दुबई / अबु धाबी सहल - भाग १

Submitted by दिनेश. on 21 August, 2014 - 06:55

मॉरिशियसचा जेट लॅग उतरलाही नव्हता आणि मी दुबईला निघालो. सोबत माझा मित्र डॉ. विवेक होता.
दुबईला तसा मी दर सहा महिन्यांनी जातच असतो, पण ते खुपदा केवळ ट्रांझिट मधेच असताना. यावेळी मात्र
शहरात जायचे होते.

दुबईत जायला हा सिझन योग्य नाही कारण या दिवसात तिथे कडक उन्हाळा असतो. अर्थात तिथल्या सोयी
बघता, त्याचा फारसा त्रास होत नाही म्हणा.

मी बाली हून परतलो ते विमान मुंबईच्या नव्या विमानतळावरच थांबले होते. पण आम्हाला बसने जून्याच
विमानतळावर आणले होते. मी परत आल्यानंतर काही दिवसांनी नवा विमानतळ सुरु झाला.

हा नवा छत्रपति शिवाजी सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ खुपच सुंदर रितीने सजवला आहे. त्याची झलक पण
बघू या.

१) एमिरेटस चा चेक इन काऊंटर

२) या स्टॉलवर खास गुजराथी पदार्थ मिळाले. ढोकळा, उंधीयु पुरी, तूरीया पात्रा वगैरे. सोबत ताक आणि मसाला चाय पण

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११) तिथे एक भलीमोठी गोधडी लावलीय.. मला त्यामागची संकल्पना खुप आवडली.

१२)

१३) हिच ती संकल्पना

१४)

१५)

१६) मराठी बाणा

१७) मॉडेल डॉ. विवेक -- त्याच्या डोळ्यात मी Happy

१८) दुबईचे प्रथम दर्शन

१९)

२०)

२१) हा फोटो एमिरेटस च्या हवाई सुंदरीने काढून दिला. ( ती खुप सुंदर होती. तिच्या परवानगीने तिचा फोटो मी
काढला आहे. पण मायबोलीवर टाकायला सेपरेट परवानगी न घेतल्याने तो देत नाही इथे ! )

२२) दुबई खाडी

२३) स्पॅनिश हॉटेल मेलिया मधे आम्ही राहिलो.. तिथली लॉबी

२४) ब्रेकफास्टला भरपूर व्हरायटी असायची..

२५)

२६)

२७) वादी हत्ताच्या वाटेवर

२८) या डोंगरावर चार चाकी माऊंटन बाईक चालवायची सोय आहे..

२९)

३०)

३१ ) मृगजळाचा फोटो काढायचा प्रयत्न

३२) इथेच टाका तंबू...

३३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जळवा रे बाबा अजून जळवा.:अरेरे::फिदी: मस्त रसभरीत फोटु आणी रसभरीत वर्णन. ब्रेकफस्ट ची डिश बघुन तोन्पासु झाले.

हवाई सुन्दरी सुन्दर होती? अहो त्या अरबी सुन्दर्‍या जात्याच अतीशय देखण्या असतात. अरेबीयन नाईटस मधल्या वाटाव्या एवढ्या सुन्दर.:स्मित: एमीरेटस मध्येच हा नजारा पहायला मिळाला. वाळवन्टाचे फोटु पण लई ग्वाड!

रश्मी.. आता जास्तीत जास्त देशातला सुंदर्‍या एका विमानात असतात. तितक्या भाषाही त्या बोलतात. त्यामूळे प्रवाश्यांची गैरसोय होत नाही.. नावाप्रमाणेच संदर असतात. ( उ. व्य.. कुठलेही एमेरेट्सचे विमान पकडा हो.. सुंदरच असतात त्या. )

आर्या.... ते दिसायला लागले कि दुबई आलेच, असे समजायचे. अनेक वर्षे बघतोय ते.

वॉव, हे फोटोज ही छान आहेत... मस्त!!
तुम्ही दोघांनी युनिफॉर्‍म का घातलाय ?? Lol
सुंदरी ला ही माहीत असेल्कि ती सुंदर आहे म्हणून तिने फोटो ही काढू दिला असेल आनंदाने.. Happy
दुबई ला जाणारच आहे एकदा.. ज्या दिवशी गोल्डसुक बंद असेल तेंव्हा घेऊन जाईल रम्मी म्हणतोय... Wink

ती खुप सुंदर होती. तिच्या परवानगीने तिचा फोटो मी
काढला आहे. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

मला ईमेल करा तो............. तिने मला ईमेल करण्याची परवाणगी दिली आहे Wink

अवांतराबद्दल क्षमस्व !

सगळेच फोटोज फार सुंदर आलेत. तुमचे फोटोवाले बाफ सहसा चुकवत नाही.
मृगजळाचा फोटो काढायचा प्रयत्न स्तुत्यच. पण एखादे फिल्टर हवे होते का ?(यातलं कळत नाही फार. चुभूदेघे)

वर्षू.. थोडे थांब तूला अरबी दागिन्यांचे पण फोटो दाखवायचे आहेत. खरे मोती (कल्चर्ड नाहीत, खरे खरे ) वगैरे.
आणि सुंदरी बाबत.. हजारो साल नर्गिस अपनी बेबुनियादीपर,, शेर ऐकला असशीलच !

उदयन... तीनजणी आहेत फोटोत... नेमक्या कुठलीने परवानगी दिली आहे ?

तो मृगजळाचा फोटो धावत्या गाडीतून काढलाय... फोकस करेपर्यंत कमी झाले नाहीतर त्या ट्रकचे पूर्ण प्रतिबिंब दिसत होते.

अमेय.. आणखी बरेच यायचेत !

दा, अप्रतीम फोटो,,,
ती खुप सुंदर होती+++ तीला न बघताही मला पटतय, तुम्हा दोघांचा फोटो बघुन.. Happy
तुम्हा दोघांचा फोटो पण छान आलाय...

आभार दोस्तांनो.. खरं तर तूम्हाला फोटो दाखवल्याशिवाय मलाच समाधान मिळत नाही.

रॉबीन Happy

मी आबुधाबी ला गेले नाहीये. पण दुबईला गेलेय. या वाळवंटात सफरी असतात ती केलेय. त्यात वाळवंटात चार चाकी बाईक चालवणे, जीपमध्ये बसून सँड्ड्युन बॅशिंग करणे, उंटावरून रपेट मारणे, बेली डान्स बघणे आणि मग मस्त जेवण.

आम्ही ऐन रमदान मधे गेलो होता ना, म्हणून बेली डान्स नसायचा.. म्हणून डेझर्ट सफारी केली नाही.
आधी केलीय.. या वेळेस वेगळ्या वाटा !

Pages

Back to top