:44

रामायण घरात वाचावे, महाभारत देवळात वाचावे ( घरात वाचू नये) असे म्हणतात ते खरे आहे का?

आरण्यकही घरात वाचू नये असे म्हणतात.

महाभारत घरात वाचायचे नसते हे खरे असेल तर मग गीताही घरात वाचता येणार नाही ना? Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे बघा जामोप्या, सध्या मी गजानन महाराजान्ची पोथीच तेव्हडि घरात वाचतोय! परवाच गुरुपुष्यामृताच्या दिवशी लिम्बीने एका दिवसात वाचून काढली.
रामायण महाभारता बाबत असे काहीही नाहीये. मात्र "अरण्यक" घरात वाचू नये, (अशा अर्थाचा उल्लेख सावरकर चरित्रातही कुठेतरी आहे असे पुसटसे आठवते)
मला वाटते की असे आक्षेप, मागे नै का एक बीबी निघालाय की "राक्षस मारण्याच्या हिन्दु पौराणीक कथा लहान मुलान्ना कशा काय ऐकवाव्या? त्याने "हिन्सेची" भलामण होत नाहीका? बालमनावर काय परिणाम होईल? वगैरे वगैरे" चिन्तेने पीडलेल्या लोकान्च्या सुपिक मेन्दूतुन वरील बन्द्या आल्या असाव्यात! तर असो.
अरण्यक सोडले तर बाकि कशालाही असे बन्धन शास्त्रानुसार माझ्या माहितीत तरी नाहीये.
हां, दाह सन्स्कार व दहाव्व्यापर्यन्तचे स्मशानातिल विधी स्मशानातच करावेत, किमान घराच्या बाहेर करावेत असेही बन्धन आहे. (पाळाच असा काही माझा आग्रह नै बरका.... ) मात्र दाहसन्स्कारासहित दहाव्यापर्यन्तचे विधी शिकताना मात्र त्या मन्त्रान्ची सन्था घरातही घेता येते.

तसेच, भरल्या घरात कुणाला उद्देशुन अशुभ/शापास्पद बोलू नये, वास्तु "तथास्तु" म्हणत असते असेही मानले जाते. (मानले जाते कारण तद्वत घटनान्चा पडताळा येत असतो/आलेला असतो)

जामोप्या,
तुमच्या चरणकमलांचा फोटो पक्षि प्रचि म्हणजेच प्रकाशचित्र (जुन्या मराठीत छायाचित्र) कुठे मिळेल हो?
ई मेल केलेत तर बरे होईल.
सकाळ संध्याकाळ दर्शन घेउन नवनवोन्मेषाची उर्मी येईल असे वाटते.
इतक्या जहाल आयडिया कुठे मिळतात हो बाफ च्या विषयांच्या तुम्हाला?

>>> इतक्या जहाल आयडिया कुठे मिळतात हो बाफ च्या विषयांच्या तुम्हाला? <<<<
सोप्प हे, तुम्हाला पण मिळतील, त्याकरता कुणाच्या चरणकमलान्चे दर्शन घ्यायला नको.
आसपास फिरुन बघा, बरेच खोडसाळ बुप्रा भेटतील, (खोडसाळ बुप्रा किन्वा मूळातच बुप्रा ओळखायचा कसा त्यावर स्वतन्त्र बीबी जामोप्याला काढायला सान्गू Proud ) त्यान्चे सन्गतीत बर्‍याच कल्पना मिळतील.
ब्रिगेडी लोकान्ची सन्गत धरलीत तर अक्षरषः हजारोन्च्या सन्ख्येने आयडीया मिळतील. हिन्दू धर्मिय वान्ङमयाचे वाचन अभ्यासाकरता आजवर हिन्दून्नीदेखिल केले नसेल, इतके त्यातिल प्रत्येक वाक्याचे उभेआडवेजोडूनतोडुन सन्दर्भ घेत त्याची चिरफाड व चिकित्सा या लोकान्नी करुन ठेवलीये, त्यातले कोणतेही उदाहरण उचललेत तरी त्यान्ना चालेल, विदाऊट कॉपीराईट! Wink
कुठल्याही मिशनर्‍याला गाठा, तो तुम्हाला अशाच प्रकारे भरपुर उदाहरणे देऊ शकेल.
हे जमत नसेल तर गेलाबाजार समाजवादी गाठा.
थोडे धारिष्ट्य असेल तर नक्षलवादी गाठलेत तर तुमच्यातच आमुलाग्र बदल होऊ शकेल व तुम्हालाच अनेकानेक कल्पना सुचू शकतील
बघा बोवा. काहीही करा वरील पैकी, पण बिचार्‍या त्या जामोप्याची चरणकमले धरुन त्याचा बुवा नका बुवा करू! Proud

रामायण घरात वाचावे, महाभारत देवळात वाचावे ( घरात वाचू नये) असे म्हणतात ते खरे आहे का?
---- फक्त रस्त्यावर फतकल मारुन (दुसर्‍याला त्रास नको म्हणुन) वाचू नये Happy .... बाकी घरांत, मंदिरात वाचले तर हरकत नसावी.

>>> फक्त रस्त्यावर फतकल मारुन (दुसर्‍याला त्रास नको म्हणुन) वाचू नये <<<
असं कस?
'ते' नाहीत का प्रार्थना करीत रस्त्यावर?
आपणही धार्मिक कारणांनी रस्ते बंद केलेच पाहिजेत! जितकी आमची 'न्यूसंस व्हॅल्यू' जास्त तितके आम्ही ग्रेट! असा नवा हिशेब आहे साहेबा

मी जे लिहतो आहे हे सगळे ऐकीव विचार आहेत. याच्यात विरोधाभास असु शकतो सबब वाचणार्‍यांनी फक्त वाचावेत. शाब्दीक किस काढु नये हि विनंती. नितीनचंद्र उर्फ नितीन गोपाळ जोगळेकर ही एक जुन्या बुरसटलेल्या विचारांची व्यक्ती समजुन पुरोगामी विचारांच्या मंडळीनी माफी द्यावी.

रामायण ही त्यागाची परिसीमा आहे. घरा घरात हा आदर्श घेतला जावा या अर्थाने रामायण वाचावे.

महाभारत हा सुडाचा प्रवास आहे असे एका लेखकाचे मत आहे. यात मानवी प्रवृत्तीची परिसीमा आहे.

सामान्य माणसांच्या अनुभवात बोलायचे झाले तर याच्या वाचनाने घरात भांडणे होतात असे मानले जाते. म्हणुन घरात वाचु नये हा नियम नसला तरी प्रथा आहे.

महाभारताचे ते चित्र घरी लाऊ नये असेसुध्दा म्हणतात..
माझ्या माहितीमधील कांही लोकांनी लावलेले चित्र काढून टाकले.. Sad

हो, महाभारताचे युद्धाचे चित्र लाऊ नये असे म्हणतात.
आमच्या ओळखीतल्या एका जोडप्याकडे श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देतानाचे युद्धभूमीवरचे चित्र होते.
त्यांचा यावर विश्वास नसल्याने ते त्यांना चारचौघांनी सहज सांगूनही काढले नाही. पुढे ते जोडपे अपघातात एकत्रच गेले. मुले पाठीशी सोडून. Sad

त्या जोडप्याने मृत्युषडाष्टक योग असूनही लग्न केले होते. ते देखील प्रेमविवाह नाही तर अरेंज मॅरेज (स्ट्रेंज ना) .. तर हे देखील एक कारण असू शकते.

अर्थात हि दोन्ही कारणे यावर विश्वास ठेवणार्‍यांसाठीच दिलेली आहेत. माझा स्वताचा यावर विश्वास नाही हे देखील नमूद करू इच्छितो. Happy

>>रामायण ही त्यागाची परिसीमा आहे. घरा घरात हा आदर्श घेतला जावा या अर्थाने रामायण वाचावे.

महाभारत हा सुडाचा प्रवास आहे असे एका लेखकाचे मत आहे. यात मानवी प्रवृत्तीची परिसीमा आहे.<<
सहमत आहे. नाही तर घराचे महाभारत व्हायचे ही भीती त्यात असते.
मी लहानपणी दोन्ही ग्रंथ मारुतीच्या देवळात भक्तीभावाने ऐकायचो.तपस्वी गुरुजी रंगवून सांगायचे.

>>मी लहानपणी दोन्ही ग्रंथ मारुतीच्या देवळात भक्तीभावाने ऐकायचो.तपस्वी गुरुजी रंगवून सांगायचे. Happy
मारूतीने महाभारत ऐकून काय विचार केला असेल मनात राम जाणे ? Wink

रामायण महाभारत हे निर्बुद्ध हतबुद्ध पुरुष आणि लबाड घमेंडी बाया यांनी भरलेले आहे.

त्याएक्षा हिंदु पुरुष मोघल बादशांचा इतिहास वाचतील अणि हिंदु बाया मोघल बेगमाच्यागत काव्य भाशा राजकारण व्यवसाय कुटुंबसुख अशा चतुरस्त्र पैलुंचा अभ्यास करतील तर देश जास्त पुढे जाईल.

.. जागो मोघल प्यारे

रामायण नि महाभारत हे अप्रतिम कलाकृती आहेत. हजारो वर्षे एखादी कलाकृती टिकणे हि मोठी गोष्ट आहे. रामायण, महाभारत घरात वाचा,प्रवासात वाचा कि देवळात वाचा त्याने मनोरंजनच होते.महाभारतातील युद्धाचा प्रसंगाचे चित्र घरात लावा किंवा कसलेही लावा त्याचा प्रभाव शुन्य असतो कारण ते केवळ कागदावर चित्रकाराने त्याच्या कल्पनेने रेखाटलेले चित्र असते. त्याचा आपल्या जीवनावर काडीचाही फरक पडत नाही. शिकलेल्या लोकातही एवढे अंधश्रद्धेचे प्रमाण पाहून त्यांची कीव येते.

गाड्गेबाबंसारखा अशिक्षित माणूस अंधश्रद्धेवर ज्या कठोरतेने प्रहर करतो तेव्हा एक बाब स्पष्ट होते व्यक्ती शिकली, चांगली नोकरी करतेय, मोठमोठ्या डिग्र्या मिळवतेय तरीही ती अडाणी आहे त्याच्या मेंदूतील आकलनशक्तीत सारासार विचार करण्याचा अभावच आहे.

गाड्गेबाबंसारखा अशिक्षित माणूस >>>> शालेय अभ्यासक्रमात ७-८ विषयांमध्ये १००-१०० पानांच्या पुस्तकांना वर्षभर रटायचे याला आपण शिक्षण म्हणतो, ज्याने त्या पुस्तकात लिहिलेय तेवढेच ज्ञान मिळते (अर्थात ते देखील आपली घेण्याची किती कुवत आहे त्यावरच ठरते), पण अक्कल येत नाही, ती उपजतच असावी लागते. अन ज्यांच्याकडे ती नसते त्यांच्यासमोर कितीही डोके आपटले तरी काही फरक पडत नाही, हे उमगण्याला शहाणपण असे म्हणतात.

असो, माझी वरील पोस्ट फक्त शिक्षित-अशिक्षित मुद्द्यासाठी मर्यादीत आहे, धाग्याचा विषय महाभारताचे घरातील वाचन हि श्रद्धा आहे कि अंधश्रद्धा या वादात मला पडायचे नाहीये.

मात्र "अरण्यक" घरात वाचू नये >>>
अरण्यक काय आहे ? ते का वाचायचं नाही घरात ? गुगलून झालंय. पण नीट माहिती मिळाली नाही .

अहो काही लोक काहीही न वाचता घरात एकमेकासन्गे भान्डतच असतात की. आता दारु पिऊन येणारा नवरा ( जो कुठेतरी रोजन्दारीवर काम करतो) आणी कामवाली त्याची बायको, हे काय रामायण्,महाभारत, अरण्यक वाचुन, त्याचे फोटु झोपडीत लावुन भान्डतात काय?

I have a doubt, serious (I know this might not be the right BB to raise it, but still ...) people who don't believe in the God, what do they say while visiting the family where someone is expired? Also when in serious difficult situation whom do they look for? Thanks in advance.

what do they say while visiting the family where someone is expired? >> प्रश्न कळला नाही. म्हणजे 'ईश्वर मृतात्म्यास शांती देवो', असं काही म्हणतात का? किवा अशा अर्थाचं काय म्हणतांत असा प्रश्न आहे कां??

Devaachaa ullekha karataata kaa? Nahee, ase uttar asalyaas kaay bolataa mag? Ho ase uttar asalyaas ka?

>>>> Devaachaa ullekha karataata kaa? <<<< चूकूनही नाही.

>>>> Nahee, ase uttar asalyaas kaay bolataa mag? <<<< "दु:खात सहभागी आहोत" इत्यादीच बोलतात. (फार फार तर "ऋणं कृत्वा घृतं पिबेत" या वचनावर विश्वास असल्याने, गचकलेल्याने काही ऋण वगैरे करून मागे ठेवलय का याची मात्र आडून आडून चौकशी करतात... Proud )

>>>> Ho ase uttar asalyaas ka? <<<< हा प्रश्न लागू पडत नाही. उलट मृताचे नातेवाईकांन्ना कसल्याही, "खास करुन हिंदू धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे" दाह संस्कार करूच नका, बामणांच्या जेवणावळी उठवु नका, कावळ्यांना पिंड घालू नका, नदीत काही सोडू नका, त्या ऐवजी गोरगरीबांना अन्नदान करा वगैरे अनेक बाबींची पिल्ले सोडतात. (हे मी प्रत्यक्षात अनुभवलय).

पण एकदा माझा एक नातेवाईक फारच कोक्या अन खमक्या निघाला. त्याने जिथल्या तिथे असे सांगणार्‍याला तडकावले की "कायरे भोXXX x, असले "गोरगरिबांन्ना वगैरे" दानधर्म करता यावेत म्हणून हा गचकलाय का? ते एरवीही करता येतात अन् करतो आम्ही. तुम्ही हिंदू धार्मिक रिवाज पाळत नसाल तर नका पाळू, पण आमच्या रितींमधे नाक नका खुपसू."

>>> मग कावळ्याना पिंड गिळता यावा यासाठी तो गचकला होता का ? <<< नाही.
पण आमच्यात कोणी गचकले, की काऊंना (कावळ्यांना) जरुर आवतण असते पिंड खाण्याचे... ! Proud

दाह संस्कार करूच नका, बामणांच्या जेवणावळी उठवु नका, कावळ्यांना पिंड घालू नका, नदीत काही सोडू नका, त्या ऐवजी गोरगरीबांना अन्नदान करा वगैरे अनेक बाबींची पिल्ले सोडतात.>> हे सर्व मी माझ्या वडिलांच्या वेळेस केलेल आहे.

>>>> हे सर्व मी माझ्या वडिलांच्या वेळेस केलेल आहे. <<<< देहदान केला असल्यास ("दाह संस्कार करूच नका") असे करता येणे शक्य आहे.
याव्यतिरिक्त इलेक्ट्रिक भट्टी वगैरे असते मोठ्या शहरातून, तिथेही "संस्कार" वगैरे टाळता येतात.
बाकी संस्कारासहित करा वा बिनासंस्काराचे, कोकणात भरपावसाळ्यात प्रेत जाळायचे असेल, तर नगरपालिकाच जुने रबरी टायरट्यूब/रॉकेल-केरोसीन वगैरे ज्वलनासाठी वापरतात, गोवरी/लाकडे शास्त्रापुरती,.... अर्रर्रऽऽ चूकला शब्द... नावापुरती असतात असे म्हणायचेय.

Pages