रामायण घरात वाचावे, महाभारत देवळात वाचावे

Submitted by जागोमोहनप्यारे on 24 September, 2011 - 06:44

रामायण घरात वाचावे, महाभारत देवळात वाचावे ( घरात वाचू नये) असे म्हणतात ते खरे आहे का?

आरण्यकही घरात वाचू नये असे म्हणतात.

महाभारत घरात वाचायचे नसते हे खरे असेल तर मग गीताही घरात वाचता येणार नाही ना? Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक प्रश्न आहे. रामायणातील उत्तरकांड हे खरोखरीच स्वतः वाल्मिकींनी लिहिले आहे काय?(या धाग्यावर कमी प्रतिसाद आहेत. तेव्हा दुसरा धागा काढण्यापेक्षा इथेच विचारले.)
लॉकडाउननिमित्त रामानंद सागर यांची जुनी(1987-88) मधली मालिका पुन्हा दाखवत आहेत. त्याच कलाकारांना घेऊन त्यांनी उत्तर रामायण मालिका काढली. ती you tube वर आहे.
सीतात्याग आणि शंबूकवध इत्यादींची सत्यता जाणून घ्यायची आहे. कोणी मूळ वाल्मिकिकृत रामायण अभ्यासले आहे काय?

परत रामायण वाचायला हवं. वाल्मिकी रामायण आहे घरी.
उत्तर रामायण वाल्मिकींनी लिहीले नव्हते असः ऐकलंय.

Pages