पावसा पावसा

Submitted by सोनू. on 13 August, 2014 - 09:18

खूप दिवसांनी माझी अन्यत्र प्रकाशित कविता वाचली. खूप छान वाटलं वाचताना. इथे चिकटवतेय.

(चालः आता तरी देवा मला पावशील का? रूप ज्याला म्हनतात ते दावशील का)

आता तरी पावसा तू थांबशील का? ऊन ज्याला म्हणतात ते दावशील का

पाण्याने या मैदाने ही तळी दिसती, रस्ते जणु चहुकडे नद्या धावती
चालावे की पोहावे ते सांगशील का? ऊन ज्याला म्हणतात ते दावशील का

लोकलही थांबली ती रुळावरती, बसमध्ये माणसे ही ओथंबती
ऑफिसला कसे जावे सांगशील का? ऊन ज्याला म्हणतात ते दावशील का

कायमचा निघुन जा सांगत नाही, वेड्यापरी नको अशी पाहिजे हमी
मधीमधी नुसताच पडशील का? ऊन ज्याला म्हणतात ते दावशील का

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users