लग्न ही लग्न जमलेल्या जोडप्यांसाठी खास बाब आहे.
एकदा लग्न निच्शित झालं की पुरुषांच्याही मनाला पंख फुटतात, दोघेही वेगळ्या विश्वात प्रवेशतात, खचितच त्यांना व्यावहारीक जगाचं भान उरते आणि ठरवुनही ते त्यामधुन बाहेर पडु शकत नाही.
पुरुषासारखा पुरुष हळवा बनतो, कंजुसही अगदि कर्ण होतो तिच्यासाठी.
त्याच्यामनाचे कधीहि समोर न आलेले नाजुक कंगोरे उलगडतात. नकळत तो तिला काय वाटेल, आत्ता तिच्या इथे असण्याने अजुन मजा येईल असे विचार करायला लागतो किंवा ती नसेल तर काही करायची इच्छाच उरत नाही.
शरीरातील प्रत्येक अणु-रेणु तिच्यासाठी जगु लागतो. आणि हे सगळं एका पवित्र भावनेन घडत त्यामधे वासनिकेतेचा लवलेशही नसतो. उलट नैतिकता उफाळुन येते उगिचच. करुणा, दया, श्रध्दा हे भाव मनात गर्दी करुन येतात. अशा वेळी मग मित्र-मैत्रिणिची साथ हवीहवीशी वाटु लागते.
दोघांचा संवाद मात्र सुरु असतो हं अबोलतेतुनच!!!
आणि बाकीच्यांना मात्र ते दोघेही हरवल्यासारखे भासतात खरतरं त्यांना शब्दापलिकडचेहि काही गवसलेले असते.
वैवाहिक जीवनाच्या सुंदर स्वप्नात ते हरवुन जातात. त्यांच्या डोळयात त्यांची स्वप्ने तरळत असतात त्याला दिवसरात्रींचे भान नसते. कधी एकटेच हसतात शुन्यात पाहुन.
इतरजण मात्र थट्टा उडवतात पण यांना त्याची फिकीर नसते, त्यांच्या मनोविश्वात त्यांनी आधीच फक्त जोडीनं जगायला सुरुवात केलेली असते.
अय्या, खरंच असं
अय्या, खरंच असं होतं?

वाग्दत्त वधू मराठवाड्यातली असली की होतं की पुण्यातली?
लग्न ठरलंय म्हणून एकटाच हसत बसलेला पुरुष अजून पहाण्यात आला नाही.
मुलगी चालून येण्याची शक्यता
मुलगी चालून येण्याची शक्यता नसताना लग्न ठरलं तर तुम्हि म्हनता तस होवु शक्तं.
वाग्दत्त वधू मराठवाड्यातलीच
वाग्दत्त वधू मराठवाड्यातलीच असेल नाही?